योग बापडा कधीच जमून आला नाही
भेट म्हणाला होता अजून आला नाही
.
जगास विसरून त्याच्या मध्ये गुंतत गेले
त्याला कळले होते कळून आला नाही
.
मनापासुनी किती काळजी माझी त्याला
कठीण घेणे निरोप म्हणून आला नाही
.
यश कीर्तीचे त्याला होते सदा वावडे
किर्ती सोबत माझ्या बघून आला नाही
.
वाट पाहणे सोड एकदा हारवल्यावर
काळ कधीही तुष्की वळून आला नाही
.
तुष्की नागपुरी
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
60
प्रतिक्रिया
1
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाह, पुनरागमनायच:
वाट पाहणे सोडले नाही , पुनारागमनायच
मंत्र मिपावर, काळ कधीच जात नाही
तुष्की तू वळून आलास......