परवा एकदा आंतरजालावर भटकत असताना स्प्रिंग ओनियन राईस अश्या नावाची पाककृती दिसली. उत्सुकता म्हणून ती कृती वाचली आणि करुनही बघावीशी वाटली. त्या कृतीच्या आधारे त्यात काही बदल करुन मी तो भात केला, त्याची चव आवडल्याने तुम्हा सर्वांसाठी मी त्याची कृती देत आहे.
साहित्य:-
१ वाटी बासमती तांदूळ
२ वाट्या पाणी
१ जुडी कांद्याची पात स्वच्छ धुवून, बारीक चिरुन
१ मोठा चमचा हरभर्याची डाळ
१ मोठा चमचा उडदाची डाळ
१ छोटा चमचा धने
१ छोटा चमचा जिरे
२ मोठे चमचे कोरडं खोबरं
७-८ काजू पाकळ्या
३-४ सुक्या लाल मिरच्या
५-६ कडिपत्त्याची पाने
चवीनुसार मीठ
फोडणीचे साहित्यः- तेल, मोहरी, हिंग.
कृती:-
१ वाटी तांदूळाचा २ वाट्या पाणी घालून भात फडफडीत शिजवून घ्यावा. भात झाल्यावर एका ताटात मोकळा करून ठेवावा.
एका कढल्यात अगदी थोडेसे तेल घालून त्यात हरभर्याची डाळ, उडदाची डाळ, धने, जिरे, कोरडं खोबरं, लाल मिरच्या आणि कडिपत्त्याची पाने असे वेगवेगळे खमंग भाजून घ्यावे. गार झाल्यावर हे जिन्नस एकत्र करून मिक्सरमधून त्याची पूड करुन घ्यावी.
एका भांड्यात फोडणीसाठी तेल गरम करुन घ्यावे. तेल तापले की त्यात मोहरी, हिंग घालावे. त्यात काजूच्या पाकळ्या घालून त्या लाल होईपर्यंत परताव्यात. त्यात चिरलेली कांद्याची पात घालून २-३ मिनिटे परतून घ्यावी. आता त्यात मिक्सरमधून वाटलेली पूड आणि मीठ घालावे. चांगले परतून घ्यावे. आता या मिश्रणात शिजवून मोकळा केलेला भात घालावा. हलक्या हाताने, शिते मोडणार नाहीत याची काळजी घेऊन ढवळावा. बारीक गॅसवर २-३ मिनिटे परतून घ्यावा.
हा झाला कांद्याच्या पातीचा भात तयार! गरमागरम भाताचा आस्वाद घ्यावा. खाताना आवडत असल्यास वरुन २-३ थेंब लिंबू पिळून घ्यावे. ती चवही छान लागते. :)
--शाल्मली.
कांद्याच्या पातीचा भात


वाचने
9465
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त दिसतो
फोटोवर्ला
मस्तच
छान!!!
झक्क्क्क्
कांद्याच्
प्रतिसादा
In reply to कांद्याच् by मदनबाण
फारच
सुरेख
मस्त
मी पण
वाह!
हा भात मी
छानच ग...
मस्त..
मस्तच ......
फरक
In reply to मस्तच ...... by वेताळ
शंका
In reply to फरक by शाल्मली
खमंग पाकृ!
फोटु जबरा!
आज केला हा भात
आज केला
+१
In reply to आज केला by रेवती
धन्यवाद!
झकास