Skip to main content

पंजब नॅशनल बॅंक ( ग्रेटर नॉइडा)

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 29/10/2026 11:41 या दिवशी प्रकाशित केले.

PNB Greater Noida case: Rs 35 crore missing, 25 customers complain | Delhi News - The Indian Express

 

या  बातमीनुसार पंजाब नॅशनल बॅंक ग्रेटर नॉईडा शाखेत  २५ ग्राहकांच्या खात्यातली रक्कम अचानक शून्यावर आली. काहींच्या एफ डी देखील शून्यावर आल्या.

हा फ्रॉड असेल किंवा तांत्रीक चूक असेल पण आपण ज्या विश्वासाने बॅंकेत पैसे ठेवतो त्यालाच जर असा धक्का लागला तर ग्राहकाने काय करायचे?

एखाद्याला अचानक रक्कम लागली आणि ती उपलब्ध नसेल तर होणाऱ्या नुकसानास बॅंकेला जबाबदार धरावे लागेल. पैशाअभावी उपचार मिळू शकले नाहीत म्हणून कोणी दगावले किंवा कोणाचे शैक्षणीक / करीयरचे / आयुषभराचे  नुकसान झाले त र्कोणास जबाबदार धरायचे.

या अशा घटनांविरुद्ध दाद कोठे मागायची. आणि निकल मिळन्यास विलंब झाला तर ग्राहकाने जायचे कोठे?

कोणी याबाबत मार्गदर्शन करू शकेल का?

 


वाचने 694
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

बाप रे ..... अवघड आहे ! 

व्यवस्थापक आणि ५ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे असे  माध्यमात वाचले. 

भ्रष्टाचार विरोधी पथक ही चौकशी करणार आहे ! 

 

या वरुन माझा एक जुना धागा आठवला : 

बॅंकीग संगणक प्रणाली: काही प्रश्न, अनुत्तरीत....

https://www.maayboli.com/node/48181

 

नुकताच भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) ग्राहकांची वैयक्तिक माहिती डार्क वेबवर लीक झाल्याचे प्रकरण समोर आले आहे.

 

भारतीय  बॅंका म्हटलं  एकंदरीत वैयक्तिक डाटा असो वा धन ... काहीच सु-रक्षित नाही ! 

 


पंजाब नॅशनल  ब्यांक ही खरेतर मोठी ब्यांक आहे. तेथे सगळी कोअर ब्यांकिंग  सिस्टीम संगणकावर आहे

ही गोष्ट एखाद्या पतसंस्थेत झाली असती तर काही  म्हणायला वाव होता 

पण जेथे सगळ्या व्यवहारांचा मागोवा घेता येतो अशा सिस्टीम मधे असे व्हावे म्हणजे खरेच आश्चर्य आहे.

पण महत्त्वाचे म्हणजे अशा व्यवहारांसाठी ब्यांक जबाबदार असायला  हवी तसेच हे  असे व्यवहार कोणी केले असतील तर त्या संदर्भातले अलर्ट योग्य माणसांना   मिळाले का नाहीत. मिळाले असतील तर त्यां लोकांवर काय कारवाई करणार हे स्पष्ट सजायला हवे.

भविष्यात असे व्यवहार होणार नाहीत याची तरतूद करायला हवी.

रखवालदारच जर चोऱ्या करायला लागले तर मग जनतेने विश्वास कोणावर ठेवायचा?


Bank transfer data बघावा लागेल.  सेविंग अकाउंटची रक्कम गेली तर त्याची डेबिट एंट्री असणारच. एफडी वटवल्याची एंट्री असेलच. त्यावरून कळेल की कुणीतरी खातेदारांच्या खोट्या सह्या करून रक्कम कुठेतरी फिरवली. 

S/v a/c मधून खोट्यासहीने NEFT/ RTGS /IMPS केले असेल.

काही खातेदार एफडी करतात पण डॉक्युमेंट नेत नाहीत, विसरतात. त्यांचे सह्या करून पैसे काढले असतील.


हे सर्व एका ब्रँचपुरते मर्यादित आहे याचाच अर्थ तिथले कोणीतरी कर्मचारी एकत्र येऊन काही प्लॅन त्यांनी केला असणार. एरवी आताच्या बँकिंग टेक्नोलॉजीमध्ये एका ब्रँचपुरते काही मर्यादित रहात नाही. मेकर चेकर एकत्र येऊन बरेच काही करता येते. ते जगाच्या लक्षात यायला वेळ लागेल आणि तेवढ्यात हे खेळाडू दूर पळून जाऊ शकतील असा बेत असावा.


आंजावरुन साभार : 

 

केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (CBI) पंजाब नॅशनल बँकेच्या (PNB) ग्रेटर नोएडाच्या सेक्टर पीआय-१ शाखेत झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधी अपहार आणि फसवणुकीप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

प्रकरणाचा मुख्य तपशील

• कार्यपद्धती: दीपांशी नावाच्या एका महिला कार्यालयीन सहाय्यकाने कथितरित्या तीन वर्षांच्या कालावधीत अनेक सहकाऱ्यांचे (शाखा व्यवस्थापकासह) कोअर बँकिंग सोल्युशन (CBS) युझर आयडी आणि पासवर्डचा गैरवापर करून ग्राहकांच्या बचत खात्यांमधून पैसे काढले आणि मुदत ठेवी (FDs) मोडल्या.

• अलर्ट्स बंद करणे: हे प्रकरण उघडकीस येण्यास विलंब व्हावा म्हणून, अनेक बाधित ग्राहक खात्यांचे व्यवहाराचे एसएमएस अलर्ट्स कथितरित्या बंद करण्यात आले होते.

• साथीदार: आशुतोष पाठक नावाच्या एका साथीदाराच्या खात्यासह, अनेक खात्यांमधून हा पैसा वळवण्यात आला होता.

++++++++ 

 

 


In reply to by चौथा कोनाडा

कुंपणनेच खेत खाब्या !

तो क्या करेगा कोब्या !!

 

कोब्या = कोअर बँकिंग मॉड्यूल

 

-गा.पै.