Skip to main content

मिपा वर्धापनदिनाच्या शुभेच्छा.

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी सोमवार, 14/09/2026 12:40 या दिवशी प्रकाशित केले.

राम राम मंडळी ! 


बघता बघता मिसळपाव डॉट कॉमला १९ वर्षं पूर्ण झाली!
२००७ साली गणेशचतुर्थीच्या मुहूर्तावर सुरू झालेला हा आपला मिपा आज १९ वर्षांचा झाला, यावर खरं तर विश्वासच बसत नाही. 


या १९ वर्षांच्या प्रवासात मिपाने कितीतरी लेख पाहिले, कितीतरी कविता ऐकल्या, कितीतरी चर्चा रंगवल्या आणि असंख्य काथ्याकूट झेलले.


कधी गंभीर चर्चा झाल्या, कधी मतमतांतरे झाली, कधी तिखट वाद झाले…पण या सगळ्या मिसळीतून एक गोष्ट मात्र कायम राहिली माणसांमाणसातला आपलेपणा


कितीतरी मिपाकर या व्यासपीठावर भेटले. काही लेखनातून जवळ आले, काही प्रतिसादातून, काही खरडफळ्यावरच्या गप्पांमधून… आणि काही तर मिपाच्या आभासी जगातून प्रत्यक्ष आयुष्यातले मित्र झाले. 


आज मागे वळून पाहताना वाटतं, मिसळपाव हे फक्त संकेतस्थळ राहिलं नाही; तो एक अनुभव झाला, एक आठवण झाली आणि अनेकांसाठी आपला एक कट्टा झाला. 


आता १९ वर्षं झाली म्हटल्यावर थोडा काथ्याकूट तर झालाच पाहिजे! 

* मिपावरची तुमची पहिली आठवण कोणती?

* पहिला लेख किंवा पहिला प्रतिसाद आठवतोय का?
* मिपावर भेटलेला एखादा खास मित्र ?
*  कोणता जुना धागा अजूनही लक्षात आहे?
* कोणता मिपाकर / कोणती लेखनशैली आजही आवडते?
* आणि हो… मिपाच्या १९ वर्षांच्या इतिहासातला सर्वात भारी काथ्याकूट कोणता ? लेख ? कविता ? प्रतिसाद ?


जुने मिपाकर असोत, नवे मिपाकर असोत किंवा आजवर फक्त वाचत राहिलेले मूक वाचक असोत, सगळ्यांनी हजेरी लावायची !

 १९ वर्षांचा हा प्रवास असाच पुढे चालत राहो, नवनवीन लेखक जोडले जावोत, चर्चा रंगत राहोत, काथ्याकूट होत राहो आणि या मिसळीतला आपलेपणा कधीच कमी होऊ नये! 
 

मिसळपाव डॉट कॉमला १९व्या वर्धापनदिनाच्या मालक नीलकांत, सहकारी तंत्रज्ञ प्रशांतशेठ,  छुपे संपादक, वाचक, लेखक, सर्वांना  हार्दिक शुभेच्छा ...!

लेख वर्गीकरण

वाचने 84
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

रात्रीपासून चार वेळा शुभेच्छाचं दळन टाकलं. प्रत्येक वेळी मसूदा गेला.  सबमिट केलं की येरर.  आता पाचव्या प्रयत्नात लेख पडला.

 

कोण पाहतं हे तांत्रिक काम ?

 

-दिलीप बिरुटे


सर्व मिपा प्रेमींना वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

पैजारबुवा, 


मिप वर्धापनदिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा, मिपा अव्याहतपणे कुठलाही मोबदला न घेता चालवणाऱ्या मालक प्रशांत, नीलकांत तसेच संपादक मंडळाचे आभार.


मिसळपाव डॉट कॉमला १९व्या वर्धापनदिनाच्या मालक नीलकांत, सहकारी तंत्रज्ञ प्रशांतशेठ,  छुपे संपादक, वाचक, लेखक, सर्वांना  हार्दिक शुभेच्छा ...! 

+१०८

मिसळपाव डॉट कॉमला १९व्या वर्धापनदिनाच्या मालक नीलकांत, सहकारी तंत्रज्ञ प्रशांतशेठ,  छुपे संपादक, वाचक, लेखक, सर्वांना  हार्दिक शुभेच्छा ...!


In reply to by कांदा लिंबू

मिपावर लिहिणाऱ्यांबरोबरच चालवणाऱ्यांचे योगदान मोठे आहे. मिपा असेच बहरत राहो याच शुभेच्छा.

🌹🌸 💐