चीन हा देश आपल्या देशासारखाच अनेक हजार वर्षांची परंपरा असलेला देश आहे . एकेकाळी या देशाची ओळख पाश्चिमात्यांना रेशीम आणि कषायपेयाचा (म्हणजेच चहाचा) देश अशी होती. ५०० वर्षांपूर्वीपर्यंत या देशातील रेशीम आणि इतर अनेक पदार्थ वाळवंट, डोंगर, दऱ्या, समुद्र अशा हजारो मैलांचा प्रवास करून युरोप खंडात पोचताना वाटेवरच्या अनेक ठिकाणच्या व्यापाऱ्यांना धनवान करत आणखी अनेकांनाही या व्यापारांत हजारभर वर्षे आकर्षित करत होते. कागद तयार करणे, छपाई, बंदुकीची दारू, होकायंत्र अशा अनेक उपयोगी (आणि ज्यातून नंतर जगात प्रचंड उलथापालथ घडली अशा) वस्तूंचा प्रथम शोध लावण्याचे श्रेय चीनला जाते.
अनेक काळ "जगातील सर्वात मोठ्या लोकसंख्येचा देश" हे बिरुद मिळवलेल्या या देशातील ऐतिहासिक घटनांबद्दल लिहिण्यासारखे बरेच तर आहेच पण हा देश हल्ली काही काळ अनेक क्षेत्रांत अमेरिका आणि युरोपीय देश यांच्याशीही टक्कर देऊ पहात असल्याने (फक्त) एका लेखात हे गुंडाळण्यासारखे होणार नाही.
या देशाच्या इतिहासात ४ जून १९८९ ला एक मोठीच उलथापालथ झाली. त्याबद्दल ४ जूनच्या सुमारास "आजच्या दिवसाचे इतिहासातील महत्व" अशासारख्या पद्धतीने, प्रथम सांगेन आणि मग कांही हजार वर्षांच्या त्या देशाच्या इतिहासांतील महत्वाची पाने, प्रकरणे, कथानके, व्यक्ती आणि इतर बरेच पुढील एकेका भागांत.
असे थोडेसेच "कांही सुरवातीचे शब्द" अशी संक्षिप्त सुरवात केल्यावर नंतर एकेक हप्ता जरा लंबाचवडा झाला तर ते कदाचित खपून जाईल.
(चीन:रेशीमगाठी आणि कषायपेयाचा देश - भाग २, लौकरच येणार)
वाचने
84
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
एका अनोख्या, रहस्यमय,…
एका अनोख्या, रहस्यमय, बंदिस्त देशाच्या शोधयात्रेची सुरेख सुरुवात.
जे दोन्हीही....
चीनी आणी चीनी (साखर) दोन्ही पण भारतीयांसाठी धोकादायक आहेत यांच्या पासून सावध रहायला हवे.
अवांतर-आपले लेख नेहमीच भावतात. पुभाप्र.
लवकर येऊ द्यात.
उत्सुकतेचा विषय ... भरघोस…
उत्सुकतेचा विषय ...
भरघोस वाचायला मिळणार ही खात्री !
लेखमालेच्या प्रतिक्षेत ! शुभेच्छा !