काहीही होवो ! काय फरक पडतो?
शेवटी कुठलीही भाषा हे केवळ संवादाचे साधन आहे. पण एकमेव नाही.
उद्या माणसाला बोलण्याची शक्ती गमवावी लागली, तरी फरक पडणार नाही.
माणुस वेगळे काहीतरी शोधेलच.
महत्व संवाद होत रहाण्याला आहे, भाषेला नाही.
अर्थात, माझ्या मते तरी सर्वोत्कृष्ट संवाद मौन आहे. :)
--अवलिया
जसजसे, खेडोपाडी इन्टरनेट पोहोचेल, तस तसे आन्तरजालावर मराठीचा वापर वाढून, झाला तर विकासच होईल! :)
मात्र एक आहे, अशा साईट्स बद्दलची पुरेशी जाहीरात व्हायला हवी जेणेकरुन अशा साईट्स्च्या अस्तित्वाबद्दल खेडोपाडिच्या लोकान्ना माहिती मिळेल
आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर) :D :P
मराठी भाषा कदाचित इंग्लिशचे एक रुप म्हणून ओळखली जाईल.
ज्याला भविष्यात मराठी शिकायची इच्छा असेल त्याला ती "ग म भ न" च्या ऐवजी "अ ग म य" (अगम्य) अशी शिकावी लागेल.
काहीतरी ला मत दिले आहे.शंभर वर्षापुर्वीची मराठी आणि आताची ह्यात फरक आहे.तसाच तो आताची आणि शंभर वर्षानंतरची ह्यात असेल.मराठी कन्नड किंवा तामिळसारखी 'क्लासिक' नाही त्यामुळे लिहिण्यात /बोलण्यात हिंदी/इंग्रजी चा प्रभाव आतापेक्षा बराच जास्त जाणवेल्.कदाचित मराठी म्हणजे हिंदीची उपभाषा म्हणून गणली जाईल.! पण वर म्हंटल्याप्रमाणे भाषा हे केवळ संवादाचे साधन आहे.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
>>मराठी कन्नड किंवा तामिळसारखी 'क्लासिक' नाही
म्हणजे काय?
उत्सुकतेने विचारतो आहे.
-- लिखाळ.या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
>>मराठी कन्नड किंवा तामिळसारखी 'क्लासिक' नाही
म्हणजे काय?
मला सुद्धा हेच विचारायचे होते.
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
क्लासिक भाषेचा मक्ता काही कन्नड आणि तमिळ या भाषांनी नाही घेतलेला
ते क्लासिक बिसिक आपल्याला काय माहीत नाय
एवढेच माहित आहे की देवांची भाषा गणली जाणारी पृथ्वीवरील सर्वात प्राचीन समजली जाणारी भाषा "संस्कृत" ही मराठी भाषेची जननी आहे.
तेव्हा आमची भाषा अमकी पुराणी आहे आणि तमकी क्लासिक आहे असे जे समजतात त्यांना त्यांची साखरझोप लखलाभ असो...
आम्ही वास्तवात जगतो... आणि आमची माय मराठी आम्हाला अती प्रिय आहे एवढे खरे :)
जय महाराष्ट्र
(मातृभाषाप्रेमी) सागर
>>मराठी कन्नड किंवा तामिळसारखी 'क्लासिक' नाही
म्हणजे कशी ! क्लासिकतेची काय वैशिष्ट्ये असतात ? ते जर कळले, तर आम्हा मराठी भाषा प्रेमींना वाटलेली काही 'क्लासिक' गोष्टींची काही भर घालता येईल !
-दिलीप बिरुटे
क्लासिकल म्हणायचे होते.चुकीबद्दल दिलगीर!!
काही महिन्यांपुर्वीच भारत सरकारने तामिळ्,कन्नड्,तेलुगु ला क्लासिकल दर्जा दिला आहे असे वाचनात आले होते.क्लासिकल दर्जा देताना खालील मुद्द्यांचा विचार केला होता.
१)१५०० ते २००० वर्षे भाषा वापरात असल्याचा पुरावा.
२) भाषा अभ्यासकाना/ईतिहासकाराना उपयोगी पडेल असे जुने साहित्य वा ग्रंथ.
३) साहित्य परंपरेवर/भाषेवर ईतर भाषांचा कमीत कमी प्रभाव.
दुवा आता माझ्याकडे नाही. सापडल्यास लवकरच देइन.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
असतील त्या भाषा क्लासिकल. त्यांनी त्यांची भाषा ईतके वर्ष जपली त्यात त्यांचा मोठेपणा आणी भाषेबद्दलचा अभिमान दिसतो आहे.
तसेच भाषा राहिली नाही राहिली तरी काहीही फरक पडणार नाही हे जरा मनाला टोचते.
तसा तर मग कशाचाच फरक पडणार नाही. शिवाजी महाराज, टिळक, सावरकर, पु.ल. नसते तरी काही फरक पडला नसता. उद्या जर मराठी भाषेवर बंदी आली तरी आपण ऐकुन घेऊ का? किंवा धर्मांतर करायला सांगितले तर करु का? काही फरक पडणार नाही असे म्हणुन. याचे उत्तर होय असेल तर मग आपण सर्व इथे का आहोत? मराठी संस्थळे का आहेत? मराठीची ओढ आहे मराठीत काहीतरी वैशिष्ट्य आहे म्हणुनच ना?
आपल्याला मराठी का आवडते, कारण आपण ती आपली ओळख आणी ती शक्य तितकी जपणे आपल्या मुल्यांपैकी एक समजतो म्हणुनच ना?
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
मराठी भाषेला क्लासिकलचा दर्जा द्यायला हरकत नाही.
(काही वर्ष कमी पडतील पण पुरावे सापडतील)
मराठी भाषेचा (काळानुरुप) विकास होईल ला मत टाकले !
-दिलीप बिरुटे
मराठी ही मराठीच राहील त्यात फक्त नविन शब्द, संकल्पना यांची भर पडेल इतकच .
जसे २०-२२ वर्षांपूर्वी संगणक इतके प्रचलीत नव्हते त्यामुळे त्याच्याशी संबधित शब्द इतके वापरले जात नसत जे आता खूपच कॉमन झाले आहेत ..
तसेच त्यावेळी जे काही नविन शोध लागले असतील, जी जिवन पध्ध्ती असेल त्या संबधित शब्दांची भर पडेल (किंवा ते शब्द प्रचलित होतील) .. पण याला मराठीचा विकास म्हणता येणार नाही .. भाषेचे नविन किंवा सुधारित रुप म्हणता येईल . पण मराठी भाषा ही राहीलच
एकुण १९ मतांपैकी १० मते मराठी भाषेचा विकास होईल या पर्यायाला आली आहेत, म्हणजे एकंदरीत आपली भाषा टिकवायचा मानस आहे सर्व मिपाकरांचा. :) धन्यवाद.
एक मत मराठी भाषेचा वापर भविष्यात पुर्णपणे नाहीसा होईल ला आले आहे. ज्याने हे मत दिले आहे त्यास याबाबत खुलासा करणाची विनंती.
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
भाषेचे काय व्हायचे ते होवो पण लिखाणाचा दर्जा मात्र दिवसेंदिवस खालावत चालला आहे हे स्पष्ट जाणवते.
संगीत, कला, साहित्य यावर दर्जेदार अभ्यासपूर्ण लेख वा कथा हे कमीच होत चालले आहेत.(दर्जेदार लेखक जालावर असून सुध्दा)
त्याउलट 'चकणा' खाताना होणारी फालतू 'पकपक्'(हा शब्द सध्या नेतेही वापरतात) जास्त ऐकू येते आहे.
(चांगले लिखाण आवडणारा पण लिहू न शकणारा) तिरशिंगराव
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
प्रतिक्रिया
काहीही
१+
In reply to काहीही by अवलिया
विकासच होईल
मराठी भाषा
ईतर
>>मराठी
In reply to ईतर by चिरोटा
>>मराठी
In reply to >>मराठी by लिखाळ
क्लासिक बिसिक आपल्याला काय माहीत नाय
In reply to >>मराठी by मराठमोळा
म्हणजे कशी ?
In reply to ईतर by चिरोटा
मला
असतील त्या
In reply to मला by चिरोटा
ही वैशिष्ट्ये असतील तर...
In reply to मला by चिरोटा
पर्याय क्र. ४
एकुण १९
भाषा