Skip to main content

धोकादायक चायनीज खाणे

लेखक ताजे प्रेत यांनी मंगळवार, 09/06/2026 12:49 या दिवशी प्रकाशित केले.

इंजिनिअरिंग मध्ये नोबेल मिळालेला प्रुशिया येथील महान शास्त्रद्न्य १८६५ मध्ये चीन मध्ये जाऊन चायनीज खाण्यावर संशोधन करत होता 
त्याने गेल्या जाही शे वर्षांचा अभ्यास करून सिद्ध केले कि शेकडो वर्षा पासून चीन मधील जे मरण पावले ते लोक चायनीज खाऊन मेले.
त्याने सांगितले कि त्याच्या आसपास जे चीनमधील चिनी लोक चायनीज खात होते ते मरणार आहेत, जे खरे ठरले

उन्मादी मानसिकतेचे भांडवलशाही वादी भारतीय हे कधी समजणार कि चायनीज खाणे धोकादायक आहे ?
 


वाचने 1312
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

धक्कादायक... आणि शंभर टक्के अचूक ठरलेले भाकीत..

बाकी आमच्या भारतीय चायनीज फूडचा (पनीर ट्रिपल शेझवान किंवा शेर्पा राईस अंडा मारके वगैरे) चीनशी दूरान्वयाने देखील संबंध नसल्याने आम्ही बिंधास आहोत..


साखर खावी पण भय्या लोकांना चीनी खाणे घातक ठरते असे आजच केलेल्या संशोधनानंतर सिद्ध झाले आहे.


माझ्याकडे चिनी गुलाब आहे त्याचा उन्मादी मानसिकतेचे भांडवलशाही वादी भारतीयांना काही धोका नाही ना??


"अमेरिकन चॉप स्वे (अथवा सुए)" हा "चायनीज" पदार्थ अमेरिका आणि चीन या दोन्ही देशात मिळत नाही, फक्त भारतात सर्रास मिळतो. 😃    


In reply to by शेखरमोघे

मग? म्हैसूरमध्ये लॅटरी म्हैसूरडोसा कुठे मिळतो?


अहमदाबाद मधे मी ग्वाल्हेर दोसा खाल्ला.

ग्वाल्लेर मधे दोसा या पदार्थाचा उगम आहे हे  नव्यानेच समजले 


असे बरेच काही पाहीले आहे. पण त्याचा ईथे संबंध नसावा. रच्याकने माझ्याकडे चिनी मातीची भांडी आहेत आणि कुलाब्याच्या चिनी चांभाराकडुन शिवुन आणलेला बूट पण. त्याचा उन्मादी मानसिकतेचे भांडवलशाही वादी भारतीयांना काही धोका नाही ना??


माझे मत असे आहे की झालेले मृत्यू चीन सरकारने दडवलेले असतील. प्रसिद्ध आकडेवारीपेक्षा ते अधिकच असतील.

 

भारतात तर आकडेवारीतच घोळ झाला असता. 

 

तसेच चीनी पदार्थ त्याकाळी कसे असतील?  चव काय असेल?  


चिनीमातीच्या कपबशीतून किंवा बोन चायनाच्या कपातून चहा प्यालो तर तो चीन ला पाठिंबा समजला जातो का?


In reply to by हणमंतअण्णा शंक…

जोशी . काशीकर , शिळीमकर ,  पळशीकर, काशीद , दिवशीकर या आडनावांबाबत काय म्हणायचे मग?


अत्यंत धक्कादायक संशोधन !

एक जुनी गोष्ट आठवते. काही वर्षे मागे बॉस्निया मध्ये एक दिवस अचानक ६ मुले जी एकमेकांना विशेष ओळखत सुद्धा नव्हती ती एका टेकडीच्या दिशेने पळू लागली. असंख्य लोकांनी हे पहिले आणि त्यावेळी म्हणे सूर्य सुद्धा अचानक गिरक्या घेऊ लागला आणि पांढरा पडला. सर्व लोकांना दूर टेकडीवर एक आकृती दिसली आणि ह्या सहा मुलांनी त्याच्या पुढे गुढगे टेकले. सहाही लहान मुले खाली अली तेंव्हा त्यांनी विशद केले कि त्यांना साक्षांत माता मेरी ने दर्शन दिले आणि काही काम दिले आणि दररोज ६:४० वाजता माता मेरी त्यांना दर्शन देईल. त्याकाळी बॉस्निया मध्ये साम्यवादी होते. त्यांनी ह्या मुलांचा छळ (!) केला. आईवडिलांना त्रास दिला पण हि लहान मुले काही बधली नाहीत. उलट दर दिवस ६:४० वाजता त्यांना आज सुद्धा म्हणे मदर मेरी दर्शन देते. त्यांच्या गावांत प्रचंड लोक जमतात. सध्या हा गाव म्हणजे एक माता मेरी चे डिस्नेलँड झाले आहे.

 

 


काय घोर लागलाय माझ्या जिवास हे संशोधन वाचून. दोन दिवस कस्सला अस्वस्थ होतो. मग लक्षांत आलं की मागल्या दुष्काळांत चिनी लोकं चायनीज न खाता मेले. तेव्हा कुठे जीव भांड्यात पडला.

-गा.पै.