SITTING IS NEW SMOKING
बैठे काम हे धूम्रपानाच्या इतकेच धोकादायक आहे असे गेल्या काही वर्षात केलेल्या संशोधनात आढळून आलेले आहे. पूर्वी एक काऊचं पोटॅटो
(couch potato) असा वाक्प्रचार होता आता त्यात बदल होऊन mouse potato हा वाक्प्रचार रूढ झाला आहे.
आजच्या जगात बरीच माणसे तासन तास सतत बसून राहून संगणकावर काम करत असतात. दुर्दैवाने तब्बल ८२ टक्के लोक जागतिक आरोग्य संघटनेने शिफारस केल्लेल्या पातळीची शारीरिक हालचाल करत नाहीत आणि जवळ जवळ ४० टक्के लोक कामाच्या वेळेत एकही ब्रेक घेत नाहीत.
त्यातच घरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कामाचे तास सरासरी दीड ते दोन तासांनी वाढलेले आढळले. यामुळे या लोकांना पुढच्या दहा ते पंधरा वर्षात होणाऱ्या मेंदूचा स्ट्रोक आणि हृदय विकारात भयावह वाढ होण्याची शक्यता आहे.
बाकी सर्व घटक ( लठ्ठपणा, मानसिक तणाव, धूम्रपान, अतिरिक्त मद्यपान, मधुमेह इ ) बाजूला ठेवले तरी केवळ बसून राहणे यामुळे आपल्याला हृदयविकाराचा अतिरक्तदाबाचा आणि लकवा( स्ट्रोक/paralysis) धोका भरपूर हालचाल करणाऱ्या माणसांपेक्षा ६० टक्क्यांनी जास्त असतो.
त्याच बरोबर या लोकांमध्ये रक्तातील साखर आणि कोलेस्टिरॉलचे प्रमाणही वाढते या मुळे त्यांना मधुमेह आणि हृदयविकाराची शक्यता वाढते.
व्हेरीकोस व्हेन्स ( पायाच्या रक्तवाहिन्या अतिरिक्त फुगून येणे) आणि पायाच्या रक्ताच्या वाहिन्यांत रक्ताची गुठळी होणे ( deep vein thrombosis) यांचे प्रमाणही बरेच वाढते.
बराच वेळ संगणकावर बसल्यामुळे मान दुखी आणि कंबर दुखीचे प्रमाण सुद्धा फार वाढलेले आहे. यात घरातून काम करणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे याचे कारण बहुसंख्य लोकांनी कोव्हीड मध्ये घरच्या डायनिंग टेबलावरच काम करणे सुरु केले. डायनिंग टेबल हे जेवण्यासाठी असल्याने त्याची उंची संगणक टेबलापेक्षा जास्त असते यामुळे लॅपटॉप वर बसल्यास सारखे खांदे उंच करून टाईप करावे लागते यामुळे या लोकांमध्ये मान दुखी नि खांदे दुखीनं फार मोठ्या प्रमाणात दिसून येते.
याशिवाय घरात ergonomic खुर्ची नसल्यामुळे तिशी पस्तिशीतील माणसांचे पाठदुखीचे प्रमाण सुद्धा भयावह प्रमाणात वाढलेले आहे.
माणसे रोजच पाठ दुखी किंवा मानदुखी होते म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतात किंवा पटकन एक डोलो ची गोळी घेऊन आजचा दिवस साजरा करतात. पण जसे वय वाढत जाते तसा हा त्रास मानगुटीवर बसू लागतो. आताच पन्नाशीच्या आसपासच्या भरपूर लोकांना स्पॉण्डयलोसिस चा त्रास दिसून येतो आहे.
सतत बसून राहिल्यामुळे आपले एकंदर स्नायूंचे प्रमाण कमी होते यामुळे वृद्धावस्थेत अपघातांचे प्रमाण वाढणार आहे.
संशोधकांनी १ लाखाहून अधिक लोकांच्या बसण्याच्या वेळेचा आणि शारीरिक हालचालींच्या पातळीचा समावेश असलेल्या १३ अभ्यासांचे विश्लेषण केले. त्यांना असे आढळून आले की, जे लोक कोणत्याही शारीरिक हालचालीशिवाय दिवसातून आठ तासांपेक्षा जास्त वेळ बसून घालवतात, त्यांच्या मृत्यूचा धोका लठ्ठपणा आणि धूम्रपानामुळे होणाऱ्या धोक्यासारखाच असतो.
परंतु, दिवसातून ६० ते ७५ मिनिटांचा मध्यम स्वरूपाचा एरोबिक शारीरिक व्यायाम जास्त वेळ बसून राहण्याचे दुष्परिणाम पूर्णपणे भरून काढतो (नष्ट करतो).
या संशोधनातील महत्त्वाचे मुद्दे:
• मोठा धोका: कोणत्याही व्यायामाशिवाय ८ तासांपेक्षा जास्त वेळ बसून राहिल्याने मृत्यूचा धोका लठ्ठपणा आणि धूम्रपानाइतकाच वाढतो.
• उपाय: दररोज नियमितपणे केलेला मध्यम स्वरूपाचा एरोबिक व्यायाम या धोक्याविरुद्ध ढाल म्हणून काम करतो.
• 'मध्यम स्वरूपाचा व्यायाम' म्हणजे काय?: यासाठी तुम्हाला मॅरेथॉन धावण्याची गरज नाही. जलद चालणे, सायकल चालवणे किंवा बॅडमिंटन/टेनिस खेळणे यासारख्या गोष्टींचा यात समावेश होतो.
वर लिहिलेलं हे आपण संगणकावर सह्ज गुगलून पाहू शकता. काही दुवे असे आहेत
https://healthcare-bulletin.co.uk/article/sitting-is-the-new-smoking-st…
https://www.mayoclinic.org/healthy-lifestyle/adult-health/expert-answer…
https://www.apolloclinic.com/blog/sitting-new-smoking
दुर्दैवाने केवळ नियमित व्यायाम करणे कॅन्सरच्या (कर्करोग) धोक्यापासून पूर्णपणे संरक्षण करण्यासाठी पुरेसे नाही हे अगदी अलीकडच्या जुलै २०२६ मधील एका महत्त्वाच्या संशोधनातून समोर आले आहे.
https://timesofindia.indiatimes.com/india/workouts-not-enoughlong-sitti…
संशोधनातील महत्त्वाचे निष्कर्ष
• ३० मिनिटांचा नियम: एकाच ठिकाणी सलग ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ बसून राहिल्याने शरीरावर आणि आरोग्यावर विपरीत परिणाम होण्यास सुरुवात होते.
• वाढणारा धोका: सलग बसण्याच्या वेळेत प्रत्येक १ तासाची वाढ ही कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका साधारणपणे ९ ते १० % ने वाढवते.
• कॅन्सरचे प्रकार: यामुळे प्रामुख्याने लठ्ठपणा आणि चयापचयाशी (Metabolism) संबंधित कॅन्सरचा धोका वाढतो. उदा. आतड्याचा (Colorectal), स्तनाचा (Breast), यकृताचा (Liver), स्वादुपिंडाचा (Pancreatic) आणि गर्भाशयाचा (Endometrial) कॅन्सर.
• व्यायाम पुरेसा नाही: तुम्ही आठवड्याला १५० ते ३०० मिनिटे व्यायाम करत असाल, तरीही दिवसभर सलग अनेक तास बसून राहिल्यामुळे शरीराला होणारे नुकसान केवळ त्या व्यायामाने पूर्णपणे भरून निघत नाही.
यासाठी काय करायला हवे?
डेस्क जॉब करणाऱ्या लोकांसाठी, थोड्या थोड्या कालावधी नंतर नियमितपणे हालचालींचे छोटे ब्रेक घेणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
जर तुमचे काम ऑफिसमध्ये किंवा कॉम्प्युटरसमोर सतत बसून राहण्याचे असेल, तर दर ३० मिनिटांनी एक टाइमर किंवा अलार्म लावा. दर अर्ध्या तासानंतर फक्त १ ते २ मिनिटांसाठी उभे राहा, थोडे ताणून घ्या (Stretching), फोनवर बोलताना चालत बोला ( बरेच लोक काम करताना बराच वेळ फोन वर बोलत असतात त्यांहा हे बोलणे फिरत फिरत करणे सहज शक्य आहे.) किंवा पाणी पिण्यासाठी थोडे फिरा.
ही छोटीशी हालचाल देखील तुमच्या शरीराची चयापचय प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यासाठी आणि आजारांचा धोका कमी करण्यासाठी पुरेशी आहे.
या विषयावर विपुल साहित्य जालावर उपलब्ध आहे.
बऱ्याच वेळेस कळतं पण वळत नाही किंवा कामाच्या व्यापात/ ताणात लक्षातच येत नाही अशी स्थिती बहुसंख्य लोकांची आहे.
पण वर म्हटल्याप्रमाणे सुरुवात तर करा.
कैसे आकाश में सूराख़ हो नहीं सकता,
एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो!
- दुष्यंत कुमार
मिसळपाव
प्रतिक्रिया
पूर्वी कामगाराच्या काम…
पूर्वी कामगाराच्या काम करण्याच्या पद्धतीवर संशोधन व्हायचे. त्यातून सुधारणा सुचवल्या गेल्या. कामाचे नियम, पद्धती बदलल्या गेल्या.
आता संगणकावर काम करणारे कामगार पद्धतीत गणल्या जात नाहीत. कामगार संघटना नाहीतच. काम बळजबरी करावे लागते. नवे नवे शिकण्याची गरज, भारतीय लाला मानसिकतेचे कंपन्या अन व्यवस्थापन, मानसिक ताण, आडनीड वेळेच्या शिफ्ट हे अतिशय घातक पद्धतीने वाढले आहे.
संगणक कामगारांची ही बहूदा पाचवी (की चौथी?!) पिढी असेल. अजूनही म्हणावा तसा गंभीरपणा ना कर्मचारी घेतात न व्यवस्थापन.
मस्त एसीची हवा खात, बसून,…
In reply to पूर्वी कामगाराच्या काम… by पाषाणभेद
मस्त एसीची हवा खात, बसून, कॉफी रिचवत काम असते तरीही समस्या?
तसे हिमनग असतात. आयटी अतिशय…
In reply to मस्त एसीची हवा खात, बसून,… by अमरेंद्र बाहुबली
तसे हिमनग असतात.
आयटी अतिशय मोठे फिल्ड आहे. अनेक सिस्टम, टेक्नॉलॉजी, प्रोसेस, डिपार्टमेंट आहेत. येथे माणूस गौण आहे.
महत्त्वाचा विषय
अतिशय महत्त्वाच्या विषयाला तोंड फोडले आहे, डॉक् . सध्या पोचपावती; चर्चेत भाग घेईन.
- ( कोविड काळापासून ढेरी सुटत चाललेला) कांदा लिंबू
दखल आणि शिकवण घेतली आहे
ढेरी सुटली आहेच. पण ह्या लेखातील व्यायाम करण्याची सुरुवात करीनच.
मला कामात मध्ये जेव्हा आठवेल तेव्हा पूर्ण वाकून पायाची बोटे पकडणे, व्हाईटबोर्ड उगाचच उचलून परत जागेवर ठेवणे असे काहीबाही करतच होतो, पण वेळ नक्की नव्हती.
सध्या मी घरातून काम करतो…
सध्या मी घरातून काम करतो. आयटी हमाल आहे.
मला गेल्या महिन्यापासून जाणवायलालागले आहे ते मह्णजे माझे कपडे ( प्यान्ट ) ढिले होऊ लागले आहेत.
चार महिन्यांपूर्वी कम्फर्टेबलसणारी ३६ साईझ ची विजार अगदी ढिल्ली होऊ लागली आहे. पट्टा नसेल तर ती सहज कमरेखाली घसरते.
३४ साईझ ची विजार देखील पट्टा नसेल तर सतत वर ओढावी लागती इतकी ढिल्ली झाली आहे.
हे कोणताही व्यायाम न करता झाले आहे. आहार थोडा कमी झाला आहे . साखर खाणे बंद केलंय. पण गहु, तांदूळ , बटाटे वगैरे कार्बोहायड्रेट्स वगैरे बंद नाहिय्येत
शुगर अगदी बॉर्डवर आहे. एच बी १ए सी ५.३३ इतके आले आहे .
ही समस्या म्हणावी की कसे ते समजत नाही.
छान लेखन
डॉक्टर, आपण मिपावर केलेले लेखन अनेकदा उपयुक्त असते. हं आता लेखाची अघळ-पघळ मांडणी असते. लेखाची अचानक झालेली सुरुवात. मराठी संकेतस्थळ आहे तर, शीर्षक मराठीतून असले पाहिजे. आणि लेखनातील मजकूर योग्य क्रमाने आला पाहिजे असे वाटले. हं आता मिपावर लेखन असे असावे तसे असावे असे काही नियम नाहीत. पण काही चांगल्या सवयी आपण लावून घेतल्या पाहिजेत. शास्त्रीय माहितीत योग्य विदा, संशोधन करणा-या लेखांचे दुवे, सारांश, आणि सहजपणा लेखनात असला पाहिजे. आपलं लेखन आलं की फार अपेक्षेने बघतो. लेखन वाचता वाचता मधेच कर्करोगाचं दळण आलं. आपणास कोणी थेटा समजावून सांगणार नाही, पण योग्य सुचना दिल्या घेतल्या पाहिजेत. पुढील लेखनात योग्य बदल दिसतील अशी अपेक्षा.
बाकी, लेखनातील दोष सोडले तरी मुद्दे बिंदुगामी आहेत. आपलं वय जसं जसं वाढत जातं तसं तसं आपल्याला शारिरीक हालचालीचा कंटाळा येतो. आरोग्य जपण्यासाठी प्रत्येकाने खेळाडू होण्याची गरज नाही; पण दिवसभर शरीराला हालचालीची संधी देणे आवश्यक आहे. नियमित व्यायाम करणे, सलग बसण्याचा कालावधी कमी करणे, कामाच्या जागेत योग्य बदल करणे आणि शरीर देत असलेल्या वेदना किंवा इतर लक्षणांकडे दुर्लक्ष न करणे, या साध्या सवयी दीर्घकालीन आरोग्यासाठी महत्त्वाच्या आहेत. बदलाची सुरुवात मोठी असण्याची गरज नाही; ती सातत्यपूर्ण असणे महत्त्वाचे आहे, हा लेखातील संदेश महत्वाचा आहेच.
डाक्टर, आयुष्यभर खेळ अविभाज्य भाग राहिला. अजूनही बॅडमिंटन खेळतो पण सातत्य नाही. दोन सेट खेळलो तर तरी थकून जातो. वयपरत्वे हे व्हायचंच. कॉलेजला फार हालचाली नसतात ज्या असतात त्य संथ असतात. महाविद्यालयात टेबल टेनीस खेळायचो मधल्या काळात तेही सुटलं. बाकी, फोनवर बोलत बोलत माणूस कुठेही चालत जातो, ते सांभाळले पाहिजे. हालचाली महत्वाच्या आहेत, ते करीत राहू द्या.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
-दिलीप बिरुटे
लेखन वाचता वाचता मधेच…
In reply to छान लेखन by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लेखन वाचता वाचता मधेच कर्करोगाचं दळण आलं.
आपण हा दुवा उघडून पाहिला तर आपल्या लक्षात येईल कि केवळ सकाळी १ तास जोरदार व्यायाम केला तरी कर्करोगापासून संरक्षण देण्यासाठी ते पुरेसे नाही.
बरेच बैठे काम करणारे दिवसात एकदाच असा भरपूर व्यायाम करतात आणि दिवस भर बसून राहतात.
त्यांच्या साठी हा दुवा दिलेला आहे तो आपण संपूर्ण पणे वाचून पहावा हि विनंती आहे.
हृदय विकार आणि कर्करोग हि मृत्यू साठी जबाबदार सर्वात महत्त्वाची दोन कारणे आहेत आणि व्यायामाचा अभाव हा त्यासाठीचा एक महत्त्वाचा घटक आहे.
workouts-not-enough long-sitting-hours-up-cancer-risk-study
https://timesofindia.indiatimes.com/india/workouts-not-enoughlong-sitting-hours-up-cancer-risk-study/articleshow/132297994.cms
अंहं....
In reply to लेखन वाचता वाचता मधेच… by सुबोध खरे
>>>>>>आपण हा दुवा उघडून पाहिला तर आपल्या लक्षात येईल कि केवळ सकाळी १ तास जोरदार व्यायाम केला तरी कर्करोगापासून संरक्षण देण्यासाठी ते पुरेसे नाही.
सकाळ संध्याकाल आणि दुपारीही जमेल तसे हालचाली केल्या तरी कर्करोग टाळता येईलच असे काही नाही. आणि कर्करोग या या कारणांनीच होईल अशी स्पष्ट कारणे सांगता येणार नाहीत. एखादा आजार नेमका कशामुळे होतो काही परिस्थितीमधे निश्चित सांगता येईल, पण प्रत्येक आजाराचे एकच, शंभर टक्के निश्चित कारण सांगता येते असेही नाही असे वाटते.
मलेरिया कशामुळे होतो हे आपण निश्चित सांगू शकाल. मधूमेहाची कारणे, अनुवंशिकता, शरीरातील इन्सुलीन, जीवनशैली, इतर जैवैक घटक वगैरे हेही सांगू शकाल. तर, मुद्दा असा होता की, एक अनुभवी डॉक्टर म्हणून बैठी जीवनशैलीचे दुष्परिणाम जसे होतात तसे थोड्या फार शारिरीक हालचालीचे जे फायदे आहेत त्या फायद्यांवर फोकस हवा असे वाटले.
बाकी, कोणत्याही भल्या बु-या गोष्टीचे दुष्परिणाम तर माणसाच्या पाचवीलाच पुजलेलेच आहेत....
-दिलीप बिरुटे
आंतरिक शक्तीचा शोध
मिपाकर नरेंद्र गोळे यांनी आंतरिक शक्तीचा शोध या लेखातून त्यांचे हृदयविकारासंबंधीचे अनुभव लिहिले होते त्या लेखाची आठवण झाली.
लेख मह्त्वाच्या विषयाबद्द्ल…
लेख मह्त्वाच्या विषयाबद्द्ल नक्कीच चर्चा सुरु करत आहे,जी नेहमीचीच असली तरी कधीही वाचण्यासारखीच आहे.
जर तुमचे काम ऑफिसमध्ये किंवा कॉम्प्युटरसमोर सतत बसून राहण्याचे असेल, तर दर ३० मिनिटांनी एक टाइमर किंवा अलार्म लावा. दर अर्ध्या तासानंतर फक्त १ ते २ मिनिटांसाठी उभे राहा, थोडे ताणून घ्या
हे मी दरवेळी ठरवते पण घडत नाही. हे जमले पाहिजे.
बाकी लेखात कंसांचा अतिरिक्त अनावश्यक वापर वाटत आहे.
यासाठी एक युक्ती वडिलांनी…
In reply to लेख मह्त्वाच्या विषयाबद्द्ल… by Bhakti
यासाठी एक युक्ती वडिलांनी सांगितली होती.पाण्याची बाटली डेस्कपासुन लांब ठेवायची ,म्हणजे पाणी प्यायला उठावे लागते.तसेच दर तासाने एका कुंडीला पाणी घालायला उठायचे.झाडांनी स्ट्रेस्सही कमी होतो.
काही जणांच्या बाबतीत या…
In reply to यासाठी एक युक्ती वडिलांनी… by Bhakti
काही जणांच्या बाबतीत या युक्तीनंतर पाणीही पिणे बंद होते आणि कुंडीतले रोप सुकते. :-))
हा हा...आळशी कुणीकडचे....असे…
In reply to काही जणांच्या बाबतीत या… by गवि
हा हा...आळशी कुणीकडचे....असे लोक्स😅
अजुन एक उपाय ,हो हा मी करते किंवा घडतो.🙃
काही जणांच्या बाबतीत या…
In reply to हा हा...आळशी कुणीकडचे....असे… by Bhakti
काही जणांच्या बाबतीत या युक्तीनंतर घराचा उकिरडा होतो आणि घराची मालकीण कोपते.
- गविंचा पमि
म्हणुनच अशा घरच्या कोपणार्या…
In reply to काही जणांच्या बाबतीत या… by गणपा
म्हणुनच अशा घरच्या कोपणार्या मालकणीचे ओरड्याने कॅलरी बर्न होऊन वजन कमी होते,मालकाचे नाही.😆
-मालकीणीची वजन कमी करण्याची पारंपारिक युक्ती ग्रंथातुन साभार🤣
अजुन एक युक्ती 😄
अशावेळी मालकाने मात्र कोपऱ्यात गपचूप बसून राहू नये, या निमित्ताने घराबाहेर पडून स्वतःचा जीव आणि वजनही सुरक्षित ठेवावे.
>>टरफले(पिस्ता,शेंगा,फळांची…
In reply to हा हा...आळशी कुणीकडचे....असे… by Bhakti
>>टरफले(पिस्ता,शेंगा,फळांची साले)
याचा केर टाकण्यासाठी हे काम करताना खाण्यास सुरु करावे लागेल, त्याने आणखी वजन वाढेल 😀
श्वेता एक युक्ती
In reply to >>टरफले(पिस्ता,शेंगा,फळांची… by श्वेता व्यास
मग भाजी निवडा...एका दगडात दोन पक्षी मारा.
महत्त्वाच्या विषयावर उत्तम…
महत्त्वाच्या विषयावर उत्तम लेख आहे, काही गोष्टी माहिती असतात पण होत नाहीत. या लेखाच्या निमित्ताने शिस्त सुरूच करावी म्हणते.
महत्वाचा विषय.नुकतेच नाना…
महत्वाचा विषय.
नुकतेच नाना पाटेकर यांचे निधन झाले. ते दिवसाला अडीज तास व्यायाम करत असत असे त्यांचा मुलगा म्हणाल्याचे ऐकले.
एकतर ७५ वर्ष वयाच्या माणसाने रोज अडीज तास व्यायाम करावा का?
दुसरी गोष्ट, एवढा व्यायाम करुनही त्यांना ॲटैक आलाच. की जास्त व्यायाम केल्यामुळे ॲट्याक आला?
मी ज्या क्लायंट साठी काम करतो त्या क्लायंट नी प्रत्येक संगणकावर अशी प्रणाली टाकली आहे की ठरावीक वेळाने एक विंडो उघडते आणि तुम्हाला काही व्यायाम सुचवते. ते व्यायाम करा अग करु नका पण ती चित्रफीत संपेपर्यंत तुम्ही काहीही काम करु शकत नाही.
म्हणजे सक्तीची विश्रांती किंवा स्क्रीन वर दिसत असलेले व्यायाम करावेच लागतात.
असो.
क्लायंटचा हा स्व:तचा संगणक…
In reply to महत्वाचा विषय.नुकतेच नाना… by खटपट्या
क्लायंटचा हा स्व:तचा संगणक असेल किंवा तो मोठा अधिकारी असेल त्यामुळे त्याने तो प्रोग्राम इन्टॉल करण्याची सुट घेतली असेल.
कंपन्या अतिशय नालायक आहेत. इतक्या मोठ्या मॅनपॉवरला ते असा प्रोग्राम टाकायला परवानगी देणारच नाहीत. देतच नाहीत. संगणक लॉक केलेले असतात.
ज्याप्रमाणे कामगार असतात त्याच प्रमाणे आयटीत हे आयटी हमाल असतात. कसलाही अधिकार नसतो.
बाहेरून आयटी जेवढे गोंडस दिसते तसे अजिबात नाही.
नाय वो नायआमच्या क्लायंट…
In reply to क्लायंटचा हा स्व:तचा संगणक… by पाषाणभेद
नाय वो नाय
आमच्या क्लायंट कंपनीनेच सर्व लॅपटॉप्स वर हा प्रोग्राम टाकून दिलाय. सर्व म्हणजे कित्येक लाखात लॅपटॉप आहेत. एकदा प्रोग्राम इमेज मधे इन्स्टॉल केला की तो सर्व लॅपटॉप मधे जातोच.
त्यांमुळे सरसकटीकरण करू नका. सर्व कंपन्या नालायक नसतात. आजकाल कित्येक ऑडीट मधे वर्क लाइफ बॅलंस आहे की नाही हे बघीतले जाते. हापिसात आता जिम आहेत. जग बदलत आहे.
अतीशय महत्वाचा विषय
बदललेल्या कामाच्या स्वरूपामुळे आहार व व्यायाम यात जाणीवपूर्वक बदल करणे आवश्यक आहे. माहितीपूर्ण लेख.
दिवसाला अडीज तास व्यायाम करत…
दिवसाला अडीज तास व्यायाम करत असत
व्यायाम करणाऱ्या लोकांना हृदयविकार होण्याची शक्यता कमी असते यात शंकाच नाही परंतु ती कधीच शून्य नसते. कारण आपल्या रक्तवाहिन्या कशा तर्हेने अरुंद होत जातात हे केवळ किती व्यायाम करू शकतो यावरून समजत नाही. दर वर्षी मॅरेथॉन मध्ये एखाद्या धावपटूचा मृत्यू होत आलेला मी कित्येक वर्षे पाहत आलो आहे.
बऱ्याच वेळेस आपण व्यवस्थित/ भरपूर व्यायाम करतो तेंव्हा आपल्याला काहीही होणार नाही असे बहुसंख्य लोक समजतात (यात मी बरेच डॉक्टर सुद्धा पाहिलेले आहेत) आणि वेळच्या वेळी तपासण्या करत नाहीत.
या शिवाय झोपेचा अभाव, मानसिक तणाव, एकटेपणा या तर्हेच्या इतर बाबींमुळे आपल्याला हृदय विकार येण्याची शक्यता वाढत जाते.
sap चा मुख्य कार्यकारी अधिकारी वयाच्या केवळ ४२ व्या वर्षी हृदय विकाराने मृत्यू मुखी पडला तेंव्हा कॉर्पोरेट जगात खळबळ झाली होती. तो व्यवस्थित व्यायाम करत असे आहारावर पूर्ण नियंत्रण होते आणि धूम्रपान मद्यपान करत नव्हता.
https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/sap-india-head-dies-aft…
काही गोष्टी आपल्याला अनुवांशिक आणि गुणसूत्रातून मिळालेल्या असतात त्या आपण बदलू शकत नाही. पण आपण व्यायाम, आहार आणि उत्तम जीवन पद्धती अंगिकारुन त्यांचा परिणाम नक्की कमी करू शकतो.
धन्यवाद - थोडक्यात…
In reply to दिवसाला अडीज तास व्यायाम करत… by सुबोध खरे
धन्यवाद - थोडक्यात ह्रुदयविकाराचे निश्चित असे काही ठोकताळे नाहीत असे म्हणू शकतो (?)
व्यायाम करणाऱ्या लोकांना…
In reply to दिवसाला अडीज तास व्यायाम करत… by सुबोध खरे
व्यायाम करणाऱ्या लोकांना हृदयविकार होण्याची शक्यता कमी असते यात शंकाच नाही परंतु ती कधीच शून्य नसते. कारण आपल्या रक्तवाहिन्या कशा तर्हेने अरुंद होत जातात हे केवळ किती व्यायाम करू शकतो यावरून समजत नाही.
अनेक वर्षे जलद चालणे, धावणे असा एरोबिक व्यायाम करूनही हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या मधल्या रक्तवाहिनीत अडसर निर्माण झाला. तो काढून आता स्टेंट टाकलाय.
एकंदरीत हृदयविकार, कर्करोग, मधुमेह, उच्च नीच रक्तदाब हे प्रकार बऱ्याच प्रमाणात अनुवंशिक आहेत असे माझे निरीक्षण आहे.
गुरुजीआपल्याकडे पाण्याचा…
In reply to व्यायाम करणाऱ्या लोकांना… by श्रीगुरुजी
गुरुजी
आपल्याकडे पाण्याचा गॅल्व्हनाइस्ज्ड लोखंडाचा पाईप असतो. त्याचि आतून गंज पकडण्याची प्रक्रिया सतत चालू असते.
आपला पाईप मुळातच अर्धा इंच असेल तर त्यातून पाणी अडकायला सुरुवात लवकर होते.
पण आपला पाईप एक इंचाचा असेल तर पाणी अडकायला जास्त वेळ लागेल
आणि मुळातच दिड इंच असेल तर आयुष्यभरात आपल्याला पाईप कधीच बदलायला लागणार नाही.
यामुळेच आपल्याला आड माप असणारी माणसे सुखात जगताना दिसतात. आणि बारीक असणारी माणसांची सुद्धा अँजिओप्लास्टी करायला लागते.
आपण व्यायाम करत होतात त्यामुळे आपल्याला हृदयविकार येण्याच्या अगोदर रक्तवाहिन्या अरुंद झालेल्या समजल्या आणि अँजिओप्लास्टी करता आली.
अजिबात व्यायाम न करणारे काऊच पोटॅटोना एकदम जास्त ताण पडला तर फार पटकन हृदयविकाराचा झटका येतो.
मला १५-२० दिवस छातीत दुखत…
In reply to गुरुजीआपल्याकडे पाण्याचा… by सुबोध खरे
मला १५-२० दिवस छातीत दुखत होते, पण झटका आला नव्हता. ग्राफीत मधल्या वाहिनीत अडथळा दिसल्याने स्टेंट टाकला. उजव्या किंवा डाव्या वाहिनीत अडथळा असता तर खूप पूर्वीच झटका आला असता.
कदाचित बालिश शंका
In reply to गुरुजीआपल्याकडे पाण्याचा… by सुबोध खरे
आपल्याकडे पाण्याचा गॅल्व्हनाइस्ज्ड लोखंडाचा पाईप असतो. त्याचि आतून गंज पकडण्याची प्रक्रिया सतत चालू असते.
आपला पाईप मुळातच अर्धा इंच असेल तर त्यातून पाणी अडकायला सुरुवात लवकर होते.
पण आपला पाईप एक इंचाचा असेल तर पाणी अडकायला जास्त वेळ लागेल
आणि मुळातच दिड इंच असेल तर आयुष्यभरात आपल्याला पाईप कधीच बदलायला लागणार नाही.
आपला पाईप किती साईजचा आहे, म्हणजे बेसिकली आपली अंतर्गत शरीर प्रकृती कशी आहे याचे मोजमाप करण्याच्या चाचण्या आहेत का? असतील तर कोणत्या आहेत?
कोणतिही गोष्ट १०० % खात्रीने…
कोणतिही गोष्ट १०० % खात्रीने नाही सांगता येत.
आपले वजन नियंत्रणात असेल मधुमेह/ रक्तदाब नसेल( पूर्ण नियंत्रणात असेल) आपली जीवन पद्धती आहार विहार जर आरोग्यपूर्ण असेल आणि आपण ठराविक कालावधीने आपल्या तपासण्या नियमितपणे करत असाल तर आपल्याला हृदयविकार नक्कीच टाळता येऊ शकेल.
CT angiography हि तपासणी आपल्या हृदयात असलेले अडथळे दाखवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. हि तपासणी व्यवस्थित असेल तर पुढच्या ५ वर्षात आपल्याला हृदयविकार होण्याची शक्यता नाही हे ९८ टक्के खात्रीने सांगता येते.
अगदी छातीत दुखत असताना हि तपासणी केली आणि आपला रिपोर्ट व्यवस्थित असेल.
The American College of Cardiology and American Heart Association (ACC/AHA) cite a 98% negative predictive value for CCTA when used as a first-line noninvasive tool for evaluating stable chest pain.
डॉक्टर
एकेकाळी कबड्डी राष्ट्रीय स्तरावर खेळत असे क्लब फॉरमॅट मध्ये (टांग ओढणे त्यामुळे जरा जास्त अंगळवणी पडलंय ते एक असो 😂)
तर, गंभीर विषय असा आहे की गेली १४ वर्षे व्यायाम म्हणून काहीच केलेलं नाही, काम अर्थातच बैठी हमाली करतोय.
परत एकदा बीस्ट मोड मधे घुसून व्यायाम करायची ईच्छा आहे पण आता वजन ९५ आहे वय ४० आणि मनात एक भीती आहे की काही व्यायाम करायला गेलो अन् क म्हणता काळजात कळ येऊन काळ आला तर पंचाईत !
Please guide me how to go about it systematically and regain my shape maybe.
सर्वात सोपे म्हणजे सूर्य…
सर्वात सोपे म्हणजे सूर्य नमस्कार घालायला सुरुवात करा आणि पाव किमी वेगात चाला.
पहिल्या दिवशी अगदी तीन सूर्य नमस्कार घातले तरी चालेल. दुसऱ्या दिवशी चार घालायचे. चार सूर्यनमस्काराने दमछाक झाली तर सकाळी चार आणि संद्याकाळी तीन असे घाला. त्याच बरोबर दुसऱ्या दिवशी ३०० मीटर वेगाने चाला आणि हळू हळू प्रमाण वाढवत न्या.
आपली उंची १७२ सेमी (पाच फूट ९ इंच गृहीत धरतोय) आणि वजन ९० किलो. म्हणजेच आपला बी एम आय ३०.४ आहे.
https://www.calculator.net/bmi-calculator.html
आपले सरासरी वजन ६४ किलो हवं ( त्यात १० % अतिरिक्त असू शकतं) पण आपलं ९० आहे म्हणजेच आपले अतिरिक्त वजन किमान ४० % आहे.
आपल्याकडे ट्रक आहे ज्याची क्षमता १० टन आहे आपण त्यात रोज १४ टन वजन भरले तर काय होईल?
इंजिन वर भार येईल, सस्पेन्शन लवकर खराब होईल आणि तयार लवकर झिजतील.
आपल्या बाबतीत आपल्या हृदयावर आपल्या पाठीच्या कण्यावर आणि गुढघ्यांवर ४० टक्के अतिरिक्त भार आहे.
यात आपण झोपलात तर पाठीच्या कण्यावर आणि गुढघ्यांवरील भार जाईल पण आपण जोवर जिवंत आहात तोवर प्रत्येक क्षणी आपल्या हृदयावर ४० % अतिरिक्त भार आहे मग आपण झोपा बसा अथवा चाला.
हे सर्व ज्ञान ज्यादिवशी हृदयविकार येईल त्यादिवशी कामास येणार नाही.
तहान लागल्यावर विहीर खणण्यास घेणे हे सुज्ञ पणाचे लक्षण नाही.
आज पासूनच सुरुवात करा.
त्याच बरोबर साधा नियम लक्षात घ्या. आपल्याला पोट भरेस्तोवर अजिबात खायचे नाही. आपल्या जठराचा अर्धा भाग (५० %) अन्नाने भरायचा. २५ % पाण्याने भरायचा आणि उरलेला २५ % रिकामा ठेवायचा. सुरुवातीला एक प्लेट भरून सलाड खा म्हणजे जठार थोडे फार तरी भरेल
अगदी पार्टीला गेलात तरी हाच नियम अंमलात आणायचा.
असे केलेत तर आपले वजन नियंत्रणात येईल.
दर महिना एक ते दोन किलो या दराने पुढच्या दीड ते दोन वर्षात वजन ७० च्या आत आणणे हा आपला हेतू असायला हवा.
दोन महिन्यात १० किलो वजन कमी केलेत तर हवा गेलेल्या फुग्यासारखी आपली त्वचा सुरकुतलेली आणि वय झालेली दिसू लागेल. तसे करणे नक्कीच चांगले नाही.
"वजनाचा काटा" हि माझी लेख माला वाचून पहा