शक्यतो सोप्या पद्धतीने मराठीत माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, पण नाईलाजास्तव बऱ्याच ठिकाणी इंग्रजी शब्द, संकल्पना वापराव्या लागत आहेत. सवयीमुळे मनातल्या मनात इंग्रजीतून मराठीत भाषांतर करावे लागले आहे पण जर एखादी गोष्ट मराठीत स्पष्ट नसेल, तर कृपया सांगावे.
सर्वप्रथम मुळात म्युच्युअल फंड म्हणजे काय ते बघू. म्युच्युअल फंड हा Pooled इन्व्हेस्टमेंटचा (Pooled investment) एक प्रकार आहे. या Pooled इन्व्हेस्टमेंट प्रकारात इतर अनेक उपप्रकार असतात. उदा. ओपन एंडेड म्युच्युअल फंड, क्लोज एंडेड म्युच्युअल फंड, युनिट इन्वेस्टमेंट ट्रस्ट (UIT), एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETF) आणि एक्सचेंज ट्रेडेड नोट्स (ETN) वगैरे. म्हणजे आपण सर्वसाधारण ज्याला म्युच्युअल फंड म्हणतो तो Pooled इन्व्हेस्टमेंट आहे.
आता बघूया Pooled इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? तर या प्रकारात अनेक गुंतवणूकदारांचे पैसे एकत्र गोळा करून म्हणजे पुलिंग टुगेदरने (pooling together) गुंतवले जातात आणि त्यासाठी एक किंवा अनेक "प्रोफेशनल इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझर" नेमलेले असतात जे "म्युच्युअल फंड मॅनेजर" म्हणून काम करतात. अर्थात ते काही फुकट काम करत नाहीत पण तुमच्या वतीने ते म्युच्युअल फंड चालवतात आणि म्युच्युअल फंडचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. वेगवेगळ्या कंपन्या ज्या एएमसी (AMC) नावाने ओळखले जातात त्या वेगवेगळे फंड्स चालवतात. आता या फंड्सचे सुद्धा अनेक प्रकार आहेत ते आपण नंतर बघूच.
साधारणतः फंडाचे उद्दिष्ट तीनपैकी एक प्रकारचे असते. पहिलं म्हणजे कॅपिटल ॲप्रिसिएशन किंवा ग्रोथ. ह्याच्यात तुमचे पैसे वाढवणे वृद्धिंगत करणे हे उद्दिष्ट असते. दुसरं म्हणजे इन्कम यात नियमित उत्पन्न (रेग्युलर ऑन गोइंग इन्कम) मिळवणे हा मुख्य उद्देश असतो. पैसे वाढले तर सोन्याहून पिवळे पण मुख्य उद्देश काय तर इन्कम मिळवणे आणि तिसरं म्हणजे कॅपिटल प्रीजर्वेशन, यात मुख्य उद्देश असतो की तुमचे पैसे सुरक्षित ठेवणे. मार्केट कंडीशन कशीही असली तरी हा मूळ उद्देश असतो, म्हणजे काय की स्टॉक/बॉण्ड मार्केट जरी खाली गेलं तरी पैसे सुरक्षित राहिले पाहिजेत. याचं एक उदाहरण द्यायचं म्हणजे मनी मार्केट फंड हे या प्रकारचे असतात.
अजून सांगायचा मुद्दा असा आहे की या प्रत्येकात अजून अनेक उपप्रकार पण असतात, जे आपण नंतर बघणारच आहोत. म्हणजे कसं? तर ग्रोथ फंडमध्ये एखादा फंड "लार्ज कॅप ग्रोथ फंड" असू शकतो, एखादा फक्त "स्मॉल कॅप ग्रोथ फंड" असू शकतो. एखादा फंड फक्त डोमेस्टिक स्टॉक घेतो तर एखादा फंड इंटरनॅशनल किंवा इमर्जिंग मार्केटचे स्टॉक्स पण घेतो वगैरे. वगैरे. त्याचप्रमाणे इन्कम म्युच्युअल फंड मध्ये पण अनेक उपप्रकार असतात, ज्याच्यात बॉण्ड ची क्वालिटी आणि ड्यूरेशन बघितलं जातं. म्हणजे ज्याच्यात कसं एखादा फंड फक्त "इंटरमीडिएट टर्म बॉण्ड"मध्येच गुंतवणूक करतो तर दुसरा एखादा फंड "लॉंग टर्म बॉण्ड"मध्ये गुंतवणूक करतो. एखादा फंड या व्यतिरिक्त ठरवू शकतो की आम्ही इंटरनॅशनल बॉण्डसुद्धा घेऊ किंवा आम्ही "डिव्हिडंट इक्विटी" (म्हणजे Dividend paying stocks) पण घेऊ वगैरे. वगैरे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ढोबळमानाने फंड त्याच्या उद्दिष्टाप्रमाणे "इक्विटी म्युच्युअल फंड" असू शकतो किंवा नुसता "बॉण्ड फंड" असू शकतो किंवा कधी कधी इक्विटी आणि बॉण्ड दोन्ही घेणारा असू शकतो, तर हे जे दोन्ही इक्विटी आणि बॉण्ड घेतात, त्यांना साधारणपणे "हायब्रीड फंड" म्हणतात. अर्थात इक्विटी आणि बॉण्डची टक्केवारी प्रत्येक म्युच्युअल फंडानुसार बदलू शकते.
पण बहुतेक म्युच्युअल फंडामध्ये साधारणत: पुढील गोष्टी गुंतवणूकदारांसाठी दिलेल्याच असतात. पहिली गोष्ट म्हणजे ऑटोमॅटिक इन्व्हेस्टमेंट ऑफ डिव्हीडंड अँड कॅपिटल गेन डिस्ट्रीब्यूशन: म्हणजे काय तर ह्याच्यात जो डिव्हीडंड मिळतो किंवा कॅपिटल गेन होतो तो गुंतवणूकदारांना दिला जातो आणि त्याची नवीन युनिट्स मध्ये पुन:गुंतवणूक (reinvestment) केली जाते. दुसरं म्हणजे ऑटोमॅटिक एडिशनल इन्व्हेस्टमेंट फ्रॉम बँक, या प्रकारात ठराविक कालावधीनुसार म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली जाते. ह्याला एसआयपी (SIP) असं पण म्हणतात. तिसरा प्रकार म्हणजे एक्सचेंज प्रीविलेज टू मनी फ्रॉम वन फंड टू द अदर फंड managed बाय सेम इन्वेस्टमेंट कंपनी. ह्याला एसटीपी (STP) असं पण म्हणतात. चौथा प्रकार आहे सिस्टिमॅटिक विड्रॉल प्लॅन एस डब्ल्यू पी (SWP). त्याच्यामध्ये काय आहे की ऑटोमॅटिक redemption केलं जातं, म्हणजे ठराविक कालावधीने युनिट्स विकून ते पैसे बँकेत जमा केले जातात. मुख्य करून जे निवृत्त लोक झाले त्यांना हा प्रकार उपयोगी पडू शकतो. पाचवा प्रकार आहे कस्टमर सर्विस दिली जाते, ज्याच्यात मग टोल फ्री नंबर दिला जातो, इंटरनेटवर माहिती असते, फोन ऍप/वेबसाईट डेव्हलप केलेली असते वगैरे आणि सहावा फायदा म्हणजे डिटेल्ड रेकॉर्ड कीपिंग जे म्युच्युअल फंड कंपनी करते.
आता तुमच्या मनात विचार येणं साहजिक आहे की याच्यात विशेष काय? म्युच्युअल फंड इतकी फी घेतात म्हणजे लोड (exit load) घेतात, एक्सपेन्स रेशो (TER - Total Expense Ratio) असतो, ज्याच्यामुळे दरवर्षी फी घेतली जाते. त्यापेक्षा मी स्वतःच स्टॉक किंवा बॉण्ड घेऊन गुंतवणूक करेन. मी कशाला कोणाला पैसे देऊ आणि माझे स्वतःचेच पैसे सांभाळायचे आहेत तर मी का नाही करू शकतं? तर तुम्ही म्हणताय तो विचार काही अगदी चुकीचा नाहीये. वॉरन बफे पण त्यांचे स्वतःचे पैसे स्वतःच मॅनेज करतात.
पण या प्रकारात काहीकाही गोष्टी आपण बघायला पाहिजेत की म्युच्युअल फंडचे फायदे काय आहेत? तर पहिला फायदा म्हणजे प्रोफेशनल मॅनेजमेंट मिळते. आता काय आहे की प्रत्येकाला स्वतःचे पैसे नीट सांभाळायला आणि ते पैसे गुंतवून वाढवायला वेळ नसतो, कधी कधी आवडपण नसते किंवा तेवढं शिक्षण झालेलं नाहीये किंवा जमत नाहीये असं पण म्हणू शकतो. तर मग अशावेळी काय करतात लोकं? ते विचार करतात की कोणीतरी चांगली भरवशाची कंपनी घेतो मी उदा. एचडीएफसी, टाटा वगैरे आणि ते लोक म्युच्युअल फंड मॅनेज करत आहेत तर मग मी कशाला स्वतः काम करू? ते त्यांच्यावरती सोपवून टाकतो तर हा एक उद्देश असतो.
दुसरा म्हणजे डायव्हर्सिफिकेशन (diversification) दुसरा फायदा असा मिळतो की त्यामुळे आपल्याला डायव्हर्सिफिकेशन मिळतं म्हणजे आता आपण समजा इंडिव्हिज्युअल स्टॉक मध्ये पैसे टाकायला गेलो तर आपण फार फार तर पंधरा-वीस-पंचवीस स्टॉक्समध्ये पैसे गुंतवू कारण की आपल्याला तेवढा वेळ पण नसतो, अभ्यास नसतो पण फंड मध्ये पैसे टाकले की त्याच्यामुळे आपल्याला बऱ्याचशा स्टॉक मध्ये पैसे गुंतवले जातात कारण फंड मॅनेजर ते काम करत असतो आपल्या वतीने आणि शिवाय तो योग्य तो बदल करतो की मार्केट वरती गेले, खाली गेले की. त्याप्रमाणे काही लोकांना ते आवडतं. शिवाय मानसिक ताण जो होतो हे सगळं पैसे मॅनेज करायचा तो काहींना नको असतो. मार्केट कंडीशनप्रमाणे फंड मॅनेज होतो आहे ते काही जणांना बरं वाटतं म्हणून मग ते म्युचल फंड जास्त आवडतो त्यांना. शिवाय एक आशा असते की आपला फंड मॅनेजर खूप भारी आहे आणि तो नेहमी आपल्याला स्टॉक मार्केटपेक्षा जास्त फायदा मिळवून देईल.
तिसरा फायदा असा आहे की लो मिनीमम इन्वेस्टमेंट. याच्यामध्ये एखादा सामान्य माणूसपण फक्त 100, 500, हजार रुपये एवढी कमी रकमेची पण गुंतवणूक करू शकतो. त्यामुळे जे लोक गरीब आहेत त्यांना ही एसआयपी सोयीची वाटते.
आता आपण हे फायदे बघितले पण सगळेच काही अगदी छान छान नसतं. त्यामुळे आता बघूया की म्युच्युअल फंडाचे तोटे किंवा लिमिटेशन काय आहेत?
तर पहिला तोटा म्हणजे टॅक्स inefficiency. सर्वसाधारणपणे इंडिविज्युअल स्टॉकपेक्षा म्युच्युअल फंड हे टॅक्स इनफिशियंट असतात म्हणजे एखादा फंड स्पेसिफिकली टॅक्स managed असेल तर गोष्ट वेगळी, पण एरवी काय होतं कारण म्हणजे सगळे डिव्हीडंड आणि फायदा (gains) आणि तोटा (losses) हे गुंतवणूकदाराकडे पाठवले जातात, pass-on होतात आणि त्याच्यावर आपला काहीही कंट्रोल नसतो. मग म्युच्युअल फंडाकडून हे जे पैसे आपल्याकडे येतात, त्याला फंड डिस्ट्रीब्यूशन म्हणतात काही काही म्युच्युअल फंड मॅनेजर मुद्दामहून हाय-टर्नओव्हर करतात ज्यामुळे आपला उगीचच शॉर्ट टर्म कॅपिटल गेन तयार होऊन ते आपल्या गळ्यात पडतात, ज्याच्यावर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो म्हणजे जास्त दराने टॅक्स भरावा लागतो. आता हेच जर आपण इंडिव्हिज्युअल स्टॉक मध्ये स्वतः गुंतवणूक केली तर आपण स्वतः टॅक्स जरा जास्त चांगल्या प्रकारे मॅनेज करू शकतो. हा एक म्युच्युअल फंडचा म्हटलं तर तोटा आहे.
दुसरा तोटा म्हणजे herd effect. आता समजा स्टॉक मार्केट कोसळलं आणि लोकांनी घाबरून पटापट पैसे काढायला सुरुवात केली तर म्युच्युअल फंड मॅनेजरला इच्छा नसतानाही स्टॉक्स कमी किमतीत विकावे लागतात. Redemption साठी तुमच्या वैयक्तिक खात्यात तुम्ही कदाचित तसं केलं नसतं. स्टॉक मार्केट पडलं तरी तुमची रिस्क घेण्याची कॅपॅसिटी जास्त असेल तर तुम्ही अनावश्यक स्टॉक विकून विकले नसते कदाचित. या अनावश्यक रिडमशनमुळे कॅपिटल गेन्स टॅक्सचा फटका इतर सर्व गुंतवणूकदारांना बसू शकतो ज्यांनी त्याच म्युच्युअल फंड मध्ये पैसे गुंतवलेत. तर हा एक तोटा आहे.
तिसरा तोटा म्हणजे म्युच्युअल फंड युनिटची किंमत म्हणजे म्युच्युअल फंडचे जे Net Asset Value (NAV) आहे, ते स्टॉक मार्केट बंद झाल्यावर ठरवलं जातं म्हणजे दिवसात एकदा, त्यामुळे होतं काय की नक्की काय किमतीला म्युच्युअल फंड मिळणार ते आधीच माहित नसतं. समजा मार्केटमध्ये volatility (चढउतार) कमी असेल तर त्यामुळे फारसा फरक पडत नाही. पण जर मार्केट दिवसभरात खूपच चढउतार होत असेल तर मग अशावेळी मार्केट बंद होण्याच्या थोडा वेळ आधी म्युच्युअल फंड घ्यावेत किंवा नाही तर सरळ ETF घ्यावेत ज्याची किंमत दिवसभरात स्टॉकप्रमाणे बदलत असते.
चौथा आणि फार महत्त्वाचा तोटा म्हणजे एक्स्पेन्सेस. हा सगळ्यात महत्त्वाचा आणि बारकाईने लक्ष देण्याचा मुद्दा आहे दुर्दैवाने बरेच जण इकडे लक्ष देत नाहीत किंवा लक्ष दिले तरी त्याला फार महत्त्वाचे समजत नाहीत.
(क्रमशः)
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
मिसळपाव
प्रतिक्रिया
mutual fund - growth हा…
mutual fund - growth हा पर्याय घेतला तर कॅपिटल गेन / हर्ड इफेक्ट वगैरे वर तुमचा कंट्रोल असतो ...
तसेच मार्केट बंद होण्याच्या थोडा वेळ आधी म्युच्युअल फंड घ्यावेत हे फारसे पटत नाही ... दिवसभरात कधीही घेतले तरी तीच NAV मिळणार
तसेच mutual fund (equity base) शक्यतो lumpsum घेऊ नयेत ... SIP किंवा STP वापरावे ..
म्युच्युअल फंड…
In reply to mutual fund - growth हा… by अमर विश्वास
म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्यूशनवर गुंतवणूकदाराचा कंट्रोल नसतो. त्यामुळे एकदम भरमसाट कॅपिटल गेन डिस्ट्रीब्यूट झाला तर टॅक्स भरावा लागू शकतो. भारतात हा प्रकार अजून झाला नसला तरी अमेरिकेत असे झाले आहे, हे माझ्या लक्षात आहे. संदर्भ मिळाला तर देतो.
NAV तीच मिळेल हे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. पण समजा दिवसभरात २% volatility असेल तर मार्केट बंद होण्यापूर्वी थोडीफार कल्पना येईल, असे म्हणायचे होते. हे थोडेफार मार्केट टायमिंग झाले. (अर्थात long term याने फारसा फरक पडू नये.) म्युच्युअल फंड ला limit order नसते, हे सांगायचा प्रयत्न फसला.
mutual fund (equity base) शक्यतो lumpsum घेऊ नयेत, असे सरसकट म्हणता येणार नाही. ते खूपसे गुंतवणूकदारांच्या रिस्क tolerance, investment timeframe आणि मार्केट परिस्थितीवर अवलंबून असते. <a target="_blank" href="https://investor.vanguard.com/investor-resources-education/online-tradi…">संदर्भ १</a>
<a target="_blank" href="https://www.morganstanley.com/articles/dollar-cost-averaging-lump-sum-i…" >संदर्भ २</a>
कॅपिटल गेन / हर्ड इफेक्ट वगैरे वर तुमचा कंट्रोल नसतो
In reply to mutual fund - growth हा… by अमर विश्वास
not having control over the timing or size of capital gains distributions with mutual funds can leave investors frustrated.
संदर्भ
समजा एक्सपेंस रेशो १ टक्का…
समजा एक्सपेंस रेशो १ टक्का आहे मी १ लाख गुंतवलेत, पुढील वर्षी ते १.५ लाख झाले, तर मला एक्सपेंस रेढो मूळ गुंतवणुकीच्या १ टक्का म्हसने १००० लागतील की गुंतवणूक + नफा ह्यासह १५००??
सध्याच्या किमतीवर
In reply to समजा एक्सपेंस रेशो १ टक्का… by अमरेंद्र बाहुबली
सध्याच्या किमतीवर म्हणजे १.५ लाखावर १%.