२०१४ च्या निवडणुकीत डोक्यात गोबर भरलेला, फक्त प्रथम श्रेणीत पदव्युत्तर शिक्षण घेतलेला गोबरशेठ देशाचा प्रधानसेवक बनला. देशाच्या अधोगतीला प्रारंभ झाला. आपल्या अंधभक्त गोबर समर्थकांना शून्य जमा असलेली बँक खाती उघडण्यास बाध्य केले. बँकांचे किती नुकसान होईल, याचाही विचार केला नाही. पण गोबरशेठ एवढ्यावर थांबले नाहीत. मेहनतीने कमावलेला पैसा शून्य जमा असलेल्या गोबर जनतेच्या खात्यांत कमिशन देऊन जमा करण्यास लोकांना बाध्य केले. मेहनतीने पैसा कमावणाऱ्यांवर हा किती अन्याय! मोठमोठे उद्योगपती हे देशाच्या आर्थिक व्यवस्थेचे मोठे घटक आहेत. त्यांच्या धंद्यात नुकसान झाले, तरी देशाची अर्थव्यवस्था चालविण्यासाठी बँका त्यांच्याकडून कर्ज वसूल करत नव्हत्या. गोबरशेठ यांनी कायदे बदलून त्यांच्याकडून लाखो कोटी रुपये वसूल केले. त्या पैशांचे काय केले, माहीत आहे? गोबरबुद्धीच्या लोकांना २४ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक मुद्रा कर्जे वाटली. हे गोबरबुद्धीचे लोक एवढे मूर्ख की त्यांनी घेतलेली कर्जेही फेडली! असे केल्याने पैसा बँकांत साठत राहील. देशाची अर्थव्यवस्था बुडेल, एवढेही गोबरबुद्धी असलेल्या अंधभक्तांना कळत नाही.
आता तुम्हीच सांगा, दोन लेनचा रस्ता चार लेनचा करून काय फायदा? दिल्लीहून काशीला पाच तास आधी पोहोचून लोक काय करणार? खाली दिमाग शैतान का घर असते, एवढेही यांना कळत नाही. रस्ते रुंद करण्यावर लाखो कोटी रुपये व्यर्थ खर्च करून फक्त ठेकेदारांचे आणि गोबरभक्त नेत्यांचे पोट भरले जात आहे. जनतेला याचा काहीच लाभ नाही. पण शेटजी एवढ्यावर थांबले नाहीत. जुनी सुंदर रेल्वे स्थानके तोडून ती नव्याने बांधण्याची सुरुवात केली. हजारो किलोमीटर रेल्वे रूळ बदलून टाकले. हजारो नवीन डबे विकत घेतले. डीएफसी (डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर) बांधून देशातील माल भारताबाहेर पाठवू लागले. गेल्या महिन्यात एकाच दिवशी दादरीहून तब्बल सात डबल डेकर मालगाड्या जेएनपीटीकडे निघाल्या. अशा प्रकारे देशात महागाई वाढेल, याचा विचारही गोबरशेठ करत नाहीत.
गोबरशेठ नेहमी बुद्धाचे नाव घेतात. पण प्रत्यक्षात सत्तेवर येताच त्यांनी मोठ्या प्रमाणात अस्त्रशस्त्रे विकत घेण्यास सुरुवात केली. दर महिन्याला एक युद्धनौका तयार होत आहे. यावर लाखो कोटी रुपये खर्च होत आहेत. पण शेटजी एवढ्यावरच थांबले नाहीत. देशात शस्त्रे बनविणारे हजारो कारखाने उभारण्यास परवानगी दिली. शस्त्रांची विक्री व्हावी म्हणून त्यांनी प्रात्यक्षिक जाहिरात केली. पाकिस्तानच्या निरपराध नागरिकांची हत्या केली. त्यांची विमानतळे उद्ध्वस्त केली. मोठ्या प्रमाणात शस्त्रविक्रीच्या ऑर्डर मिळवल्या. अस्त्रशस्त्रे विकून जगाची शांतता भंग करण्याचा गुन्हा गोबरशेठ करत आहेत.
खेड्यापाड्यांत राहणारे कोट्यवधी लोक पूर्वी अंधार झाल्यावर शांतपणे झोपून जायचे. पण शेटजींना हे आवडले नाही. त्यांनी विजेचे उत्पादन दुप्पट करून गावोगावी इंटरनेटही पोहोचवले. आता गरीब जनतेचा पैसा वीज आणि इंटरनेटची बिले भरण्यात खर्च होत आहे. हे सर्व उपद्व्याप अदाणी-अंबानींना फायदा पोहोचविण्यासाठी केले जात आहेत.
आपला देश वसुधैव कुटुंबकम् या विचारधारेचा आहे. बांगलादेशी इत्यादी लोक आपल्या देशात येतात आणि मेहनत करून आपले पोट भरतात. देशाचे नागरिक बनून सरकार निवडण्यात योगदानही देतात. भारतात वर्षानुवर्षे राबूनही त्यांची नावे मतदारयादीतून रद्द करून त्यांना देशाबाहेर काढण्याचे प्रयत्न गोबरशेठ करत आहेत. जगात कुठेही राहणाऱ्या व्यक्तीला आपल्या देशात येऊन राहण्याचा अधिकार आहे, हेही गोबरशेठ यांना कळत नाही.
आपल्या अल्पबुद्धीने देशाच्या अर्थव्यवस्थेला बुडविण्याची ही काही मोजकी उदाहरणे वरील लेखात दिली आहेत. मीपावकरांपाशी आणखी अनेक उदाहरणे असतील, तर त्यांनी ती प्रतिसादात द्यावीत.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
मिसळपाव
प्रतिक्रिया
आशा करतो संपादक लेख उडविणार…
आशा करतो संपादक लेख उडविणार नाही. गोबर शब्दाचा जास्त प्रयोग केला आहे. तो निश्चित सर्वांना आवडेल.
तुम्हीं कशाही कितीही कोलांट्या उड्या मारा.
तुम्हांला लेबल चिटकवले गेले आहे. तुमच्या दुकानात कुणीच फिरकणार नाही.
=))
In reply to तुम्हीं कशाही कितीही कोलांट्या उड्या मारा. by कर्नलतपस्वी
>> तुम्हांला लेबल चिटकवले गेले आहे.
ते लेबल त्यांचं त्यांनीच चिकटवून घेतलं आहे. 😀
- (लेबल्ड) सोकाजी
भारतनेट (BharatNet)…
भारतनेट (BharatNet) प्रकल्पाला 25 ऑक्टोबर 2011 रोजी मंजुरी मिळाली. त्यामुळे गावांमध्ये इंटरनेट पोहोचवण्याचं संपूर्ण श्रेय काँग्रेस सरकारला द्यायला पाहिजे नाही? लेख विनापुरावा काहीही ठोकून लिहिलेला दिसतोय.
दुप्पट वीजेचे उत्पादन??
कोणत्या वर्षापासून कोणत्या वर्षापर्यंत उत्पादनाची तुलना केली आहे??
भारतनेट योजनेची २०११ ते २०१४ दरम्यान ची प्रगती
भारतातील तंत्रज्ञानी किंवा…
भारतातील तंत्रज्ञानी किंवा प्रशासकीय सेवक यांचे काम अव्याहत चालू असते. त्याला हिरवा सिग्नल देणे हे राजकारणी लोकांचे काम असते.
काँग्रेसच्या राज्यात बऱ्याच वेळेस चुकीच्या किंवा वेळेत न घेतलेल्या निर्णयांपायी देशाचे अपरिमित नुकसान झालेले आहे.
उदा. माझगाव डॉक मध्ये एच डी डब्ल्यू पाणबुड्यांचे उत्पादन चार पाणबुड्यानंतर बासनात गुंडाळले ( त्याच्या कंत्राटात झालेल्या भ्रष्टाचारामुळे कि इतर कोणत्या कारणामुळे) आणि मोठ्या कष्टाने पाणबुडीवर काम करण्याचे कौशल्य मिळालेला अनुभव असणारे तंत्रज्ञ बिनकामाचे निवृत्त झाले.
अशीच स्थिती बऱ्याच प्रकल्पात होत होती. मध्यंतरी युतीची कडबोळे सरकारे आली त्याने तर बऱ्याच प्रकल्पांची वाट लावली. कारण प्रत्येक घटकाला आपला मलिदा काढून हवा होता.
यानंतर स्कॉरपियन या फ्रेंच पाणबुडीचे काम चालू झाले. त्या सहा पाणबुड्या निर्मिती नंतर हे काम थंडावले पण ते परत सुरु करून अधिक तीन पाणबुड्या बनवण्याचे काम चालू करणार आहेत असे समजते.
इसरो, रेल्वे, अणुऊर्जा किंवा संरक्षण खात्यातील शास्त्रज्ञ काही गेल्या १२ वर्षात आलेले नाहीत. ते अगोदरपासूनच होते. पण त्यांना काम करण्यासाठी हवे तेवढे स्वातंत्र्य आणि लाल फितीपासून सुटका होत नव्हती. सरकारचे हे काम UPA १ मध्ये थंडावलेले होते आणि UPA २ मध्ये तर पार थंड पडले होते.
रेल्वेचे संपूर्ण विद्युतीकरण किंवा सौर ऊर्जा असो अणुऊर्जा असो कि उपग्रहावर आधारित तंत्रज्ञान असो. काँग्रेसच्या काळात मंदगतीने चाललेली कामे श्री मोदी सरकारने मोठ्या धडाक्याने राबवली.
यामुळेच त्याचे दृश्य परिणाम श्री मोदी यांच्या कारकिर्दीत दिसून येत आहेत.