Skip to main content

व्यावसायिकांच्या संघटना आपली जबाबदारी पार पाडतात का?

लेखक नितिन थत्ते यांनी शुक्रवार, 23/01/2009 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 880
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

नाहीला मत!! कारण या संघटना मुळात समाजाच्या हितासाठी स्थापन झालेल्या नसतातच मुळी! आपापल्या सभासदांचे हित पाहणे इतक्यापुरते मर्यादित ह्यांचे वर्तुळ. जबाबदारीची अपेक्षा बाळगणेच भाबडेपणाचे ठरेल. फुकटात वजन कमी करायचा सल्ला हवाय तुम्हाला? - चालते व्हा!!

लहानपणापासून डॉक्टर आणि आता कामानिमित्त अकाउंटंट्स / ऑडिटर वगैरेंशी बर्‍यापैकी जवळून संबंध येत आहे. व्यायवसायिकांच्या संघटना या पूर्णपणे सामाजिक जबाबदारीकडे दुर्लक्ष करतात असेच अगदी नाही. पण सभासदांच्या वैयक्तिक किंवा इतर हेतूंना / त्यांना प्रोटेक्ट करणे वगैरे प्रकारांना जास्त झुकते माप मिळते हे नक्की. कमी अधिक प्रकाराने सगळीकडेच हे बघायला मिळते. एखाद्या विशिष्ट समूहाची संघटना असली की हे होणारच. मग ती सी.ए. असोसिएशन असो, बार असोसिएशन असो, कामगार युनियन असो की टॅक्सी / रिक्षा चालकांची युनियन असो. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

"हो" ला मत दिले आहे. बिपीन कार्यकर्त्यांच्या मताशी सहमत आहे. व्या. संघटना सामाजिक जबाबदारीकडे दुर्लक्ष करतात असे म्हणता येणार नाही. अर्थात त्यांच्या काही योजनांमागचे हेतू त्यांच्या व्यवसायाला सुरक्षित करावे, असे असतात असे म्हणावे लागेल. काही प्रमाणात त्यात तथ्यही असते. व्यावसायिक संघटनांचे हेतू दरवेळी असेच असतील असे नाही, पण प्रत्येक वेळी निर्भेळ सामाजिक जबाबदारी म्हणून योजना आखल्या जात असतील असेही नाही.

(काही असामाजिक अपवाद सोडले तर) या व्यावसायिकांच्या संघटना मुळात त्यांच्या व्यवसायाला समाजात योग्य तो मान आणि प्रतिष्ठा मिळावी म्हणून स्थापन झालेल्या असतात, त्यांचा दुय्यम हेतू अर्थातच त्यांच्या व्यवसायाला सुरक्षित करावे असाही असतो, पण म्हणून जर समाजात विश्वास निर्माण करण्याच्या मूळ हेतूलाच धक्का बसेल अशा रीतीने त्या संघटना त्यांच्या अकार्यक्षम/अनीतिवान सभासदांची भलावण करत असतील तर अशा संघटना त्यांच्या सामाजिक जबाबदारीकडे दुर्लक्ष करतात असंच म्हणावं लागेल. दुर्दैवाने अशी प्रवृत्तीच आधिक दिसत असल्याने 'नाही' (म्हणजे सामाजिक जबाबदारी ओळखून वागत नाहीत) असं मत दिलं आहे.