Skip to main content
लेखक खिलजि यांनी रविवार, 04/10/2026 22:57 या दिवशी प्रकाशित केले.


मी शाळेत असल्यापासून किंवा ककॊलेजात होतो तेव्हापर्यंत मला आपल्या महाराष्ट्रात पाच ज्योतिर्लिंगे आहेत हे ठाऊक होते . पण जेव्हा गुगलून बघितले तर तीनच आपल्या राज्यात आहेत असे समजले . सत्य काय आहे ? 


वाचने 589
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

गूगल महाराष्ट्र आणि मराठवाडा वेगळे समजत असेल..

 

निजामशाहीतही असतील. अर्थात ओपन सोर्समुळे कुणीही फेरफार करतात.

त्यामुळे औंढ्या नागनाथ आणि परळी वैजनाथ महाराष्ट्रात नाहीत.

 

भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, महाराष्ट्रात धरली. खरंतर घृष्णेश्वरलाही मराठवाड्यात धरायला पाहिजे.


त्यामुळे औंढ्या नागनाथ आणि परळी वैजनाथ महाराष्ट्रात नाहीत.

गुजरात (सौराष्ट्र) मध्ये द्वारके जवळ असलेले  नागेश्वर ज्योतिर्लिंग आणि झारखंड मध्ये असलेले बैद्यनाथ ज्योतिर्लिंग आणि महाराष्ट्रातील वरील दोन ज्योतिर्लिंग ह्याबाबत गोंधळ आहे.त्यामुळे वरील दोन महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग धरली नाहीत तर महाराष्ट्रात ३ ज्योतिर्लिंग आहेत.


In reply to by कानडाऊ योगेशु

गुजरात (सौराष्ट्र) मध्ये द्वारके जवळ असलेले  नागेश्वर ज्योतिर्लिंग आणि झारखंड मध्ये असलेले बैद्यनाथ ज्योतिर्लिंग आणि महाराष्ट्रातील वरील दोन ज्योतिर्लिंग ह्याबाबत गोंधळ आहे.

होय हा गोंधळ आहे.पाच एक महिन्यापुर्वीच मैत्रिणीला सांगत होते.केदारनाथ व्हायला हव लवकर ...बाकी महाराष्ट्रातले पाच ज्योतिर्लिंग झाले आहेत.तेव्हा तीही म्हणाली की महाराष्ट्रात तीनच आहेत.गुजरातमध्ये नागनाथ आणि वैद्य्नाथ दुसरीकडे आहे.

पण लहानपणापासुन ओंढा आणि परळी आम्ही १२ पैकी एक मानत आलो आहोत.


खरं तर उरलेली ७ ज्योती र्लिंंगे सुद्धा  महाराष्ट्रात आणावी म्हण्जे टोट्ट्ल १२ लिंगे मराठी भुमीत !

महाराष्ट्रावर अन्याय झाला नाही पाहिजे ! 

या मराठमोळ्या भुमीचा विकास होवो ..... मराठी माणसाची भरभराट होवो.

 

विकास, विकास महाविकास ! 


In reply to by चौथा कोनाडा

सह्याद्रीच्या घाटवाटांवरून भटकताना, अंगावर कोसळणाऱ्या पावसाच्या धारा झेलत या १२ प्राचीन शिवमंदिरांचे दर्शन घेणे म्हणजे ट्रेकर्स आणि शिवभक्तांसाठी एक अवर्णनीय आणि समृद्ध अनुभव आहे. हा आकडाही बारा, हा योगायोग बारा ज्योतिर्लिंगचे दर्शना आनंदापेक्षा कमी नाही.राजा झंझ यांची निसर्ग आणि भक्ती एकत्र गुंफण्याची ही संकल्पना खरच थक्क करणारी होती

| अनुक्रम | नदीचे नाव | मंदिराचे नाव आणि ठिकाण |

|---|---|---|

| १ | गोदावरी नदी | त्र्यंबकेश्वर मंदिर, नाशिक (ज्योतिर्लिंग) |

| २ | प्रवरा नदी | अमृतेश्वर मंदिर, रतनवाडी (अकोले, अहमदनगर) |

| ३ | मुळा नदी | हरिश्चंद्रेश्वर मंदिर, हरिश्चंद्रगड (अहमदनगर) |

| ४ | पुष्पावती नदी | नागेश्वर मंदिर, खिरेश्वर (जुन्नरजवळ, पुणे) |

| ५ | कुकडी नदी | कुकडेश्वर मंदिर, पुर (जुन्नर, पुणे) |

| ६ | मीना नदी | ब्रह्मनाथ मंदिर, पारुंडे (जुन्नर, पुणे) |

| ७ | घोड नदी | सिद्धेश्वर मंदिर, आहुपे (भीमाशंकर जवळ, पुणे) |

| ८ | भीमा नदी | भीमाशंकर मंदिर, डाकिनी (पुणे जिल्हा - ज्योतिर्लिंग) |

| ९ | कडवा नदी | जागेश्वर मंदिर, टाकेद (इगतपुरीजवळ, नाशिक) |

| १० | आरळा नदी | सिद्धेश्वर मंदिर, ओतूर (जुन्नर, पुणे) |

| ११ | कृष्णावती नदी | कोटेश्वर मंदिर, भोरगिरी (खेडजवळ, पुणे) |

| १२ | भाम नदी | कपालेश्वर मंदिर, भामचंद्र डोंगर (राजगुरुनगरजवळ, पुणे) |

सह्याद्रीचा हा ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वारसा खरोखरच अद्भूत आहे.