Skip to main content

प्रादेशिक बातम्या अन पंप्रनांचा परदेश दौरा

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 30/06/2026 23:18 या दिवशी प्रकाशित केले.

'प्रादेशिक' (Regional) म्हणजे एखाद्या विशिष्ट प्रदेश, क्षेत्र किंवा विभागाशी संबंधित. हा शब्द सामान्यतः भौगोलिक सीमा, स्थानिक संस्कृती किंवा ठराविक क्षेत्राच्या वैशिष्ट्यांचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो.

सकाळी ७:१० वाजता आकाशवाणी पुणे केंद्रावर प्रादेशिक बातमीपत्र वाचल्या जाते. वरील व्याख्येनुसार साधारणपणे पुणे जिल्हा, विभाग किंवा महाराष्ट्र राज्यातील बातम्या असायला हव्यात हा आपला समज आहे. दुराव्याने एखादा व्यक्ती की जो महाराष्ट्राशी संबंधित आहे आणि तो इतरत्र असेल तर त्याची बातमी अपवादाने येऊ शकते हे समजू शकते.

पण पंतप्रधान मोदी परदेश दौर्यात जातात, दिल्लीत एखादा कार्यक्रम करतात, परराज्यात निवडणूकीची सभा घेतात, परराज्यात एखादे उद्घाटन करतात त्याची बातमी आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरील प्रादेशिक बातमीपत्रात - ती देखिल विस्तृत एक ते दिड मिनीटांच्या वेळात, ते देखिल त्यांच्या आवाजाच्या बाईटमध्ये कशी येऊ शकते.

प्रादेशिक बातम्या अन मोदींचा परदेश दौरा यांचा परस्पर संबंध काय?

असलाच विषय वर्तमानपत्रातील पानभर महाराष्ट्र शासनाच्या जाहिरातींचा. त्यात मुमं, उपमुमं ( हे पद संविधानिक नाही) यांच्या फोटोंबरोबर मोदी यांचा फोटो असतो. काय संबंध मोदींचा?
उदा. पंजाब राज्यातील पानभर जाहिरातीत मोदींचा फोटो नसतो. का? पंबाबमधील राज्यसरकार मोदींचे नाही म्हणून ना? मग पंतप्रधान या नात्याने पंजाब सरकारच्या जाहिरातींत मोदींचा फोटो का नसावा?

 


वाचने 461
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

मिपा अन मोदींचा परदेश दौरा यांचा परस्पर संबंध काय?

पंतप्रधान मोदी परदेश दौर्यात जातात, दिल्लीत एखादा कार्यक्रम करतात, परराज्यात निवडणूकीची सभा घेतात,  एखादे उद्घाटन करतात त्याबद्दल मिपावर मुद्दाम नवीन जिलबी सोडण्याचे प्रयोजन काय ?


In reply to by चित्रगुप्त

मोदी च्या नावाच्या ऐवजी आपण कोबीची भाजी म्हणूया. पण प्रादेशिक बातम्यांचा मुद्दा बरोबर आहे की नाही? 


जास्तीत जास्त धावा काढण्यासाठी.

 

"मोदी", शब्द धाग्यात आला की मोरू आणी मोगू यांचा क्रिकेटचा कसोटी सामना जुंपतो.  मग हार हार मोदी आणी घर घर मोदी  म्हणत  दोन्ही संघ एकमेकात तुटून पडतात.

 

ह का ना  का

 

हलकेच घ्या.

(मैदाना बाहेर चा प्रेक्षक)


In reply to by कर्नलतपस्वी

हाच धागा पप्पू या नावाने लिहीला जाऊ शकतो का? त्याच्या बातम्या प्रादेशिकमध्ये येतात का?

तसे नसेल तर आकाशवाणी पुणे ने राष्ट्रीय बातमीपत्र असा उल्लेख का केला नाही?

तसेच वर्तमानपत्रातील महाराष्ट्र शासनाच्या जाहिरातीत मोदींचा (सॉरी आपण उगाचच मोदींचे नाव घेतो आहोत) तर कोबीच्या भाजीचे काय काम आहे? 

आणि आजच्याच वर्तपत्रात पंजाब सरकारची पानभर जाहिरात आहे. मग त्यात कोबीच्या भाजीचा फोटो का नाही? नसेना का फोटो पण मग देशाच्या राष्ट्रपतींचा फोटो का नाही? 


पाभे,

पूर्वी असे प्रश्न विचारणे हे काही विशेष समजले जात नसे. आता मात्र असे प्रश्न विचारणे हेच लोकांना पचत नाही असे दिसते. बाकी ते सेशेल्स चे प्रकरण माहिती असेलच,


In reply to by स्वधर्म

दिल्लीत असे पुरस्कार विकत मिळतात. तोच प्रकार कोबीच्या भाजीने अंतरराष्ट्रीय स्तरावर केलेला दिसतो आहे. 


मिपावर पोहचवणार पाषाणवाणी.

 

अशा अनेक गोष्टींवर जिल्ब्या पडू शकतात.  टि व्ही वर काही चानेल पंक्चर  झालेल्या फुग्यात हवा भरायचा चोवीस तास प्रयत्न करत आहेत. 

 

पप्पू किंवा मोदी दोघांचेही कुणी शष्प वक्र करू शकत नाही. तरीही  काही भक् , अंधभक्   त्च्यायां बद्दल आकस ठेवून  उगाचच गरळ ओकणे, तावातावात भांडणे करतात. याचा त्या दोघांनाही गंध नसतो पण असे करणाऱ्याचा रक्तचाप मात्र  वाढतो,उगाच दुखी होतो.असो,. मला काय करायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न  आहे. 

दुखी होऊ नका एवढाच  एक मिपा सहोदर म्हणून  अनाहूत सल्ला. 

एवढे बोलून  खाली बसतो.


In reply to by कर्नलतपस्वी

मोदी अन पप्पू साठी मी कशाला दु:खी होऊ? 

पप्पूचे चे समजू शकतो. तो शांत अन चांगला असतो. पण मोदी तर खॅ खॅ खॅ, ही ही ही आहे. त्यासाठी मी माझा रक्तदाब नाही वाढवत.

पण माझा बरोबर असलेला मुद्दा मी लिहीला. काँग्रेस किंवा इतरही असते तर तरी मी लिहीले असते.

प्रश्न हा आहे की इतके अयोग्य वर्तन असूनही आहे तेच बरोबर आहे हे म्हणणे चूक आहे. 


जर जाहिरातीसाठी केंद्र सरकारचा निधी वापरला जात असेल, तर त्यात पंतप्रधानांचा फोटो असणे अनिवार्य आहे. राज्य सरकारच्या निधीतून राबवल्या जाणाऱ्या योजनांच्या बाबतीत हा फोटो लावणे ऐच्छिक असले, तरी तसे करण्यास कोणतीही कायदेशीर मनाई नाही. कर्नाटकात सर्व जाहिरातींमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे फोटो पाहायला मिळतात.
 


In reply to by कोण

अहो कोण, राज्यसरकारच्या जाहिराती बघा. कसला आलाय त्यात केंद्राचा निधी? पेपर चाळा. प्युअर राज्यसरकारी योजना आहेत त्या. कसला आलाय संबंध त्यात कोबीच्या भाजीचा? 

ते सोडा, पेट्रोल पंपावर का आहे कोबी? 

कोरोनात तर एटीएम मशीन अन अनेक ठिकाणी अन कोरोनाच्या लशीच्या प्रमाणपत्रावर कोबीचे तोंड तुम्ही पाहीले आहे ना? 

का असावे तेथे? 


In reply to by खटपट्या

फोटो नाहीच लावले तर चालणार नाही का? पंप्रंचा फोटो कोविड सर्टीफिकेटवर बघून इतर देशांतील विमानतळावर इमिग्रेशन अधिकारी गोंधळात पडत होते किंवा हसत होते. पण फोटो लावलाच पाहिजे असे का? 

अवांतर: उजव्या विचारसरणीत एक दैवत लागते (श्रध्दा) आणि एक शत्रू (द्वेष) आवश्यक असतो. हे दोन्ही नसेल तर उजव्या लोकांना आता जीवनात काय करावे काही सुचत नाही.


In reply to by स्वधर्म

स्वधर्म,

 

तुमचं वरील अवांतर वाचलं. त्यात उद्धृत केलेली उजवी विचारसरणी म्हणजे नेमकं काय? ही संज्ञा डाव्या विचारांच्या लोकांनी ठरवलेली आहे का? तसं असल्यास तिला बिगरडावी म्हणायला हवी. 

 

बाकी, उजव्याडाव्या विचारसरणींचं द्वैत जन्मास येण्याच्या खूपखूप आधीपासनं भारत नामे राष्ट्र अस्तित्वात आहे. तेव्हा जमल्यास भारतीय विचारांच्या संदर्भात उजवे व डावे या संज्ञांचं निरुपण करावं ही विनंती.

 

आ.न.,

-गा.पै.


In reply to by गामा पैलवान

डावे व उजवे या संज्ञा फ्रेंच राज्यक्रांतीनंतरच जन्माला आल्या. १७८९.
उजवे: supporters of the King, the monarchy, the Church, and traditional social hierarchy.

डावे: favored revolutionary change, greater equality, and limiting the powers of the king.

 

त्याआधी भारतात व जगातही सगळे राजकीय पक्ष उजवेच होते कारण बहुतांश राजेशाहीच होती. तशाच प्रकारची नेत्यावर दृढ निष्ठा, प्रश्न न विचारण्याची वृत्ती, सामाजिक समतेऐवजी पारंपारिक उतरंडीचा पुरस्कार इ. इ. करणारे अर्थात... ओळखा पाहू कोण?


In reply to by स्वधर्म

 

 

डाव्या विचारसरणीत एक दैवत लागते (मार्क्स) आणि एक शत्रू (धर्म) आवश्यक असतो. हे दोन्ही नसेल तर डाव्या लोकांना आता जीवनात काय करावे काही सुचत नाही.


In reply to by कांदा लिंबू

हजरजबाबी पणा आवडला. शब्दांचा खेळ म्हणून ठीक आहे, पण... त्याचा सत्याशी संबंध असेलच असे नाही. असो.

ते गापै ना जरा डावं उजवं काय ते समजाऊन सांगा. तुंमच्या संकल्पना खूपच स्पष्ट आहेत.