Skip to main content

लिखाणाचे नवे नियम

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 15/07/2026 11:34 या दिवशी प्रकाशित केले.

मिपावर लिखाणाचे नवे नियम काय आहेत?

धागा किती शब्दांचा, ओळींचा असावा असा काही नियम आहे का?

धाग्यात आक्षेपार्ह काहीच नसेल तरीदेखील धागा उडवण्याचे काय कारणे असतात?

एका सदस्याने किती धागे काढावेत असा काही नियम आहे का? (बेसीक गोष्ट आहे ती. मला समजते. पण नियम काय आहे?)

धागा काय कारणाने उडवला याचे कारण समजते काय?

अशा सर्व नियमांचा धागा कोठे आहे? 

एखादा सदस्य जवळचा अन दुसरा लांबचा असे आहे का?

आणखी इतर पुरक प्रश्न असतील तर त्यांचे समाधान होईल का? 


वाचने 294
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

धाग्यात आक्षेपार्ह काहीच नसेल तरीदेखील धागा उडवण्याचे काय कारणे असतात?

आक्षेपार्ह हे कोणाच्या दृष्टीने? अर्थात संपादक मंडळाच्या. त्यांना तो आक्षेपार्ह का वाटला याचे स्पष्टीकरण देण्याची सक्ती त्यांच्यावर नाही. आक्षेपार्ह वाटला किंवा नाही या व्यतिरिक्तही धागा उडवण्याचे अधिकार संपादक मंडळाला आहेत. मिपावर आक्षेपार्ह वाटणारा धागा हा अन्य संकेतस्थळांवर आक्षेपार्ह असेलच असे नाही. प्रत्येक संकेतस्थळाची एक प्रकृती असते.

उदाहरण द्यायचे झाले तर माझा जानव्याची पॉवर हा माझा धागा काही काळाने अप्रकाशित झाला.आतापर्यंत च्या माझ्या उपक्रम,मायबोली,मिसळपाव,ऐसी अक्षरे, इत्यादी लेखनमंचावर 2007 पासून मी लिहितो आहे. पण धागा अप्रकाशित व्ह्यायची ही पहिलीच वेळ आहे. जानव्याची पॉवर एवढी असेल असे मला खरोखर पुसटसे सुद्धा वाटले नव्हते. मी हा मानापमानाचा मुद्दा न मानता विषय इथे सोडून देत आहे. पण धागा अप्रकाशित करावा एवढे सामर्थ्य त्या लेखात नव्हते हे माझे मत आहे. तो धागा अप्रकाशित होण्याचा घटनाक्रम हा येथील अनेक जेष्ठ व सजग मिपाकरांना माहित आहे. संपादक मंडळाला तो अप्रकाशित करावा असे का वाटले? हे जाणून घेण्यात मला उत्सुकता नक्की आहे.कदाचित माझा मिपाकर बिल्ला क्रं २७ असल्याने संकेतस्थळाची वाटचाल मला माहित आहे या कारणामुळे ती उत्सुकता असेल.

उडालेला धागा कोणता याची उत्सुकता  ज्यांना असेल त्यांच्यासाठी जानव्याची पॉवर हा लेख मायबोलीवर वाचता येईल

 


In reply to by प्रकाश घाटपांडे

माझेही मत तुमच्यासारखेच आहे. केवळ एक महिना बाल सदस्याच्या सांगण्यावरून धागा उडवणे हे अयोग्य आहेच. ते देखील काहीच कारण न देता.

राहीला प्रश्न मी लिहीण्याचा, अन ते लेखन इतरांनी जोखण्याचा. 

ॲज अ वाचक म्हणून माझी काही वाचण्याची, ते समजण्याची कुवत असते. जर लेखकाचा प्रकृतीधर्म मला मानवला नाही, शैली मानवली नाही तर मी त्या लेखकाला दोष देणार नाही. मीच कोठेतरी कमी पडलो असे समजेन.

पण येथे मला इतर समजावत होते की अमूक तमूक ढमूक समुक यांचे लिखाण दर्जेदार आहे. माझ्या धाग्यांमुळे त्यांचे धागे खाली गेलेत वगैरे. अशा तत्वहीन चर्चेत मला सहाभागी व्हायचे नाही. माझी स्वतःची शैली आहे. मला किती प्रतिसाद आले याच्याशी काही घेणे नाही. अन मी भरपूर लिहू शकतो. अगदी दिवसाला पन्नास धागेही काढेल न काढेल. तो प्रश्न वेगळा आहे. पण मग याचे लेखन असे अन तुमच्यामुळे ते खाली गेले वगैरे सर्वथा अयोग्य आहे.

 अन एकोळी दोनोळी असा काही धागा नव्हता. चांगला मोठाच होता.

मग तोच नियम लावायचा तर मग शंभर शब्दातली कथा तरी कशाला स्पर्धा घेतात? 

मुख्य म्हणजे फोरमवर लॅंडीग पेजवरच नियम असतात. मॉडरेशन असते, वॉर्नींग असतात. मग शेवटी रीड ओन्ली, लॉग आऊट, बरेच प्रकार असतात. 

येथे डायरेक डिलीट. मला सांगितले असते तर मीच धागा डिलीट केला असता. पण तसे झाले नाही.


In reply to by पाषाणभेद

मी देखील फोरम्स, ड्रूपल वर काम केले आहे. मला माहिती आहे. 

कंटेट लिहीणारे असतील तरच फोरम चालतो. तुम्ही (तुम्ही म्हणजे कोणीही हं) उद्या वर्षभरात दोन अतिशय दर्जेदार (हे कोण ठरवणार?) कथा लिहीता अन दुसरा उठवळ (माझ्यासारखा) महिन्यात पन्नास धागे काढतो. तर प्रॉडक्षन कोणाचे जास्त अन फोरमने गृप हालता ठेवला, जास्त कंटेट निर्माण केले तर कोणाचा सन्मान केला पाहीजे? 

अन असे कोणते धागे खाली गेले आहेत? जे होते ते विकीपीडीया सारखे अन गोडबोलेंसारखे इकडून तिकडे गोळा केलेल्या माहीतीवरून लिहीलेलेच धागे होते ना? लिखीत साहित्य अगदी १००% होते का? 

काहीतरी उगाच आपलं 


मिथून चे चित्रपट दर्जेदार नव्हते (हे कोण ठरवणार) असे म्हणतात. अरे पण त्याने भरपूर पैसा कमावला. मला भले शुन्य ० प्रतिसाद मिळाले तरी मी लेखन केले आहे ना. काढा सरासरी. मी गृप हालता ठेवला. 

 

 


अन तुम्हाला (म्हणजे धागा असा अन तसाच पाहिजे अशी फुटपट्टी लावणार्यांना हं) जर त्या त्या दर्जेदार लेखनाची एवढीच काळजी आहे तर मग तुम्ही (परत वरचा कंस) तो तो धागा खाली जरी गेला तरी त्याच्या खाली नवा प्रतिसाद देऊन तुमच्या फेवरमधल्या लेखकाचा धागा वरती आणूच शकतात ना?

 

 


मला वाटते माझा जो धागा लॉक केला आहे त्यात जे लिहायचे होते ते येथे लिहीले आहे.

ज्यांना वाचायचे होते ते वाचतील.

 


अन समजा, मी लिहीलेला धागा मानूया की एकोळी होता ,( तो नव्हताच) तर मग त्या आमटीत मी पाणी टाकून आमटी अगदी १० लिटरही करू शकेन. अन ते देखील स्वतःच्या मनाने. कोणत्याही ए आय ची मदत न घेता.


संपादक मंडळाकर जो धागा ठीक वाटत नाही तो  उडवू शकता. या शिवाय दुसऱ्या  नियमांची  गरज  नाही.