Skip to main content

अचानक ठरलेला पुणे गोंदवले पुणे... पुन्हा एकदा सायकल प्रवास...पण तिच्यासाठी..

लेखक Abhay Khatavkar यांनी शनिवार, 02/05/2026 13:51 या दिवशी प्रकाशित केले.

अचानक ठरलेला पुणे  गोंदवले  पुणे... पुन्हा एकदा सायकल 🚲️प्रवास...पण तिच्यासाठी..

 

२३ जानेवारी २०२६ रोजी पुणेग्रँड टुरची सायकल स्पर्धा बघून दुपारी ३ वाजता घरी आल्यावर, सायंकाळी ५ वाजता अचानक बायको म्हणाली २४ आणि २५ जानेवारी सुट्टी आहे तर चला गोंदवले  सायकल राईड करू.... (याआधी एका ग्रुप सोबतपुणे तुळजापूर अक्कलकोट ठरलेला असा सायकल प्रवासकाही वैयक्तिक कारणाने रद्द केला होता) ....मी तिला म्हणले, जाऊन येऊन कमीत कमी ३५०होतील..तर ती म्हणाली, होऊ दे..मी तयारआहे..... झालं मग काय.. लागा तयारीला . आता पर्यंत तिने कधीच पहिल्या दिवशी मोठी राईड करून दुसऱ्या दिवशी १००+ किमी सायकल राईड केलेली नाही, आता ही वेळआली होती. माझ्याकडं सायकल carrier बॅग नसल्याने आमचे सायकल मित्र श्री बालाजी जगताप यांच्या कडून सायकल बॅग आणल्या आणि त्यात दोघांचे २ दिवसाचे कपडे भरून ठेवले... तिला सांगितले जर पहाटे जाग आली आणि जायची इच्छा झाली तर जायचे...नाहीतर नाही 

 

२४ जानेवारी २०२६

 

तिचा पहाटे चा अलार्म झाल्यावर ती म्हणाली.. उठा जायचे आहे...मी विचारले..नक्की का ? तर ती हो म्हणाली आणि उठून आवरून घरी आई वडील मुलं यांच्या त्या दिवशीच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागली. मी तो पर्यंत झोपलो होतो... वाजता तिने परत उठवले... चला निघायचे आहे... आता उठण्याशिवाय पर्याय नाही, ही दिवस  सायकलिंग करूनच राहणार  असे म्हणून मी उठून आवरून सकाळी वाजता आम्ही दोघांनी घर सोडले आणि निघालो हडपसरच्या दिशेने .... सकाळी .३० वाजता दिवे घाट पार करून सासवड पुढे .३०वाजता नाश्त्यासाठी थांबलो, तिथे थोडा वेळ थांबून जेजुरी... वाल्हे..नीरा करत करत लोणंद अलीकडे फलटण बायपास रस्त्याने निघालो. वाटेत लिंबू सरबत घेताना एक वयस्कर व्यक्ती आली आणि त्यांनी बाकी माहिती विचारून बायकोच्या सायकलची एक राईड मारूनआले. त्यानंतर मजल दर मजल करत फलटण येथे दुपारी १ वाजता पोचलो.. तिथे थोडे खाऊन फलटण दहिवडी रस्त्याने निघालो, वाटेत एकाने सांगितलं की रस्ता खराबआहे... मोगराळे घाट पर्यंत रस्त्याचीकामे सुरू असल्याने सायकलिंग हळूहळू सुरू होते. दुपारी३ वाजता घाटाच्या अलीकडे थोडा वेळ थांबून पाणी पिऊन निघालो तो घाट पार करण्यासाठी. मोगराळे घाट हा एका वळणावर शेवट संपला असे वाटत असताना परत एक वळण येतेआणि तो घाट सुरूचअसतो... असा हा घाट२ वेळा आहे. त्या घाटात  हिची सायकल भन्नाट सुटली होती...मी एका वळणावर असताना वर पाहिले तर ती लांब एका वळणावर दिसत होती. दुपारी .३० घाट संपल्यावर मिनिटे थांबलोआणि निघालो. आता तिथून दहिवडी २५ किमी अंतर राहीलेहोते. येताना परत याच मार्गे यावे हा विचार केला.

 

पण तो घाट संपल्यावरजो काही रस्ता खराब लागला..... त्याला काही तोडच नाही, एक बाजू रस्ता पूर्ण झाला आहे पण त्यावर पोती घातली होती आणि दुचाकी जाऊ नये म्हणून काहीठिकाणी दगडी तर काही ठिकाणी काटेरी झाडे टाकली होती, त्यामुळे एक बाजूने वाहने ये जा करत होती.. त्यात पण काही ठिकाणीमोठ मोठी दगडं रस्त्यावर... त्यातून टँकरने काही ठिकाणी पाणी मारल्याने काही ठिकाणी चिखल.. सायकल नुसत्या खडखड चालत होत्या. रस्ता काही संपत नव्हता...कसेबसे त्या खडबडीत रस्त्याने ६.३० वाजता दहिवडी आणि शेवटचे किमी संपून सायंकाळी वाजता गोंदवले येथे पोचलो , परत दहिवडी रस्त्याने परतीचा प्रवास करायचा नाही हा ठामनिर्णय घेतला, त्यानंतर गोंदवले येथे समाधी मंदीर इथे पोचल्यावर जो काही तिथे असलेल्या लोकांचा घोळका आला... जसे आम्ही वेगळेच केले आहे आणि मग सुरू झाली प्रश्नांची मालिकाच.. कुठुन आला.. किती दिवस लागले?..किती किमी आहे ?... कधी निघाला ??... एवढया लांब कसे काय?? पाय दुखत नाही का??.. किती तास लागले??.. ह्या सगळ्यांची उत्तरे देता देता २० ते २५ मिनिटे गेली...एक गेली की एक व्यक्ती... त्यात काही पुरुष तर काही महिला असे कितीतरी जण विचारत होते... सरतेशेवटी एक जण म्हणाला... जा लवकर दर्शन घ्या...आणि मग प्रसाद घ्या...असे म्हणून मगआम्ही दोघे तिथेच सायकल लावून श्री महाराज चरणीलीन झालो आणि नतमस्तक होऊन आजचा दिवस सार्थकी लागला म्हणून पाया पडून रूमवर गेलो...आणि आंघोळी करून मग प्रसाद घ्यायला रात्री .३० वाजता परत मंदिरात आलो, त्यानंतर प्रसाद घेऊन रूमवर जाऊन झोपी गेलो.

 

२५ जानेवारी २०२६

दुसऱ्या दिवशी जो पर्यंत उजाडत नाही तो पर्यंत निघता येणार नाही म्हणून सकाळी लवकर उठून वाजता गोंदवले सोडले, गोंदवले - पुसेगाव रस्त्यावर दरूज (२५ किमी) येथे अचानक एक काम निघाल्याने तेथे सकाळी वाजता पोचलो.. तिथून ११ वाजता निघालो. पुसेगाव येथे मित्र अजित जाधव याचे गाव आहे.. इतर वेळेस यात्रेला तिथे जात असे...ह्या वेळेस पहिल्याच वेळेस सायकलने त्याच्या घरी दुपारी १२ वाजता वाजता पोचलो, तिथे त्याची आईआणि वाहिनी होत्या... थोडा वेळ थांबूनपाणी पिऊन निघणार तोच त्याची आई म्हणाली जेवण करून जा... आम्ही नाही नाही म्हणत असताना त्या म्हणाल्या अरे आज रथसप्तमी आहे आणि पुरणपोळी केली आहे..... झालं... पुरणपोळी म्हणजे माझी फार आवडती...मग काय पुरणपोळी, दूध, भात आणि कटाचीआमटी यावर भरपूर ताव मारून त्यांचे आभार मानून दुपारी १ वाजता पुसेगाव येथून निघालो.. फलटण रस्त्याने आल्यावर डिस्कळ येथुन डावीकडे वळून वाठार स्टेशनकडे निघालो... दुपारी .३० दरम्यानभाडळे घाटातून .३० वाजता वाठार स्टेशन येथून लोणंद कडे निघालो. दुपारी४.३० वाजता लोणंदयेथून खंडाळा रस्त्यावर किमी वरखेड बु. येथे बायकोचे माहेर असल्याने तिथे गेलो... सायंकाळचे ५ वाजल्याने आता परत पुणे प्रवास रात्रीचा नको म्हणून तिथेच मुक्काम करायचा ठरले आणि २६जानेवारी २०२६ रोजी घरी जाता येईल असे ठरले, त्या प्रमाणे तिथेच मुक्काम केला.

 

२६ जानेवारी २०२६ 

तिसऱ्या दिवशी सकाळी वाजता तिथून १५ किमी अंतरावर असलेल्या पारगाव खंडाळा कडे निघालो. रस्त्यात २६ जानेवारी निमित्त रस्त्यावरील गावामधून प्रजासत्ताक दिनी प्रभात फेरी निघत होत्या...आणि त्यात देशभक्तीपर गाणी चालू होती...एक वेगळेच वातावरण निर्माण झाले होते. खंडाळा येथे पोचल्यावर  झेंडे सायकलला लावुन .३० वाजता पुणे रस्त्याला लागलो.... शिरवळ... कापूरहोळ.. खेड शिवापूर करत करत सकाळी ११.३० दरम्यान खेड शिवापूर येथे टोल नाकायेथे नाष्ट्या साठी थांबलो... त्यानंतर नवीन कात्रज बोगदा... दरीपुल... वारजे.. कोथरूड... सेनापती बापट रोड येथून औंध मार्गे दुपारी .३० वाजताआम्ही दोघे  सुखरूप घरी पोहोचलो आणिअशा प्रकारे दिवसात संपणारा हा प्रवास   -या दिवशीसंपला.... जय श्रीराम  

 

एकंदर या प्रवासात बायकोने ३६० किमी (पुणे  गोंदवले  पुणे) अंतर पूर्ण केलेकी जे तिचे सगळ्यात लांबचे सायकलचे अंतर ठरले आणि ह्या आधी तिने कधीच पहिल्या दिवशी २३० किमी करून दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी १०० + किमी सायकलिंग केले नाही, पण ह्या वेळी तिने ते पूर्ण केले, त्याबद्दल तिचे हार्दिक हार्दिकअभिनंदन   ...ह्या सायकल राईडमध्ये अजून एक वैशिष्ट्य म्हणजे जिथे चढ असेलअथवा घाट असेल तिथे बायको सन्नाट सायकल चालवत माझ्या पुढे जायची आणि उतार अथवा सपाट रस्ताअसेल तर मी जोरात तिच्या पुढे जायचो....असाआमचा दिवस पाठशिवणीचा  सायकलिंग प्रवास सुरू होता...आता ती मोठ्या सायकल राईड साठी तयार झाली असे म्हटले तर चालेल...

 

भेटू परत अशा सायकल राईडला...ते पण जोडीने 

 

 

 

 

जय श्रीराम 

अंजली आणि अभय खटावकर 

 


वाचने 114
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

दूर दूरच्या सहली करत राहा.