नेपाळमधील भोटेकोसी नदीला अचानक आलेल्या महापुरामुळे तांडव माजले आहे. शेकडो मृत्युमुखी पडले असून अजून काही शेकडोंचा संपर्क नाही. यात अनेक नेपाळी नागरिक व काही चिनी नागरिक आहेत. अनेक भारतीय नागरिक व परदेशी पर्यटक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक घरे, पूल संपूर्ण वाहून गेले आहेत.
ही नदी तिबेटच्या सीमेवरून नेपाळमध्ये प्रवेश करते. तिबेट चीनने बळकावला आहे. तेथील सीमेवर असलेले काही चिनी अधिकारी वाहून गेले आहेत.
भूकंप, भूस्खलन, हिमनद्यांचे वितळलेले पाणी, दरडी कोसळणे ही या महापुरामागील कारणे असावी असे सांगण्यात येत आहे.
माझ्या मते यामागे चीन आहे. मागील अनेक वर्षांपासून चीन, भारतात वाहून येणाऱ्या नद्यांवर, भारत सीमेलगत महाप्रचंड धरणे बांधत आहे. भविष्यात जेव्हा भारताविरूद्ध युद्ध होईल तेव्हा धरणे फोडून संपूर्ण ईशान्य भारत जलमय करून उर्वरित भारताचा ईशान्य भारताशी संपर्क नष्ट करून ईशान्य भारत बळकावणे हा एक उद्देश आहे. पाणी अडवून ईशान्य भारतात पाणीटंचाई निर्माण करणे हा सुद्धा अजून एक उद्देश आहे.
असेच एक धरण फोडून नेपाळमध्ये कशी वाताहत होते हे पाहणे हा प्रयोग चीनने केला असावा. तसेही नेपाळ चीनला बळकावयाचा आहेच. तिबेटनंतर, भारतीय भूभाग, आजूबाजूच्या अनेक देशांची लहानमोठी भूमी चीनने आधीच बळकावली आहे. चीनच्या दीर्घकालीन योजनांमध्ये तैवान, नेपाळ, भूतान व ईशान्य भारत बळकावणे हे मुद्दे आहेतच. बलुचिस्तानमध्ये अशांतता निर्माण करून आधी तो भाग पाकिस्तानपासून तोडून नंतर घशात घालणे ही चीनची योजना कार्यरत आहेच. त्यातून चीनला हिंदी महासागरात पोहोचण्यासाठी अजून एक मार्ग मिळेल (सध्या फक्त दक्षिण चीन समुद्रातून चीन हिंदी महासागरात पोहोचू शकतो).
एकंदरीत या बकासुराला आवरणे जगाने मनावर घ्यायला हवे.
जाता जाता - या योजना विनाविरोध प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतात चीनसमर्थक, चीनवर अंधविश्वास ठेवणारे भोळसट नेतृत्व सत्तेत असणे आवश्यक आहे. डोकलाम संघर्षाच्या वेळी गुपचुप चिनी राजदुताची भेट घेऊन ते लपवून ठेवणे, कैलास पर्वत पाहण्यासाठी नेपाळमध्ये जाण्याचे नाटक करून तेथे चिनी मंत्र्यांची भेट घेणे, गलवान संघर्षानंतर भारतीय सैन्यावरच अविश्वास दर्शविणे, सिंदूर मोहिमेनंतर भारतीय सैन्यावरच अविश्वास दर्शविणे, वारंवार अज्ञात देशात जाणे . . . यांची सांगड घातली तर चीनला भारतात कोण सत्तेवर हवे आहेत व त्यासाठी चीनने अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने काही भारतीय नेते कसे गळाला लावले आहेत हे स्पष्ट आहे.
भविष्यात चीनविरूद्ध युद्ध होणार, धरणात अडविलेले पाणी, चीन शस्त्र म्हणून वापरणार, गळाला लावलेले भारतीय नेते भारताविरोधात काम करून चीनला मदत करणार हे विद्यमान सरकारने लक्षात घेऊन तात्काळ पर्यायांची चाचपणी सुरू करायला हवी.
मिसळपाव
प्रतिक्रिया
चीन काय करेल सांगता येत नाही…
चीन काय करेल सांगता येत नाही, पश्चात मदतीचा आव तर भरपूर आणलाय.
लेख मला वाटले चीनविरुद्ध…
लेख मला वाटले चीनविरुद्ध असावा पण शेवटी शेवटी लेखाचा मूळ उद्देश उघडा पडला!
या योजना विनाविरोध प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतात चीनसमर्थक, चीनवर अंधविश्वास ठेवणारे भोळसट नेतृत्व सत्तेत असणे आवश्यक आहे. >>>
मग आता काय वेगळे नेतृत्व सत्तेत आहे का?
+१
In reply to लेख मला वाटले चीनविरुद्ध… by अमरेंद्र बाहुबली
चांगला चर्चा विषय आहे. शेवटचा उतारा सोडून देऊ. चीन कायमच आपल्या थोड्या थोड्या जागा बळकावतोय, सध्या सीमेशेजारी तीन नवे जिल्हे चीनने निर्माण केले अशी एप्रीलमधे बातमी होती. चीननं शिनजिगांगमध्ये पाकव्याप्त काश्मीर आणि अफगाणिस्तानच्या सीमेजवळ एक नवा जिल्हा (काऊंटी) तयार केला आहे. सेनलोंग नावाचा हा नवा जिल्हा काराकोरम पर्वताच्या जवळ वसलेला आहे. या जिल्ह्याच्या निर्मितीच्या हेतूंबद्दल प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. या जिल्ह्यामुळे भारताला असलेला धोका वाढला आहे, अशी चर्चा होती.
चीनने नेपाळवर केलेला पाणीप्रलय प्रयोग असेल असे वाटत नाही, पण आयडिया चांगली वाटली. बाय द वे, नेपाळमधे हिमनदी फुटल्याने हा प्रलय आल्याचे नेपाळमंत्री यांनी काल सांगितले. गावचे गाव वाहून गेले, धरण, आणि त्यामुळे होणारं नुकसान भविष्यातले युद्धाचे नवे डावपेच असतीलही, पण काल पुराचे व्हीडीयो पाहात होतो तेव्हा लक्षात आलं की एकाकी पाणी आलं. असे पाणी अडवल्याचे दिसते आणि ते सर्व नव्या येणा-या पाण्यामुळे ते अनियंत्रित झाले. नागरी वसाहती निसर्गाच्या क्षेत्रात आक्रमण करायला लागल्या आहेत, त्यामुळे निसर्ग अधून मधुन आम्हाला नडू नका असा संदेश देतात, जीवित वित्त हानी अशावेळी मोठी होते असे दिसते. नद्या जोड प्रकल्प, धरणाचे पाणी, हे संशोधन अभ्यासाचे विषय आहेत.
नेपाळचे मंत्री म्हणाले की, पर्यावरणाचे सामायिक संकट भविष्यात भारतावही येऊ शकते असे ते म्हणाले. हिमालयात बर्फ वितळला किंवा दुर्घटना घडली तर, थेट समुद्रपातळी वाढते त्यामुळे हिमालयातील ढासळते पर्यावरण ही एक समस्या आहे असे ते म्हणाले. भारत, चीन, नेपाळ आणि भूतान यांनी हिमालयाचं रक्षण करण्यासाठी एकत्र काम केले पाहिजे. नेपाळमधून वाहणा-या काही नद्या गंडक आणि कोसी भविष्यात भारतासाठी धोका आहे असेही ते म्हणाले ( लोकसत्ता ) एकूण पर्यावरण, नद्या, वितळणारा हिमालय, शिखरे हे भविष्यातले धोकादायक क्षेत्र आहेत यात वाद नाही.
-दिलीप बिरुटे
चोप्य पस्ते
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नेपाळ प्रलय.
काठमांडूपासून सुमारे 45 किलोमीटर अंतरावर असलेला लांगटांग लिरुंग पर्वत तब्बल 7,234 मीटर म्हणजेच 23,733 फूट उंच आहे. या पर्वताच्या सुमारे 17 हजार फूट उंचीवरील भागातून जवळपास 2 हजार फूट रुंद म्हणजेच अर्ध्या किलोमीटरपेक्षा मोठा बर्फाचा तुकडा तुटला. हा महाकाय बर्फ आणि त्यासोबतचा खडक-मातीचा मलबा तब्बल 4 हजार फूट खाली घाटीत कोसळला... त्यामुळे ही 'हिमालयीन त्सुनामी' निर्माण झाली असं शास्त्रज्ञांचं, अभ्यासकांचे म्हणणं आहे.
( वाट्सॅपच्या महाप्रलयातून साभार )
-दिलीप बिरुटे
नैसर्गिक असावे कारण
चीनमध्ये अंतर्गत इतके प्रॉब्लेम वाढले आहे की चीनला हे असले राक्षसी प्रोजेक्ट करायला मनुष्यबळ एकत्र करणे पण कठीण जाते आहे.
बऱ्याच आधी वाचले होते की चीन ब्रह्मपुत्रेवर (चिनी भाषेत सांगपो) सुद्धा एक धरण बांधणार आणि ते प्रसंगी फोडून पूर्ण आसाम पुरात लोटणार.
नंतर लक्षात आले की ब्रह्मपुत्रा नदी तिबेट मधून जितके पाणी कॅरी करून आणते त्याच्यापेक्षा कैकपट जास्त वॉटर इनलेट नदीमध्ये सहाय्यक नद्या घेऊन येतात आणि त्या सगळ्या भारतीय हद्दीत आहेत. त्यामुळे चीनने इतके प्रयोग केले तरी impact पडण्यालायक पाण्याचा साठा करून त्याला व्हेपनाइज करून ब्रह्मपुत्रा वापरणे त्यांना शक्य नाही. खरे खोटे देव अन् एक्स्पर्ट मंडळी जाणे.
हिमंत बिस्व सर्मा
In reply to नैसर्गिक असावे कारण by वृषभ खोंडे
मागच्या वर्षी पहलगाम हल्ल्यानंतर आपण सिंधू पाणीवाटप करार रद्द केल्यानंतर चीनही ब्रह्मपुत्रेवर धरण बांधून भारताचे पाणी रोखू शकेल का या प्रश्नावर उत्तर देताना आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सर्मा पण हेच म्हणाले होते. ब्रह्मपुत्रेने भारतात प्रवेश केल्यानंतर त्या पाण्यात पडणारा पाऊस तसेच उपनद्या यामुळे मिळणारे पाणी ध्यानात घेतले तर ६५-७०% पाणी भारतातच असते. त्यामुळे चीनने धरण बांधले तरी ते आपले पाणी रोखू शकणार नाहीत. उलट त्यांनी धरण बांधून पाणी रोखले तर चांगलेच आहे- दरवर्षी आसामात पुरामुळे जे नुकसान होते त्यात ३०-३५% पाणी कमी आले तर तेवढेच नुकसान कमी होईल असेही ते म्हणाले. हे मी कोणत्यातरी न्यूज चॅनेलवर बघितले होते त्यामुळे लगेच देण्यासाठी माझ्याकडे लिंक नाही. पण ते मी ऐकले होते हे नक्की.
समजा चीनने धरण बांधले आणि आपल्याला नको तेव्हा धरणाचे दरवाजे उघडून भारतात पूर आणायचा प्रयत्न केला तर काय होईल? हिमंत बिस्व सर्मांचे म्हणणे तथ्याला धरून असेल आणिा ते धरण ब्रह्मपुत्रेवरच असेल तर फार परिणाम होणार नाही कारण आता येतो त्यापेक्षा मोठा पूर चीन आणू शकणार नाही. मात्र चीनने खोडसाळपणा करायला जर आणखी कोणत्या नद्यांमधील पाणी कालवे काढून ब्रह्मपुत्रेत आणून सोडले आणि ब्रह्मपुत्रेची पाण्याची पातळी वाढवली तर काही सांगता येत नाही. हा माझा तर्क आहे. त्या भागात अशा इतर नद्या कोणत्या, कालवे काढून ब्रह्मपुत्रेत पाणी आणून सोडणे शक्य आहे का- असल्यास किती वगैरे गोष्टी मला माहीत नाहीत.
अगदी अगदी
In reply to हिमंत बिस्व सर्मा by चंद्रसूर्यकुमार
हाच संदर्भ डोक्यात होता पण विदा उपलब्ध नाही माझ्याकडे सुद्धा म्हणून जरा लेखणी आवरती घेतली होती. तुमच्यासारख्या सर्वमान्य विद्वत मिपाकराने लिहिल्यामुळे मात्र शिक्कामोर्तबच झाले म्हणायचे.
ह्या निमित्ताने थ्री गॉर्जेस धरण आठवले चीनचे, हे धरण इतके मोठे आहे की त्यामुळे पृथ्वीच्या रोटेशन स्पीड वर पण प्रभाव पडल्याचे वाचले होते. तसेच उगाच राक्षसी महत्वाकांक्षा सिमेंट अन् दगडात कालवून हे अजस्त्र पांढरे हत्ती बांधण्यात ह्यांचा मोठा हातखंडा.
तिबेटच्या आजुबाजूला चीन…
तिबेटच्या आजुबाजूला चीन सुमारे २०० लहानमोठी धरणे बांधत आहे. त्यातील काही पूर्वीच पूर्ण झाली आहेत, तर काही २०३० पूर्वी पूर्ण होतील.
त्यातील महाप्रचंड म्हणजे मोटुआ/मेडॉग ही ५ धरणांची शृंखला ज्यातून ६०,००० मेगावॅट्स वीज निर्मिती होईल. ३-गॉर्जेस धरणाच्या तिप्पट वीज यातून निर्माण होईल.
याव्यतिरिक्त शॉंगजिऑंकू, बैहेतन, तीन गॉर्जेस ही महाप्रचंड धरणे आधीच पूर्ण झाली आहेत.
ही धरणे एकमेकांना जोडली तर त्यातून महाप्रचंड पाणी सोडून नेपाळ, ईशान्य भारत, बांगलादेश येथे अक्षरशः महाप्रलय निर्माण करता येईल.
आता 'पुढारी' वाहिनीवर दोन…
आता 'पुढारी' वाहिनीवर दोन निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांची चर्चा ऐकली. दोघेही या पुराचा उल्लेख वॉटरबॉम्ब असा करीत होते व भारत भविष्यात संभाव्य वॉटरबॉम्ब भारतावर फुटेल हे ग्ृहीत धरून उपाययोजना करीत आहे असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
हे धरण तिबेटमध्ये फुटल्यानंतर चीनने नेपाळला माहिती देण्यास ४५ मिनिटे घेतली. तेथून नेपाळची सीमा २० किमी अंतरावर आहे. जर तात्काळ सूचना दिली असती तर निदान काही प्रमाणात प्राणहानी टाळता येणे शक्य होते. अशी शक्यता आहे की नेपाळला अंधारात ठेवून तेथपर्यंत पाणी पोहोचण्यास किती वेळ लागतो, किती नुकसान होते, किती परिणाम होतो हे चीन चाचपून पाहत असावा. भविष्यात खरोखर असा महाप्रलय घडवायचा असेल तर ही माहिती नक्कीच कामी येईल.
हे वृत्त सत्य की असत्य याची…
हे वृत्त सत्य की असत्य याची कल्पना नाही.
Explosive material found on the bank of the Trishuli River in Shahid Lakhan Rural Municipality-3, Silingtar, Gorkha, has been safely disposed of.
A team deployed from the Nepali Army’s Rudradhwaj Battalion carried out the disposal.
The explosive material was found on the riverbank around 2:30 pm on Thursday. An earlier disposal attempt the previous day had been unsuccessful.
Birodh Rijal, a company officer with the Rudradhwaj Battalion, said the explosive material may have been swept in by the flood that came down from Rasuwa.
हे वृत्त सत्य असेल तर या महाप्रलयामागे चीनचा काहीतरी हात असण्याची शक्यता बळावते.
अहो
वृत्त सत्य असले तरी ती नदी जेव्हा ग्लेशियर तोडून बाहेर पडून पूर्ण वेगाने अर्धा नेपाळ क्रॉस करून येते आहे तेव्हा नेपाळ मध्ये त्या नदीच्या काठी एखाद नेपाळी आर्मीची छावणी असणे, तिथे युद्धसामग्री असणे अन् ती वाहून येणे इतपत एक शक्यता म्हणून तरी जमेस धराल की नाही आपण ? परत जे explosive सापडले आहेत ते न फुटलेले आहेत (unexploded ऑर्डनन्स) त्यामुळे जर तो माल चिनी असता तर बातम्यांत ते आले नसते काय ? न फुटलेल्या स्फोटकांवर तर चीनचा छाप सहज दिसेल की ! उगाच प्रत्येक गोष्ट उठसुठ conspiracy ला नेऊन भिडवण्यात काहीच पॉईंट नाही.
https://vajiramandravi.com…
https://vajiramandravi.com/current-affairs/how-chinese-dams-may-affect-the-brahmaputras-flow-in-india/
China's dry Tibetan plateau simply cannot compete with India's massive monsoon downpour when it comes to water volume
https://www.ndtv.com/india-news/chinas-water-warning-will-have-no-effec…
खूप भयंकर प्रकार झाला आहे…
खूप भयंकर प्रकार झाला आहे असं वृत्त आणि व्हिडिओ यातून दिसतं आहे. मिसिंग नातेवाईकांची माहिती मिळावी म्हणून असंख्य लोक शोध घेत आहेत आणि वाट पाहत आहेत. भारतीय पर्यटक देखील खूप आहेत संपर्क तुटलेले.त्यांंच्या घरच्या लोकांच्या मनात काय चालले असेल असे वाटून अंगावर काटा येतो.
चीनचे जलविद्युत प्रकल्प फार…
चीनचे जलविद्युत प्रकल्प फार मोठ्या क्षमतेचे असले तरी त्या धरणात साठवलेले पाणी फारच कमी आहे
Medog Hydropower Station
Yarlung Tsangpo gorge, where the river descends 2,000 meters over a 50-kilometre span. the dams being constructed on the Yarlung Tsangpo are of the run-of-the-river type, in which water is diverted through tunnels to a lower elevation to generate electricity and then returned to the river. Such systems do not store significant volumes of water for extended periods, unlike large reservoir-based dams capable of extensive flow regulation
या भयंकर उतारामुळेच चीनने तेथे एका मागो माग एक जलविद्युत केंद्रे उभारून मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती करण्याचे ठरवले आहे. पण प्रत्यक्ष पाण्याची साठवण फारच कमी असेल.
बांग्लादेशात वाहणाऱ्या पाण्याच्या ७० % पाणी हे ब्रम्हपुत्रा नदीतुन येते. त्यामुळे अगदी चीनने एकदम पाणी सोडून दिले तरी भारतात होणाऱ्या नुकसानीपेक्षा बांग्लादेशात हाहाकार माजेल. कारण भारतात हि नदी दोन पर्वतरांगांच्या मधील त्यामानाने चिंचोळ्या मार्गाने वाहते आणि पावसाळ्यात पडणाऱ्या प्रचंड पावसाने येणाऱ्या पूररेषेपर्यंतच( flood planes) पाणी पोचेल.
यामुळे चीन पाण्याचा वापर शास्त्र म्हणून करू शकेल हि पोकळ धमकी आहे आणि ती केवळ पाकिस्तानला धीर देण्यासाठी आहे असे वाटते.
चीन खूपच कमी माहिती उघड करतो…
In reply to चीनचे जलविद्युत प्रकल्प फार… by सुबोध खरे
चीन खूपच कमी माहिती उघड करतो. चीनने दिलेल्या माहितीची सत्यता उर्वरित जग तपासू शकत नाही. त्यामुळे चीनमध्ये एकूण धरणे किती, धरणांची क्षमता किती याचा केवळ तारतम्याने अंदाज करता येतो.
चीन प्रत्यक्षात खूप कमी पाणी साठवेल हा केवळ आशादायक अंदाज असू शकतो. चीन किती पाणी साठवेल हे जगाला कळणे अशक्य आहे.
चीन हा पोलादी पडद्याआड महाभयंकर कारस्थाने योजून अंमलात आणणारा राक्षस आहे. असा देश पाण्याचा वापर शस्त्र म्हणून करण्याची शक्यता अजिबात अवास्तव नाही. अचानक प्रचंड पाणी सोडून ईशान्य भारत जलमय करणे, प्रचंड मनुष्यहानी व वित्तहानी करणे आणि त्यात भारताला गुंतवून व भारतीय सैन्याची हालचाल आणि प्रतिकार अशक्य करून चीन ईशान्य भारताचा भाग बळकावू शकतो.
मग ?
In reply to चीन खूपच कमी माहिती उघड करतो… by श्रीगुरुजी
तुम्हाला वाटते जाणवते तेच अन् तितकेच तारतम्य का ? एकीकडे म्हणताय चीन जगापासून सगळी माहिती लपवून ठेवतो सगळे अंदाज तारतम्याने लावले असतात ते काय हे तुम्ही कसे ठरवले ? तुम्हाला वाटत असेल धरण फोडले चीनने तर त्यासंबंधी काही विदा किंवा कोण्या चायना अभ्यासकाने केलेला अभ्यास तरी द्या, नाही, मला वाटते ! तुम्ही कोण ? हा मूळ प्रश्न आहे. कारण इथे सुबोध खरे ह्यांच्यासारखे निवृत्त लष्करी अधिकारी conspiracy थिअरीला हवा देणे इष्ट नाही इतपत सौजन्यशील अन् सूचक वक्तव्य करत असताना तुम्ही आपलेच पालुपद लावून ठेवले आहेत. का पुढारीवर येणारे निवृत्त लष्करी अधिकारी मंजूर अन् मिसळपाववर येणारे खरे साहेब नामंजूर ?
(मेरे मुर्गे की एक ही टांग निर्दालक)
खोंडे
चीनने हा पूर स्वतःहून घडवून…
चीनने हा पूर स्वतःहून घडवून आणला, हा तर्क मला अजिबात पटत नाही.
एक तर ज्या ग्लेशियरच्या फुटण्यामुळे हा पूर आला, ते नेपाळमध्येच होते. दुसरं म्हणजे चीनला असा प्रकार घडवून आणण्याची गरज तरी काय आहे?
सध्याच्या नेपाळ सरकारने भारत आणि चीन या दोघांनाही जवळपास समान अंतरावर ठेवण्याचं धोरण स्वीकारलं आहे. उलट, पुरात वाहून गेलेलं चीनचं इमिग्रेशन ऑफिस Gyirong हिथं होतं, ते चीन आणि नेपाळमधील मोठ्या व्यापाराचं महत्त्वाचं प्रवेशद्वार आहे. त्यामुळे ते स्वतःचं महत्त्वाचं व्यापारकेंद्र चीन का उद्ध्वस्त करेल?
चीन धूर्त, कपटी वगैरे असेल; पण चीनविषयी आपल्या माध्यमांमध्ये उगाचच अनेकदा फेकाफेक केली जाते. कधी चीन आर्थिकदृष्ट्या कोसळणार, कधी Xi Jinping मरण पावला, तर कधी त्याच्याविरोधात मोठं आंदोलन सुरू झालं,अशा कितीतरी बातम्या मुद्दाम पसरवलेल्या आहेत. प्रत्यक्षात त्यापैकी किती खरं ठरलं?
उलट चीन दिवसेंदिवस आर्थिक आणि मिलिटरी दृष्ट्या अधिक शक्तिशाली होताना दिसतो.
आपलंच उदाहरण घ्या. Xi Jinping सप्टेंबरमध्ये भारतात होणाऱ्या BRICS परिषदेला मोठ्या शिष्टमंडळासह येण्याची शक्यता आहे. बातम्यानुसार , ते 400 लोकांच्या शिष्टमंडळासह येणार आहेत.
गलवाननंतर आपण चिनी गुंतवणुकीवर अनेक निर्बंध आणले होते; आता मात्र भारत-चीन संबंध पुन्हा हळूहळू सुधारत आहेत.
EV आणि बॅटरी क्षेत्रातही भारत आणि चीनमधील व्यावसायिक संबंध परत सुरु झालेत. Reliance चिनी battery giant CATL कडून battery-storage components घेण्याबाबत चर्चा करत आहे. Tata AutoComp ने याआधीच चीनच्या Gotion Hi-Tech सोबत EV battery technology साठी भागीदारी केली आहे.
चीनला असा प्रकार घडवून…
In reply to चीनने हा पूर स्वतःहून घडवून… by रात्रीचे चांदणे
चीनला असा प्रकार घडवून आणण्याची गरज तरी काय आहे?
प्रयोग करून पहायचा आणि कितपत यशस्वी होतो, किती परिणाम होतो, किती विध्वंस होतो, जगाच्या लक्षात येते का हे तपासणे असे उद्देश असू शकतात.
उलट, पुरात वाहून गेलेलं चीनचं इमिग्रेशन ऑफिस Gyirong हिथं होतं, ते चीन आणि नेपाळमधील मोठ्या व्यापाराचं महत्त्वाचं प्रवेशद्वार आहे.
अश्या गोष्टींकडे चीन दुर्लक्ष करतो. जून २०२० मधील गलवान संघर्षात जखमी झालेले आपले ६ सैनिक भारतीय हद्दीत सोडून चीनचे सैन्य माघार घेऊन निघून गेले होते. शेवटी भारतीय डॉक्टरनेच त्यांच्यावर उपचार केले होते.
२०१८ मध्ये चीनने क्षेपणास्त्र सोडून आपलाच एक उपग्रह नष्ट केला होता. भविष्यातील युद्धात शत्रूचे उपग्रह नष्ट करून दळणवळण ठप्प करता येईल का याची ती चाचपणी होती. चाचपणीत होणाऱ्या मनुष्यहानीकडे व इतर हानीकडे चीन लक्ष देत नाही. कोरोना जगभर पसरविताना चीनचे अनेक नागरिक मेले. परंतु चीनने त्याकडे दुर्लक्ष करून विषाणू जगभर पसरविला.
उलट चीन दिवसेंदिवस आर्थिक आणि मिलिटरी दृष्ट्या अधिक शक्तिशाली होताना दिसतो.
याची कोणतीही विश्वासार्ह आकडेवारी उपलब्ध नाही. चीन खरी आकडेवारी कधीही सार्वजनिक करीत नाही. डोकलाम व गलवान संघर्षात चीनला माघार घ्यावी लागली होती. या संघर्षात झालेली मनुष्यहानी चीनने आजतागायत लपवून ठेवली आहे.
**माझ्या मते यामागे चीन आहे…
**माझ्या मते यामागे चीन आहे. मागील अनेक वर्षांपासून चीन, भारतात वाहून येणाऱ्या नद्यांवर, भारत सीमेलगत महाप्रचंड धरणे बांधत आहे. भविष्यात जेव्हा भारताविरूद्ध युद्ध होईल तेव्हा धरणे फोडून संपूर्ण ईशान्य भारत जलमय करून उर्वरित भारताचा ईशान्य भारताशी संपर्क नष्ट करून ईशान्य भारत बळकावणे हा एक उद्देश आहे. पाणी अडवून ईशान्य भारतात पाणीटंचाई निर्माण करणे हा सुद्धा अजून एक उद्देश आह****
ह्याला पुरावा शून्य. फक्त "मला वाटते" हा षडयंत्र सिद्धांत. Trust Me Bro !
> भविष्यात जेव्हा भारताविरूद्ध युद्ध होईल तेव्हा धरणे फोडून संपूर्ण ईशान्य भारत जलमय करून उर्वरित भारताचा ईशान्य भारताशी संपर्क नष्ट करून ईशान्य भारत बळकावणे हा एक उद्देश आहे.
धरणे बांधायची अब्जावधी खर्च करून मग फोडायची आणखीन कोट्यवधी खर्च करून मग आपलाच भूभाग जलमय करायचा आणि युद्धाच्या काळांत त्या जलमय भागाला आपलेसे करायचे आणि मग काय ? पुन्हा धरणे बांधायची ?
हे कुठल्या CCP मिटिंग मध्ये ऐकले ?
चीनच्या वॉटर बॉम्बचा भारत…
चीनच्या वॉटर बॉम्बचा भारत कसा सामना करणार?
काय ठरलं मग? कुणामुळे झालं…
काय ठरलं मग? कुणामुळे झालं हे सगळं?
तिबेटमध्ये ५.३ तीव्रतेचा…
तिबेटमध्ये ५.३ तीव्रतेचा भूकंप झाल्याचे वृत्त आहे.
हम्म
In reply to तिबेटमध्ये ५.३ तीव्रतेचा… by श्रीगुरुजी
चीनने घडवला म्हणताय ?