प्रख्यात कविवर्य मा. श्री. संदीप खरे ह्यांची क्षमा मागून आणि त्यांच्या गाजलेल्या एका गीताचे विडंबन काही गांजलेल्या आणि अर्थात दमलेल्या बाबांसाठी सादर करीत आहे.
गंडलेल्या पॉपॉची कहाणी
घामेजून त्रासलेली एक देशी राणी
काळवंडले तोंड, डोळा संपलेले पाणी
रोजचेच आहे सारे काही आज नाही
पीसी(१) कशी घेऊ पोरी मला तोंड नाही
घडलोय मी फार वेगळ्या मुशीत
कळले नाही तरी पण येशील खुशीत
सांगायाची आहे माझ्या एप्रिल्च्या फुला
गंडलेल्या पॉपॉची कहाणी तुला
ना ना ना ना नाऽऽऽऽऽऽऽऽ ना ना ना ना नाऽऽऽऽ
होर्मुझाच्या खाडीमध्ये युध्द झाले भारी
नटूथटू राजा करी इझ्रेलाची वारी
मंकी बात करताना राजा गोड बोले
पारसाच्या राजास्तव रडू घाले मोले
जमलेच नाही त्यांना तेल देणे जरी
पेटवीन गोबर ग्यासा मग घरोघरी
एआयची रिले टाकू सुत्रांना पेरी
खऱ्याखुऱ्या बातमीला अंजू (२)तोंड फेरी
विसरीन हल्ल्यामध्ये मेलेल्या मुला
गंडलेल्या पॉपॉची कहाणी तुला
ना ना ना ना नाऽऽऽऽऽऽऽऽ ना ना ना ना नाऽऽऽऽ
व्होटरांची नावे खोडी ग्यानेश बसून
यमाच्याच नावे जणू सगळे ससून
संस्था आणी सत्तेचा माज हा बघून
एक एक राज्य येते हळूच विझून
अशावेळी काय सांगू कसे कसे खोटे
गौतमाला(३) द्यायचे कसे किती वाटे
वाटते की उडोनिया तुझ्या पास यावे
मित्रो मित्रो संबोधून उगा बडबडावे
उगीचच हसावे आणि खेटावे सर्वाशी
खीखी करुनिया दाखवीन मिजाशी
इन्स्टावर फेबुवर टायपीशी काही
भक्तुल्यांना चाळीस पैसे पुरणार नाही
रॅलीमध्ये, सभेमधे दिसतील काही
घरी नाही खाया म्हणू पाठविते आई
तरीसुध्दा माईकपुढे आव आणू असा
अर्थशास्त्र शिकवीन गुपचूप बसा
व्हाटसापवरच्या(४) ग्रॅज्युएट मुला
गंडलेल्या पॉपॉची कहाणी तुला
ना ना ना ना नाऽऽऽऽऽऽऽऽ ना ना ना ना नाऽऽऽऽ
रिकाम्या त्या हातांना काम काही नाही
आयटीसेल पुरवील खाद्य काही काही
कुजबुजी करायला येशील न अशी
देशाच्या भल्यापेक्षा मोठी माझी खुषी
टोपी माझी दिसते कशी बघ बाळा काही
फुटका पैसा जरी का तुझ्या पास नाही
चहा पकोडा आणि डेटा देतो मी तुला
न्हेरुपेक्षा ज्यादा जीबी पुरवेन तुला ऽऽऽऽऽऽऽऽऽ
पाकपुढे वाघ होई तात्या (५) पुढे बुळा
शीचा(६) विषय येता माइक होई लुळा
मिटिंगा त्या चालु असता नाही जात शूला(७)
गंडलेल्या पॉपॉची कहाणी तुला
ना ना ना ना नाऽऽऽऽऽऽऽऽ ना ना ना ना नाऽऽऽऽ (२)
घरामधून कामे होती बस तू घरात
आणि हजारो कोटीच्या विमानातून हलविन मी हात
सोन्यामागे नको धावू वेडा का तू बाबा
मित्रांना देऊ आपण जंगलांचा ताबा
नेत्यांच्या त्या मिठ्यामधे खिदळायचं पैलं
वर्ल्ड टूर झाली तीनदा नेपाळ राहिलं
असा गेलो आहे बाळा रोड शो फिरवून
बुलेटप्रुफ गाडीमागे हात ते हलवून
असा कसा पॉपॉ राम लेकरांना देतो
परदेशी जातो आणि मयताला येतो
आयुष्य गेले तुझे केव्हाच निसटून
दिले मतही नसे आता मशीनीमधून
जरी येते दुनियेला माझ्यावरी हसे
नजरेत तुझ्या काही वेगळेच दिसे
तुझ्या जगातून पॉपॉ हरवेल का गं
मेल्यावरी पॉपॉ तुला आठवेल का गं
चितेवरी जाता-जाता विसाव्या मध्ये
पॉपॉसाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये….
ना ना ना ना नाऽऽऽऽऽऽऽऽ ना ना ना ना नाऽऽऽऽ
ना ना ना ना नाऽऽऽऽऽऽऽऽ ना ना ना ना नाऽऽऽऽ
कठीण शब्दांचे अर्थ
(१) पीसी : काहीजण ह्याला पत्र्कारपरिषद, प्रेस कॉन्फरन्स असे काहीसे म्हणतात पण तसे काही नसते.
(२) अंजू: अंजना मुमताज नामक एका नाममात्र सेक्युलर अभिनेत्रीचा नामपूर्वार्ध
(३) गौतम : एक ऋषीनाम. त्यांना सुर्य, पर्यावरण, जंगल अतिशय प्रिय असे.
(४) व्हाटसाप : सांप्रतकालीन एक विद्यापीठ, लोखंडी कुत्रे पाळणाऱ्या विद्यापीठांचे मातृविद्यापीठ.
(५) तात्या : तुझ्या शेतातल्या बुजगावण्यामुळे माझ्या शेतात पाखरं येत नाहीत म्हणून दुसऱ्याचा बांधावर जाऊन भांडणारा रांगडा शेतकरी.
(६) शी : नाव आणि डोळे लहान पण मूर्ती, किर्ती, व्यापार आणि देश महान असा मनुष्य.
(७) शू : अठरा तासात साधारण तीन ते चारवेळा करण्याची कृती.
| लेखनविषय: |
|---|
मिसळपाव
प्रतिक्रिया
खिक्क! जमलीय!🤣गंडलेल्या…
खिक्क! जमलीय!🤣
गंडलेल्या पॉपॉची कहाणी तुला
ना ना ना ना नाऽऽऽऽऽऽऽऽ ना ना ना ना नाऽऽऽऽ ……🤣
धन्यवाद
In reply to खिक्क! जमलीय!🤣गंडलेल्या… by अमरेंद्र बाहुबली
धन्यवाद अमरेन्द्र बाहुबली
जबराट
एका सुरियाचा(गायिक , अभिनेत्री) पहिल्यापासूनच पंखा होतो त्यात दुसर्या सुरियाची भर पडली.
हलकेच घ्या.
अशा जर कवितेच्या जिल्ब्या पडत राहील्या तर "कवीता", ला अच्छे दिन जरूर येणार.
धन्यवाद
In reply to जबराट by कर्नलतपस्वी
धन्यवाद कर्नलतपस्वी
तिसरा (नॉट री) सुरिया आहे त्याचा मी फॅन आहे.
तमिळ अभिनेता सुरिया शिवकुमार
उच्चारी सुर्या आहे पण स्पेलिंग नुसार आयडी सुरिया झाला.
डूआयडी
;)
डूआयडी
पण प्रतिभावेष्टन =))
सॉलीड मारा
ह ह पु वा...
पण... पण... ते मो. भ. येतील तेंव्हा तयार रहा.
ह्या ह्या जमली आहे मस्त
ह्या ह्या
जमली आहे मस्त