Skip to main content

जेन झी आणि पुढील राजकारणाची दिशा (कि दशा?)

लेखक कानडाऊ योगेशु यांनी सोमवार, 27/07/2026 10:14 या दिवशी प्रकाशित केले.

सध्या केवळ भारतात नाही तर एकुण जगातच जेन-झी हा प्रकार धुमाकुळ घालतोय. श्रीलंका,नेपाळ व बांग्लादेशामध्ये त्यांच्यामुळे सत्तापालट ही झालेला बघितला. 

भारतात पण गेले काही दिवस हीच मंडळी वर्तमान पत्राच्या पहिल्यापानावर होती.सत्तरच्या दशकात जन्मलेल्या मला हा प्रकार अचंबित करणारा होता. त्यामुळे जेन-झी हा शब्द अग्रस्थानी (फोरफ्रंट) वर येण्याची कारणांबद्दल विचार करत होतो. नेट वर गुगल केले असता पुढील माहीती मिळाली.

The Greatest Generation: Born 1901–1927 (lived through the Great Depression and World War II).

The Silent Generation: Born 1928–1945 (grew up during war and post-war stability).

Baby Boomers: Born 1946–1964 (part of the post-WWII population surge).

Generation X: Born 1965–1980 (known for independence and latch-key childhoods).

Millennials (Gen Y): Born 1981–1996 (the first to grow up with the internet).

Generation Z: Born 1997–2012 (true digital natives valuing immediacy).

Generation Alpha: Born 2010–2024 (growing up in a fully screen-reliant era).

 

म्हणजे जेन-झी मधल्या सगळ्यात सिनिअर व्यक्तीचे वय २९ येते.आणि इथेच हे कारण दडलेले आहे. जेन-झी आता पूर्णपणे करिअरच्या मुख्यप्रवाहात आली आहे. मुळात गेल्या काही दशकात टेक्नोलोजीमध्ये प्रचंड बदल झाले आहेत. मेनफ्रेम संगणक पासुन डेस्क्टॉप संगणक मार्गे लॅपटॉप युग यायला साधारण चार ते पाच दशकांचा कालावधी लागला पण मोबाईल ते स्मार्टफोन हे बदल घडायल केवळ एक अथवा दीड दशकाचाच कालावधी लागला. ह्याच्यामुळे जी जनरेशन ह्या कालावधीत जन्मली ती इफर्ट्लेसली टेक्नॉलॉजी सेवी बनली. 

                   मला आठवतेय माझी कन्या ३-४ वर्षांची असताना मी बेंगलोरमध्ये नोकरी करत होतो. तिच्यासाठी मला मराठी बडबडगीते असणारी काही व्यवस्था शोधत होतो पण काही केल्या मिळाली नाही. माझी कन्या इंग्लिश बडबडगीतांवरच मोठी होत होती.अर्थात आजुबाजुलाही हेच घडत होते. कारण ह्या बालकांचे पुढचे करियर ही इंग्लिश आणि पालकांच्या करिअरनुसार इंटरनॅशनल स्कूल वगैरेंमधुनच होणार होते आणि ह्याबद्दल कुणाला काही वाटण्याचे कारणच नव्हते.पण मी स्वत: एकत्र कुटुंब पध्दतीत मोठा झाल्याने लहान असताना पारंपारिक मराठी घरात म्हटली जाणारी चिऊ काऊ,इथे इथे बस रे मोरा,एबीसीडी सातारा,येरेयेरे पावसा वगैरे बडबडबीते वा तत्सम प्रकार ऐकुनच मोठा झालो होतो आणि केवळ ह्या कारणामुळे ज्गाचया पाठीवर कुठेही असलो तरी मराठीशी नाळ जोडुन होतो.अर्थात असे संगोपन घरातच व्हायला हवे होते हे जरी खरे असले तरीही एकुणच लाईफस्टाईल मुळे (दोघेही करिअर ओरिंएटेड. परमुलखात असल्याने सिनिअर पिढीचा सातत्याने न मिळणारा सहवास वगैरे) जसे संगोपन माझे झाले तसे कन्येचे होऊ शकले नाही. पुढे जरा मोठी झाल्यावर डे-केअर वगैरे प्रकार अंगवळणी पडले.तिथे मिनिमम कॉमन डिनॉमिनेटर ला ध्यान्यात ठेवुन जे सर्वासाठी योग्य राहतील असेच प्रकार खेळात/शिक्षणात/ खाण्यात वगैरे येत असत. माझी कन्या वरिल तक्त्यानुसार ज्युनिअर जेन-अल्फा मध्ये येते पण हीच अवस्था साऱ्या जेन-झी पिढीचीच आहे. तर सांगण्याचा मुद्दा हा आहे कि इतर प्रकारात जेव्हा वेगाने बदल होत गेले तसे बदल राजकारणामध्ये होत होते का? राजकारण आपल्या पारंपारिक पध्दतीनेच पुढे रेटण्याचा प्रकार चालु होता. 

मी शाळेत असताना माझ्या वर्गामध्ये एक मित्र होता.चालण्याबोलण्यात ठिकठाक होत, तरी त्याच्याशी बोलत/खेळत असताना एक अंतर राखले जायचे.अभ्यासाच्या बाबतीत तसा यथातथाच होता पण त्याच्या भोवती एक अदृश्य वलय नेहेमी होते. शिक्षकही थोडे काळजी घेऊनच त्याच्याशी बोलत असत. तो एका नगरसेवकाचा मुलगा होता आणि त्याचे करिअर ही त्याकाळात फिक्स होते.(हे मोठे झाल्यावर कळले.). सध्या तो ही नगरसेवक आहे आणि एकदोन साखर कारखान्याच चेअरमन आहे. तर त्याचे फेसबुक प्रोफाईल दोन तीन दिवसांपूर्वी पाहिले तेव्हा त्यावर त्याच्या १५-१६ वर्षे वयाच्या मुलाचा फोटो होता. जाहीरात होती त्या मुलाच्या वाढदिवसाची व तेच पारंपारिक मथळे..उद्याचे आशास्थान..आमचे प्रेरणास्थान..मनमिळाऊ..प्रामाणिक वगैरे वगैरे शब्दावली पेरली होती. तो फोटो व हे मेसेज पाहुन विचारात पडलो कि अजुनही हा प्रकार ह्या जनरेशन मध्ये चालतो का? त्याचा तो मुलगा ही जेन-झी मधला आहे पण जी व्यवस्था वापरली गेली आहे ती जुन्या पिढीतली आहे. आणि अजुन एक राजकारणी माथी मारण्याचा प्रकार चालला होता.अर्थात हा प्रकार कितपत पुढे जातो तो औत्सुक्याचा विषय आहे.

ह्या जन-झी इफेक्ट मुळेच मोदींना सेल्फी मोडवर यावे लागले. राहुल गांधींना पण ढगळ बॅगी पॅंट मध्ये दोन्ही हात घालुन क्या कुल है हम हेे दाखवत मतदारयादीतील घोळाबाबत पॉवरपॉईंट वर प्रेझेंटेशन द्यावे लागले. मुळात जर हे राजकारण करण्याची पध्दतच बदलली गेली नाही तर असे प्रकार वारंवार घडतील. स्वातंत्र्यपूर्व काळात पहिल्या फळीतील बरेच स्वातंत्र्यसैनिक हे बॅरिस्टर वगैरे असायचे. शिकायला विलायतेत जाणार व इथे येऊन स्वातंत्र्यचळवळीत उडी घेणार असा प्रकार होता. आता ही जेन-झी मधील नेते मंडळी पॉलिटीक्ल सायन्स/जर्नॲलिझम वगैरे क्षेत्रात शिकुन ,प्रात्यक्षिक म्हणुन अश्या चळवळी सुरु करण्याची संधी शोधतात. (त्यात काही गैरे असावे/आहे असे मला वाटत नाही) पण ह्या होत असलेल्या बदलांसाठी राजकिय पक्ष तयार आहेत का? 

राज शमामि नावाचा एक युट्युबर आहे. एका  पॉडकॉस्ट मध्ये बॉलिवुडसंबंधित काही चर्चा होती.समोरच्याने मीनाकुमारी बद्दल काही माहीती सांगितली तर शमामि ला मीनाकुमारी कोण हे माहीतच नव्हते. मीनाकुमारी ही तशी माझ्या आईवडलांच्या पिढीतली.आपल्याला तिच्याबद्दल माहीती आहे माझ्यासाठी शमामि ला ती माहीती नसणे हे एक आश्चर्य होते. पुढे विचार करता असे कळले कि जितक्या इमोशनली आपण (माझी जनरेशन) स्वातंत्र्यचळवळीशी/ स्वातंत्र्यसैनिक त्यांच्या प्रेरणादायी कहाण्य ह्या बद्दल जुळले गेलो आहोत तितक्याच इंटेनसिटीने जेन-झी जुळली असेल का ह्याबद्दल सांशकता आहे. ज्या प्रभावीपणे आपली शिवरायांच्या इतिहासात ,स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात आपली भावनिक गुंतवणुक होती तितकी ह्या जेन-झींची नाही. तिच गोष्ट गेल्या शतकात झालेल्या राजकिय चळवळींबाबत म्हणता येईल. 

जर राजकिय पक्षांनी आपली व्यवस्था येणार्या काळानुसार बदलली नाही तर त्यांचे अस्तित्वच धोक्यात येऊ शकते.किंवा असे होऊ शकते का?


वाचने 562
प्रतिक्रिया 28

प्रतिक्रिया

जेनझींनीच यावे राजकारणात, ते खूप हुशार आहेत. काहीतरी बदलण्याची गरज तर आहेच, पण वर्षानुवर्षे चाललेलं सोयीचं राजकारण बदलता येत नाही. कोणताही पक्ष आला तरी व्यवस्थेतला भ्रष्टाचार संपवू शकत नाही. उद्या यातलेच जेनझी व्यवस्थेमध्ये असणार आहेत, ते भ्रष्टाचार करणार नाहीत अस तुम्हाला वाटतं?


In reply to by श्वेता व्यास

जेन झी ने राजकारणात यावे ! त्यांच्या राजकीय डिस्कोर्स मधे आयमाय शिव्या असल्या तरी काही फरक पडत नाही मला तरी वैयक्तिक, कारण समकालीन राजकारण एकूण एक पक्ष त्या शिव्यांच्या स्व हक्काने त्यांचा धनी झाला आहे. 

 

अपेक्षा फक्त एकच - ह्या पिढीने राजकारणात येऊन तो खादी कुर्ते अन् चकाचक मखलाशीचा संस्कार आत्मसात करू नये ! किंवा गुंठामंत्री युनिफॉर्म धारण करू नये ! चेष्टेचा भाग सोडता ह्या पोरांनी खादी पांघरून राजकारणात यावे, किंवा वल्कले पांघरून मला त्याचाही फरक पडत नाही 

 

बेसिक अपेक्षा एकच आहे - आजवर आपल्या राजकारणाने, पुढाऱ्यांनी, राजकीय विचारधारांनी जे जे म्हणून प्रश्न एकतर त्याज्य मानून किंवा अगदीच परमपवित्र मानून हाताळले नाहीये ते हाताळावे, ह्यांनी रस्त्यावरच्या खड्ड्यांची अकाउंटबिलिटी हाताळावी, इस्रो अजून मजबूत करण्याची पण हाताळावी, सशस्त्र दले आणि संरक्षणाचा विचार करावा, अंतर्गत सामाजिक प्रश्न पक्षी शिक्षक, पाणी पुरवठा, रोजगार, आरक्षण, स्त्री हक्क सुद्धा अशाच बोल्ड पद्धतीने हाताळावे. प्रसंगी एखाद किमोथेरपी डोस लागला तरी चालेल पूर्ण देशाला आणि नागरिकांना पण भारताची पुरोगामी (पुढे जाणारी या अर्थाने) आर्थिक वाटचाल, लोकांचे आर्थिक + सामाजिक ऍस्पिरेशन्स इतक्यावर फोकस करावे असे वाटते.


In reply to by श्वेता व्यास

उद्या यातलेच जेनझी व्यवस्थेमध्ये असणार आहेत, ते भ्रष्टाचार करणार नाहीत अस तुम्हाला वाटतं?

मी असे कुठे म्हटले आहे कि जेन-झींच्या येण्याने सुराज्य (भ्रष्टाचार मुक्त,सुबत्त इ इ.) येईल ते? जेन-झी मधुनही जे नेते/पुढारी येतील ते ही संधीसाधुच असतील.माझ्या म्हणण्याचा उद्देश हा आहे कि राजकारणाची दिशा बदलत आहे आणि जर सध्याच्या स्थापित पक्षांनी स्वत:ला त्याप्रमाणे जुळवुन नाही घेतले तर ते राजकारणातुन हद्दपार होतील.  अभिजीत दिपके किंवा गेला बाजार (गेला-बेजार) केजरीवाल ही संधीसाधु मंडळीच आहेत. दिपके कडे काही रोडमॅप असेल असे वाटत नाही आणि त्याचे जे काही इंटरव्युज पाहिलेत त्यावरुन ही त्याची विचाराची खोली फार असावी असे वाटत नाही. तत्कालीन मुद्द्याचा वापर करुन त्याने हात धुवुन घेतले आहेत असे माझे मत आहे आणि त्यात मला काही वावगे वाटत नाही. मी लेखात म्हटल्याप्रमाणे तो आपल्या शिक्षणाचे प्रात्यक्षिक करायला भारतात आलाय. (हा प्रकार तो जिथे शिकलाय त्या अमेरिकेत ही करु शकला असता. पण भारत ह्या असल्या प्रकारांसाठी सॉफ्ट टारगेट आहे)


In reply to by कानडाऊ योगेशु

जर राजकिय पक्षांनी आपली व्यवस्था येणार्या काळानुसार बदलली नाही तर त्यांचे अस्तित्वच धोक्यात येऊ शकते.किंवा असे होऊ शकते का?

सध्याच्या राजकीय पक्षांचे अस्तित्व नष्ट होऊन समजा इतर राजकीय पक्ष निर्माण झाले, आणि त्यामध्ये जेनझी आले तरी बदलणार काहीच नाही, अशा अर्थाने तो प्रश्न होता. तुम्ही लिहिलेलं पटलंय, माझा एक विचार मांडला फक्त.


In reply to by कानडाऊ योगेशु

 

मी असे कुठे म्हटले आहे कि जेन-झींच्या येण्याने सुराज्य (भ्रष्टाचार मुक्त,सुबत्त इ इ.) येईल ते? जेन-झी मधुनही जे नेते/पुढारी येतील ते ही संधीसाधुच असतील.माझ्या म्हणण्याचा उद्देश हा आहे कि राजकारणाची दिशा बदलत आहे आणि जर सध्याच्या स्थापित पक्षांनी स्वत:ला त्याप्रमाणे जुळवुन नाही घेतले तर ते राजकारणातुन हद्दपार होतील.  

 

https://youtu.be/VKUoijYReGA?si=HakB0yMgBC_qArq3

जेन झी युवक कशी विचार करते आणि नुसता विचार करून थांबत नाही ते विचार अमलात आणून समाजाचाही विचार कसा करतात ते ह्या व्हीडीओ मध्ये बघायला मिळते. त्यांची तळमळ बघता ते भ्रष्टाचाराचा मार्ग स्वीकारतील का हा प्रश्न का पडावा ?  आपण जसा विचार करतो तसाच ते करतील असे आपल्याला का वाटावे? ते आपल्यापेक्षा कैक प्रकाशवर्ष पूढे आहेत.

अशा युवकांकडे कोणता राजकीया नेता जातो हे सध्या बाजूल ठेवा.   


In reply to by आग्या१९९०

जेन झी युवक कशी विचार करते आणि नुसता विचार करून थांबत नाही ते विचार अमलात आणून समाजाचाही विचार कसा करतात ते ह्या व्हीडीओ मध्ये बघायला मिळते. त्यांची तळमळ बघता ते भ्रष्टाचाराचा मार्ग स्वीकारतील का हा प्रश्न का पडावा ?  आपण जसा विचार करतो तसाच ते करतील असे आपल्याला का वाटावे? ते आपल्यापेक्षा कैक प्रकाशवर्ष पूढे आहेत.

तसे नसावे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही सत्तेत आलेल्या नेत्यांकडुन अशाच अपेक्षा होत्या व काही नेतेही अश्याच स्वप्निल विचारांचे होते.जे.पींच्या जनाआंदोलन चळवळीनंतर आलेल्या सरकारकडुन पुन्हा ह्याच अपेक्षा ठेवल्या गेल्या होत्या. डिट्टो विथ अण्णा केजरीवाल. प्रत्येकवेळी प्रचंड भ्रमनिरास झालेला आहे. जेन-झी कडुन तशी अपेक्षा करणे मूर्खपणाचे आहे. (विडिओत राहुल गांधी दिसले आणि तिथेच फाऊल झालाय.)


In reply to by कानडाऊ योगेशु

विडिओत राहुल गांधी दिसले आणि तिथेच फाऊल झालाय

 ज्याकडे दुर्लक्ष करावे असे मी म्हटले तेच तुम्हाला  महत्वाचे वाटले.  असो .

एकंदरीत जेनझीला तुम्ही चांगले ओळखले आहे आणि त्यांच्याकडे जाणारी राजकीय व्यक्ती हि कधीच आपले विचार बदलू शकणार नाही ह्यावर तुम्ही ठाम आहात .  

बसा बैलाचे दूध काढत .

 

 

 

 


In reply to by आग्या१९९०

त्यांच्याकडे जाणारी राजकीय व्यक्ती हि कधीच आपले विचार बदलू शकणार नाही ह्यावर तुम्ही ठाम आहात .

राहुल गांधींबद्दल मला विश्वासार्हता नाही. तिथे दुसरी कुणी राजकीय व्यक्ती असली असती तरे माझे मत हेच राहिले असते. जेन-झी साठी राजकारणात यशस्वीरित्या यायचेच असेल तर केजरीवालांप्रमाणेच नवी विट्टी नवे राज्य असा प्रकार करावा लागेल.


In reply to by कानडाऊ योगेशु

मी असे कुठे म्हटले आहे कि जेन-झींच्या येण्याने सुराज्य (भ्रष्टाचार मुक्त,सुबत्त इ इ.) येईल ते?

 

बरोबर आहे. तसे म्हणणे भाबडेपणाचे ठरेल


देशाचे भवितव्य शेवटी तरुण पिढीच्या हातात आहे. करायचे किंवा तोडायचे त्यांची जबाबदारी आहे. साधारण ७० च्या वर जी मंडळी आहे त्यांना स्वतःलाच भवितव्य नाही, त्यामुळे देशाचे हिट त्यांच्या हातातून होईल हि अपेक्षा ठेवणे मुश्किल. प्रत्येक पिढीला आपल्या पुढील पिढीवर टीका करावीशी वाटते. त्यांच्याकडून चुका होतात असे वाटते पण शेवटी हा नियम प्रत्येक पिढीला लागू होतो. एके काळचे बंडखोर काही दिवसांनी प्रस्थापित होतात आणि नवीन बंडखोर त्यांची जागा घेतात हे कालचक्र आहे.

गोबी असो वा पप्पू, ह्यांचे राजकारण कालबाह्य झाले आहे. आधुनिक सुशिक्षित जेन झी मंडळींना त्यांचे अपील नाही. त्याच वेळी आधुनिक सुशिक्षित मंडळी संख्येने कमी आहे. सध्या तरी मुख्य मतदाता हा देहाती असुसंस्कृत पद्धतीचा आहे. त्यांना फुकटच्या रेवड्या, हिंदुत्वाचे चूर्ण इत्यादी दिले तरी पुरे. जुनी बुमर मंडळी एक तर मोदी भक्तींत आंधळी आहेत तर मोदी द्वेषांत जळफळाट करणारी बुरसटलेल्या विचारांची आहेत. त्यांच्याकडून सुद्धा काही अपेक्षा नाही.Gen Z ने गोबिना धोबी पछाड मारला असला तरी हि एक चकमक आहे, खरे युद्ध शेवटी निवडणुका आहेत आणि दुर्दैवाने तिथे Gen Z चे जास्त काही चालेल असे वाटत नाही.

 


माध्यमांना फक्त सनसनाटी हवे असते त्यामुळे  बरेच दिवस  मेडियावाले  जंतरमंतरच्या रिकामंटेकड्या  लोकांचा  उकिरडा  चिवडत बसले होते.
 ह्या सगळ्या गदारोळात स्कायरूट कॉर्पोरेशनच्या  तरुण मुलांनी केलेला भीम पराक्रम झाकोळला गेला. अग्निकुल कॉर्पोरेशनची मुले पण तरुणच आहेत. इसरो मधून १२० लोकांनी resign केले हि बातमी आली  पण ४०० नवीन  कंपन्या सॅटेलाईट लाँच साठी रजिस्टर झाल्या आहेत हि बातमी झाकोळली गेली. ती काय म्हातारी माणसे आहेत का.  काल मीराबाई चानू ने २ रे कॉमनवेल्थ सुवर्णपदक मिळवले हि बातमीसुद्धा कुठेतरी कोपऱ्यात असेल. जगात काही चांगले सुरु आहे हे शोधावे  लागत कारण त्या बातमीचे ठळक  मथळे नसतात.  तसे प्रत्येकच प्रौढ पिढीत आमच्या वेळी असे नव्हते हे  म्हणण्याची पद्धत असतेच.


ञर जेन झी कोनाकडून पैसा घेवून त्याच्या इच्चेनुसार आन्दोलन करणार असतील तर त्यन्च्याबद्दल वर दर्शविलेले विचार कधीच खरे ठरणार नाहीत. 


 

जर राजकिय पक्षांनी आपली व्यवस्था येणार्या काळानुसार बदलली नाही तर त्यांचे अस्तित्वच धोक्यात येऊ शकते.किंवा असे होऊ शकते का?

ही व्यवस्था न बदलल्यानेच महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस (शप) व उबाठा गट नामशेष झाले आहेत.

 

 पवार अनेक दशके या समजुतीत आहेत की तथाकथित विचारवंत समाजाचे मन प्रभावित करून मतपरिवर्तन करतात. त्यामुळे १९९० पासून पवार सातत्याने साहित्य संमेलन, नाट्यसंमेलन  अश्या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहत होते. वृत्तपत्रांचे संपादक असलेले गोविंदराव तळवलकर, माधव गडकरी अश्यांच्या गळ्यातले ते ताईत होते. जवळपास ३०० साहित्यिक, कलाकार इ. ना त्यांनी प्रत्येकी १ लाख रूपये वाटले होते. अगदी २०२५ पर्यंत ते साहित्य संमेलनात व्यासपीठावर असायचे. अचानक बाळ ठाकरे, मोदी अशांची भेट घेऊन खळबळ माजविणे व यातून आपल्याला लाभ होईल या समजुतीत राहण्यात त्यांची हयात गेली. मोदींना भेटायला गेले की मी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांना भेटलो ही नेहमीचीच पुडी सोडायचे. भाषणात जातीय वाक्ये हळूच पेरणे, मागासवर्गीयांचा कळवळा दाखविणे, उच्चभ्रू लोकात वावरणे यातून मते मिळतात या भ्रमात शेवटपर्यंत राहिल्याने आता ते व त्यांचा पक्ष दुर्लक्षणीय अवस्थेत आहे.

 

दुसरीकडे ठाकरे पिताश्री निवडणूक प्रचाराचा कालावधी वगळता घराबाहेर पडत नव्हते. तेथूनच कार्यकर्त्यांना सांगायचे या आंदोलनात जा, रेल्वे बंद पाडा, मुंबई बंद इ. त्यांच्या काळात चालून गेले. स्वतः किंवा यांच्या कुटुंबातील कोणीह कधीही कोणत्याही आंदलनात सहभागी  झाले नाही कारण आम्ही घराबाहेर पडणार नाही, सर्व इतरांनी करायचे, आम्ही सर्वात पुढे राहन  केवळ लोणी गट्टम्  करणार ही कार्यपद्धती.  त्यांच्या चिरजिवांनी बदलत्या काळाची पाऊले न ओळखता पिताश्रींची कार्यपद्धती सुरू ठेवली जी केव्हाच कालबाह्य झाली. गेली अनेक दशके उबाठा सेनेचे तेच तेच चेहरे झळकतात कारण पक्षात आता नवीन कोणीच येत नाही. तेच प्रवक्ते, त्याच फुशारक्या, तीच घाणेरडी भाषा, खुराड्याबाहेर न येता आदेश सोडण्याची तीच कार्यपद्धती आता अजिबात चालत नाही. त्यातूनच तो पक्ष आता भंगारात गेला आहे.‌


आजच ऐकलेल्या बातमीनुसार आता 'आरक्षण हटाओ' हे नवे जेन झी आंदोलन सुरु झालेले आहे. अल्पावधीतच लाखो तरूण - तरूणी यात सामिल झालेले आहेत. 

https://www.youtube.com/live/VA6YlxOky5E?si=drMrkFltHuPaRaGl

https://www.youtube.com/live/QQ8hBRThLkk?si=p-3HpW3_97npZDdZ


In reply to by चित्रगुप्त

चित्रगुप्त काका. युट्युबच्या लिन्क एकाच युट्युबर च्या आहेत. त्यात तो जी मते मांडत आहे ती त्याची मते आहेत. कुठलाही डोके ताळ्यावर असलेला जेन-झी नेता आरक्षण,मंदीर,धर्म,संबंधित विषय इतक्यात हाताळणार नाही.


In reply to by कानडाऊ योगेशु

 'नीट' परीक्षा हा जितक्या विद्यार्थांच्या जिव्हाळ्याचा विषय असेल, त्याच्या कैक पटींनी 'आरक्षण' हा विषयाची व्याप्ती असावी असे वाटते. बघूया पुढे काय होते ते.


In reply to by चित्रगुप्त

नीट घोटाळ्याचा सरसकट सर्वच विद्यार्थ्यांचा त्रास झाला. आरक्षण घेणारे व न घेणारे ह्या दोन्ही वर्गात येणार्या सर्वच विद्यार्थ्यांचा. पण एकदा आरक्षणासंबंधित एखादी भूमिका घेतली कि सध्या जो एकसंधपणा दिसतोय जेन-झीं मध्ये तो दुभागला जाईल. आरक्षण घेणारे पण जेन-झी आहेतच आणि ते काय इतक्या सहजासहजी आरक्षण हटाव अशी भूमिका घेतील का? 


In reply to by कानडाऊ योगेशु

हे कोण बोलला बुवा ? 

 

पण जसे डी. बी. टी. वापरून सबसिडी चॅनल sanitize करण्यात आला तोच अप्रोच आरक्षणाला लावला तर हरकत काय आहे ? 

 

क्रीमी लेअर नीट enforce केल्याने उलट जे सर्वाधिक deserving आहेत त्यांना affirmative actions चा फायदाच होईल ना ?

 

आरक्षणावर चर्चा करणे म्हणजे आरक्षण हटाव मागणी करणे, ही मांडणी अन् समजच मुळात प्रॉब्लेमॅटिक आहे 


In reply to by कानडाऊ योगेशु

कुठलाही डोके ताळ्यावर असलेला जेन-झी नेता आरक्षण,मंदीर,धर्म,संबंधित विषय इतक्यात हाताळणार नाही.

 

 

मग कशाला हवेत जेन झी ? जुन्या बाटलीत नवीन दारू नकोय, बोल्डली त्या त्या प्रश्नांना पण हाताळावे लागणारच आहे. मनमोहन सिंह पंतप्रधान असताना म्हणाले होते (ऑईल बाँड इश्यू करताना) की आम्ही आजचे प्रॉब्लेम पुढच्या पिढीला देतोय, तसे परत परत नकोय.


In reply to by वृषभ खोंडे

मग कशाला हवेत जेन झी ? जुन्या बाटलीत नवीन दारू नकोय, बोल्डली त्या त्या प्रश्नांना पण हाताळावे लागणारच आहे.


 सहमत. 


In reply to by कानडाऊ योगेशु

शैक्षणिक अधोगती , सरकारी कामचुकारपणा , ऐतखाऊ प्रवृत्ती , पगार ज्यासाठी मिळतो ती कामं  न  करता अडवणूक करणे ...ह्या सगळ्या गोष्टींचे मूळ आरक्षणात आहे. पण भारतात असा कुणीही नेता / पक्ष नाही जो हे मान्य करून त्यावर काहीतरी जालीम उपाय शोधेल. त्यामुळे आरक्षण संपवणे हे पुढील ५० वर्षे  तरी एक दिवास्वप्नंच राहणार.


जेन झी ने पारंपारीक नेपोटिझम सोबत आरक्षण वगैरे चाही विचार टाकून दिला असेल तर ती खरी विचारसरणी असेल 

अनथा. ते केवळ जेन झेड ची  गोंगडी पांघरलेला जुनाच लोहिया वाद असेल.

जेन झी ला  कम्युनिझमच्या नावाखाली  शांतीप्रीय लोक त्यांच्यात ओढायचा प्रयत्न करताहेत. ते त्याला काही प्रमाणात बळी पडताहेत.


ठॉकरोच पक्षाचे भावी अध्यक्ष काल जल्लोष करीत होते.‌ जे काही घडलं त्यात यांचा सहभाग (नेहमीप्रमाणेच) शून्य, त्यातून यांना लाभ शून्य, त्या आंदोलनात यांना महत्त्व शून्य  .  .  .  मग जल्लोष कशाचा केला? 


In reply to by श्रीगुरुजी

जे काही घडलं त्यात यांचा सहभाग (नेहमीप्रमाणेच) शून्य >> हे कसे ठरवले? कारण ठाकरेंनी सभा घेतली होती, चांगलीच गर्दी होती त्यांच्या सभेला!


जेन झी ची "मुत्राही पैजासी जिंके" भाषा मला फार आवडून गेली. वा ! 

काय काय माणिकमोती ओसंडत होते !  ते ऐकूण मला

'गटारगंगा आली हो अंगणी" या गाण्याची आठवण झाली.

 

पण जंतर मंतर वर देखील पण मराठीची गळचेपी केली गेली. म्होरक्या मराठी होता तरीही सगळा हिंदीचा कारभार !

बघावा तो हिंदीत "जेनझीमुत्रभाषा" रुपी भाषालंकार ल्यायले होता. 

आतातरी इथे हिंदीला शिव्या घालणाऱ्यांनी हिंदीचा विरोध थांबवावा.  

 

तरीदेखील म्हणावेसे वाटते 

 

आता ह्या वयात उठत नाही माझे.....

.

.

मन आक्रंदून!

--

त्या अवयवाला होणारा रक्तपुरवठा मधुमेहामुळे आणि वाढत्या वयामुळे कमी झाला आहे. 

त्याला मेंदू म्हणावे की डोकं ? कळत नाही. 

 

पण एखाद्या जेनझीची शिकवणी लावावी लागेल बहुधा.

 

साधारण पणे जेनझी भाय / ब्रो लोक्स 

आपल्या वडीलांना काय नावाने हाक  मारत असतील ? 

आपल्या मेहुण्याला काय नावाने हाक मारत असेल ?

Any Guess ?? की हिंट हवी ??

उत्तरे नाही लिहिली तर बरेच !

  


डॉक्टर सुबोध खरे कुठे गायब झाले? ते सांगत होते की कॉकरॉच जनता पार्टी आंदोलन फक्त ऑनलाईन आहे, मूल रस्त्यावर उतरणार नाहीत वगैरे! आता बरे गायब झाले.