Skip to main content
लेखक वृषभ खोंडे यांनी शनिवार, 13/06/2026 11:20 या दिवशी प्रकाशित केले.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता ही हा हा म्हणता आपल्या रोजच्या जीवनातील एक मुख्य घटक झालेली आहे. म्हणजे अगदी कोअर डेव्हलपमेंट ते कस्टमर केअर चॅटबॉट ह्या तंत्रज्ञानाने आपल्या जीवनात शिरकाव केला आहेच. अगदी परवा आमची वय वर्षे आठ असणारी कन्या शाळेतील "महाराष्ट्र आणि सिक्कीम मधील सणांची तुलना" ह्या विषयावर पोस्टर बनवण्याचे आर्ट वर्क घेऊन आली तसे आम्ही नवरा बायको हबकलो असताना छोटीने शांतपणे माझा मोबाईल उचलून जेमिनीला असा अचूक प्रॉम्प्ट दिला की त्याने पंधरा सेकंदात गुढी पाडवा अन् सिक्कीमचा लुसूंग (नवीन वर्ष स्वागत सण) तुलना करणारे इन्फोग्राफिक पोस्टर दिले. पुढे कन्येने आमच्या नाक्यावरच्या मारवाडी स्टेशनरी वाल्याला (माझ्या मोबाईल वरून) ते पोस्टर पाठवून कलर प्रिंट घरपोच मागवली आणि कापून व्यवस्थित चार्ट पेपर वर चिकटवून फायनल केला प्रोजेक्ट. आता एकंदरीत जिओ वापरणाऱ्या जनतेला जेमिनी, एअरटेल वापरणाऱ्या जनतेला पर्प्लेक्सिटी, फुकटात वापरणाऱ्या जनतेला चॅट जीपीटी प्रसंगी ऑफिस वर्क मध्ये नोटबुक एल एल एम सहज रोज भेटत असतात, आपल्या लॅपटॉप, मोबाईल्स इत्यादींचा अविभाज्य घटक झाले आहेत हे सगळे ए.आय. ह्या धाग्याची संकल्पना ही आहे की आपल्याला वापरता येईल असे ए आय प्रॉम्प्ट कसे लिहावे, कोडिंग ते पोस्टर मेकिंग, आणि एखाद किचकट सरकारी कामाचे स्वरूप/ फॉर्म डाउनलोड करणे (पण तिथे शेवटी एखाद मानवी एजंटच कामी येण्याची शक्यता जास्त वाटते ते एक असो), एखाद नवीन संकल्पना सखोल समजून घेणे सगळ्यासाठी गरजेचे आहे अचूक आणि विषयवार नीट प्रॉम्प्ट लिहिता येणे, प्रॉम्प्ट इंजिनियरिंग सुद्धा एक नवीन जॉब शाखा म्हणून झपाट्याने उदयाला येते आहे. तर चला आपल्या मनातील उत्तम प्रॉम्प्ट/ आपण प्रयोग करून एखाद काम अचूक करवून घेण्यासाठी deploy केलेले प्रॉम्प्ट/ तांत्रिक प्रॉम्प्ट/ शेअर analysis करायला असलेले प्रॉम्प्ट/ अकॅडमिक माहिती देणारे प्रॉम्प्ट किंवा एकंदरीतच मजेशीर प्रॉम्प्ट इथे शेअर करूया. एक उत्तम प्रॉम्प्ट repository तयार व्हावी आणि ती इच्छुकांना रेडी रेक्नर म्हणून वापरायला उपलब्ध व्हावी हा पण एक हेतू आहेच.


वाचने 1258
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

कृबुच्या सुरुवातीपासूनच मी अनेक प्रतिमा रचलेल्या आहेत. त्याबद्दल एकदोन लेखही इथे प्रकाशित केले होते.

या लेखावरील प्रतिसादांमधून धागाकर्त्यास नेमके  काय अपेक्षित आहे, हे नीटसे समजले नाही. 


In reply to by चित्रगुप्त

प्रॉम्प्टची देवाणघेवाण, एखाद एक्सेल शीट ऑटोमेशन, एखाद उत्तम कलात्मक व्हिडिओ किंवा चित्र बनवण्यासाठी द्यायचा प्रॉम्प्ट, किंवा प्रॉम्प्ट through काहीतरी नवीन शिकता येईल असे काही. रोजच्या जीवनातील धकाधकीत एखाद टास्क ऑटोमेट केला असेल कोणी तर त्याचा अनुभव, ए आय वापराचे अनुभव, एकमेकांना प्रॉम्प्ट डिझाइन मधे मदत करणे इत्यादी.


YouTube व्हिडिओ आपल्या प्रतिसादात अन् धाग्यात देणे सगळ्यांनाच आवडते/ आवडावे. पण प्रॉब्लेम हा होतो की मोबाईल वरून मिपावर येत असता ब्राउझर मधून यूट्यूब वर जाणे दुरापास्त होते, कारण यूट्यूब डॉट कॉम म्हणले की डायरेक्ट ऍप लाँच होते अन् ब्राउझर पेज ऍप होम वर redirect होते. ह्याच्यावर इलाज म्हणून मी सरळ जेमिनी वापरले गुगलचे, वापरण्याची पद्धत अतिशय सुटसुटीत. 

 

- यूट्यूब ऍप वर जावे 

- हवा तो व्हिडिओ सिलेक्ट करावा 

- शेअर बटन क्लीक करून त्या व्हिडिओची (शॉर्ट तर शॉर्ट) लिंक copy करावी 

- जेमिनी मध्ये जावे नवीन विंडो मधे लिंक पेस्ट करावी 

- खाली प्रॉम्प्ट लिहावा "Give me full html code for this link" 

- generate झालेला कोड कॉपी करावा, इथल्या मेसेज बॉक्स मधे पेस्ट करावा (iframe कोड मिळतो व्यवस्थित)

 

 


पण माझ्या कामाच्या निमित्ताने त्या केलेल्या आहेत. कामातील पुन्हा पुन्हा येणारा भाग वगळणे हा त्याचा उद्देश. मग तो सर्वांना कसा लागू होईल?

उदाहरणार्थ, मी ज्या ज्या कामांसाठी बाहेर जातो, फिल्डवर , त्यासाठी मला approval हवे असते संस्थेच्या निर्देशकांचे. ते सुद्धा दोन भाषेत. इंग्रजी व हिंदी. मी AI ला सर्व माहिती दिली. आता फक्त पत्र लिहीताना सर्व्हेचे नाव, visit करण्याचा जिल्हा आणि तारीख एवढे सांगतो. उर्वरित पत्र AI लिहून देतं. आता ही prompt मी इकडे देऊन काय साध्य होणार?  

 

तर अशा प्रकारच्या अनेक prompt आहेत. 


In reply to by आगाऊ म्हादया

जर तुमच्या कंपनीच्या नो डिस्क्लोजर अग्रीमेंट मध्ये बसणारे असले तर नका सांगू, असले तर सांगा. आता जसे approval letter sanction आहे generic प्रॉम्प्ट द्या (तुमच्या व्यावसायिक प्रोफाइल मध्ये काही खंड पडणार नसेल तर) कोणालाही चालेल की तो लेटर्स ड्राफ्ट करणाऱ्या प्रॉम्प्ट मधे काय असावे ते पण शिकायला मिळेल. किंवा मजा मजा म्हणून जर एखाद्या कन्सेप्ट वर काम करत असाल तर ती मांडा, काहीतरी ब्रेन स्टॉर्मिंग होईलच.


https://www.thelabs.org.in/programs

तर यात मुलांना ए.आय. ला कसे हाताळायची याची अनेक तंत्रे मुलांना शिकवली जातातच शिवाय त्यांना कुठवर थांबायचे आणि कुठे काय करायचे याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाते.  कारण मुलं यात अडकणारच आहेत. परंतु हे जे कमर्शियल फ्रंटियर मॉडेल किति वापरायचे आणि ते तसे का वागतात बोलतात लिहितात आणि करतात हे मुलांना अत्यंत काळजीपूर्वक, सांगून त्यांना थोडक्यात ए. आय. स्लॉप पासून वाचवण्याचे हे कोर्सेस ते चालव्तात. नाही नाही, ते इतरांप्रमाणे चिर्कुट बाबींना ए.आय. वापरून आपली सर्जनशीलता गहाण टाकायला आणि मुलांना 'स्मार्ट' व्हयायल शिकवत नाहीत, उलट त्या तसल्या अक्राळ विक्राळ राक्षसापासून स्वत:चे, स्वत्वाचे कसे रक्षण करावे हे शिकवतात.

तुम्ही जे तुमच्या मुलीचे उदाहरण दिले आहे ते वाचून मला तुमच्या मुलीची खरेतर काळजी वाटली. 

या गोष्टीला तुम्ही 'वॉव, काय भारी आणि गुणाची माझी पोर' असे पाहणार असाल तर सावधान. ती किती घातक गोष्ट आहे याची तुम्हला  कल्पना देखील नाही.  मला तरी त्यात कौतुक तर सोडाच पण उलट भीतीच वाटली. 

म्हणजे मी काहीतरी हायपोथेटिकल बोलत नाही. मी तुम्हाला हॅकिंग, मुलांच्या मनात भरवले जाणारे बायसेसचे, न्यूनगंडांचे विष वगैरे तंत्रज्ञानाचे हे असलेले ऑब्वियस तोटे हे सांगणार नाही. ते तुम्हला सगळीकडून ऐकायला येइल.

मी तुम्हला सांगतो की मानवी आयुष्यात अनुभवानांच सर्वात जास्त किमंत आहे. अनुभवांतुन माणसाच्या मनात जो विचारांचा आणि कल्पनांचा कंद फुलतो त्याला सर्जनशीलतेचे धुमारे फुटतात.  त्यातून जी निर्मिती होते ती कितिही सामान्य असली किंवा कितीही युगप्रवर्तक असली तरी ती स्वत:ला दिलेल्या चॅलेंज मधून, स्वत:ला घडवत नेलेल्या प्रोसेस मधून आलेली असते.  माहीती मिळणे ही काय आता विशेष अवघड गोष्ट राहिलेली नाही. (ती पूर्वी प्रचंड कष्टदायक गोष्ट होती) ती एकवेळ एका क्षणात गोळा करणे मी समजू शकतो, मात्र कोणतीही क्रियेटिव्ह प्रोसेस आउटसोर्स करणे आणि त्याची अत्यंत लहान कोवळ्या वयातच सवय लावणे ही प्रचंड क्रूर गोष्ट आहे.

शेवटी प्रॉम्प्ट देऊन लाखो लोक ज्या मंडेन आणि सामान्य दर्जाच्या गोष्टी करणार आहेत तेच आउटपुट तुमच्या मुलीने काढले. त्याचे कौतुक तर अजिबातच करू नये, कारण वर्गातली जवळजवळ सगळीच मुलं असे तयार पोस्टर आणून ठेवणार आहेत. उन्नीस बीस चा फरक असेल.

मानवी मेंदू प्रोसेसिंगच्या बाबतीत जित्का जास्तीत जास्त आळशी करता येइल तेवढा तो करता येतो कारण त्याला उत्क्रांतीची कारणं देखिल आहेत. ही सवय किमान सर्जनशील गोष्टींसाठी तरी इतक्या लहान वयात मुलांना लावू नये. 



 


In reply to by हणमंतअण्णा शंक…

प्रतिसाद एकदम योग्य. 

फक्त एक शंका... बालबोध आहे राग मानू नका... 

 

हल्ली शाळांमधे प्रोजेक्टच्या नावावर असली थेरं चालत असतात. चूक बरोबर गर्दभ महाशयांच्या पार्श्वभागात.

 

यात सगळीच मुले/मुली जे सामान्य आउटपुट काढणार आहे ते काढतील आणि १० पैकी ८, ९ किंवा १० गुण मिळवतील. (समजा हं)

आता एखाद्याच्या मुलाने/मुलीने बुद्धी/मेंदू किंवा मानेच्या वरचा जो काही भाग असेल तो वापरुन तसेच सामान्य किंवा असामान्य आउटपुट काढले आणि मास्तर/मास्तरणीने हे कसले फालतु असे म्हणून दोन चारच गुण दिले तर त्या बालकाची समजुत मेंदू वापरुन कशी काढावी ह्याचे मार्गदर्शन करावे. 

 

अडाणी जोशी 


In reply to by हणमंतअण्णा शंक…

पहिले तर लिंक आणि आनुषंगिक योग्य मार्गदर्शनासाठी आभार. 

वापरून आपली सर्जनशीलता गहाण टाकायला आणि मुलांना 'स्मार्ट' व्हयायल शिकवत नाहीत, उलट त्या तसल्या अक्राळ विक्राळ राक्षसापासून स्वत:चे, स्वत्वाचे कसे रक्षण करावे हे शिकवतात. 

ए आय डेंजरस आहे हे अधोरेखित प्रतिपादन मला पूर्णतः मान्य आहे. पण हे inevitable आहे, आज यूट्यूब बघता हजार जाहिराती येतात, आपल्या नोकरीत स्टँड आउट होण्याकरता ए.आय. वापरा इत्यादी इत्यादी. मुलांना एका लेवल पर्यंत एआयचा ऍक्सेस पक्षी तोंडओळख करून देणे त्यामुळे मला फार भयानक वाटले नाही, provided ते कंट्रोल कंडीशन मध्ये असेल. 

शेवटी प्रॉम्प्ट देऊन लाखो लोक ज्या मंडेन आणि सामान्य दर्जाच्या गोष्टी करणार आहेत तेच आउटपुट तुमच्या मुलीने काढले. त्याचे कौतुक तर अजिबातच करू नये, कारण वर्गातली जवळजवळ सगळीच मुलं असे तयार पोस्टर आणून ठेवणार आहेत. उन्नीस बीस चा फरक असेल. 

करत असतील, सामान्य कुवतीचे आईबाप म्हणून आपल्या पोराचे एखाद पाव टक्का कौतिक जास्त इतकेच. 

मानवी मेंदू प्रोसेसिंगच्या बाबतीत जित्का जास्तीत जास्त आळशी करता येइल तेवढा तो करता येतो कारण त्याला उत्क्रांतीची कारणं देखिल आहेत. ही सवय किमान सर्जनशील गोष्टींसाठी तरी इतक्या लहान वयात मुलांना लावू नये.

 हे सुद्धा मला मान्य आहे, किंबहुना ह्या बाबतीत मी स्वतः सजग आहे त्यामुळे जितका वेळ बाकी लाखो लोक ए आय वर मंडेन प्रॉम्प्ट देऊन सर्जनशीलता गहाण ठेवत असतील त्याच्यापेक्षा कदाचित दुप्पट जास्त वेळ मी तिला सायकल वर हुंदडू देतो, गुढघे फोडून घेऊ देतो, मिरचीचे बी देऊन त्याला मातीत पुरून "त्या झाडाची निगा घेऊन तुझ्या झाडाच्या मिरच्यांचा खर्डा आईला करून घालायला सांगायचा" मला असे काम पण देतो 

(धागा सार्थक आनंदी) खोंडे.


In reply to by हणमंतअण्णा शंक…

हणमंतअण्णा तुम्ही अनेकदा माझे प्रचंड टंकनश्रम वाचवता. धन्यवाद. :-)


थोड्या दिवसांनी "एआइला प्रॉम्प्ट काय द्यायचा" याचेही सर्च एंजिन येणारच. गूगलचेच पहिले असेल. 


In reply to by कंजूस

बाटलीत पाणी मिळत असतांना नळ कुणी सोडेल काय?

 

एका एआयला दुस-या एआयला काय प्रॉम्ट देउ असे  विचारायचे की झाले काम एक दोन वाक्यात. कशाला ते सर्च इंजीन आणि गुगलकडे जायचे? ऑ 

 


माझ्या सारख्या मराठी न शिकलेल्या व्यक्तीला एआइचा लाभ  होतो. एक स्पेलिंग आणि वाक्यरचना सुधारण्यासाठी मी  वापरतो. दूसरा, माहिती पडताळून घेण्यासाठी ही वापर करतो. तिसरा संस्कृत भाषेतील मंत्र श्लोक टंकणे कठीण जाते  एआइ ते करून देते. या शिवाय विभिन्न विषयांवर माहिती ही मिळते.  टंकणचा बराच वेळ वाचतो.  प्रत्येकाने किमान एवढा वापर तरी केला पाहिजे. पुरोगामी लोकांनी तर वापर केला पाहिजे किमान खरी माहिती तरी ते देऊ शकतील. 


In reply to by विवेकपटाईत

पुरोगामी लोकांनी तर वापर केला पाहिजे किमान खरी माहिती तरी ते देऊ शकतील.

 

इथे शुद्ध शास्त्रीय/अभियांत्रिकी किंवा तत्सम संकल्पना, कृत्रिम बुद्धिमत्तेचे फायदे तोटे, संभाव्य धोके आणि सेफ गार्ड इत्यादींवर चर्चा अभिप्रेत आहे, कृपा करून आपले डावे उजवे पुरोगामी प्रतिगामी इत्यादी शरसंधान इथे करू नयेत अशी हात जोडून नम्र विनंती. 

 

(धागा यजमान) खोंडे


In reply to by विवेकपटाईत

>>>पुरोगामी लोकांनी तर वापर केला पाहिजे किमान खरी माहिती तरी ते देऊ शकतील. 

 

सहमत आहे. पण त्यापेक्षा तुमच्यासारख्यांना जास्त गरज आहे ज्यामुळे तुम्ही भलते सलते दावे करणार नाही. 


In reply to by राज जोशी

मी सरकारी बाबू आहे मी माहिती शिवाय भलते सलते दावे कधीच करत नाही. ते काम करण्यासाठी इथे पुरोगामी भरपूर आहे. 


In reply to by विवेकपटाईत

>>>मी सरकारी बाबू आहे मी माहिती शिवाय भलते सलते दावे कधीच करत नाही.

 

चिकित्सक विश्लेषण

 

हे विधान केवळ स्वतःच्या विश्वासार्हतेबद्दलचा दावा नाही; त्यामध्ये पदाचा आधार, माहितीवरील अधिकार, स्वतःच्या विवेकाबद्दलची खात्री आणि टीकेला दिलेले अप्रत्यक्ष प्रत्युत्तर असे अनेक अर्थ दडलेले आहेत.

 

१. भाषिक विश्लेषण : शब्दांची निवड काय सांगते?

“मी सरकारी बाबू आहे”  वक्ता स्वतःची ओळख सरकारी पदाशी जोडतो. सरकारी सेवेत असल्यामुळे आपल्याकडे माहिती, नियम, प्रक्रिया आणि प्रशासकीय अनुभव आहे, असा अप्रत्यक्ष संदेश यातून मिळतो. मात्र, सरकारी कर्मचारी असणे आणि प्रत्येक विषयातील दाव्यांसाठी पुरेसे पुरावे असणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. “सरकारी बाबू” या शब्दप्रयोगात संदर्भानुसार आत्मविश्वास, नोकरशाहीची प्रतिमा, उपरोध किंवा स्वतःच्या पदाचे महत्त्व अधोरेखित करण्याचा सूर असू शकतो.

“माहितीशिवाय”  हा शब्द संपूर्ण विधानाचा केंद्रबिंदू आहे. वक्ता आपल्या दाव्यांना माहितीचा आधार असल्याचे सांगतो. परंतु येथे एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो : ती माहिती नेमकी कोणती? अधिकृत कागदपत्रे की वैयक्तिक अनुभव? प्रत्यक्ष पडताळलेली तथ्ये की ऐकीव माहिती?

अद्ययावत माहिती की कालबाह्य नोंदी? संपूर्ण संदर्भातील माहिती की निवडक माहिती? म्हणूनच, माहिती असल्याचा दावा आणि माहितीची सत्यता सिद्ध करणे या दोन स्वतंत्र बाबी आहेत.

 

“भलतेसलते दावे”

या शब्दांत स्वतःच्या विधानांची गुणवत्ता उंचावण्याबरोबरच इतरांच्या संभाव्य आरोपांना किंवा शंकांना उत्तर देण्याचा सूर जाणवतो. वक्ता स्वतःला बेजबाबदार, अतिशयोक्ती करणाऱ्या किंवा आधारहीन दावे करणाऱ्या लोकांपासून वेगळे दाखवत आहे.

 

“कधीच करत नाही”

“कधीच” हा निरपेक्ष शब्द आहे. तो ठामपणा व्यक्त करतो; परंतु त्याच वेळी दाव्याची कसोटी अधिक कठोर करतो. एकदाही चुकीचा, अपूर्ण किंवा अपुऱ्या पुराव्यावर आधारित दावा केलेला नाही, असा अर्थ यातून निघू शकतो. मानवी ज्ञानाच्या मर्यादा लक्षात घेता, अशा निरपेक्ष विधानासाठी स्वतःच्या खात्रीपेक्षा अधिक भक्कम आधार आवश्यक असतो.

 

२. तार्किक विश्लेषण : विधानात कोणती गृहीतके आहेत?

या विधानामागील तर्क साधारणपणे असा आहे : मी सरकारी सेवेत आहे. मला संबंधित माहिती उपलब्ध असते किंवा ती मिळवण्याची क्षमता आहे.

मी माहितीच्या आधारेच दावे करतो. म्हणून माझे दावे निराधार नसतात.

 

या तर्कात मात्र दोन संभाव्य उणिवा आहेत.

पहिली उणीव — पद म्हणजे पुराव्याची हमी नव्हे.

सरकारी सेवेत असल्यामुळे काही विशिष्ट माहितीपर्यंत प्रवेश असू शकतो; परंतु त्यावरून प्रत्येक विषयातील प्रत्येक दावा योग्यच असेल, असे सिद्ध होत नाही. पद हे पार्श्वभूमीचे प्रमाण असू शकते, दाव्याच्या सत्यतेचा अंतिम पुरावा नव्हे.

दुसरी उणीव — माहिती असणे म्हणजे माहितीचा योग्य अर्थ लावणे नव्हे.

एखादी व्यक्ती कागदपत्रांच्या आधारे बोलत असली तरी तिचा निष्कर्ष चुकीचा ठरू शकतो. माहिती अपूर्ण असू शकते, तिचा अर्थ चुकीचा लावला जाऊ शकतो किंवा उपलब्ध पुराव्यापेक्षा निष्कर्ष अधिक व्यापक असू शकतो.

त्यामुळे या विधानाची तार्किक ताकद वक्त्याच्या पदावर नव्हे, तर त्याच्या दाव्यांना उपलब्ध असलेल्या पडताळता येण्याजोग्या पुराव्यांवर अवलंबून आहे.

 

३. मानसशास्त्रीय आणि संवादात्मक विश्लेषण

संदर्भानुसार या विधानाचे किमान तीन वेगवेगळे अर्थ असू शकतात.

१. व्यावसायिक आत्मविश्वास

वक्त्याला आपल्या माहितीवर विश्वास आहे आणि तो बेजबाबदार विधानांपासून स्वतःला दूर ठेवू इच्छितो. त्याने पुरावे देण्याची तयारी दाखवली, तर हे विधान व्यावसायिक शिस्तीचे द्योतक ठरू शकते.

२. टीकेला दिलेले बचावात्मक उत्तर

हे विधान एखाद्या आरोपानंतर केले असेल, तर त्यामागे स्वतःची विश्वासार्हता टिकवण्याचा प्रयत्न असू शकतो. मात्र, बचावात्मक सूर आहे म्हणून दावा खोटा आहे, असा निष्कर्ष काढता येत नाही.

३. पदाच्या प्रतिष्ठेचा आधार घेणे

जर वक्ता स्वतःच्या पदाचाच आधार देऊन पुरावे किंवा प्रश्न टाळत असेल, तर हे विधान अधिकाराच्या आधारे विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न ठरू शकते. पण केवळ या एका वाक्यावरून तसा हेतू निश्चित करता येत नाही.

४. विधानातील अंतर्विरोध : “माहिती आहे” की “दावा सिद्ध करता येतो”?

या विधानाची सर्वात महत्त्वाची चिकित्सक कसोटी येथे आहे.

एखादी व्यक्ती म्हणते की ती माहितीशिवाय दावे करत नाही. मग तिच्या दाव्याला आव्हान दिले असता तिने कोणती भूमिका घ्यावी?

संबंधित माहितीचा स्रोत स्पष्ट करणे. शक्य असल्यास अधिकृत नोंदी किंवा कागदपत्रे सादर करणे. तथ्य आणि वैयक्तिक मत यांतील फरक स्पष्ट करणे.  नवीन पुरावे समोर आल्यास निष्कर्षाचा पुनर्विचार करणे. माहिती अपुरी असल्यास अनिश्चितता मान्य करणे.

याउलट, “मी सरकारी बाबू आहे, त्यामुळे माझे म्हणणे बरोबरच आहे” अशी भूमिका घेतली, तर मूळ विधानातील माहितीचा आधार दुय्यम ठरतो आणि पदाचा आधार प्रमुख बनतो. अशा वेळी विधान स्वतःच्या कसोटीवरच कमकुवत होते.

 

५. सरकारी कर्मचाऱ्याच्या भूमिकेतून पाहिल्यास

सरकारी सेवकासाठी विश्वासार्हता ही केवळ आत्मविश्वासाने बोलण्यात नसते. ती तथ्यनिष्ठता, नियमांचे योग्य आकलन, नोंदींची अचूकता आणि उत्तरदायित्व यांतून निर्माण होते. त्यामुळे या विधानाचे मूल्यमापन करताना दोन प्रश्न वेगळे ठेवणे आवश्यक आहे :

वक्त्याचा हेतू: तो जाणीवपूर्वक निराधार दावे टाळत आहे का?

वक्त्याच्या दाव्याची सत्यता: त्याने केलेला विशिष्ट दावा वस्तुनिष्ठ पुराव्यांनी सिद्ध होतो का?

पहिल्या प्रश्नाचे उत्तर प्रामाणिक “हो” असले, तरी दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर आपोआप “हो” होत नाही. प्रामाणिक व्यक्तीकडूनही तथ्यात्मक चूक होऊ शकते.

 

६. अधिक प्रभावी आणि बौद्धिकदृष्ट्या प्रामाणिक मांडणी

मूळ विधानातील आत्मविश्वास कायम ठेवायचा, पण त्याला पुराव्याची जोड द्यायची असेल, तर पुढील मांडणी अधिक परिणामकारक ठरेल :

 

“मी सरकारी सेवेत आहे. त्यामुळे कोणताही दावा करताना उपलब्ध अधिकृत माहिती, नोंदी आणि पडताळता येण्याजोगे पुरावे यांना महत्त्व देतो. माझ्या विधानाबाबत शंका असल्यास संबंधित पुरावे तपासावेत; आणि माझी चूक निदर्शनास आल्यास ती मान्य करून दुरुस्त करण्यासही मी तयार आहे.”

 

या मांडणीत पदाचा अनावश्यक आधार घेतलेला नाही. त्याऐवजी पुरावे, पडताळणी आणि चूक सुधारण्याची तयारी यांना महत्त्व दिले आहे. त्यामुळे विश्वासार्हता केवळ घोषित न राहता तपासता येण्याजोगी बनते.

 

अंतिम निष्कर्ष

“मी सरकारी बाबू आहे, मी माहितीशिवाय भलतेसलते दावे कधीच करत नाही” हे विधान आत्मविश्वासपूर्ण आहे; पण केवळ आत्मविश्वासामुळे ते सत्य सिद्ध होत नाही.

त्याची ताकद वक्त्याच्या पदात किंवा “कधीच” या शब्दाच्या ठामपणात नसून, तो कोणती माहिती वापरतो, त्या माहितीची विश्वासार्हता किती आहे, निष्कर्ष कितपत तर्कसंगत आहे आणि पुरावे मागितल्यावर तो किती पारदर्शक राहतो यांत आहे.

चिकित्सक दृष्टिकोनातून पाहिल्यास, स्वतःच्या विश्वासार्हतेची घोषणा करणे आणि ती पुराव्यांनी सिद्ध करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. खऱ्या अर्थाने विश्वासार्ह व्यक्ती केवळ “मी निराधार दावे करत नाही” असे म्हणत नाही; तर तिचे दावे तपासता येतील अशी भूमिका स्वीकारते.


In reply to by राज जोशी

सरकारी नोकराने पूर्ण सेवाकाळात "मी टेबलावर आलेल्या फायली अन् हात जोडून आलेल्या गरीब लोकांना सेवा देताना ओव्हरटाईम केला, वेळ काळ (लंच अवर सुद्धा) पाहिला नाही" इतपत त्यांचे वक्तव्य विश्वासार्ह वाटले बुवा मला तरी तुम्हाला उगाच बांडी पंचायत करायचा नाद लैच !


In reply to by वृषभ खोंडे

 

"काय करणार राव, उगाचच्या पंचायती करायची सवय लहानपणापासनं हाय. आता म्हातारपणी काय बदलणार..."