रूढींत गुंतला हा सगळा समाज आहे
काही न बदलणे हा इथला रिवाज आहे!
रस्त्यांत बांधलेली असतात देवळे, वा
रस्त्यामधेच कोणी पढतो नमाज आहे
मी विनवले कितीदा त्यांना परोपरीने
त्यांना परंपरांचा भलताच माज आहे!
काही न बदलणे हा इथला रिवाज आहे!
रस्त्यांत बांधलेली असतात देवळे, वा
रस्त्यामधेच कोणी पढतो नमाज आहे
मी विनवले कितीदा त्यांना परोपरीने
त्यांना परंपरांचा भलताच माज आहे!
सोसून उत्सवांचे आवाज कर्णभेदी
बहुतेक देव झाला बहिराच आज आहे
शोधू नकोस तूही आता उपाय येथे
धर्मांधळेपणावर कोठे इलाज आहे?
(विसरू कसे तुला, अन् ठुमरी प्रिये तुझी ती...
अजुनी मनात तू, अन् ओठी खमाज आहे!)
- कुमार जावडेकर
बहुतेक देव झाला बहिराच आज आहे
शोधू नकोस तूही आता उपाय येथे
धर्मांधळेपणावर कोठे इलाज आहे?
(विसरू कसे तुला, अन् ठुमरी प्रिये तुझी ती...
अजुनी मनात तू, अन् ओठी खमाज आहे!)
- कुमार जावडेकर
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
233
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान.
छान....!
-दिलीप बिरुटे
छानच
छानच
सुंदर शब्दरचना
कठीण काळ सांप्रत येता, उगी राहून बघावे बैल म्हणे.
दिसली जशी..
दिसली जशी काल.. तशी आजही दिसावी
काल एकोणतीस 🤔 आज तीसावी असावी.🤣
आवडली.
निशाणी चुकला.
In reply to दिसली जशी.. by कर्नलतपस्वी
दिसली जशी काल.. तशी आजही दिसावी
काल एकोणतीस 🤔 आज तीसावी असावी.🤣
हा प्रतिसाद दुसरीकडे डकवायचा होता तो चुकून इथे डकवला गेला.
रूढी परंपरां हाच साज आहे
धनदांडग्यांना पैशाचा माज आहे
मानती कस्पटासमान इतरेजनांना
हाच देव त्यांचा कसला समाज आहे
गझल आवडली हे वेगळे सांगावयास नको.
वाह ..गणपती ज्ञानाचा देव…
वाह ..
गणपती ज्ञानाचा देव म्हणतो,
मग उत्सवात कुठे ज्ञान आहे?
डीजे-ढोल-ताशांचा कर्णभेदी नाद,
विवेकाचा कुठे आवाज आहे?
धन्यवाद
"विवेकाचा कुठे आवाज आहे?"
व्वा!
सर्वांना धन्यवाद!
- कुमार
छान...
In reply to धन्यवाद by कुमार जावडेकर
खरंच आवडली रचना. म्हणून पुन्हा एकदा दाद.
स्टाफ रुममधे गप्पा करता करता, वाचली तुमची रचना..
-दिलीप बिरुटे
धन्यवाद!
In reply to छान... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्यवाद डॉक्टर साहेब! आपण पुन: दाद दिल्याबद्दल आणि स्टाफरूम मध्ये वाचल्याबद्दल.
वाह!
खूपच आवडली ...
शोधू नकोस तूही आता उपाय येथे
धर्मांधळेपणावर कोठे इलाज आहे?
(विसरू कसे तुला, अन् ठुमरी प्रिये तुझी ती...
अजुनी मनात तू, अन् ओठी खमाज आहे!)
वाह!
थोडेसे...
रस्त्यावर बांधलीत, देवाला घरे,
चालायला आता, रस्ते हवेत कुठे?
भोंग्यांचा त्रास, कधी डीजेचा मार,
भक्तीच्या नावाखाली बहिरेच फार
दहा लाखाचा स्पिकर अन् नाचणारी पोरे,
परंपरेचा देखावा फक्त, बाकी सारेच कोरे!
रुग्ण, वृद्ध, नाही कुणाचाच विचार
आवाजाच्या जोरावर, बहिरे करून टाका ठार!
ठार बहिरा
चेतन
खरं आहे
In reply to थोडेसे... by चेतन
बाकी सारेच कोरे.... नाही कुणाचाच विचार.