राम राम मिपाकर...
एक ऑक्टोबरला अजून एक-दोन दिवस बाकी आहेत. पण, लिहित्या हातांना प्रोत्साहन दिले गेले पाहिजे, हे आपलं पहिल्यापासूनच धोरण आहे. पाहा संदर्भ जुने धागे. तर, काही मित्रांचं सुरू झालं, सर, चालू घडामोडीचा धागा काढा. तर, आपल्याला मिपाकर मित्रांचे आग्रह मोडता येत नाहीत.
तर मित्रांनो, यावेळी पाऊस कमीच झाला. दुष्काळी तालुक्यांची नावे जाहीर झाली. आपला तालुका राहिला, आपल्यावर अन्याय होतोय म्हणून कार्यकर्ते नेत्यांच्या मागे लागलेत. शेतीसाठी पाण्याची गरज, पिण्याचे पाणी, शेतीचे कर्ज, कर्जमाफी हे नियमितच विषय झाले आहेत. त्यावरही बोलू काही.
श्रीगणेशोत्सव शांतपणे, कमी आवाजात साजरा झालाय. गणपती बाप्पाची आठवण अजून आहेच. आता दुर्गोत्सव पण दिसायला लागला आहे. आमच्याकडे गल्लीत श्रीगणेशाचं स्टेज देवीसाठी तसंच ठेवलं आहे. आता वर्गणीवाले सुरू होतील, दांडिया रंगेल, काही अशा-काही तशा बातम्या येतील. उत्साह महत्त्वाचा. परंपरा, श्रद्धा वगैरे आणि देवीच्या कथा-आख्यायिका, त्यावरही काही बोलूया.
दुसरीकडे, निवडणूक आयोगाच्या कारभारावर चर्चा सुरू आहे. मतदार वगळणे, अन्याय आणि निवडणूक आयोगाने घेतलेले निर्णय, तसेच पक्षीय आरोप-प्रत्यारोप सुरू झालेले आहेत. निवडणूक आयोगाची स्वायत्तता, प्रत्यक्ष अंमलबजावणी, निर्णयप्रक्रियेतील पारदर्शकता, पक्षीय भूमिका आणि शेवटी असलेला मतदार मतदान केंद्रापर्यंत पोहोचला पाहिजे, यावरही चर्चा करू.
कॉकरोच जनता पार्टीचं निवडणूक आयोगाच्या धोरणाविरुद्ध आंदोलन सुरू होणार आहे, अशा बातम्या येत आहेत; पण त्यापूर्वीच आंदोलन पोकळ व्हावे, पूर्वीसारखं काही होऊ नये म्हणून वेगवेगळ्या क्लुप्त्या सुरू झालेल्या आहेत. दोन ऑक्टोबरला मुंबैतील दादरच्या शिवाजी पार्क येथे निवडणूक आयोगाच्या कारभाराविरुद्ध आंदोलन करण्यासाठी कॉकरोच जनता पार्टीने पोलिसांकडे परवानगी मागितल्याची बातमी होती आणि आंदोलन कायदा-संविधानाला अनुसरून शांततापूर्वक राहील, असे कॉकरोच जनता पार्टीने म्हटले आहे. सीजेपीचं प्रेशर ग्रुप म्हणून काम करणे पुढे कसे सुरू राहील, ते भविष्यात कुठे जाईल, त्यावरही बोलू...
तर, काथ्याकूट शांततेच्या मार्गाने, मिपाच्या धोरणानुसार, एकमेकांच्या मतांचा आदर करत सुरू राहील, अशी अपेक्षा व्यक्त करतो.
स्वागत आहे. शुभेच्छा.
मिसळपाव
प्रतिक्रिया
पदवीधर निवडणूक
पदवीधरांनी महाविकास आघाडीच्या पारड्यात तीन जागा दिल्या. पुणे पदवीधर हर्षदा देशमूख -जाधव, डॉ.प्रतापसिंह पाटील, छ. संभाजीनगर ( राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट ) तर, नागपूर पदवीधर मधून कॉंग्रेसचे अभिजित वंजारी विजयी झाले. तरुण ( जेन झी ) यांनी सरकार विरोधात मतदान केलं.
शिक्षक़ मतदार संघात दोन्ही जागा महायुतीने जिंकल्या. कौस्तुभ गावडे ( भाजप ) किरण सरनाईक ( शिवसेना -एकनाथ शिंदे गट ) विजयी झाले.
सर्वांचे अभिनंदन. आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा.
-दिलीप बिरुटे
विद्यार्थी आंदोलनाला यश
दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया (JMI) विद्यापीठात विद्यार्थी संघटनेच्या पुनर्स्थापनेसाठी गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते.
विद्यापीठातील विद्यार्थी संघटना (Jamia Millia Islamia Students' Union – JMISU) २००६ मध्ये बरखास्त करण्यात आली होती. त्यानंतर जवळपास दोन दशकांपासून विद्यार्थी संघटनेच्या निवडणुका झाल्या नव्हत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रश्नांसाठी आणि समस्यांसाठी विद्यापीठ प्रशासनासमोर लोकशाही पद्धतीने निवडून आलेले प्रतिनिधित्व मिळत नव्हते.
विद्यार्थी संघटनेची पुनर्स्थापना करावी, विद्यार्थी संघटनेच्या निवडणुका घ्याव्यात आणि निवडणुकांसाठी निश्चित कालमर्यादा जाहीर करावी, या प्रमुख मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी १२ ऑक्टोबर २०२६ पासून आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनात धरणे, निदर्शने आणि उपोषणाचाही समावेश होता.
अखेर २९ ऑक्टोबर २०२६ रोजी विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या मागण्यांसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.
विद्यापीठाने विद्यार्थी संघटनेच्या संविधानाच्या अंमलबजावणीला मंजुरी देत ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी १५ मे २०२७ ही अंतिम मुदत निश्चित केली आहे. तसेच, आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना आंदोलन तातडीने मागे घेण्याचे निर्देश दिले आहेत.
विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण संघर्षानंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय समोर आला आहे.
विद्यार्थ्यांचे संघटन, लोकशाही प्रतिनिधित्व आणि आपल्या हक्कांसाठीचा संघर्ष यांचे हे एक महत्त्वपूर्ण उदाहरण आहे.
जामिया मिलिया इस्लामियाच्या सर्व विद्यार्थी मित्र-मैत्रिणींचे मनःपूर्वक अभिनंदन.
-दिलीप बिरुटे
इस्त्रायल मधे निवड्णूक घोटाळा ?
इस्रायलमध्ये ‘किंगमेकर’ ठरू शकणाऱ्या अरब नेतृत्वाखालील गटांवर पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी मतदारांना लाच दिल्याचा, निवडणूक चोरल्याचा आरोप केला आहे.
निवडणुकीच्या प्राथमिक निकालांनुसार नेतान्याहू यांच्या पक्षाला ५३ जागा तर माजी लष्करप्रमुख गाडी आयझेनकोट यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला ४८ जागा मिळाल्या आहेत. अरब पक्षांना १८ जागा प्राप्त झाल्या आहेत. १२० सदस्यांच्या नेसेट या इस्रायली संसदेत कोणालाही बहुमत न मिळाल्याने अरब नेतृत्वाखालील गट किंगमेकर ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
-दिलीप बिरुटे
एक दुरुस्ती -- अरब गटाला १९…
एक दुरुस्ती -- अरब गटाला १९ जागा मिळाल्या आहेत. म्हणजेच त्यांच्या २१ % लोकसंख्येत त्यांना भरपूर प्रतिनिधित्व आहे. इस्रायलच्या विरुद्ध जातायेता आरडा ओरडा करणार्यांनी हे ध्यानात घ्यावे अशी नम्र विनंती आहे.
अरब गट किंग मेकर असण्याची शक्यता फार कमी आहे कारण बाकी दोन्ही गटांना त्यांची मदत घेणे असून अडचण आणि नसून खोळंबा सारखी स्थिती आहे.
अरब गट बिबीला पाठिंबा देण्याची शक्यता मुळातच कमी आहे.
दुसऱ्या गटाने त्यांचा पाठिंबा घेतला तरी अरब गट आपली किंमत वसूल करतील आणि मध्यावधी निवडणूक झाल्या तर आयसेनकोट याना इतर ज्यू मतदार दुरावतील अशी भीती आहे. त्यामुळे ते अरब गटांचा पाठिंबा घेण्याबद्दल कचरत आहेत.
एकंदर पुढच्या वर्ष दीड वर्षात इस्रायलमध्ये फेर निवडणूक होतील असेच वाटते.
जाता जाता - अख्ख्या मध्यपूर्वेत ज्यू लोकांना एक ही देश अंशतः सुद्धा प्रतिनिधित्व देताना दिसत नाही.
दुरुस्ती.
In reply to एक दुरुस्ती -- अरब गटाला १९… by सुबोध खरे
>>>> एक दुरुस्ती -- अरब गटाला १९ जागा मिळाल्या आहेत.
मिपा संपादकांनी माझ्या प्रतिसादात कृपया दुरुस्ती करावी, विनंती.
-दिलीप बिरुटे
याशिवाय आयसेनकोट यांनी…
याशिवाय आयसेनकोट यांनी अरबांशी हात मिळवणी करणायचा प्रयत्न केल्यास त्यांच्या युतीतील एखादा पक्ष फुटून नेतान्याहू यांच्याशी हातमिळवणी करतील हा शक्यता जास्त आहे.उदा. पूर्व पंतप्रधान नफताली बेनेट यांच्या कडे ८ जागा आहेत ते मिळून नेतान्याहू यांच्याकडे ६१ जागा( बहुमतासाठी किमान आवश्यक) होतात.
कारण इस्रायलच्या बहुतांश ज्यू लोकांना सत्तेच्या चाव्या अरबांच्या हाती जाणे हि ज्यूंच्या अस्तित्वालाच धोका निर्माण करणारी घटना वाटते.
यामुळे अरब युती किंग मेकर बनण्याची शक्यता मला तरी फारच कमी वाटते.
अरब पक्षाची भूमिका...
In reply to याशिवाय आयसेनकोट यांनी… by सुबोध खरे
नेत्यान्याहू यांना सत्तेत येण्यापासून रोखणे ही पहिली भूमिका असेल, त्यामुळे नेत्यान्याहू सत्तेत येणे शक्य वाटत नाही. इस्त्रायलमधे अरब नागरिकांचे अधिकार कोण सुरक्षित करेल त्याला ते प्राधान्य देतील, व्यवस्थेत त्यांचा प्रवेश, आणि अरब समाजाच्या विकासासाठी ठोस पावले कोण उचलतील त्याला पाठींबा देतील.
इस्रायली ज्यू लोकांना सत्तेच्या चाव्या अरबांच्या हाती जाणे जवळ जवळ मान्य नसेल, असे समजणारे किती लोक आहेत ? आणि भविष्यात अरबांचे काय काय होते, जागतिक राजकारणा-च्या मंचावर याही देशात बरीच उलथापालथ आणि त्याचबरोबर इस्त्रायलची राजकीय दिशा भविष्यात कळेलच.
-दिलीप बिरुटे
इस्रायली ज्यू लोकांना…
In reply to अरब पक्षाची भूमिका... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
इस्रायली ज्यू लोकांना सत्तेच्या चाव्या अरबांच्या हाती जाणे जवळ जवळ मान्य नसेल, असे समजणारे किती लोक आहेत.
इस्रायल मध्ये निदान ९० % तरी ज्यू लोक तसे आहेत.
फेक्युलर, लिबरल वगैरे ज्यू लोक इस्रायलमध्ये राहत नाहीत. तर युरोप अमेरिकेत राहतात.
मुळात गादी आयसेनकोट याना सुद्धा अरब पक्षांचा पाठिंबा फारसा मान्य असेल असे वाटत नाही. त्यांचा विरोध नेतान्याहू यांच्या धोरणाला आहे याचा अर्थ असा नव्हे कि ते अरबांची दाढी धरतील.
बापाच्या आयुष्यभराच्या मेहनतीवर पाणी फिरवून सत्तेत येण्यासाठी काहीही करतील असे लोक आपल्याकडे फार दिसतात.
अरबांनी बिनशर्त पाठिंबा दिला तरच कदाचित ते सरकार बनवतील.
गादी आयसेनकोट यांचे दाहीये डावपेच "Dahiyeh doctrine"वाचला तर आपल्याला लक्षात येईल. हिझबुल्लाह च्या इमारती बांधकामे इ पायाभूत सुविधा जमीनदोस्त करा म्हणजे त्यांना कुठंही लपता येणार नाही आणि ते शरण येतील हा विचार त्यांनी इस्रायली लष्कराच्या उत्तर विभागाचे प्रमुख असताना पुरस्कार केला होता
संयम ठेवायचा
In reply to इस्रायली ज्यू लोकांना… by सुबोध खरे
>>>>>इस्रायल मध्ये निदान ९० % तरी ज्यू लोक तसे आहेत.
आत्ताच चॅटजीपीटी आणि गुगलवर शोधत होतो.
मिळालेले आकडे खालीलप्रमाणे आले.
पारंपरिक पण कमी धार्मिक २० %
पारंपरिक धार्मिक १४ %
राष्ट्रीय धार्मिक १३%
अतिधार्मिक हरेदी ५%
तर, धर्मनिरपेक्ष ज्यू ४४ %
-दिलीप बिरुटे
धर्मनिरपेक्ष अरब किती आहेत?…
In reply to संयम ठेवायचा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धर्मनिरपेक्ष अरब किती आहेत?
इस्रायल मध्ये किंवा संपूर्ण मध्यपूर्वेत
Israel is formally a secular democracy.
There is no Arab country that is officially or purely secular in the strict sense of a total separation between religion and the state.
भक्त किती धर्मनिरपेक्ष...
In reply to धर्मनिरपेक्ष अरब किती आहेत?… by सुबोध खरे
धर्मनिरपेक्ष अरब किती आहेत? हाच प्रश्न बदलून विचारला की,
गोबरभक्त किती धर्मनिरपेक्ष आहेत ? याचं उत्तर काय देता येईल ?
-दिलीप बिरुटे
इस्रायल अरब वादात गोबर…
In reply to भक्त किती धर्मनिरपेक्ष... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
इस्रायल अरब वादात गोबर आणण्याचे प्रयोजन समजले नाही!
कायम पोटात असलेले ओठावर यायला फार वेळ लागत नाही असे म्हणतात!
टुनिशिया
In reply to धर्मनिरपेक्ष अरब किती आहेत?… by सुबोध खरे
टुनिशिया
अरब गटाला १९ जागा मिळाल्या…
अरब गटाला १९ जागा मिळाल्या आहेत. म्हणजेच त्यांच्या २१ % लोकसंख्येत त्यांना भरपूर प्रतिनिधित्व आहे. इस्रायलच्या विरुद्ध जातायेता आरडा ओरडा करणार्यांनी हे ध्यानात घ्यावे अशी नम्र विनंती आहे. >>>मुस्लिम लोकं इतर धर्मीय बहुसंख्य असलेल्या देशात राहू शकतात पण हेच उलट सहजा सहजी शक्य नाही होत. साम दाम दंड भेद वापरून इतर लोकांना लक्ष केलं जात.
इस्त्रायल मुळात अरबांचे आहे …
In reply to अरब गटाला १९ जागा मिळाल्या… by रात्रीचे चांदणे
इस्त्रायल मुळात अरबांचे आहे ज्यू नंतर आले आणि दादागीरी करून राहत आहेत.
इस्त्रायल मुळात अरबांचे आहे …
इस्त्रायल मुळात अरबांचे आहे ज्यू नंतर आले
वाचन वाढवा .
पाच हजार वर्षांपासून ज्यू तेथे राहत आले होते.
अगदी बायबल मध्ये सुद्धा इस्राएल चा उल्लेख आहे.
अरबांनी त्यांना हाकलून दिले तरी "पुढच्या वर्षी जेरुसलेम" हे काव्य गात त्यांनी आपल्या पवित्र भूमीची आठवण आपल्या मनात तेवत ठेवली होती.
शेवटी १९४८ साली आपले राष्ट्र निर्माण केले आणि अविरत प्रयत्नांनी आणि कायम लढा देत भरभराटीला आणले.
सगळ्या अरबांनी केवळ त्याचा द्वेष केला पण स्वतःला काही सुधारले नाही. केवळ जमिनीत मिळणाऱ्या तेलावर राजकारणं केली.
कुठल्याही परिस्थितीत अरब…
कुठल्याही परिस्थितीत अरब पक्षांचा पाठिंबा कितीही हाडवैर असलेले स्वत:ला ज्यू म्हणवणारे पक्ष घेतील असे वाटत नाही.
दिल्लीत उद्या महामोर्चा...
एखाद्याला आपली पिछेहाट होतेय का असे वाटायला लागले की, प्रत्युत्तर द्यायची घाई होऊन जाते, त्याबाबतची उद्या अशीच एक घटना होत आहे. मतदार याद्यातील कथित अनियमितता अर्थात मतचोरीचा आरोप आणि निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरावलोकन प्रक्रियेच्या बाबतीत विरोध म्हणून मुख्य विरोधी पक्ष १ नोव्हेंबर रोजी दिल्लीत दोन मोर्चा काढणार आहे, आजपासून तुडूंब गर्दी दिल्लीत व्हायला लागली आहे. कॉग्रेस नेते राहुल गांधी आणि विरोधी पक्षातील मुख्य नेते या आंदोलनात सहभागी होणार आहे. महामोर्चा रामलीला मैदानावर होणार आहे, सायंकाळी पाच वाजेपर्यंत आंदोलन संपवणे बंधनकारक आहे.
दुसरीकडे, ऑक्टोबर २०२६ मध्ये महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष फेरतपासणी (SIR) संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने निवडणूक आयोगाला (ECI) धारेवर धरत विचारले: "ज्या राज्यांमध्ये सध्या निवडणुका सुरू नाहीत, तिथे ही प्रक्रिया पूर्ण करण्याची एवढी घाई का केली जात आहे?" असे विचारले.
कोर्टाच्या भूमिकेनंतर निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील या प्रक्रियेच्या वेळापत्रकात काही बदल केले आहेत. दावे आणि हरकती घेण्याची मुदत वाढवण्यात आली असून, अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याची तारीख आधीच्या वेळापत्रकापेक्षा पुढे ढकलून १६ नोव्हेंबर २०२६ अशी करण्यात आली आहे
उद्याच्या मोर्चाच्या निमित्ताने दिल्लीच्या काही व्यापा-यांना हाताशी धरुन मोर्चा पुढे ढकलावा आमचे नुकसान होत आहे, वगैरे सत्ताधारी भाजपाने प्रयोग करुन बघितला त्यावर राहुल गांधी यांनी-
दिल्लीच्या प्रत्येक व्यापाऱ्याला, उद्देशून आम्ही तुमच्यावर प्रेम करतो आणि तुमचे म्हणणे ऐकत आहोत. व्यापाऱ्यांच्या नुकसानीसाठी सरकारला जबाबदार धरले. ते म्हणाले, "मेट्रो सरकारने बंद केली, रस्ते सरकारने सील केले आणि राजधानीला टाळेही सरकारनेच ठोकले." जेव्हा देशात मतचोरी होते, तेव्हा काहीही सुरक्षित राहत नाही. ना तुमची दुकानं, ना तुमची बचत, ना तुमच्या मुलांचे भविष्य." त्यांनी स्पष्ट केले की, "मोदीजींना सांगा की त्यांनी , ज्ञानेश कुमार (मुख्य निवडणूक आयुक्त) यांना हटवावे, आंदोलन ३० सेकंदात थांबेल.
आता हे प्रयोग यशस्वी होत नसल्याचे लक्षात येताच भाजपाने प्रत्युत्तर मोर्चा काढायचे ठरवले आहे. सारांश उद्याचा दिवस दिल्लीत मोर्चाचा आहे. ः)
-दिलीप बिरुटे
प्रत्युत्तर मोर्चाला मोठा…
In reply to दिल्लीत उद्या महामोर्चा... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रत्युत्तर मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला तर व्यापाऱ्यांचं नुकसान होणार नाही का?
भाजप कार्यकर्ते बनले व्यापारी ?
In reply to प्रत्युत्तर मोर्चाला मोठा… by रामचंद्र
मला वाटलं खरंच व्यापारी आहेत की काय सगळे बनावट भाजपा कार्यकर्ते व्यापारी बनून प्रतिक्रिया देत होते. कमीत कमी नाटक प्रॉपर व्हायला पाहिजे. पण मोदी सरकारच्या दुर्दैवाने सगळी नाटकं उघड़ी पडत आहेत. =))
बाय द वे, त्यांच्या मोर्चाने काही परिणाम नाही होत कोणावर..
-दिलीप बिरुटे
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणातली…
In reply to दिल्लीत उद्या महामोर्चा... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणातली पुढली सुनावणी २ नोव्हेंबरला आहे असं वाचलं. म्हणून तर मोर्च्यासाठी १ तारीख निवडली असेल का बरं?
National Herald मधून यंग…
In reply to दिल्लीत उद्या महामोर्चा... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
National Herald मधून यंग इंडियाला ट्रान्सफर केलेले पैसे केव्हाच जप्त केले आहेत. आता ते कायदेशीर आहेत हे सिद्ध करण्याचे काम आरोपींवर आहे.
मत वाचवा देश वाचवा...
दीड व्ररशापासून मतदार याद्यांच्या विशेष सखोल पडताळणीविरोधात (एसआयआर) विरोधी पक्षांमध्ये उमटलेला विरोधाचा आवाज रविवारी रामलीला मैदानावर आणखी बुलंद झाला. निवडणुकांमध्ये 'मतचोरी' झाल्याचा आरोप करून, विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीने 'एसआयआर' विरोधात रणशिंग फुंकले.
'निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेशकुमार 'देशद्रोहा' च्या आरोपाखाली पदाचा राजीनामा देऊन तुरुंगात जातील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही 'कायदेशीर कारवाई' केली जाईल,' असा पुनरुच्चार काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. या सभेद्वारे 'इंडिया'ने मोठे शक्तिप्रदर्शन केले.
भाजपनेही प्रत्युत्तरात मोर्चा काढला.
-दिलीप बिरुटे
रामलीला मैदानावरील इंडिया…
रामलीला मैदानावरील इंडिया आघाडीच्या सभेमुळे आजुबाजुच्या व्यापारांचे नुकसान होणार होते ते टळले . राहूल गांधीनी सभेला येणाऱ्या लोकांना ह्या मार्गावरील व्यापाऱ्यांकडून खरेदी करण्याचे आवाहन केले होते परंतू ह्या सभेला १०० लोकंही उपस्थित नव्हते , गिऱ्हाईक नसल्याने शेवटी व्यापाऱ्यांनी स्वतःहून दुकाने बंद केली. हि दुकाने बीजेपी कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्यांना धमकावून बंद केली हि अफवा होती
हा हा
In reply to रामलीला मैदानावरील इंडिया… by आग्या१९९०
प्रत्युत्तर रॅलीला 'मोठी गर्दी' होती आकडा सांगायला गेले की पंचायत होत होती म्हणे. महामोर्चाला लाखभर लोक आले ही सुद्धा अफवाच असावी, रीकाम्या खुर्च्या दाखवण्याचा गोदी मिडियाने पूर्ण प्रयत्न केला म्हणून जमले म्हणे. संदीप बातरा म्हणे चाळीस टक्के मैदान रिकामे होते, दहा लाख लोक येणार होते, तेवढी संख्या नव्हती. बाय द वे, या अराजक आंदोलनाला चीनकडून फंडींग होत आहे, असे मा. मुख्यमंत्री ( राज्य महाराष्ट्र ) यांनी आरोप केला. असंच वातावरण राहिलं तर, गोबरसत्ता जाते असे वाटायला लागले आहे.
-दिलीप बिरुटे
राम लीला मैदानावर १० लाख लोक…
राम लीला मैदानावर १० लाख लोक येणार होते पण पन्नास हजारच आले.
चालायचंच.
त्यातून काँग्रेसने "आपल्या एन एस यु आय च्या " युवकांच्या ऐवजी "ए आय एस ए" च्या वाममार्गी नेहा बोराला मंच उपलब्ध करून दिल्यामुळे काँग्रेस मध्ये धुसफूस वाढली आहे.
त्यावर खर्गे साहेबानी लोकांना धमकी दिली कि ते शांत बसले तर पाच मिनिटात भाषण संपवतील अन्यथा तास भर भाषण करून लोकाना काव आणतील.
आता असे वक्ते असल्यावर भविष्यात कोण कशाला भाषणाला येईल?
शेठला किती धोका आहे ?
In reply to राम लीला मैदानावर १० लाख लोक… by सुबोध खरे
विरोधी पक्षाचं कामच असतं की सत्ताधा-यांच्या चिमटे घेणे बाय द वे,
डाक्टर, येत्या निवडणूकीत शेठच्या पक्षाला किती धोका आहे ?
बाय द वे, कुंभमेळ्याच्या उद्घाटनाला मा. राष्ट्रपती
आणि संसदेच्या उद्घाटनाला मा. पंतप्रधान
योग्य विश्लेषण करा.
-दिलीप बिरुटे
रामलीला मैदानाचे क्षेत्रफळ…
In reply to राम लीला मैदानावर १० लाख लोक… by सुबोध खरे
रामलीला मैदानाचे क्षेत्रफळ 48 हजार स्क्वेअर मीटर आहे त्यात फक्त अर्ध्या मैदानात खुर्च्या लावल्या होत्या याशिवाय दोन्ही बाजूला रस्ते सोडले होते. कोणत्याही परिस्थितीत 20,000 पेक्षा जास्त लोक तिथे येऊ शकत नव्हते. या रॅलीचे फ्लॉप होण्याचा इतका विश्वास होता की सेंट्रल पार्क मधली दिवाळी पहाट हा कार्यक्रम रद्द झाला नाही लोकांनी दहा वाजेपर्यंत सुदेश भोसले आणि इतरांच्या गायनाचा आनंद घेतला.
डाक्टर, येत्या निवडणूकीत…
डाक्टर, येत्या निवडणूकीत शेठच्या पक्षाला किती धोका आहे ?
जोवर रागा विरोधी पक्ष प्रमुख आहेत तोवर मोदींना कसलीच भीती नाही.
दर महिन्या दोन महिन्यांनी गुपचूप परदेशात जाणार नेता सामान्य लोकांना अजिबात मान्य होत नाही.
कालच आमचा बिहारी भाजीवाला ( याचे नाव सुद्धा लालू यादवच आहे) स्वच्छपणे म्हणाला अखिलेश आणि तेजस्वी यादव जोवर राहुल बाबा का साथ नही छोडते तब तक उनको चुनाव जीतना मुश्किल है. (हे यादव लोक आपल्या जातीला धरूनच असतात आणि तसेच मतदान करतात. हा "रा ज द" ला मतदान करायला मुंबईतून बिहार मध्ये सिवान येथे गेला होता )
तळागाळातील लोकांना राहुल गांधींच्या एकंदर राहणी मान आणि आचार विचारांबद्दल आणि त्यानी एकंदर मारलेल्या कोलांट्या या बद्दल अजिबात ममत्व वाटत नाही. त्यांच्या विदेशी मातेबद्दल लोकांना फारसे ममत्व दिसत नाही.
असेच मुंबईतील बहुसंख्य चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे मत दिसले. यात तिवारी नावाचा फळवाला, मौर्य आणि विश्वकर्मा हे सुतार आणि इलेकट्रीशियन पण येतात.
याउलट श्री मोदी यांच्याबद्दल सामान्य माणसांना नक्कीच जास्त आदर आहे. भारतीय जनमानसात वैराग्य आणि संन्यस्त माणसांबद्दल एक उच्च प्रतीचा आदर असतो.
श्री मोदी किंवा योगी यांच्याबद्दल सामान्य माणूस अगदी सहज बोलताना आढळतो कि इनका क्या है? ना कोई आगे है ना कोई पीछे है! झोला उठा के चल देंगे! मार्च २०२५ मधेय लखनौ ला आणि २०२६ एप्रिल मध्ये मी अयोध्या आणि वाराणसी येथे गेलो असताना योगी आदित्यनाथ आणि श्री मोदी यांच्या बद्दल तेथील सामान्य लोकांना प्रचंड आदर आहे हे सहज दिसून आले.
बाकी मराठी माणसांचे विचाराल तर तुरळक अपवाद सोडले सामान्य शिवसैनिकांना उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाला दिलेली तिलांजली पटलेली नाही. त्यातून संजय राऊत यांच्या बेफाट वक्तव्य करण्या मुळे बहुसंख्य शिवसैनिक नाराजच आहेत. त्यांच्या पेक्षा एकनाथ शिंदे न बोलून शहाणे ठरले असे स्पष्टपणे दिसते.
तुलनात्मक अभ्यास हवा..
In reply to डाक्टर, येत्या निवडणूकीत… by सुबोध खरे
आपला वरील प्रतिसाद वाचला भावनिक जास्त आहे, कोणत्याही पक्षाचे नेतृत्त्व कायम बदलत असते, बदल होत असतो. राहुल गांधी यांच्याकडे कॉग्रेस पक्षाची धुरा आहे, प. मोदी लाटेत अनेक पक्षांची वाताहात झाली, हे नाकारताच येत नाही. २०१४ पूर्वी लोकसभेत कॉंग्रेसचे २०९ खासदार होते, पुढे कांग्रेस विरुद्ध वातावरण आणि प. मोदी यांच्या नव्या नेतृत्त्वाची नवी लाट होती, त्या लाटेत कॉग्रेसला फटका बसला. यूपीए सरकारविरोधातील भ्रष्टाचाराचे आरोप, नरेंद्र मोदी यांची आक्रमक प्रचारशैली, काँग्रेस नेतृत्वाबाबत जनतेमध्ये निर्माण झालेली नाराजी, राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह, उत्तर भारतातील काँग्रेसचा जनाधार कमी होणे, प्रादेशिक पक्षांशी योग्य राजकीय समन्वयाचा अभाव अशी अनेक कारणे काँग्रेसच्या वाताहतीची होतीच ते नाकारता येत नाही, कॉग्रेसला ४४ जागा मिळाल्या. पक्ष पुढेही सावरला नाही. पुढच्या २०१९ च्या निवडणूकीत ५२ सीट्स मिळाल्या. येथून कॉग्रेस पक्ष नेतृत्त्वात सुधारणा झाली पुनरागमन म्हणू या २०२४ ला ९९ सीट्स मिळाल्या.
आता सध्याचा विरोधी पक्ष आणि राहूल गांधी यांनी मिळून भाजपा विरोधात वातावरण केले आहे, आता हे नाकारता येत नाही. आता येत्या निवडणूकीत त्यांच्या सीट्स कमी होतील असे कोणीही म्हणनार नाही ( अंधभक्त सोडून ) ४४, ५२, आणि ९९ यापुढे ही संख्या वाढत जाणार आहे.
भाजपा यापुढे अजून गोंधळात जाईल असे वाटते आता लोकांना देण्यासारखे मुद्दे नाही. राम कृष्ण, यावर आता निवडणूका जिंकता येणार नाही. हिंदू-मुस्लीम हाही मुद्दा आता लोकांना कळला आहे, नव्या निवडणूकीत नवे मतदार अधिक असणार आहेत. बेकारी, महागाई, हे मुद्दे आहेतच. सरकारी धोरणे आणि देशातील स्वायत्ता संस्था याची वाताहात लोक पाहात आहे त्याच वेळी राहुल गांधी यांच्याकडे केंद्रीय नेतृत्त्व आहे, पण इतर राज्यात त्यांना अजून ती ताकद उभी करावी लागणार आहे, सध्या ती नाही. संघटनात्मक बांधणी ती आवश्यक असणार आहे, बुथनिहाय ते तालुका जिल्हा आणि राज्य ही मजबूत स्थितीत जाईल तेव्हा ते सत्तेजवळ पोहचणार आहेत, हे नवं नाही. बाकी, सहकारी विरोधी पक्ष त्यांची स्थिती या भूमिका या अनुषंगाने माझा प्रश्न होता पण तो झेपला नाही, असे दिसले असो. धन्यवाद.
-दिलीप बिरुटे
राहुल गांधी यांच्याकडे…
In reply to तुलनात्मक अभ्यास हवा.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
राहुल गांधी यांच्याकडे केंद्रीय नेतृत्त्व आहे.
आपल्या भाबडेपणा बद्दल आपली कीव करावी कि हसावे ते समजत नाही.
त्यांच्यावर लायकी नसताना नेतेपण थोपलेले आहे. ९९ निवडणूका हरून हि विरोधी पक्ष जर त्यांनाच परत नेता म्हणून उभे करणार असतील तर विरोध पक्ष २०४७ पर्यंत सत्तेत येणे कठीण आहे.
तुलनाच करायची तर श्री मोदी २००१ पासून २५ वर्षे सतत निवडणुका जिंकतच आले आहेत. त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात १९८७ सालच्या अहमदाबाद महापालिकेच्या निवडणुकांमध्ये दोन तृतीयांश जागा जिंकण्यापासून झाली आहे म्हणजेच जवळजवळ ४० वर्षे त्यांच्याकडे राजकारणा चा अनुभव आहे.
त्या तुलनेत राहुल गांधी यांची स्थिती किती केविलवाणी आहे हे स्पष्ट असूनसुद्धा आपलयाला राहुल गांधी यांच्यात देशाचे भविष्य दिसते यातच आपली मंदभक्ती दिसून येते.
साध्या क्रिकेट संघात सतत जिंकत असलेल्या संघनायकाला कोणी बदलत नाही
आणि
सतत दोन तीन स्पर्धा सुद्धा हरत असलेल्या संघनायकाला ताबड्तोब नारळ दिला जातो
इतके साधे सरळ तत्व आपल्याला दिसत नाही याचेच आश्चर्य वाटते.
इथे ९९ निवडणूका हरुनही अजून त्यांनाच नेतृत्व दिले जाते आहे.
https://meghalayatimes.in/rahul-gandhi-approaches-100th-election-loss/
Rahul Gandhi's long tenure at the centre of Congress politics has been defined by a string of electoral setbacks that now total 99 defeats nationwide, leaving him just one short of a century of losses.
The infographic of his electoral record paints a stark picture of repeated rejections across states and years, underscoring the challenges faced by the Congress under his leadership.
Over the last two decades, the Congress has navigated a difficult path, accumulating a total of ninety nine electoral defeats across various states and national polls.
ही मे २०२६ ची स्थिती आहे
“Insanity is doing the same thing over and over again and expecting different results.”
इंग्रजीतील 'insane' या शब्दाचे मराठीत विविध अर्थ होतात:
• वेडा / वेडसर (मानसिकदृष्ट्या अस्वस्थ किंवा मतिमंद असणे)
• पागल / पिसाट / भ्रमिष्ट
• विवेकशून्य (मूर्खपणाचे किंवा अविचाराचे वागणे)
२०२९ च्या निवडणुकांनंतर श्री मोदी बहुधा निवृत्त होतील असा अंदाज आहे.
(डॉ मनमोहन सिंह हे ९२ व्या वर्षापर्यंत सक्रिय (?) राजकारणात होते. अर्थात त्यांनी निवडणूक कधीच लढवली नाही. ३३ वर्षे त्यांना काँग्रेसने राज्यसभेवर पाठवले.)
पण २०२९ नंतरही जर काँग्रेस राहुल गांधी यानाच पुढे ढकलणार असतील तर काँग्रेसचं काही खरं नाही.
शुभेच्छा.
In reply to राहुल गांधी यांच्याकडे… by सुबोध खरे
डाक्टर आपली अंधभक्ति दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे विषय आपल्याला समजलेला नाही तेव्हा आपणास वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा...
-दिलीप बिरुटे
अरेरे! वस्तुस्थिती मुळे…
In reply to शुभेच्छा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अरेरे!
वस्तुस्थिती मुळे फार जळजळ होते आहे!
मंदभक्ती टोकाची झाली आहे.
वैफल्यपण कमाल सीमेचं झालं आहे!
चालू द्या!
बभाजपा ने कधीच हिंदू मुस्लिम…
In reply to तुलनात्मक अभ्यास हवा.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बभाजपा ने कधीच हिंदू मुस्लिम राजनीति केली नाही. कोणत्याही सरकारी योजनेतून मुस्लिम समाजाशी भेदभाव केला नाही. पण कोंग्रेस ने नेहमीच हिंदू मुस्लिम राजनीति केली आहे. धर्माच्या आधारावर योजना आणि कायदे केले. एवढेच नव्हे तर वक्फ बोर्डला न्यायिक शक्ति ही दिली. कट्टर मुस्लिम मतांसाठी मुस्लिम महिलांना न्याय न मिळो म्हणून कायदा ही पास केला. दक्षिणेत तर मंदिरांचा पैसा ही चर्च आणि मस्जिदसाठी दिला जातो. याला पुरोगामी राजनीति म्हणायचे असेल तर माझी हरकत नाही. बाकी नुकतीच राहुलची रामलीला मैदान सभा पूर्ण फ्लॉप झाली. एक ही दिल्लीकर तिथे फिरकला नाही.
परिणाम उत्तर परदेशात अखिलेश आता 50 जागा ही देणार नाही. आज आलेल्या निकलनुसार आंध्रा प्रदेश लोकल निकाय निवडणूकीत ही कोंग्रेसला जवळपास शून्यच आहे. तमिळनाडू इथे स्वतच्या पायावर कुदळ मारली आहे. यावेळी 10 जागा जिंकल्या होत्या पुढच्यावेळी 2-3 वर आंकडा जाणार नाही. केरळ केरळ कर्नाटक मध्ये ही अधोगती होईल. उत्तर प्रदेशात ही 2-5 च्या वर जाणार नाही. बिहार इथे ही तेजस्वी 5 जागा लढायला देतील की नाही विधान सभेचा अनुभव त्यांना चांगला आला नाही ते बोलून ही दाखविले आहे.
बाकी महागाई 12.5 टक्के ही आधी होती आता अर्धी 6 तक्याहून कमी ते ही इराण युद्ध सुरू असताना ही.
रोजगार म्हणाल तर एकट्या मुद्रा लोन (24 लक्ष कोटी छोट्या उद्योगांना आणि रस्त्यावर विक्री करणार्यांना ) 14 कोटी नवीन रोजगार निर्मित झाले आहे. एकट्या हॉटेल आणि पर्यटन क्षेत्रांत 3 कोटीहून 10 कोटी नियमित रोजगार वाढला आहे. (उत्तम रस्ते, उत्तम रेल्वे इत्यादि मुळे पर्यटन वाढले आहे). डीएफसी मुळे मालभाडे कॉस्ट 16 टक्के हून 10 टक्क्यांवर आली आहे. दादरी (गौतम बुद्ध नगर (80000 हजार कारखाने यात नोयडा, ग्रे. नोयडा, सुरजपुर, दादरी इत्यादि) रोज निघालेल्या अनेक मालगाड्या 24 तासांत जेएनपीटी वर थेट पोहचतात. (बाकी आपण शिक्षित आहात हे ग्रहित धरतो गूगल वर देशाची प्रगति तपासू शकता)
मास्तर कुंभ मेळ्या बद्दल…
मास्तर
कुंभ मेळ्या बद्दल डाव्या आणि फुरोगामी लोकांनी कितीही कुत्सित उद्गार काढले तरी सामान्य माणसं तिथे का जातात? याचा मूलभूत विचार ते करताना दिसत नाहीत.
प्रयागराज येथील महा कुंभ मेळ्या साठी ४० कोटीपेक्षा जास्त लोक ( काही अंदाजाप्रमाणे ६६ कोटी ) तेथे का आले होते ?
जगातील सर्वात मोठा मेळा असे त्याचे वर्णन होते त्यामागे सामान्य माणसांची विचारसरणी लक्षात न घेता केवळ टीका केल्याने डावे आणि फुरोगामी लोक सामान्य माणसांपासून दूर जातात हि वस्तुस्थिती आहे.
हेच लोक उद्या आपल्याला मतदान करणार नाहीत हे याना लक्षात येत नाही. अर्थात झापडबंद वृत्तीचे कुणीच काही करू शकत नाही.
२५ -३० लाख लोक दर वर्षी पंढरीची वारी का करतात? याचा एकदा विचार करून पहा.
जसे मुसलमान माणसास हाज यात्रा करणाऱ्या माणसा बद्दल आदर आणि ममत्व वाटते तसेच सामान्य हिंदू माणसाला कुंभ मेळा पंढरीची वारी किंवा चार धाम ला जाणाऱ्या माणसाबद्दल वाटते.
कसं आहे? राजकारणी आपले फायदे पाहतात. काँग्रेस आणि डाव्या लोकांनी हिंदू लोकांत जातीवरून फूट पडून आणि मुस्लिम एकगठ्ठा मतांचे राजकारण करून इतकी वर्षे पोळी भाजून घेतली.
याउलट श्री मोदी यांनी मुस्लिम एक गठ्ठा मतपेटी दुभंगली आणि हिंदू मतांचे एकीकरण केले.
पण त्याशिवाय देशाचा आर्थिक विकास धडाक्याने राबवला. यामुळे लोक त्यांना परत परत निवडून देतात.
India has achieved one of the fastest rates of poverty reduction in the world, lifting an estimated 496 million people (49.6 crore) out of poverty between 2011 and 2023, according to the World Bank's October 2026 Poverty and Equity Brief.
हे जागतिक बँक म्हणते आहे
आणि
विरोधी पक्ष दर वेळेस नवा खुळखुळा वाजवत राहतात
दीया मिर्झा.. आणि मंद भाजप.
सध्याचं गोबरयुगातलं सरकार मंद जमातीचं आहे म्हणजे यांच्या डोक्यात मेंदूच नाही, सगळं गोबर भरलेलं आहे.
पर्यावरणाच्या दृष्टीने जनजागृती होण्याकरिता मुंबई महापालिकेने प्रसारित केलेल्या सेलिब्रिटींच्या व्हिडिओ संदेशांच्या बाबतीत धार्मिक रंग देण्याच्या संकुचित वृत्तीला मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी चपराक लगावली.
अभिनेत्री दिया मिर्झाचा हटवलेला व्हिडिओ संदेश पुन्हा अपलोड करण्याचा आदेशही महापालिकेला दिला. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी दिया मिर्झाच्या फटाक्यांबाबतच्या व्हिडिओवर आक्षेप घेतला. होता. त्यानंतर तो व्हिडिओ हटविण्यात आला होता.
या पार्श्वभूमीवर, या प्रकाराची न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने स्वतःहून दखल घेत, मंगळवारी सुनावणी घेतली.
आणि कोणत्याही प्रकरणात जातीय हेतु ठेवणा-यांना मा.न्यायालयाने फटकुन काढले. एवढ्यावरुन भाजपच्या लोकांना अक्कल येईल असे अजिबात वाटत नाही.
-दिलीप बिरुटे
आमच्या धर्मातील…
In reply to दीया मिर्झा.. आणि मंद भाजप. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आमच्या धर्मातील चालीरीतींबद्दल आम्हाला उपदेश करू नका असे दिया मिर्झाला म्हणणारे अनिसला ' हिम्मत असेल तर आधी ' त्यांच्या ' चालीरीतींवर आवाज उठवून दाखवा " असे कुठल्या तकनि म्हणतात ? मिपावरही अशी मागणी करणारे आहेत.
गोबर युगातील सरकार मंद…
In reply to दीया मिर्झा.. आणि मंद भाजप. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गोबर युगातील सरकार मंद बुद्धी आहे म्हणून टेक्नॉलजी सहित सर्व क्षेत्रांत अभूतपूर्व प्रगति केली आहे. बाकी दिल्लीत 31 ऑक्टोबर प्रदूषण मीटर 117, आणि 3 नोव्हेंबर 365. पंजाब मध्ये मोठ्या प्रमाणात पराळी जळत आहे. पण सुप्रीम कोर्ट शांत, जरी त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असेल तरीही. दिवाळीच्या दिवशी ही फटाक्यांच्या प्रदूषण 10 टक्के ही नसते. त्यावर आक्षेप. परिणाम दिल्लीकर आजकाल महाग फटा घेतात पण जोरदार फोडतात. न्यायाधीश लोकांसाठी ही हिंदू अस्मिता म्हणजे बळी जाणारी बकरी. बाकी बकरीदच्या दिवशी रस्त्यावर वाहणार्या रक्ताबाबत ते चुकूनही टिप्पणी करणार नाही.
गोबरयुग कधी संपेल? कोणता…
गोबरयुग कधी संपेल? कोणता अवतार येणार आहे?
देशात सर्वच आंदोलन करत...
भाजपच्या सरकारमध्ये पहिल्यांदाच असं पाहायला मिळत आहे की, बेरोजगार आंदोलन करत आहेत, नेते आंदोलन करत आहेत, स्वतः भाजपही आंदोलन करत आहे, विरोधक आंदोलन करत आहेत, पोलीस आंदोलन करत आहेत, साधू-संतही आंदोलन करत आहेत.
फक्त अंधभक्तच राहिले आहेत, जे आंदोलन करत नाहीत. =))
हॅपी दीपावली.
-दिलीप बिरुटे
केंद्र सरकारला autoimmune…
In reply to देशात सर्वच आंदोलन करत... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
केंद्र सरकारला autoimmune आजाराने पछाडले आहे , स्वतःला कुरतडून संपवून टाकल्याशिवाय थांबणार नाही .
अंधभक्तांच म्हणाल तर ते व्हाटसअँप युनिव्हर्सिटीमध्ये आंदोलन करतील, आदेशाची वाट बघत असतील.
लोकशाही बचाव.
In reply to केंद्र सरकारला autoimmune… by आग्या१९९०
वेगवेगळ्या पक्षातील आमदार,खासदार फोडले, पक्ष फोडले, काही पक्षात घेतले.ED,CBI,IT, पोलिस प्रशासन, कोर्ट यांचा गैरवापर केला. पक्ष कार्यकर्ते, विरोध करणारे विनाकारण तुरुंगात टाकले, ईव्हीएम आणि अधिका-यांच्या माधमातून निकालावर संशय मध्ये उभा केला, प्रश्न विचारणाऱ्याना देशद्रोही, पाकिस्तानी, चीनी समर्थक ठरवले, मंदिरांच्या नावावर एकशे पाचवेळा चोरी केली, जाती धर्माचे द्वेषाचे राजकारण केले. देशाच्या सरकारी कंपन्या, जमीनी विकल्या. ते आता "लोकशाही बचाव" करण्यासाठी मोर्चा काढत आहेत* =))
धनत्रयोदशीच्या सर्व मिपाकरांना शुभेच्छा....
-दिलीप बिरुटे
राहूल गांधींना पप्पू म्हणून…
In reply to लोकशाही बचाव. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
राहूल गांधींना पप्पू म्हणून हिणवले, हातात संविधानाचे कोरे पुस्तक घेऊन मिरवतो असे सांगून झाले. मग असा माणूस लोकशाही धोक्यात कसा आणू शकेल? लोकशाही संपवण्याची सुरूुवात वोट चोरीने करून तेच आता आंदोलन करत आहेत. आता हे तक्रार नेमके कोणाकडे करत आहेत आणि ह्यांचे ऐकणार कोण ? ह्यालाच autoimmune आजार म्हणतात.
राहुल गांधी यांनी इतक्या…
In reply to राहूल गांधींना पप्पू म्हणून… by आग्या१९९०
राहुल गांधी यांनी इतक्या वेळेस इतकी दिशाहीन आणि सन्दर्भ वक्तव्ये केली आहेत.
कोणतीही विचारांची सुस्पष्टता नसलेला हा नेता ज्याने सलग ९९ निवडणूक हरल्या आणि ऐनवेळी हा परदेशात जाऊन बसतो तरीही त्यालाच नेते पदी बसवणे आणि त्याच्यातच लोकांना देशाचे भवितव्य दिसते.
यालाच मंद भक्ती म्हणतात.
एकीकडे राहुल गांधींना…
In reply to राहुल गांधी यांनी इतक्या… by सुबोध खरे
एकीकडे राहुल गांधींना मंदबुद्धी म्हणायचे दुसरीकडे तो लोकशाही नष्ट करेल असे म्हणायचे . राहूल गांधींनी नुसते भ्बॉ केले तरी लपून बसायचे , विश्वघाबरू नाव उगाच पडले नाही.
राहुल गांधींना मंदबुद्धी…
In reply to एकीकडे राहुल गांधींना… by आग्या१९९०
राहुल गांधींना मंदबुद्धी म्हणायचे दुसरीकडे तो लोकशाही नष्ट करेल.
तोच तर प्रश्न आहे.
दुसऱ्याच्या बुद्धीने चालणाऱ्या राजकुमारापासून राज्याला सर्वात जास्त धोका असतो हे त्रिकालाबाधित सत्य आहे.
इतका मंदबुद्धी असूनही केवळ गांधी घराण्यात जन्माला आला म्हणून तुमच्या सारखे लोक त्याच्या ओंजळीने पाणी पितात म्हणून तर काळजी वाटते.
काँग्रेस ला पाठिंबा किंवा मोदी विरोध ठीक आहे ठीक आहे पण म्हणून राहुल गांधींना नेता मानायचं?
इतकी बुद्धी कशी काय लोक गहाण ठेवू शकतात याचेच आश्चर्य वाटते.
प्रश्न राहुल गांधी यांच्या मंदबुद्धीबद्दल नसून त्याच्यात तुमच्या सारख्या लोकांना देशाचे भवितव्य दिसते याचा आहे
विश्वघाबरू हा हा हा हा
राष्ट्राच्या आथिर्क राजधानी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला आणि १७५ लोक मृत्युमुखी पडले पण अतिकडक महाभयंकर आणि महाकडक अति भयंकर खलिते पाठवण्याच्या पलीकडे काही झाले नाही.
उडी बालाकोट आणि ऑपरेशन सिंदूर असे तीन वेळा चढत्या भाजणीने पाकिस्तानला धडा शिकवला. प्रथम पाकव्याप्त काश्मीर, नंतर पाकिस्तान आणि तिसऱ्या वेळेस केवळ दहशतवादी केंद्रच नव्हे तर ११ वाईदलाच्या तळांवर आणि थेट पाकिस्तानच्या अणूबॉम्बच्या साठा असलेल्या किराणा टेकडीवर हल्ला.
पण मोदीद्वेष किती?
असो
दिवाळीच्या आणि (वाढदिवसाच्या हि) शुभेच्छा
विश्वघाबरू हा हा हा हा हा हा…
In reply to राहुल गांधींना मंदबुद्धी… by सुबोध खरे
विश्वघाबरू हा हा हा हा
हा हा हा ( हा माझा बरंका )
घ्यावे विश्वघाबरूने राहूल गांधींचे चॅलेंज , वाटल्यास सोबत हरदीप पुरीला घ्यावे . पाच मिनीटात संपवेल सगळा खेळ . संपूर्ण पावसाळी अधिवेशनात घाबरून हजर राहीले नाही फक्त वंदे मातरमला हजर आणि टाटा बाय बाय खतम ! किव येते हो असल्या टेलिप्रॉम्प्टरजीवीचे आणि त्यांच्या समर्थकांचे.
वाटलंच होतं तुम्ही फडतूस…
In reply to विश्वघाबरू हा हा हा हा हा हा… by आग्या१९९०
वाटलंच होतं तुम्ही फडतूस मुद्दा आणणार.
मूळ मुद्दा सज्जड असल्याने त्यावर तुम्ही बोलणार नाहीच .
जर चर्चा किंवा संवाद करायचा तर संसद आहेच कि.
तिथे जर पंतप्रधान आणि विरोधी पक्ष नेता यात चर्चा होणार नसेल तर काय उपयोग ?
रस्त्यावर वाद घालायचा तर निवडून कशाला यायचं?
भंपकपणा चालू द्या तुमचा
शुभेच्छा.
In reply to वाटलंच होतं तुम्ही फडतूस… by सुबोध खरे
>>> भंपकपणा चालू द्या तुमचा
दीपावलीच्या आणि वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. !
-दिलीप बिरुटे
तुमचं त्या ढोलकीवाल्या…
In reply to वाटलंच होतं तुम्ही फडतूस… by सुबोध खरे
तुमचं त्या ढोलकीवाल्या उंदरासारखं आहे!
सहज कुतूहल म्हणून राजाने टोपी पाहायला घेतली तर राजा भिकारी ~ माझी टोपी घेतली आणि परत केली तर राजा घाबरला माझी टोपी दि~ ली.
मूळ मुद्दा सोडून फालतू गोष्टीवर ढोलकी वाजवायची.
जर चर्चा किंवा संवाद करायचा…
In reply to वाटलंच होतं तुम्ही फडतूस… by सुबोध खरे
जर चर्चा किंवा संवाद करायचा तर संसद आहेच कि.
पण एकटे राहूल गांधी संसदेत हजर असून काय साधणार ? विश्वघाबरू संसदेत पाय ठेवत नाही , मग कशी चर्चा होणार ? पूर्ण पावसाळी अधिवेशनात लपून राहिले विश्वघाबरू , त्यावर सोयीस्कर दुर्लक्ष करायचे . रस्त्यावर चर्चा करायला काय भीती वाटते ? होऊ दे दूध का दूध पानी का पानी.
जर चर्चा किंवा संवाद करायचा…
In reply to वाटलंच होतं तुम्ही फडतूस… by सुबोध खरे
जर चर्चा किंवा संवाद करायचा तर संसद आहेच कि.
पण एकटे राहूल गांधी संसदेत हजर असून काय साधणार ? विश्वघाबरू संसदेत पाय ठेवत नाही , मग कशी चर्चा होणार ? पूर्ण पावसाळी अधिवेशनात लपून राहिले विश्वघाबरू , त्यावर सोयीस्कर दुर्लक्ष करायचे . रस्त्यावर चर्चा करायला काय भीती वाटते ? होऊ दे दूध का दूध पानी का पानी.
तुम्हाला कुणी लुन्ग्या…
In reply to जर चर्चा किंवा संवाद करायचा… by आग्या१९९०
तुम्हाला कुणी लुन्ग्या सुंग्याने आव्हान दिले कि रस्त्यावर या आपण चर्चा करू आपण जाणार का?
नाही गेलात तर आपण भ्याड आणि घाबरट आहा त असे आम्ही म्हणतो चालणार का?
रस्त्यावर चर्चा करायला काय भीती वाटते ? होऊ दे दूध का दूध पानी का पानी.
मास्तर तुमचं गोबर युग काही…
In reply to देशात सर्वच आंदोलन करत... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मास्तर
तुमचं गोबर युग काही संपणार नाही. पण आशा अमर आहे.
आशा नाम मनुष्याणां काचिदाश्चर्यशृंखला ।
यया बद्धाः प्रधावन्ति मुक्तास्तिष्ठन्ति पङ्गुवत्
पण आशा हि अशी आश्चर्य कारक शृंखला आहे कि जिने बांधल्यावरहि माणूस जोराने पाळतो आणि त्यातून मुक्तता झाली कि (निराश) माणूस पांगळ्या माणसासारखा एका जागी जखडून पडतो.
दीपावलीच्या सर्वाना शुभेच्छा!
गोबरयुगं गमिष्यति...
In reply to मास्तर तुमचं गोबर युग काही… by सुबोध खरे
गोबरयुगं गमिष्यति सत्ययुगं जनिष्यति ।
क्रौर्यं लुण्ठनं च नश्येत् सुखसूर्योऽप्युदेष्यति ॥
अर्थ ः
हे गोबरयुग (ढोंग आणि अंधाराचे युग) निघून जाईल आणि सत्ययुगाचा उदय होईल;
सर्व अन्याय आणि लूट नष्ट होईल आणि सुखाचा सूर्य नक्कीच उगवेल.
धनत्रयोदशीच्या सर्व मिपाकरांना खुप शुभेच्छा.
-दिलीप बिरुटे
होईल होईल २०४७ नंतर नक्कीच…
In reply to गोबरयुगं गमिष्यति... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
होईल होईल
२०४७ नंतर नक्कीच होईल.
आशा अमर असते
धन्यवाद. 🙏
In reply to गोबरयुगं गमिष्यति... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धनत्रयोदशीच्या सर्व मिपाकरांना खुप शुभेच्छा.
धन्यवाद. 🙏 आपणांसही धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा. ही दिवाळी आपणांस सुख-समाधान-समृद्धीची जावो. 😊
- कांदा लिंबू
केंद्र सरकारला autoimmune…
केंद्र सरकारला autoimmune आजाराने पछाडले आहे , स्वतःला कुरतडून संपवून टाकल्याशिवाय थांबणार नाही
"हम को मालूम है जन्नत की हक़ीक़त लेकिन
दिल के ख़ुश रखने को 'ग़ालिब' ये ख़याल अच्छा है"
जीवन में उम्मीद और एक सुखद भ्रम का होना ज़रूरी है, जो दिल को संभाल कर रखता है।
तुमचं स्वप्नातलं गाजरं खाणं चालू द्या !
संपूर्ण गजल-मराठी अर्थासहित:हम को मालूम है जन्नत की हक़ीक़त
In reply to केंद्र सरकारला autoimmune… by सुबोध खरे
१. हुस्न-ए-माह गर्चे बा हंगाम-ए-कमाल अच्छा है
उस से मेरा माह-ए-ख़ुर्शीद-जमाल अच्छा है
२. बोसा देते नहीं और दिल पे है हर लहज़ा निगाह
जी में कहते हैं कि मुफ़्त हाथ आए तो माल अच्छा है
३. और बाज़ार से ले आए अगर टूट गया
सागर-ए-जम से मेरा जाम-ए-सिफ़ाल अच्छा है
४. बे-तलब दें तो मज़ा उसमें सिवा मिलता है
वो गदा जिस में न हो ख़ू-ए-सवाल अच्छा है
५. उन के देखे से जो आ जाती है मुँह पे रौनक
वो समझते हैं कि बीमार का हाल अच्छा है
६. देखिए पाते हैं उश्शाक बुतों से क्या फ़ायज़
इक ब्राह्मण ने कहा है कि ये साल अच्छा है
७. एक हम-सुख़न तेशे ने फ़रहाद को शिरीन से किया
जिस तरह का कि में हो कमाल अच्छा है
८. कतरा दरिया में जो मिल जाए तो दरिया हो जाए
काम अच्छा है वो जिस का मा’ल अच्छा है
९. ख़िज़्र-सुल्तान को रखे ख़ालिक-ए-अकबर सर-सब्ज़
शाह के बाग़ में ये ताज़ा निहाल अच्छा है
१०. हम को मालूम है जन्नत की हक़ीक़त लेकिन
दिल के बेहलाने को ‘ग़ालिब’ ये ख़याल अच्छा है
- मिर्ज़ा ग़ालिब
ही मिर्झा गालिब यांची प्रसिद्ध गझल आहे. तिच्यातील प्रेम, सौंदर्य, विनोद, उपरोध आणि जीवनाकडे पाहण्याचा तत्त्वचिंतनात्मक दृष्टिकोन जपून मराठीत भावानुवाद केला आहे.
मिर्झा गालिब : गझल — मराठी भावानुवाद
१.
चंद्राचे सौंदर्य पौर्णिमेच्या बहरात खचितच सुंदर दिसते,
पण त्याहूनही सुंदर माझा सूर्यतेजाने उजळलेला चंद्र आहे.
२.
ती चुंबन तर देत नाही, पण प्रत्येक क्षणी माझ्या हृदयावर तिची नजर असते,
मनात म्हणत असावी — फुकटात मिळत असेल, तर हा माल वाईट कशाला?
३.
बाजारातून दुसरा प्याला आणता येईल, तो फुटला तर काय झाले?
जमशेदच्या दिव्य मद्यपात्रापेक्षा माझा साधा मातीचा प्याला अधिक प्रिय आहे.
४.
न मागता जेव्हा काही मिळते, तेव्हा त्याचा आनंद काही औरच असतो,
मागण्याची सवय नसलेला भिकारीच खऱ्या अर्थाने चांगला असतो.
५.
तिचे दर्शन होताच माझ्या चेहऱ्यावर जी प्रसन्नता उमलते,
ते पाहून तिला वाटते की या आजारी माणसाची प्रकृती आता चांगली आहे!
६.
या मूर्तिमंत सौंदर्याच्या उपासकांना त्यांच्या प्रेमातून काय लाभ होतो, ते पाहू या!
एका ब्राह्मणाने भविष्यवाणी केली आहे की हे वर्ष फार चांगले जाणार आहे!
७.
एका कुऱ्हाडीनेच फरहादला शिरीनशी एकरूप केले!
ज्या प्रकारचा शेवट होतो, त्यावरच त्या कार्याची महानता ठरते!
८.
एखादा थेंब नदीत मिसळला की तो स्वतः नदीच होऊन जातो,
ज्या कार्याचा शेवट सुंदर, तेच खऱ्या अर्थाने सुंदर कार्य!
९.
परमेश्वराने खिज्र सुलतानला सदैव हिरवेगार आणि समृद्ध ठेवावे,
राजाच्या बागेतील हे नवे रोपटे खरोखरच सुंदर आहे!
१०.
स्वर्गाचे खरे स्वरूप काय आहे, हे आम्हाला माहीत आहे, गालिब,
पण मनाचे सांत्वन करण्यासाठी ही कल्पना तरी किती सुंदर आहे!
काही महत्त्वाच्या शेरांचा भावार्थ
दुसरा शेर: प्रेमातील नखरे आणि प्रियकराची असहायता यांवर गालिबने अतिशय खोडकर उपरोध केला आहे. प्रेयसी प्रेम देत नाही, पण तिची नजर मात्र त्याच्यावर असते.
तिसरा शेर: राजेशाही, मौल्यवान वस्तूंपेक्षा आपल्या साध्या, मातीच्या प्याल्याचे अधिक मोल आहे. यात स्वतःच्या साधेपणाचा अभिमान आहे.
पाचवा शेर: प्रेमात प्रिय व्यक्तीचे दर्शन होताच चेहऱ्यावर आनंद फुलतो; पण प्रेयसी त्याचा अर्थ त्याची प्रकृती सुधारली असा लावते. हा प्रेमातील सूक्ष्म विनोद आहे.
सातवा शेर: फरहाद आणि शिरीनच्या प्रेमकथेचा संदर्भ आहे. शिरीनच्या मृत्यूची बातमी ऐकून फरहादने कुऱ्हाडीने स्वतःचे जीवन संपवले, अशी आख्यायिका आहे. गालिब येथे शोकांतिकेलाही एका विलक्षण उपरोधिक वळणाने मांडतो.
शेवटचा शेर: गालिबच्या तत्त्वज्ञानाचा हा अत्यंत सुंदर नमुना आहे. स्वर्ग खरोखर आहे की नाही, हे माहीत नसले तरी मनाला दिलासा देणारी कल्पना म्हणून त्याचे अस्तित्व किती सुंदर आहे!
माझ्या मते, या गझलेचा शेवटचा शेर हा केवळ स्वर्गाविषयी नसून मानवी कल्पनाशक्ती, आशा आणि जगण्याला आधार देणाऱ्या भ्रमांविषयीचे गालिबचे गहन तत्त्वज्ञान आहे.
केरळम च्या काँग्रेस पक्षाला…
केरळम च्या काँग्रेस पक्षाला सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयाचा अपमान केल्याबद्दल आपल्यावर कडक कारवाई का करू नये अशी नोटीस पाठवली आहे.
झुरळांच्या नादाला लागून आजकाल कोणीही उठतो आणि सभयतेचे संकेत मोडून वाटेल ती भाषा वापरतो हे फार वाईट आहे.
केरळम च्या काँग्रेस पक्षाने ट्विट केले होते कि Dear Surya Kant, If law and order is not your domain, resign now. We will find your replacement who can handle it.”
हि असली ग्राम्य भाषा वापरताना सभ्यतेचे साधे संकेत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पळू नयेत याचे आश्चर्य वाटते. अर्थात मोदी हि क्या उस का बाप भी जायेगा असे विद्यमान काँग्रेस अध्यक्षच म्हणतात मग तीच भाषा आणि संस्कृती त्याच पाकसाहत तळागाळात पसरली तर त्यात आश्चर्य वाटू नये.
अर्थात गदारोळ झाल्यावर त्यांनी ते ट्विट काढून टाकले आणि विनाशर्त क्षमायाचनाही केली.
परंतु एका घटनात्मक सर्वोच्च पदावरील व्यक्ती बद्दल अशी टीका करताना राजकीय पक्षाच्या पदाधिकार्यांना लाजही वाटली नाही?
न्यायालयाने हि नोटीस बजावताना कडक भाषेत ताशेरे ओढलेले आहेत.
The Constitution is supreme. No individual or political organisation stands above it. Independence of judiciary is not a matter of political convenience," the Court observed.
The Bench further clarified that while judgments of courts are always open to criticism, freedom of expression cannot be used as a shield for intimidation or interference with the administration of justice.
"Any attempt to undermine the authority of the Court needs to be dealt with an iron hand," the Bench said.
The Court also observed that the authority of the judiciary does not require political endorsement but rests on the rule of law.
"The Court had registered a writ petition on its own motion on a complaint by Advocate Vineet Jindal.
According to Jindal, The office of the Chief Justice of India is a constitutional judicial office and cannot be treated as one whose continuance is subject to the approval or displeasure of any political organisation.
झुरळांच्या आंदोलनात आणि तिला कूल समजणारे जेन झी अशीच अत्यंत वाह्यात आणि निरर्गल भाषा वापरली गेली होती.
"ज्ञानू मस्ट गो" म्हणणारे आपलॆ लायकी किती? आपला पगार किती? आणि आपण बोलतो काय? याचा काहीही संबंध नाही असेच बोलत असतात.
जेन झीची भाषा एक अभ्यास. ः)
In reply to केरळम च्या काँग्रेस पक्षाला… by सुबोध खरे
>>>>>>झुरळांच्या आंदोलनात आणि तिला कूल समजणारे जेन झी अशीच अत्यंत वाह्यात आणि निरर्गल भाषा वापरली गेली होती.
प.मोदी यांचं जे सरकार आहे, सरकारचे जे धोरण आहे, जी व्यवस्था आहे, ती व्यवस्था तरुणांना खटकते. आणि म्हणून सरकार ज्या लायकीचं आहे, त्याच पातळीच्या पुढे जाऊन तरुण पिढीने सरकारची लायकी काढली, असावे असे वाटते. दुसया भाषेत सांगायचं तर, सरकारला आणि त्या पदाला तरुणांनी विवस्त्र केले. आपल्या पिढीला धक्का बिक्का बसू शकतो. पदाची गरिमा वगैरे ते असतंच ना ? नाही कोण म्हणतं. पण, पोरांनी एक नवा इतिहास घडवला. सरकारच्या धोरणाविरोधात जे कोणा बारा वर्षात कोणाला जमले नाही, ते या पोरांनी घडवून शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला. जेन झी ने करुन दाखवलं. आंदोलन संपले असले तरी दर दिवशी तरुण पिढी मिडियावर सरकारचे वाभाडे काढते. थेट देशाचे पंतप्रधान यांना प्रश्न विचारते. ( आणि ते रील करतात ) हं आता आठवी नववी पास वाल्या सगळ्याच नेत्यांना तरुणांच्या प्रश्नांना उत्तर देता येईल असे काही नाही. प्रॉम्टरवर सर्व जमतं असं नसतं.
बाय द वे, प्रत्येक पिढीची आपली एक व्यक्त होण्याची भाषा आणि शैली आहे, आजकालच्या वयस्कर लोकांना त्यांच्या भाषेचा त्रास होतो, ती भाषा झेपत नाही आणि आजकालचे पोरंही झेपत नाही. आजकालच्या जेन झीची पिढीची भाषा आणि वर्तनाबद्दल म्हातारी पिढी कायम यंव बरोबर नाही, त्यंव बरोबर नाही, असे म्हणत असते. कोनाड्यात कन्हत असते. अभिव्यक्त होण्याची त्यांची एक पद्धत आहे. जेन झीच्या भाषेबद्दल मतभेद होतील काही शब्द, काही चित्र, काही बॅनर अपवाद असतील. फारच मोकळे ढाक़ळे असतील थेट चड्डीत हात घालणारी असू शकते. आता तरुण म्हटलं की एवढं तेवढं व्हायचंच असे वाटते.
आजचे तरुण शब्दांचे पडदे ठेवत नाहीत. ज्या गोष्टींवर जुनी पिढी चार भिंतींच्या आडही बोलायला लाजत होती, त्या गोष्टींवर आजची मुलं भरचौकात, सोशल मीडियावर उघडपणे बोलतात. त्यांची भाषा मोकळीढाकळीच नाही, तर अनेकदा जुन्या विचारांच्या थेट 'मर्मावर' ( चड्डीत हात घालणारी) आणि अंगावर येणारी असते . म्हाताऱ्या पिढीला जे उथळ किंवा अश्लील वाटतं, ते या तरुणांसाठी अत्यंत सामान्य आणि 'कूल' असतं. आजचे पोरं लांबलचक पत्र किंवा संवाद लिहीत नाहीत. एक मिम (Meme), एक बोचरी इमेज, किंवा एखादा विचित्र वाटणारा शब्द वापरून ते अख्ख्या व्यवस्थेची खिल्ली उडवतात. मी या पिढीत वावरतो, डेंजर पिढी आहे.
ज्ञानू मस्ट गो" म्हणणारे ही योग्य आहे. निवडणूक आयोगाने संशय दूर केला पाहिजे. जनता निवडणूक आयोगाला प्रश्न विचारते आणि सरकार आणि त्यांचे कार्यकर्ते ग्यानूच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरतात तेव्हा ग्यानू गेलाच पाहिजे अशी मागणी करणे काही गैर नाही. मै कही नही जाऊंगा असे म्हणून कसे चालेल. जाना तो सबको ही है
शेवटी, हा केवळ भाषेचा वाद नाही, तर दोन भिन्न जगांचा, दोन पिढ्यांचा, विचारांचा संघर्ष आहे. एका बाजूला जुन्या मूल्यांना घट्ट धरून ठेवणारी आपली वयस्कर आणि कालबाह्य आणि काळासोबत न बदलल्यामुळे हतबल झालेली आपली ( हतबल ) पिढी आहे, तर दुसऱ्या बाजूला सर्व मर्यादा तोडून स्वतःच्या अटींवर जगू पाहणारी नवी बेधडक पिढी आहे. निवड कोणती करायची हा एकच ऑप्शन आहे.
दीपावलीच्या सर्व वयस्कर आणि हतबल लोकांना आणि नव्या दमदार पिढीलाही दीपावलीच्या खुप खुप शुभेच्छा. ः)
-दिलीप बिरुटे
वा मास्तर, तुम्हाला तुमच्या…
वा मास्तर,
तुम्हाला तुमच्या भर वर्गात कुणी "बिरू घरी जा" किंवा "दिलप्या चड्डीत राहा" असं सांगितलं तर चालेल म्हणा कि !
काही गोष्टी उचित असतात त्या कोणत्याही काळात उचित असतात.
आपल्या आईवडिलांचा शृंगार हे १०० टक्के सत्य असले तरी जेन झी ला सुद्धा आपल्या मुलांशी चर्चा करणे झेपणार नाही.
जेन झी पैकी किती मुलांना स्त्रीरोगतज्ज्ञ अर्ध्या चड्डीत चिवट्या बावट्याचा शर्ट घालून येऊन एका हातात सिगरेट धरून बायकोला तपासत असलेला चालेल.
जे अनुचित आहे ते कोणत्याही काळात अनुचितच आहे
प्रत्येक गोष्टीला औचित्य असतं.
आपण इतके द्वेषांध झाला असाल असे वाटले नव्हते
असो
यावर मी अधिक काहीच बोलत नाही.