माफीचा साक्षीदार, हा मराठी सिनेमा, जोस्जी-अभयंकर हत्याकांड वर आधारीत होता. काही कारणास्त्व (लेखनासाठीच) मला ह्या घटने बबातचे सर्व लिखान हवे आहे, सर्व्वत मह्त्वचे म्हणजे काही वर्षांपुर्वी ईथे मिपावर, एका लेखकाने त्यांनीच लिहलेला (ह्या घटनेबद्दलचा) एक लेख, तो एका मासिकात ही प्रकाशित झाला होत त्याची पीडीएफ दीली होती, कृपया मला ती फाईल कुठे आहे ,मला कशी मिळेल हे कोणी सांगेल का?
तसेच जर ईतर कोणाकडे ह्या संबंधीत सखोल माहीती असेल कींवा काही लिंक्स (ऑनलाईन) असतील तर कृपया शेअर करा.
आगाऊ धन्यवाद!!
वाचने
499
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
"येस, आय ॲम गिल्टी" ह्या…
"येस, आय ॲम गिल्टी" ह्या नावाने जोशी- अभ्यंकर खून खटल्यातील आरोपीने - मुनव्वर शाहने तुरुंगातून लिहिलेले हे पुस्तक आहे. ह्यात सगळी तपशीलवार माहिती मिळेल.
हे पुस्तक मुनव्वर शाहने…
In reply to "येस, आय ॲम गिल्टी" ह्या… by प्रचेतस
हे पुस्तक मुनव्वर शाहने लिहिले आहे ज्यात त्याने मी यात चुकून अडकलो, मला त्यावेळी नोकरी व योग्य मार्गदर्शन असते तर यात मी गेलो नसतो, मी एकच दोरी ओढली . . . असा स्वतःचा काहिसा कमी दोष दाखविणारे निवेदन आहे.
या गुन्हेगारांसोबत अभिनव कलामहाविद्यालयात चित्रकला शिकणारे चित्रकार श्याम भुतकर यांनी या घटनेसंदर्भात प्रदीर्घ लेख लिहिला आहे ज्यात सर्व घटनांचे सविस्तर वर्णन, चित्रे, जक्कलची विकृत मानसिकता इ. चा सविस्तर ऊहापोह केला आहे.
हा २२ पानी लेख खालील संकेतस्थळावर आहे.
https://drive.google.com/file/d/1ALHeWNbGIvNArdwFkaywTM1qPA_xamGt/view?usp=drivesdk
हे पुस्तक मुनव्वर शाहने…
In reply to हे पुस्तक मुनव्वर शाहने… by श्रीगुरुजी
हे पुस्तक मुनव्वर शाहने लिहिले आहे ज्यात त्याने मी यात चुकून अडकलो, मला त्यावेळी नोकरी व योग्य मार्गदर्शन असते तर यात मी गेलो नसतो, मी एकच दोरी ओढली . . . असा स्वतःचा काहिसा कमी दोष दाखविणारे निवेदन आहे.
ते अर्थातच आहे. मात्र तो स्वत: च ह्यात सामिल असल्याने त्याने जरी वाचकांची सहानुभूती आपल्याला मिळावी ह्या दृष्टीकोनातून लिहिलेले असले तरी बऱ्यापैकी अचूक माहिती त्यातून मिळते.
श्याम भुतकरांचा लेख दिल्याबद्द्ल धन्यवाद. तो वाचतो.
एकदम ओघवते लेखन आहे. मुनव्वऱ…
In reply to हे पुस्तक मुनव्वर शाहने… by प्रचेतस
एकदम ओघवते लेखन आहे. मुनव्वऱ शाहच्या पुस्तकांत नाही ती माहितीदेखील समजली.
मी मुनव्वर शाहचे पुस्तक…
In reply to एकदम ओघवते लेखन आहे. मुनव्वऱ… by प्रचेतस
मी मुनव्वर शाहचे पुस्तक वाचलंय आणि श्याम भुतकरांचा हा दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला प्रदीर्घ लेखही वाचलाय.
मुनव्वर शाह स्वतः सामील असल्याने त्याने हातचे राखून स्वतःला थोडी सहानुभूती मिळावी म्हणून पुस्तक लिहिलंय. श्याम भुतकरांचा या प्रकरणाशी अजिबात संबंध नसला तरी आरोपी त्यांचे सहाध्यायी होते. ते व्यक्तिशः जक्कल कुटुंबियांना जवळून ओळखत होते, ते अनेकदा जक्कलच्या घरीही गेले होते, जक्कलची विकृत गुन्हेगारी मानसिकता त्यांनी अनुभवली होती. त्यामुळे त्या दृष्टीकोनातून त्यांचा लेख खूप सविस्तर व माहितीपूर्ण आहे.
श्याम भुतकरांचा लेख वगैरे
In reply to मी मुनव्वर शाहचे पुस्तक… by श्रीगुरुजी
श्रीगुरुजी,
श्याम भुतकरांच्या लेखाबद्दल धन्यवाद.
मला अंधुकसं आठवतं त्यानुसार मुनव्वर शहाने जेमतेम सज्ञान ( नुकतीच अल्पवयीन मर्यादा पार ) म्हणून दयेचा अर्ज केला होता. तो फेटाळल्याची बातमी वाचली होती.
या प्रकरणावर माफीचा साक्षीदार नामे चित्रपट पाहिलेला आठवतो. त्यात नाना पाटेकारांनी राजेंद्र जक्कलची भूमिका वठवलेली होती. त्यांतलं जक्कलचं विकृत क्रौर्य तुलनेने लहान वयांतही जाणवलं.
आ.न.,
-गा.पै.
लेख वाचला, महाविद्यालयीन…
In reply to हे पुस्तक मुनव्वर शाहने… by श्रीगुरुजी
लेख वाचला, महाविद्यालयीन मुलांच्या या क्रौर्याने तेव्हाचे पुणे किती हादरले असेल याची कल्पनाच करू शकते.
https://bobhata.com…
https://bobhata.com/lifestyle/story-joshi-abhyankar-serial-murders-2992
त्या काळातला पोलीस…
त्या काळातला पोलीस तपासावरच्या कथांचा लोकप्रिय दिवाळी अंक दक्षतामध्ये यावरचं लेखन वाचल्याचं आठवतंय.
वेळ असल्यास आणि चिवटपणा असल्यास
विवेक वाघ, पुणे ह्यांनी "जक्क"" ह्या नावाची डोक्यूमेंटरी बनवली होती. त्याला अनेक बक्षिसे मिळाली पण ती रिलीज केली नाही त्यांनी. कुटुंबियांशी वार्तालाप करून काही पहावयास मिळते का बघा. नक्कीच जास्त माहिती मिळेल.
जक्कल, सुतार, जगताप व…
जक्कल, सुतार, जगताप व मुनव्वर शाह यांच्याव्यतिरिक्त सुहास चांडक व सतीश गोरे यांनाही अटक झाली होती.
सतीश गोरेची शनिवार पेठेतील वर्तकाश्रमासमोरील एका वाड्यात भाडयाने घेतलेली खोली होती. त्या खोलीत हे सर्जण अनेकदा असायचे. याव्यतिरिक्त जक्कल कर्वे रस्त्यावरील एका घराच्या बागकामासाठी केलेल्या खोलीत रहायचा. सध्याचे श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ आहे त्याच्या समोरच्या बाजूला हे घर होते. याच खोलीत त्यांनी हेगडे व गोखलेचा गळा आवळून खून केला होता.
सतीश गोरेचा प्रत्यक्ष गुन्ह्यात सहभाग आढळला नाही. चोरीच्या वस्तूही मिळाल्या नाहीत. त्यामुळे तो न्यायालयात निर्दोष सुटला.
सुहास चांडक प्रत्यक्ष खुनात सहभागी होता. त्याला अटक झाल्यानंतर तात्काळ त्याचे मामा (प्रसिद्ध फौजदारी वकील ब्. ना. तथा बाबाराव भिडे) पोलीस स्थानकात जाऊन त्याला भेटले व त्याने सर्व गुन्ह्यांची माहिती दिल्यानंतर त्यांना गांभीर्य लक्षात आले व त्यांनी त्याला त्वरित माफीचा साक्षीदार होण्याचा सल्ला दिला. नाहीतर तू सुद्धा फासावर जाशील हे निक्षून सांगितल्याने त्याने माफीचा साक्षीदार होण्याचे मान्य केल्याने तो शिक्षा न होता सुटला. नंतर ९० च्या दशकात अनेक दिवाळी अंकांच्या मुखपृष्ठावरील चित्राचा चित्रकार म्हणून सुहास चांडक हे नाव दिसायचे.
२००३ मधे अनुराग कश्यपने ह्या विषयावर लूजली आधारित
पांच हा चित्रपट बनवल्याचे आठवते. ह्या सिनेमात असणारा अतिरेकी हिंसाचार, ड्रग्स वापराचे चित्रण आणि डार्क छटा पाहता त्याला सेन्सर बोर्डाचा परवाना मिळाला नाही नंतर हा सिनेमा भरपूर कट करून रिलीज करा असे ही ठरले पण री शूट करण्यास बजेट नसल्याने सगळा मामला डब्यात गेला, पुढे हा सिनेमा कैक फिल्म फेस्टिवल मध्ये दाखवला गेला आणि टोरेंट्स वर उपलब्ध झाला तेव्हा नंतर बघू म्हणून सोडला तो पहायचा राहिलाच
हे पहा
https://contentcarvaan.com/blog/2024/12/07/%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B6%…
प्रसिद्ध फौजदारी वकील…
प्रसिद्ध फौजदारी वकील बाबाराव उपाख्य ब. ना. भिडे हे सुहास चांडकचे मामा होते असा उल्लेख श्याम भुतकरांच्या लेखात आहे.
१९७६ मध्ये पुणे खूपच लहान शहर होते. शहराची सीमा पूर्वेला शंकरशेट रस्त्यावरील सेवन लव्ज हॉटेल चौक, दक्षिणेला स्वारगेट, पश्चिमेस कर्वे रस्त्यावरील नळ स्टॉप चौक व उत्तरेस शिवाजीनगर बसस्थानक इतकीच होती. जक्कल टोळीने शंकरशेट रस्त्यावर सेवन लव्ज चौकापासून २०० मीटर अंतरावर असलेल्या बाफनांच्या त्रिशला बंगल्यावर (जो त्या काळात शहराबाहेर होता) दरोडा घालण्याचा प्रयत्न केला होता. परंतु बाफनांच्या जागरूकतेमुळे तो फसला होता.
जोशी कुटुंबियातील सर्व तिघांचा खून ३१ ऑक्टोबर १९७६ च्या मध्यरात्री झाला. नंतर अभ्यंकर कुटुंबियातील ५ जणांचा खूप ३० नोव्हेंबर १९७६ च्या मध्यरात्री झाला. त्यानंतर ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री पुण्यात सायंकाळपासून अक्षरशः संचारबंदीसमान वातावरण होते. सर्व लोक भयभीत अवस्थेत लाठ्या काठ्या जवळ ठेवून रात्रभर जागे होते. गल्लीबोळातून तरूणांचे गट हातात काठ्या, हॉकी स्टिक्स इ. घेऊन शिट्ट्या फुंकत गस्त घालत होते.
असंख्य प्रकारच्या आधी पसरल्या होत्या. विषमअंकी खून होत असल्याने ज्यांच्या कुटुंबात विषमअंकी सदस्य होते त्यांनी समसंख्या होण्यासाठी घरातील एका सदस्याला दुसरीकडे पाठवून दिले होते किंवा कोणाला तरी रहायला बोलवून घरात सदस्यांची समसंख्या केली होती. ३१ डिसेंबरला ७ सदस्य असलेल्या कुटुंबाचे हत्याकांड होणार अशीही आवई चर्चेत होती. जोशी (२ अक्षरी आडनावाचे ब्राह्मण) व अभ्यंकर (४ अक्षरी आडनावाचे ब्राह्मण) यानंतर ६ अक्षरी आडनावाच्या ब्राह्मण कुटुंबाचे हत्याकांड होणार हे सुद्धा पसरले होते. त्यात अजून भर म्हणजे ते कुटुंब चित्पावन असणार हे अजून एक संशोधन कोणी तरी केले होते. ६ अक्षरी आडनावाचे कोणते चित्पावन ब्राह्मण कुटुंब आपल्या माहितीतले आहे याचाही काहींनी शोध घेतला. वर्तकाश्रमाचे मालक प. वि. वर्तक यांनी प्लॅंचेट करून कै. काशीनाथशास्त्री अभ्यंकराकडून खुन्याची माहिती घेतली हे सुद्धा पसरले होते. याच वर्तकांनी दावा केला होता की व्हॉयेजर मंगळावर पोहोचण्यापूर्वी ते सूक्ष्म देहाने मंगळावर जाऊन आले होते. अनेकांनी संकट टाळण्यासाठी सत्यनारायण, यज्ञ, याग केले होते. ३१ डिसेंबरला पुण्यात रहायला नको म्हणून काही जण दुसऱ्या गावी निघून गेले होते.
मागे वळून पाहता याची आता गंमत वाटते.
अवांतर : सहा अक्षरी चित्पावन
In reply to प्रसिद्ध फौजदारी वकील… by श्रीगुरुजी
अवांतर : मला पटकन आठवलेलं षडाक्षरी चित्पावन आडनाव म्हणजे करमरकर.
-गा.पै.
सुहास चांडक
In reply to प्रसिद्ध फौजदारी वकील… by श्रीगुरुजी
सुहास चांडक चे मामा बाबाराव भिडे हे रास्व संघाचे फार प्रतिष्ठित नाव होते. त्यांचा प्रभाव आणि प्रेरणा असणारी एक मोठी फळी संघ आणि भाजपात कार्यरत होती.
सुहास चांडकने नंतर कमर्शिअल आर्टिस्ट म्हणून बरीच कामे केली. मुख्यत्वे पुस्तकांची कव्हर्स वगैरे. पुस्तकेही बहुतांशी सुशि टाइप लेखकांची असत. बरीच कव्हर्स बघण्यात आहेत पण त्यांचे काम काही एक्सलन्स ह्या कैटेगरीतले वाटले नाही. जसे चंद्रमोहन कुलकर्णी किंवा रवि परांजपे ह्यांची स्टाइल आणि काम होते तसे चांडकांचे नव्हते. ते कट पेस्ट टाईप डिझाईन किंवा काही रेफरन्स घेऊन त्यावर ब्रश स्ट्रोक्स ने ऐडिशन करुन डिझाईन आटपणारे आर्टिस्ट वाटले. डीटीपी आणि फोटोशॉ्पपूर्व जमान्यातली ही गोष्ट असल्याने तेव्हाही चालू बाजाराप्रमाणे पुरवठा हे तत्त्व वाटले. चार रंगी/बहुरंगी छपाई हेच कौतुक असल्याने आणि त्यातही फोटोटाईपसेटिंग, हाफटोन, सेपरेशन, फिल्मा, प्लेटा अशी व्यवधाने सांभाळून काम करणारे ते लोक्स असल्याने बेसिक आर्ट पेक्षा व्यावसायिक गरजांच्यावर उपजिविका करणारे आपण म्हणू शकतो. अर्थात कमर्शिअल आर्ट कडून तेंव्हाही हीच अपेक्षा असायची. अलिकडे अलिकडे त्यांच्या राजसुय कलाविश्व ह्या रविवार पेठेतील फर्म ची (४८ वर्षे जुनी फर्म अशी) जाहिरात फोन पत्यासह जस्ट डायलवर पाहिल्याचे आठवते. आता चांडक हयात आहेत का नाही तेही माहित नाही.
अजून एक आठवण म्हणजे मला आठवी नववीत असताना पुण्याला पहिल्यांदा मामाकडे आलेलो तेंव्हा मामाने पुणे फिरवून दाखवलेले. सारसबाग, राजा केळकर संग्रहालय वगैरे. हॉटेल विश्व पासून जाताना मामाने "इथेच ते जक्कल सुतार बसायचे" ही मौलिक माहिती मलाही अभिनवला जाण्याची इच्छा असल्याने सांगितल्याचे आठवते. त्या हॉटेलात गेलो सुध्दा होतो बहुधा. बरीच वर्षे पुण्याच्या लोकांच्या डोक्यात ते जोशी अभ्यंकर प्रकरण होते. नशीबाने अभिनवही राहिलेच जायचे नाहितर अजून एक्स्ट्रा माहिती मिळाली असती. ;)
जक्कल हे नाव मराठी भषिकांना जरा वेगळे वाटले तरी ते सोलापुरात बरेचसे परिचित नाव आहे. स्वातंत्र्यसैनिक आणि सोलापूर समाचार चे मालक स्व. बाबुराव नरसप्पा जक्कल सोलापुरात प्रसिध्द होते. त्यांचे ऑफिस असलेला चौक आजही सोलापुरात समाचार चौक म्हणून ओळखला जातो.
जरा विषयांतर
In reply to सुहास चांडक by अभ्या..
तुमचे एकंदरीत क्षेत्र वेगळेच दिसते व्यावसायिक कला इत्यादी इत्यादी. चंद्रमोहन कुलकर्णींचे नाव ऐकून थेट द मा मिरासदार आणि त्यांची अजरामर पुस्तके आठवली, माझ्याकडे संग्राह्य नाहीत पण बऱ्याच आधी लायब्ररी मधून आणलेल्या त्यांच्या पुस्तकांवर चंद्रमोहन कुलकर्णींच्या सोबत शि द फडणीस (एस फडणीस) ह्यांची पण कलाकारी होती असे अंधुक आठवते. ह्या दोन वल्लींचे काही किस्से असले तर नक्की सांगा , अगदीच विषय औचित्यभंग नको म्हणून ह्या धाग्यावर नसले तरी चालेल, सुचेल अन् रुचेल तशी खरड टाकलीत तरी चालेल. - खोंड्या
असो
In reply to जरा विषयांतर by वृषभ खोंडे
क्षेत्र थोडे वेगळै आहेच पण माझा कालखंड फार विचित्र ट्राझिंशनमध्ये गेला. उपयोजित कला शिकलो पण तेंव्हा सिलैबसमध्ये कम्प्युटर ग्राफिक्स नव्हते. बाजारात डीटीपी चालत होते पण अभ्यासक्रमात ते नव्हते. शिकून बाहेर पडलो तेंव्हा स्कैनर्स, प्रिंटर्स, ग्राफिक्स सॉफ्टवेअर्स आदींनी बाजारपेठ समृध्द झालेली होती. त्यानंतर खाजगी संस्थामधून ग्राफिक्स शिकावे लागले. बेस पक्का असल्याने ते फार इझी झाले. काम करतानाही नुस्ता डीटीपी ऑपरेटर आणि ग्राफिक्स येणारा आर्टिस्ट हा फरक जाणवत गेला. ह्यामुळे जान गुटेनबर्गापासून आजपर्यंत जेवढ्या प्रिंटींग मेथडस वापरल्या गेल्या त्या माहित तरी अहेत किंवा त्यांचा प्रत्यक्ष अनुभव आहे.
पण ह्याच शिक्षणामुळे मला फाईन आर्टसमध्ये काम करणारे आर्टिस्ट, त्यांच्या कलाकृती आणि त्यांचे किस्से ह्याविषयी फारशी माहिती नाही.
स्व. दीनानाथ दलालांनी आकार दिलेली आणि बऱ्याच मराठी असणाऱ्या कमर्शिअल आर्टिस्टनी समृध्द केलेली हि उपयोजित कलेची दुनिया मात्र माणसांच्या किश्श्यापेक्षा तंत्र,यंत्र आणि कल्पकतेच्या किश्श्याची दुनिया आहे. दुर्दैवाने लोकांना त्यात फारसा रस नसतो. तरीही काही वेळप्रसंगी आठवेल तसे लिहिनच.
मुख्य म्हणजे मला माझ्या पदवीची किंमत भारतात जी कधीच जाणवली नाही, लोकांनीही जाणवू दिली नाही ती युरोपात जाणवली.
एका जवळपास पावणेदोनशे वर्षाचा इतिहास असणाऱ्या महाविद्यालयाचा अभ्यासक्रम आणि पदवी आजही आपले नाणे खणखणीत वाजवते तेही भारताबाहेर हेच मला अपूर्वाईचे आहे.
खरंय
In reply to असो by अभ्या..
कधी काही मनासारखे नाही झाले किंवा भरपूर मेहनत करून पण फळ अपेक्षित पदरी पडले नाही तर आमची आजी कायम एक म्हण सांगत असे
"उकिरड्याचे सुद्धा पांग फिटतात नाना (माझे घरचे नाव) आपण तरी हाडामासाची माणसे आहोत".
<...ती युरोपात जाणवली>या…
In reply to असो by अभ्या..
<...ती युरोपात जाणवली>
या संदर्भात तुम्हाला बसलेल्या सुखद धक्क्यांविषयी अजून काही वाचायला मिळेल काय?