Skip to main content

शाकाहाराचे भविष्य काय ?

लेखक टारझन यांनी रविवार, 24/05/2009 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 3065
प्रतिक्रिया 52

प्रतिक्रिया

काहीही होवो ! काय फरक पडतो‍? शेवटी कुठलेही खाद्य हे केवळ भुक भागवायचे साधन आहे. पण एकमेव नाही. उद्या माणसाला खाण्याची शक्ती गमवावी लागली, तरी फरक पडणार नाही. माणुस वेगळे काहीतरी शोधेलच. महत्व भुक भागण्याला आहे, खाद्याला नाही. अर्थात, माझ्या मते तरी सर्वोत्कृष्ट खाद्य १२ नंबर आहे. --अवलिया

In reply to by अवलिया

सहमत आहे. ;) (अवांतरः या टारझणाला सुट्टी असण्याचे बरेच तोटे आहेत. आठवड्याचे फ्रस्टेशन एकदमच काढतो आणी ते पण दिसेल त्या धाग्यावर. असो चालायचच ;) ) या धाग्याला ५०+ प्रतिसाद कंफर्म. :) चालु द्या. आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

In reply to by मराठमोळा

अवांतरः या टारझणाला सुट्टी असण्याचे बरेच तोटे आहेत. आठवड्याचे फ्रस्टेशन एकदमच काढतो आणी ते पण दिसेल त्या धाग्यावर.
अतिअवांतर : आता एयरटेलचं नेट घ्यावं म्हणतोय .. म्हणजे कामाच्या दिवशीही फ्रस्ट्रेशन काढता येईल आणि कदाचित "कोणतेही धागे" फ्रस्ट्रेशनखाली येणार नाहीत :) बाकी "कोणताही धागा" मस्तच हो :)
असो चालायचच
आमी नाय गा चालवून घेत राव :)
या धाग्याला ५०+ प्रतिसाद कंफर्म.
वा वा वा !! "देव" पावला... आपला कांदामुळा कोणत्याही गोष्टीचा विचार गहण होण्यापर्यंत ठिक आहे, पण त्याचा (गट्णेछाप)कौल होउ देऊ नये

In reply to by टारझन

>>आपला कांदामुळा =)) =)) =)) >>कोणत्याही गोष्टीचा विचार गहण होण्यापर्यंत ठिक आहे, पण त्याचा (गट्णेछाप)कौल होउ देऊ नये व्यक्तीपरत्वे विचार आणी मते बदलत असतात. आपल्या विचारांशी काही सहमत असतात तर काही असहमत, तर काहींना मतेच नसतात. एखादा प्रश्न महत्वाचा आहे किंवा नाही हे आपण लगेच ठरवु शकत नाही. आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

In reply to by मराठमोळा

अजुन एक महत्वाची गोष्ट. जर मिपाकरांना आपल्या मायबोलीच्या भविष्याचा कौल निरर्थक वाटला असेल तर कृपया प्रामाणिकपणे कळवावे, मी तो कौल लगेच उडवतो आणी इथुन पुढे कोणताही लेख, कौल घेण्यापुर्वी टारझन व ईतर काही मान्यवरांचा सल्ला घेईन. टारझण भौ, तुम्ही हा कौल घेऊन मायबोलीच्या भविष्याबद्दलच्या कौलामधे प्रतिसाद देणार्‍या व विचार मांडणार्‍या सर्व लोकांच्या सद्सदविवेक बुद्धीवरच संशय घेतल्यासारखे वाटते आहे. जेव्हा जेव्हा मराठी बाबत काही चांगले करण्याचे प्रयत्न झाले आहेत तेव्हा तेव्हा पहिला वार मराठी माणसानेच घातला आणी पुर्ण ताकदीनिशी विरोधही केला, त्यामुळे इतरांची गरजच नाही. खरे ना? असो. मी जर तुमच्या किंवा तुमच्या कोणा मित्राच्या भावना कळत न कळत भावना दुखावल्या असतील आणी त्यामु़ळे तुम्ही हा शाकाहारी कौल घेतला असाल तर मग मी त्याबद्दल माफी मागतो पण माझी मातृभाषा हा माझा (ईतरांचा माहीत नाही) जिव्हाळ्याचा विषय आहे त्यामुळे मी हा कौल घेतला होता. बाकी माझे मिपावर कुणी मित्र/मैत्रिणी नाहीत अजुन, माझे सर्व लेखन/प्रतिसाद प्रामाणिक असतात. मी मिपावर काहीतरी चांगले उद्देश ठेवुन सदस्य झालो आहे. आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

In reply to by मराठमोळा

पर्सनली घेतलं नसतं तर एवढी उद्विग्नता वाढली नसती .. जरा मौजमजा सदतात कौल टाकण्याचं कंटाळ्यामुळं टाळलं .. ५०-१०० वर्षांनी काय होईल मराठीचं /संस्थळांचं ? ह्याचं भाकीत कोण करणार ? मतं देणारे सर्वसामान्य लोक कसं सांगतील ? हा प्रश्न कदाचित "धोंडोपंत" किंवा "घाटपांड्यां"ना व्यनि करून सुटला असता का ? मी मिसळपाव वर येण्याआगोदर जेवढा "मराठी" होतो तेवढाच आता ही आहे . त्यामुळे संस्थळांचं भविष्यात काय होणार ? असले प्रश्न मला तरी वांझोटे वाटले, अर्थात ते माझं व्यक्तिगत मत होतं .. मी मौजमजा म्हणून माझा माझा कौल काढला होता .. त्यात तुमच्यावर व्यक्तिगत टिका वगैरे नव्हती ... झाली असेल तर ती सादाला प्रतिसाद देताना झाली असेल. आणि तुम्ही म्हणता तसं मी फ्रस्ट्रेशन काढतो ना "कोणत्याही धाग्यावर ?" मग एवढा वेळ प्रतिसाद लिहायला घालवायचीही गरज नव्हती .. आणि एवढं मनावर घ्यायचीही गरज नव्हती. असो .. चालायचंच तुमचा काही दोष नाही, आमच्या हिण आणि हिणकस व्यक्तिमत्वामुळे बरेच जण आम्हाला नकारात्मक दृष्टीने पहातात. जर तुम्हाला ह्या कौलाचा पर्सनली एवढा त्रास झाला असेल तर मला माझीच शरम वाटते ( मालकांना वाटण्याआधी ;) ) - टारोबा टेचर (इथून पुढे कसल्याही स्पष्टीकरनास बांधील नाही)

In reply to by टारझन

टारझण भौ, त्रास नाही आणी रागही नाही, अशा गोष्टींमुळे मी इतक्या लवकर विचलित होत नाही, मिपावर हे सर्व येणारच आनी तुमच्या स्वभावाची मला बर्‍यापैकी कल्पना आली आहे. :) पण हा विषय माझ्यासाठी जरा नाजुक होता, इतरांसाठी नसेलही कदाचित, किंवा मराठीच्या भविष्याची काळजी आपण का करावी, करणारे करतील हा विचार सुद्धा कदाचित बरोबर असेल. थोडेसे पर्सनली घेतले कारण मराठीचा मी उगाचच गाजावाजा करत नाहिये. असो, मला नेहमी वाटत आलं आहे की वाद हे न संपणारे असतात, कुणीतरी एकाने माघार घेईपर्यंत किंवा एखाद्याला बहुमत मिळेपर्यंत. कोणताही धागा किंवा विषय हा निरर्थक ठरवता येईल. जसे ईंटरव्हिव्यु मधे जर घेण्यार्‍याने समोरच्याला नापास करायचे ठरवलेच तर मग समोरचा कितीही चांगला असला तरी त्याला ती नोकरी मिळु शकत नाही. जाउ द्या विषयांतर नको. वाद घालण्याचा किंवा भांडण्याचा अजिबात विचार नाही आणी नव्हता. :) तुमचा दिवस शुभ होवो. :) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

In reply to by मराठमोळा

वाद घालण्याचा किंवा भांडण्याचा अजिबात विचार नाही आणी नव्हता.
आणि आमचाही नव्हता हो ... जरा मौजमजा म्हणून टाकलेलं .. आपल्याला आयुष्यातले सर्व दिवस आनंदातच जावो :)

In reply to by टारझन

अरे मुलांनो काय चाललेय ? भांडु नका रे, मला सुखाने जगु द्या ! :) --अवलिया

In reply to by अवलिया

महत्व भुक भागण्याला आहे, खाद्याला नाही.
नानाजी ... आपले हे वक्तव्य मराठी संस्कृतीला शोभणारे नाही ... (कोणतीही) भुक भागवण्यासाठी कोणतेही खाद्य कसे चालेल ? ह्याच मुळे पुढच्या ५०/१०० वर्षांत मराठीचे (भाषा / संस्कृती) काय होईल असा गहन प्रश्न श्रीमान मराठमोळा यांना पडला आहे . कृपया आपण विधान मागे घ्या ;) - टारझन

In reply to by टारझन

मुळात भाषा ही प्रवाही असेल, बदल होत असेल तर जिवंत गणली जात असते. तिचे भविष्यातील प्रवाही स्वरुप ठरवणारे आपण कोण? नदी ज्याप्रमाणे कुणालाही न जुमानता प्रवास करत असते त्याचप्रमाणे भाषासरितेचा प्रवाह अखंड चालु असतो. क्वचित एखादी नदी येवुन संगम होतो, क्वचित दुस-या नदीत संगम पावते. शोक कसला ? आनंद कसला? भाषेवर व्यवहार अवलंबुन नाही, व्यवहारासाठी भाषा आहे. मराठमोळा यांचा कौल भाषेच्या बदला बद्दल होता म्हणुन मी काय फरक पडतो असे म्हटले होते. भाषा कोणती वापराल असा कौल असता तर माझे उत्तर त्यानुसार असते. :) --अवलिया

In reply to by अवलिया

>>>भाषा कोणती वापराल असा कौल असता तर माझे उत्तर त्यानुसार असते अहो नाना, कौलाची मांडणी चुकली असेल कदाचित. असो, तुमचे विचार पटताहेत. मी बहुदा एकांगी विचार करत होतो. पुन्हा एकदा विचार करेन यावर. यासाठीच मी मिपावर येतो. :) विचारांची प्रगल्भता येथेच वाढते. आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

कौल पाडण्याआधी प्रभूमास्तरांना कन्सल्ट केलं होतं काय? प्रतिसाद म्हणजे लग्नाच्या आहेरांप्रमाणे असतात. आठवणींनी फेडायची असतात. ;)

In reply to by अनंता

अनंता, पुरे की. सगळीकडे मला कुठे घसिटतोस.

पहिल्या पर्यायाला मत दिले आहे. मी शाकाहारी आहे म्हणून नव्हे तर मांस कोणतेही किंवा मासे यांच्या किमती बर्‍याच वाढल्याचे ऐकून असं वाटतय की हळूहळू लोक्स शाकाहाराकडं वळू लागणार. त्याला बरिच वर्षे लागतील पण. अवांतर : टारू, कपूरकाकांची करिष्मा मांसाहाराकडून शाकाहाराकडं वळली रे बाबा! रेवती

In reply to by रेवती

>>>की हळूहळू लोक्स शाकाहाराकडं वळू लागणार. त्याला बरिच वर्षे लागतील पण. अगदी खरे आहे. अमेरिकेत नेहमीप्रमाणे आहाराचा लंबक हा मांसाहारीकडून शाकाहारीकडे वळवण्याचे जोरदार प्रयत्न चालू आहेत. त्याला वेगवेगळी कारणे आहेत. मात्र इथे मी एक गेल्या विकांताला आमच्या गावातील पर्यावरणजत्रेत पाहीले. ही लोकं आता व्हेज पेक्षा व्हेगन होण्याकडेच लागली आहेत. म्हणजे प्राण्याचे काहीच नाही - अगदी गाई-म्हशीचे दूध पण नाही... बाकी त्यांच्या (मूळ) मांसाहाराला विरोध असण्याचे कारण वेगळे होते. त्याच्या इथल्यापद्धतीच्या प्रोसेसिंगमधे जितकी उर्जा वापर आणि हरीत वायू उत्सर्जन होते ते खूपच असल्याने आणि आता (काहीं खर्‍या इंग्लंडच्या गोर्‍या लोकांच्या "कल्पनेच्या आयडीया" प्रमाणे) जग हळू हळू बदलत आहे तेंव्हा आपण स्वतःला हळू हळू सवय लावत बदलायला हवे असे काहीसे आहे. :)

In reply to by विकास

अमेरिका म्हणजे सर्व जग नव्हे !! चीन म्हणजेही सर्व जग नव्हे, पण जगातील सर्वाधिक लोकसंख्या तेथे आहे. आणि आ. आशियातील इतर देशांतील लोकांचे खाणेपिणे चीन्यांसारखे आहे. तेव्हा ह्या प्रांतातील बहुसंख्य लोक ह्याबाबतीत काय करत आहेत, इथे काय ट्रेंड्स आहेत हे पहाणे उचित ठरावे. ही सर्व जनता भरपूर मांसाहार करते, आणि तो अगदी सर्वंकश असतो म्हणा ना! म्हणजे ते नुसते मांसावरच भागवत नाहीत, तर प्राण्यांच्या सर्व अवयवांचा, त्यांतील सर्वच भागांचा खाण्यासाठी उपयोग करतात (काही उदाहरणे: सापाच्या रक्तात त्याचे गॉल ब्लॅडर बुडवून खाणे, वाघाचे शिस्न खाणे, माकडाचा -- तोही जिवंत -- मेंदू खाणे..). 'आकाशाकडे पाठ असलेली प्रत्येक जीवित वस्तू खाण्यासाठी आहे' असे तेथे मानले जाते. हे अगदी शब्दशः खरे आहे. त्यातून काही म्हणजे काही सुटत नाही असे म्हणणे अतिशयोक्त ठरू नये. म्हणजे रानमांजरे, कुत्रे, उंदीर हे सर्व खाण्यासाठी निषिद्ध नाहीत. जगाच्या ह्या भागांत स्वतःच्या फिटनेसची तीव्र जाण असली तरी त्याचा व मांसाहारी खाण्याचा संबंध हे लोक जोडत नाहीत. ह्याउलट मांसाहार करण्याच्या नवनव्या तर्‍हा येथील शेफ्स शोधून काढतात. सर्व काही ताजे पाहिजे ह्या विचाराचा फायदा घेऊन जनावरांना/ माश्यांना अभिनव पद्धतिने मारून त्यांना खाण्याच्या नवनव्या शकला काढण्यात येतात. जिवंत माकडाचा मेंदू खाण्यामागील कारण हेच. तसेच अलिकडेच 'मासा अर्धवट मारून तो खाण्याचा' एक नवा प्रकारही वाचनात आला होता. थोडक्यात असल्या वातावरणात लोक शाकाहाराकडे वळणार, हे अगदी अशक्यप्राय आहे.

In reply to by रेवती

>>की हळूहळू लोक्स शाकाहाराकडं वळू लागणार. त्याला बरिच वर्षे लागतील पण. काही लोक मांसाहाराकडे पण वळु लागली आहेत. पुर्वी ब्राम्हण समाजातील लोक मांसाहार करत नव्हते, आता बरेच जण करतात. माझ्या ओळखीचे असे ३ जण आहेत.

पचवायला सोपा.आपल्या मनोव्रुत्तीचा आणि आहाराचा फार जवळचा संबध असतो असे माझे वयक्तिक मत आहे. 'बॉम्बे-मॅक्झिमम सिटी'या पुस्तकात लेखकाने(नाव आठवत नाही)एका शार्प शुटरचा (सत्य)अनुभव सांगीतला आहे,त्यात तो शार्प शुटर म्हणतो की पुर्वी तो न्याहरी,आणि दोन्ही वेळच्या जेवणात मांसाहार घ्यायचा पण शाकाहार सुरु केल्यापासून मनाला शांती वाटायला लागली.

In reply to by स्वामि

मला मांसाहार सोडुन एक वर्ष झालं. डोकं शांत झाल्याचं काही जाणवलं नाही (कुटुंबाचही असचं मत आहे!). मला वाटतं ज्या मांसाहारी मंडळींना मांसाहार करतांना "गिल्ट" ची भावना येते त्यांना कदाचीत शाकाहाराकडे वळल्यावर शांत वाटत असेल. - पांथस्थ माझी (शिळी) अनुदिनी: रानातला प्रकाश... मी काढलेली छायाचित्रे - फ्लिकर

ऍडॉल्फ हिटलरने म्हटले होते की "एक दिवस सगळे जग शाकाहारी होईल" सुंदर विषय सुंदर चर्चा :)

टारझन यांचा हा अतिशय हिन आणी हिणकस कौल बघुन निदान 'माझ्यानंतर' हिन आणी हिणकस दर्जाच्या लिखाणचे काय होणार हा प्रश्न माझ्यालेखी सुटला. अतिशय 'फर्र्स्ट्रेटेड' असा कौल आहे. ईतर काहीला मत दिले आहे. या पर्यायाला मत दिले की आपण ज्ञानी आहोत आणी सामान्य आणी तुच्छ मानवांपेक्षा वेगळा विचार करणारे आहोत असे आतुन कुठुन तरी वाटते. अवांतर :- ह्या धाग्यावरील चर्चेने अवलियाजी ह्यांचे जिवन काहि काळासाठी दु:खी झालेले बघुन सुख वाटले. परा पाध्ये. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

आहार विषयक उहापोह करणारा कौल आवडला. त्यात पार्श्वभाग, लिंबू खिशात ठेवणे वगैरे कल्पना खुपच हसवणार्‍या आहेत. हसल्याने भूक वाढते, माणूस तरतरीत होतो, रक्ताभिसरण वाढते असे हास्याचे निरनिराळे फायदे लोक सांगतात. ते फायदे नक्कीच वाचकांना मिळाले असणार. अनाहुतपणे घडलेल्या या लोकसेवेमुळे टारझन सुद्धा आनंदले असणार. असा हा सर्वांचे भले करणारा कौल तयार केल्याबद्दल अभिनंदन !! आम्ही शाकाहाराचे पुरस्कर्ते आहोत. (मांसाहार पचत नाही म्हणून शाकाहारी असा 'हिण' शेरा काही लोक मारतात ते असो.) सर्वांना भरपूर भूक लागो, त्यांना खाल्लेले अन्न पचो, पचलेले अन्न अंगी लागो आणि सर्व लोक आरोग्य संपन्न होवोत अशी आम्ही देवापाशी प्रार्थना करतो. -- लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

शाकाहार सर्वोत्तम आहार! शाकाहार /मांसाहार हा फरक लुप्त होतोय असं वाटतं! (आहारी)संदीप.

मांसाहार सर्वोत्तम आहार! -- (प्रतिदिन कोंबडी आणि मटन व मासे हादडणारा) इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.

In reply to by Pain

अहो मांसाहार खाउन खाउन गरम होत असेल आणि त्यामुळे एसी बसवावा लागला...आता त्यामुळे डोकं दुखून झोप येत नसेल...त्यामुळे पुन्हा खाण्याकडे मोर्चा.... तुम्हाला बै फारच लोकांची चिंता...अशाने तुम्चे डोके दुखायचे. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

तरी देखिल दररोज मासांहार करणार्‍या इंटरनेटप्रेम्याचे कौतुक वाटते. अजुन ही त्याची मनोवृती हिंसक झालेची मला वाटत नाही. वेताळ

In reply to by वेताळ

पावसाळ्यात नव्हे, उन्हाळ्यात वापरायचा, किमान काही दिवस. पुढचे माहित नाही. राग का यावा? मांसाहार करणार्‍यांची तब्येत उत्तम असते असा समज आहे ( प्रथिने वगैरे ) तर मग मांसाहार करणार्‍यास, पचवणार्‍यास प्रकृतीच्या इतक्या तक्रारी कशा अस प्रश्न पडणे साहजिक आहे. अर्थात मांसाहार ही फारच vague term असल्याने कोणत्याही निष्कर्षाप्रत पोहोचता येत नाही.

माणसाच्या आहारामधे भेंडीपासुन मेंढीपर्यंत आणि कार्ल्यापासुन कुर्ल्यापर्यंत सगळ्याचा समावेश हवा...

अरेच्च्या ... :) हा माझा धागा आहे होय ? मी लिहीलंय असं ? =)) -प्रोफेसर टारझन विसरभोळे

@ Pain हो. @ शिल्पा ब तसे काहीही नाही. @ वेताळ बरोबर आहे साहेब तुमचे म्हणणे - कितीही राग आला तरी मी "Speak when you are angry and you will make best speech you will ever regret."हे नेहमी लक्षात ठेवतो. असो. आपुलकीने दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे. -- इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.

शाकाहाराच्या जोडीने अजून एक प्रकारचा आहार काही काळात अधिक प्रिय होईल असे वाटते. तो म्हणजे कृत्रिम रित्या तयार केलेल्या, सर्व अन्नघटक शरीराला देणार्‍या पण कोलेस्टरॉल, वजन इ. इ. न वाढवणार्‍या भुकट्या. सध्या अशा भुकट्या बाजारात बर्‍याच प्रमाणात दिसू लागल्या आहेत. प्रोटीन पावडर वगैरे रूपात. मला त्यांचे स्रोत घटक माहीत नाहीत. पण भविष्यात वजन वाढू नये, पोषक जीवनसत्त्वे मिळावीत व शरीराची कमीत कमी हानी व्हावी ह्या दृष्टीने असा आहार करणारे वाढल्यास नवल वाटणार नाही. अवकाशात राहाणारे अवकाशयात्री ज्याप्रमाणे वेगळ्या प्रकारचे खाद्य खातात, काहीसे त्याप्रमाणे! आणि काहीच दिवसांत कृत्रिम रित्या तयार केलेल्या जैवपेशीप्रमाणे कृत्रिम रित्या तयार केलेला आहार/ खाद्य पदार्थही बाजारात यायला काहीच हरकत नाही. तसेच समुद्र शैवाल, अल्गी, सी वीड वगैरे प्रकारांनाही खाद्यसमुदायात बसवून अधिकाधिक पाकृ बनायलाही काहीच हरकत नाही! अरुंधती http://iravatik.blogspot.com/

शाकाहाराचा वा भाशेचा विकास होवो न होवो पन टारझनभौंचा 'विकास' नक्कि व्हईल

In reply to by नावातकायआहे

>>पन टारझनभौंचा 'विकास' नक्कि व्हईल खुप बरे वाटले. ----- ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.

In reply to by नावातकायआहे

नावातकायआहे जी , आमचे जे होईल त्याला चार काड्या नं लावल्याबद्दल आभार , खुप बरे वाटले :) - (प्रोग्रामर)जावातकायनाही

भौ, 'ते' खाते आम्च्याकड न्हाय. वडालापारंब्याहाय

क्रुत्रिम मांस बनवण्याचे प्रयोग चालु असल्याचे २-३ वर्षांपुर्वी वाचले होते. त्याबद्दल कोणी माहिती देउ शकेल का ?

साला गरमा-गरम लेखन कसे करावे ते आमच्या टार्‍याला विचारा. टार्‍या कसे सुचते रे तुला असे छान छान.. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

(सध्या)बिनकामाचा असल्याने सुचत असेल .... तुम्हाला भारी लोकांच्या चौकशा हो!!! फरसाण *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

In reply to by शिल्पा ब

(सध्या)बिनकामाचा असल्याने सुचत असेल .... तुम्हाला भारी लोकांच्या चौकशा हो!!!
मग तुम्ही त्याला कामाला का लावुन घेत नाही ? आणि कोणाला कोणाच्या चौकशा आहेत ह्याच्या तुम्हाला एक फार चौकशा बॉ !! ©º°¨¨°º© फोल्पा ट ©º°¨¨°º© आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

काय करता, दिस्त म्हणून बोलवत !!! आणि आमच्याकड सध्या काहीच काम नाही...त्यामुळे नाईलाज...दोघान्चाहि (चौकशीखोर) फुर फुरा *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

In reply to by शिल्पा ब

काय करता, दिस्त म्हणून बोलवत !!! आणि आमच्याकड सध्या काहीच काम नाही...त्यामुळे नाईलाज...दोघान्चाहि
टार्‍याकडे काम नाही ? त्याच्याकडे बघुन तर तसे वाटत नाही. काय रे टार्‍या तुझ्याकडे म्हणे काम नाही ?? ;) कामाशीवाय जीवन व्यर्थ आहे रे बाबा ! ©º°¨¨°º© परा बधीर ©º°¨¨°º© आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

त्याच काम वेगळं आणि आमचं काम वेगळं ...म्हणून म्हंटल.. (अर्थकाढू)बरा *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

In reply to by परिकथेतील राजकुमार

काय रे टार्‍या तुझ्याकडे म्हणे काम नाही ?? कामाशीवाय जीवन व्यर्थ आहे रे बाबा !
हौ बाबा ... काम लै म्हत्वाचं .. म्हणुनंच तर मी रात्रंदिवस निसतं काम कान नी काम करतोय ... मला कामाचा फॉर्मुला सापडलाय =)) - भौजि || जै जै काम देव प्रसन्न , हे काम देवा सगळ्यांना काम दे||

शाकाहार वा भाषा याचा संबंध का जुळला जातो???............देव त्यांना लागलेल्या धक्क्यामधुन बाहेर काढो म्हणजे त्यांना सुजान(???) प्रतिक्रीया देणे जमेल. लेखावर : शाकाहाराचा उपयोग वाढेल कारण आज Health conscious व्यक्तींची संख्या वाढतेय. मांसाहारात fats जास्त असल्याने ते अशा व्यक्तींकडुन जपुनच खाल्ले जातात. मासे मात्र भाव खाउन जातील/जातात त्यातल्या त्यात. - बांगडा-सुकट प्रेमी.

..."आर यू अ व्हेजिटेरियन ऑर अ मीट-ईटर*" या प्रश्नाचे उत्तर "येस" असे आहे. त्यामुळे, मी जिवंत आहे तोवर शाकाहार आणि मांसाहार दोघांनाही मरण नाही. (बाकीचे जग गेले तेल लावत. तव्याला.) बाकी चालू द्या. - पंडित गागाभट्ट. * "नॉन-व्हेजिटेरियन" हा शब्द इंग्रजी नसून देशी बनावटीचा आहे. त्यामुळे माझ्या लेखी तो बाद.