Skip to main content
लेखक राज जोशी यांनी गुरुवार, 01/10/2026 19:38 या दिवशी प्रकाशित केले.

अखेरीस अमेरीकेने बालविवाहाला बंदी घातली आहे. 

 

https://www.loksatta.com/desh-videsh/california-bans-child-marriage-us-states-legality-marathi-news-rds-00-6167640/?ref=latestnews_hp

 

 

यामुळे अमेरीका सुद्धा भारतासारखीच पुरोगामी दिशेने वाटचाल करत आहे याबद्दल अमेरीकेचे आणि अमेरीकन जनतेचे हार्दिक अभिनंदन !!! 


वाचने 1177
प्रतिक्रिया 35

प्रतिक्रिया

अल्पवयीन विवाहास बालविवाह म्हंटलं जातंय का? माझ्या माहितीनुसार इथे इंग्लंडात वय वर्षे १६ ते १८ हे वय तांत्रिक दृष्ट्या बालकाचं असलं तरी विवाहासाठी पुरेसं धरलं जातं. मात्र या वयात विवाह करायचा असल्यास पालकांची परवानगी लागते. जी १८ व्या वर्षानंतर लागंत नाही.

 

-गा.पै.


In reply to by गामा पैलवान

अल्प काय आणि बाल काय ? शेवटी १८ च्या आत आहे ना? मनुवादी भुमिका आहे ही १८ च्या आत लग्न करण्याची !


In reply to by गामा पैलवान

आमच्याकडे ४०व्या वर्षीदेखील विवाहासाठी पालकांची परवानगी लागते 🙃


"अस्तित्त्वात नसलेल्या गोष्टी कधीही नष्ट होत नाहित" असे बहुतेक "पुण्यनगरी" नावाच्या वर्तमानपत्राची ट्यागलाईन होती (आता आहे की नाही माहित नाही.).

आता अमेरीकेने सतीप्रथा, केशवपन, अस्पृश्यता बंद करणारे विधेयक देखील लवकरात लवकर आणावे हीच सदिच्छा !

 

तळटीप : पहिल्या वाक्याचा दुसऱ्या वाक्याशी संबंध नाही.


In reply to by धर्मराजमुटके

तसेच अमेरिकेने ताबडतोब मनुस्मृतीवर बंदी घालावी अशी आम्ही मागणी करतो अन्यथा चौकाचौकात (अमेरीकेतल्या) मनुस्मृती जाळली जाईल तसेच अमेरीकेतील पितॄसत्ताक पद्धती ताबडतोब बंद करावी. 

 

- राहुल जोशी 


In reply to by राज जोशी

अमेरीकेत १२ ते १५ टक्के कृष्णाच्या वर्णाचे आहेत ? आता कृष्णा वर्णाचे म्हणजे हिंदू. ते  मनुस्मृती जाळून देतील होय :)


In reply to by धर्मराजमुटके

त्यांना बुद्धीभेद करु की ... तुमचा रंग काळा मनुस्मृतीमुळे झाला... संपलं ! दनादन जाळपोळ सुरु... हाकानाका 


इतकी वर्षे अमेरिकेत एक संगीत शारदा नाटक किंवा संमती वय कायदा इत्यादी काहीच आले नाही म्हणजे अवघड आहे ! तसेही अमेरिकन लोकशाही फारच conservative आहे हे ऐकून होतो आज समक्ष बघितलो.


In reply to by वृषभ खोंडे

सहमत आहे. तसेच एकच प्याला नाटकाची सुद्धा त्यांना जरुरी असावी असे वाटते. 


In reply to by राज जोशी

करमणुकीच्या सगळ्या साधनांवर एकत्रच घाला घालायचा म्हणता आहात मग जनते ने काय I घा..... ? 🤣🤣


ह्या प्रॉब्लेम वर जुनो हा सिनेमा असल्याचे अंधुक आठवते, टीनएज प्रेग्नन्सी इत्यादी असाच काहीतरी विषय होता.


In reply to by वृषभ खोंडे

वृषभदादा आपले सॉफ्टवेर उपडेट करण्याची वेळ आली आहे :) बांधावरून बरेच पाणी गेले आहे.

जुनो चित्रपटांत एलेन पेज ह्या मुलीने त्या गरोदर टीनएज मुलीची भूमिका वठवली होती. त्या एलेन ने लिंगबदल करून आता इलियट पेज हे नाव धारण केले आहे आणि नुकताच हिट झालेल्या ओडिसी मध्ये ऍचिलीस ह्या महान योध्याची भूमिका केली आहे. इतकेच नाही तर तिचा/त्याचा हल्लीच न्यू रॉक मॅगझीन च्या मेन्स style issue मध्ये अनावृत्त फोटो सुद्धा प्रकाशित झाला आहे. 

 

तिप: ओडिसी  मध्ये ऍचिलीस च्या मृत्यूची आकाशवाणी झाली होती कि हा मुलगा महान योद्धा होईल आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू होईल. त्याला त्याच्या ह्या विधिलिखितापासून वाचविण्यासाठी त्याच्या आईने त्याला पुरुष म्हणून वाढवले नाही तरी स्त्री म्हणून मुलींत ठेवून वाढवले.

 


In reply to by साहना

यावरून सुप्रसिद्ध लेखक आणि प्रवासवर्णनकार जेम्स/जॅन मॉरिस हे नाव आठवलं. 


In reply to by साहना

असे असेल तर सॉफ्टवेअर नाही मला फर्मवेअर हार्डवेअर जीवन तत्वज्ञान करंट अफेअर्स सगळेच अपडेट करण्याची सक्त गरज आहे.


In reply to by वृषभ खोंडे

काही करु नका. जसे आहात तसे ठीक आहे.. आता कीती राहीले तुमचे? पाच गेले दहा राहीले... राहू द्या !! 


अमेरिकेत विविध प्रकारचे विचित्र कायदे आहेत. विविध अमेरिकन राज्यांत विवाहबाह्य शरीरसंबंध ठेवणे बेकायदेशीर आहे. अर्थांत त्याचे पालन आणि अंबलबजावणी होत नाही.

अमेरिकन विवाहविषयक कायदे हे ब्रिटिश कॉमन लॉ वर आधारित आहेत. साधारण १७६५ मध्ये अमेरिकेत हे कायदे अस्तित्वांत आले तेंव्हा विवाहाचे वय मुलींसाठी १२ आणि मुलांसाठी १४ होते. त्याकाळी अपेक्षित आयुष्य साधारण ३५ वर्षांचे होते. ७ पेक्षा लहान मुलांचे लग्न हा गंभीर गुन्हा मानला जात होता तर ७-१२ वयांत लग्न केल्यास १२ वर्षानंतर पाहिजे तर तो विवाह आपोआप void मानला जात होता. पण सरासरी विवाहाचे वर साधारण २० होते. ह्याशिवाय मुलगी गरोदर राहिल्यास कुठल्याही वयांत लग्न कायदेशीर ठरवले जाऊ शकत होते.

त्यानंतर विवाहाचे वय २१ केले होते पण घटनेत २६व्ही दुरुस्ती करून ते १८ करण्यात आले. पण पालकांची परवानगी घेऊन विवाह करण्याचे वय विविध राज्यांत वेगळे होते आणि माझ्या माहिती प्रमाणे काही अपवादात्मक गोष्टींत १४ आहे. आणि हे सर्व असून १८ वर्षांच्या आधी लग्न करणे आणि गरोदर होणे हि अत्यंत सामान्य बाब आहे. माझ्या माहितीतील आणि ओळखीतील अनेक मुली १६-१७-१८ वयांत गरोदर आणि विवाहबंधनात अडकली आहेत.  

आधुनिक काळांत १८ हे वय जास्त आहे असे मला वाटते पण हे uninformed opinion आहे ! कदाचित १६ हे चांगले वय असावे.
 


पूर्ण अमेरिकेत बंदी घातली नाहीये 

 काही राज्यात  घातली आहे. काही राज्यात अजूनही आहे


In reply to by राज जोशी

बळी म्हणजे अशी ही बनवाबनवी चित्रपटातला बळी, जो म्हाताऱ्या मावशीला धमकावतो पण सगळ्यांकडून मार खातो. 


In reply to by राज जोशी

मी नाही! अमेरिकेत बळीचे राज्य असल्याने कुणालाही यायला बंदी नाही! नी भारतात कुणाचे राज्य आहे माहीत नाही पण लोक पळून चाललेत. 


In reply to by अमरेंद्र बाहुबली

लोक जिकडे पैसे मिळतील तिकडे पळतात. 

 

तरीही भारतात शेकडो कोटी लोक अजून आहेत आणि ते पळुन अजिबात जाणार नाहीत.


In reply to by अमरेंद्र बाहुबली

तुम्हाला माहीत नाही आणि चक्क तुम्ही विचारताय ?? 

तुमच्या सारख्या सर्वज्ञ गाढ्या अभ्यासू आणि व्यासंगी माणसाला असे प्रश्न पडावे याचे आश्चर्य वाटते.


In reply to by अमरेंद्र बाहुबली

 

 आम्ही सामान्य तुमच्यासारखा व्यासंग थोडी आहे आमचा?