क्रांती.....
आपणच जेव्हां दगड बनतो
तेव्हां कोणीहि उपटसुंभा क्रांतिसूर्य होतो
आणि भिरकावतो आपल्याला
कोणाच्या तरी घरावर
सार्वजनिक मालमत्तेवर
कारण त्याला वाटत असते
विध्वांस म्हणजेच क्रांती...!
पण दगडालाच पंख फुटले
अन घेतली झेप त्याने स्वबळावर
मोकळ्या आकाशात
कुठल्याश्या हिरव्या गार फांदीवर
बसला गात.... तर..?
वाटतं क्रांती म्हणजे असच काहीसं
कि...
दगडांनाही पंख फुटुन
पक्षी होउन उडावं..
पर्वतांनी वितळून
नदी होउन वहावं..
नगरातील प्रेतांनी
अचानक उठावं
मुठी वळवून चालावं..
मानातील तटबंदीनी
पडदे होउन झुलावं...
क्रांती म्हणजे असच
काहिस असावं..
मला खात्री आहे
असं नक्की होइल....!
कारण अजुनही माझा श्वास चालु आहे
आणि माझ्या श्वासावर माझा विश्वास आहे
मुंगी उडाली आकाशी
तिने गिळले सुर्यासी
याचा अर्थ हाच असावा..
क्रांती!!!
लेखनविषय:
याद्या
1799
प्रतिक्रिया
6
Taxonomy upgrade extras
मिसळपाव
आवडली
मस्त!
छान
जबरा
एकदम मस्त..
मस्त,