Skip to main content

नवी मुंबईतले "ट्रेकिंग किंग" मिपाकर्स आणि चांगले ट्रेकिंग ग्रुप्स माहिती आहेत का कोणाला?

लेखक शैलेश लांजेकर यांनी बुधवार, 29/07/2026 11:56 या दिवशी प्रकाशित केले.

नमस्कार मंडळी,

नवी मुंबईतले कोणी "ट्रेकिंग किंग" मिपाकर किंवा चांगले ट्रेकिंग ग्रुप्स तुमच्या माहितीत आहेत का.. 

हा धागा काढण्याआधी मी खरडफळ्यावर खरड टाकली होती आणि काही मिपा सदस्यांच्या खरड वहीत या बद्दल लिहिले होते. काही जणांनी तत्परतेने त्यांच्या कडे असलेली माहितदेखील दिली..  खरडफळ्यावर फेसबुकवरचे ग्रुप्स चेक करण्याबाबतसुद्धा कोणीतरी सुचवले आहे पण मी फेसबुकवर नाही आणि हल्लीच्या परिस्थितीमुळे एकदमच अनोळखी लोकांशी डायरेक्ट कनेक्ट करून ट्रिपा  वैगरे  काढायच्या म्हणजे मन जरा बिचकते.. बायको मला जगन्मित्र म्हणते पण हल्ली मीच जरा स्वतःला आवरते घेतो.. तुमच्या माहितीत कोणी (सक्रिय) ट्रेकिंग वाला मिपाकर किंवा एखादा ग्रुप असल्यास सांगा.. ट्रेकिंग साठीची चांगली ठिकाणे, ट्रेकिंग साठी ची प्राथमिक तयारी (अगदी नवख्यांसाठी) हि सुद्धा माहिती येऊ दे. 

सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होऊन त्याचा सर्वानाच उपयोग व्हावा या दृष्टीने हा धागा मी काढत आहे. तरी सर्वानी आपापल्या परीने माहिती द्यावी हि सर्वाना विनंती.. 
 


वाचने 410
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

शैलेश लांजेकर,

 

खरडफळ्यावर तुमचं जे वर्णन वाचलं ते मला नीट आठवंत असेल तर मला वाटतं की तुम्ही नियमित व्यायाम ( घरच्याघरी अथवा व्यायामशाळेत ) सुरू करावा. आधीच सुरू केला असेल तर उत्तम.

 

आ.न.,

-गा.पै.


In reply to by गामा पैलवान

होय होय, घरीच व्यायामाची सुरुवात केलेली आहे गा.पै. जी.. आधी एके ठिकाणी जात होतो पण नंतर नंतर वेळ जमेना.. म्हणून घरीच सुरुवात केली आहे गेल्या महिन्यापासून.. पण हे परत एकदा लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद!! 


In reply to by गामा पैलवान

होय होय, घरीच व्यायामाची सुरुवात केलेली आहे गा.पै. जी.. आधी एके ठिकाणी जात होतो पण नंतर नंतर वेळ जमेना.. म्हणून घरीच सुरुवात केली आहे गेल्या महिन्यापासून.. पण हे परत एकदा लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद!! 


म्हणजे मला ग्रूपमध्ये जायला आवडत नाही. तो एक शाळेचा वर्ग वाटतो. शिवाय त्यांचे प्लान पक्के असतात...शनिवारी रात्री निघायचं...डोंगराच्या पायथ्याशी मुक्काम टाकायचा आणि रविवारी संध्याकाळी सहा ते नऊपर्यंत घरी यायचं. शाळेतल्या मुलांसाठी सुटी न घेता ट्रेक करवणे हा हेतू असतो. किंवा नोकरी करणाऱ्या महिलाही येऊ शकतात.

मला हा साचेबंद कार्यक्रम घाईगर्दीतला जमत नाही.  सोमवार ते शुक्रवार जातो.एकटेच जायचं.

मग सुरक्षिततेचं काय? तर मुख्य गावात पोहोचायचं आणि गावातला गाईड घ्यायचा बरोबर. एक दोन ट्रेक केल्यावर नवीन ठिकाणी गाईडही लागत नाही. गाववालेच मार्ग सांगतात तसे जायचं.

१. प्रथम माथेरान ट्रेक करावेत. सर्व सुविधा आहेत. पाच वाटा आहेत वर जायला.

२. प्रबळगड ( कलावंतीण बुरुजावर नाही जायचं).

३. पेठचा किल्ला.

४. हाजी मलंगगड.

 


In reply to by कंजूस

कंका तुमच्या सोबतचा आपटा मार्गे कर्नाळा ट्रेक करायचा राहेिला तो राहूनच गेला.


In reply to by रुस्तम

मग परत प्लॅन करा की..  आपटा मार्गे कर्नाळा जाताना वाटेत कुठे तरी मी भेटू शकतो तुम्हाला.. कर्नाळा माझ्यासाठी ट्रेकिंगचे सर्वात सोयीचे ठिकाण आहे.. 


In reply to by शैलेश लांजेकर

पावसाळ्यानंतर जायला बरं पडेल.  तुम्ही रसायनी कर्नाळा वाटेत कुठे भेटणार?


In reply to by रुस्तम

मी पनवेल वरून येणार आहे. तेव्हा मला वाटतं कि मी तुम्हाला कर्नाळा पक्षी अभयारण्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर भेटू शकतो. ते जर तुम्हाला सोयीचं नसेल तर तुमचा रूट डिटेल मध्ये समजल्यावर नक्की ठिकाण ठरवू शकतो. पावसाळ्यानंतर जायचं असेल तर आपल्याकडे वेळ आहे हे ठरवण्यासाठी


In reply to by कंजूस

मोलाची माहिती दिलीत काका, त्याबद्दल धन्यवाद.. जर करता येणार असेल तर एकट्याने  ट्रेकिंगला माझी पहिली पसंती असेल.. माथेरानचा विचार करायला हरकत नाही कारण माझ्यासाठी ते एक सोयीचं ठिकाण आहे.. त्या बद्दल अजून सविस्तर माहिती सांगू शकाल का? पहिलीच वेळ आहे ट्रेकिंगला जायची म्हणून तुमच्या मागे सारखं माहिती द्या म्हणून टुमणं लावतोय.. एकदा व्यवस्थित अंदाज आला की मग माझे प्रश्न पण कमी होतील..  


१. माथेरानला पनोरमा पॉइंट ट्रेक......

हा अगदी सुरुवात करणाऱ्यांसाठी आहे. म्हणजे आपण खालून सहाशे मिटर्स चढून न जाता फक्त वरतीच रस्त्याने पनोरमा पॉईंटला जाऊन येणे. ( यासाठी प्रवेश शुल्क लागत नाही. मागच्या दस्तूरीनाका कार पार्किंगमधूनच रस्ता जातो. ४५ मिनिटे चालावे लागते. जाऊन येऊन पाच किमी.

२. माथेरानमध्ये प्रवेश घेऊन छोटा चौक पॉइंटपर्यंत जाऊन येणे. पंधरा किमी होतात.

३. याच पद्धतीने शार्लोट लैक ते लुइझा पॉइंट आणि परत पंधरा किमि होतात.

४. खालून वर जाण्याचे ट्रेक आहेत त्यात ...

    ४अ. पनवेल डेपोतून नवीन पनवेल मार्गे धोधाणी बस जाते. धोधाणी गावाच्या वरतीच माथेरानच सनसेट पऑइंट आहे. सरळ एक वाट आहे. चढून वर गेल्यावर तिथून बाजार स्टेशन आणि दस्तूरी मार्गे टॅक्सीने खाली येणे.

  ४ ब. कर्जत स्टेशन. ते बोरगाव फाटा बस किंवा शेअर टॅक्सीने फाट्याला उतरणे. फाट्यावरून चालत किंवा शेअर टॅक्सीने नदीपुलापाशी उतरणे. येथून एका टपरीजवळून वाट वरती रामबाग पॉइंटला जाते. 

४क. कर्जत ...बोरगाव फाटा...नदी पुल...पुढे ताडवाडीला उतरणे. ( साडे आठची बस बंद झाली बहुतेक. )शेअर टॅक्सीने जावे लागेल. ताडवाडी गावाच्या विहिरीजवळून एक वाट वर चढत जाते ती थेट वन ट्री हिल पॉइंटला जाते.

४ब आणि ४क चा बोरगाव फाटा हा पनवेल चौक_ कर्जत रस्त्यावर आहे.

५. कर्जत ट्रेनने भिवपुरी रोड स्टेशनला उतरणे. चालत भुतिवली धरणाकडे जाणे. धरणाला अर्धा वळसा घातल्यावर वरच्या ठाकुरवाठीमार्गे गार्बटवाडी/ गार्बट पॉइंटमार्गे माथेरानमध्ये जाता येतं. बराच लांबचा मार्ग आहे. पाऊस कमी झाल्यावर जाणे.

६. नेरळ स्टेशनहून टपाल वाडीत चालत जाणे. तिथून प्राथमिक शाळेजवळून वरती जुमापट्टीला जाता येतं. त्यागावातून एक शॉर्टकट चढ चढून वाटरपाईप स्टेशनजवळून नंतर वरती रस्त्यावर येऊन दस्तूरीला पोहोचता येतं.

_____________________

कर्नाळा किल्ला

नेहमीच्या पनवेल- पेण रस्त्यावरच्या गेटने न जाता कोकण रेल्वेच्या रसायनी स्टेशनला उतरणे. ( पनवेल..सोमाटणे... रसायनी...आपटा...) रसायनी स्टेशनला रेल्वे क्रासिंगला उजवीकडच्या उद्योगनगर वसाहतीतून एक वाट ठाकरवाडीतून वरती कर्नाळ्याच्या मुख्य वाटेला मिळते. ( इकडे प्रवेश शुल्क लागत नाही).

आपटा स्टेशनहूनसुद्धा जरा आडवळणाने कर्नाळा जाता येते पण रसायनी ची वाट उत्तम.

______________

 


In reply to by कंजूस

खूपच छान  माहिती!! मी राहत असलेल्या ठिकाणापासून इतक्या सुंदर जागा आहेत याचा मला पत्ताच नव्हता.. कारण फिरण्यासाठी कधी फारसा बाहेर पडलोच नाही.. आता मात्र खूप कंटाळा येतो घरात बसून बसून.. त्यामुळे जमेल तितकं आणि जमेल तसं  घराच्या बाहेर पडायचं ठरवलं आहे...

काका, तुम्ही एकट्याने ट्रेक करताना काय काय तयारी करता? काय काय वस्तू बरोबर घेता?काय खबरदारी बाळगता? अडचण किंवा एखादं  संकट आलं तर त्याचा सामना कसा काय करता? तुमच्या सवडीने उत्तरे दिलीत तरी चालेल, काही घाई नाही... 


In reply to by शैलेश लांजेकर

कारण वजन वाढले की त्रास होतो. तरीही काही अत्यावश्यक असतात.

चाकू, दोरी, वर्तमानपत्राचे कागद, टॉर्च, एक पाण्यात बुडू शकणारा डबा आणि त्यास चाळीस फुट दोरी गुंडाळलेली. (याने विहिरीतून पाणी काढता येते किंवा हँडपंपातून पाणी काढताना भरता येते. सुटे पैसे. एक जोडी कपडे. छत्री आणि प्लास्टिक कापड दोन बाइ अडीच मिटर. पातळ चादरीची गुंडाळी.

इलेक्ट्रीक बिल आपला पत्ता असलेलं, आधार कार्ड आणि दोन कॉप्या. छोटी डायरी आणि पेन. फोन नंबर लिहिलेले असावेत. मोबाईल बंद पडल्यास लागतात. 

तयार खाण्याचे पदार्थ, पोळ्या किंवा ब्रेड. आणि दोन तीन लिटर पाणी असावे. सर्व मिळून सात किलो वजन होते.


In reply to by कंजूस

होय कंका, खरड वही तपासली.. खूप सारी माहिती अगदी विनासायास मिळत आहे.. पण मी विचार करतोय कि आधी तुम्ही वर सुचवलेले सोपे सोपे ट्रेक एकट्याने करायचे आणि मग सगळी व्यवधानं सांभाळून वेळेत बसत असेल तरच ग्रुप मध्ये जॉईन व्हायचं.. पाहूया कसं  काय होतंय  ते..