Skip to main content

तांत्रिक अडचणी आणि सोयी.

लेखक कंजूस यांनी सोमवार, 13/04/2026 03:21 या दिवशी प्रकाशित केले.
तांत्रिक अडचणी मिसळपाव संस्थळ मिसळपाव साईट एका तयार प्रोग्रामवर चालते त्या Drupal CMS (Content Management System) code चे पाच सहा जाणकार सभासद हवेत. म्हणजे साईट सातत्याने सुरू ठेवण्यास गती मिळेल आणि ते काम फक्त एक दोघांवर पडणार नाही. आपापली इतर मुख्य कामं संभाळून हे काम करावे लागते. बरेच दिवसांच्या खटपटीनंतर मिपा अद्ययावत होत आहे. ( Drupal 7>>Drupal 11) गुढी पाडव्याला नूतनीकरण झाले पण नंतर संस्थळ बंद पडले. आपल्याला जुन्या मिपाची सवय आहे. पण नवीन CMS code अद्यतन झाल्यावर 'खरडफळा' आणि 'व्यक्तिगत संदेश' बाद झाले. यांची उणीव प्रकर्षाने जाणवणारी आहे. आपल्या तांत्रिक अडचणी लिहिण्यासाठी हा चाचणी लेख धागा उघडला आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1670
प्रतिक्रिया 92

प्रतिक्रिया

माहीत आहे. पण वीस फोटोंच्या धाग्याचे काम करणे सोपे नाही. धागा, मजकूर, कोड सारखा हलत राहतो वर खाली. पुढे कधीतरी मीच करेन रीसाईज. ही चाचणी आहे.


In reply to by अमरेंद्र बाहुबली

गरज नाही, ते आपोआप काजव्यांसारखे चमकायला लागतात. 
आता देवाभाऊ घरोघर महिला आरक्षण घेऊन येतील तेव्हा 
दिसायला लागतील. 

चाचणी प्रतिसाद आहे.  ;) 

-दिलीप बिरुटे

 


थेट संगणकाहुन .मोबाईलहुन इमेज देण्याची सुविधा बंद केली कती.ती जास्त सोयीची होती.

आता लिंकनेच फोटो देऊ शकतो.


In reply to by Bhakti

त्याने सर्व फोटो थेट मिपाच्या सर्व्हरवर येऊन वेब स्पेस आणि साईटला ताण येऊ शकतो म्हणून अपलोड फ्रॉम वेब सुरू केले असावे असे वाटते.


१. आज खराखुरा खाजगी खरडफळा सुरू झाला. ... फक्त लॉगिन केलेल्या मिपासदस्यांनाच त्यावरचे लेखन दिसते आणि प्रतिसाद देता येतात.  नवीन प्रतिसाद वरतीच दिसतात.

२. खरडवही सुरू... 

२अ. लॉगिन केलेल्या सभासदांना एकमेकांशी संपर्क करता येतो.

२ब.. त्यावरच्या नोंदी इतर सभासदही वाचू शकतात. 

२क.. खरडवहीत पत्र आले की त्याची सूचना खरडवही(संख्या) अशी मिळत आहे. हे छान झाले.

२ड.. काही नकोशी वाटणारी पत्रे एक एक किंवा अनेक एकदम रद्द करता ये आहेत. कुणी त्रासदायक पत्रे पाठवत असेल तर ती काढता येण्याची सोय झाली.

३. गूगल फोटोजच्या लिंक्सने फोटो चढवता येत आहेत.  यामुळे जे सभासद भरपूर फोटो असलेले लेखन करतातत्यांना फायदा होईल.  

एकूण नवे ड्रुपल ११ वरचे मिसळपाव संस्थळ एक नंबरच झाले आहे.


Flickr फोटो लिंक वापरता येईल का? गुगल ची काही जमली नाही बुवा...


 


मोबाईलवर अवाढव्य साईझचे फोटू दिसताहेत म्हणून ही चाचणी.


In reply to by सुमो

माझं काहितरी चुकतंय . कसं कारायचं सांगाल का ?


लाल रंग खूपच वापरला आहे थीम मधे. यामुळेच चर्चा विषयावर (शाब्दिक) हाणामाऱ्या लै म्हणजे लैच प्रमाणात होतील असे कुडमुडे भाकीत वर्तवतो. 

:) 



In reply to by किल्लेदार

फ्लिकर फोटो ब्राउझर मधे उघडा.

 

फ्लिकर १

 

फोटोखाली उजव्या कोपर्‍यात असलेल्या बाणावर क्लिक करा. Medium size वर क्लिक करा. डाऊनलोड विंडो उघडेल.

 

फ्लिक ३

 

डाऊनलोड लिंक कॉपी करा. मिपाच्या एडिटर मधे inseart image url च्या खिडकीत पेस्ट करा.

 

फ्लिकर

 

फोटो दिसेल.


Test

एक विचार मनात आला तो मांडावा म्हणतो. मिपा असे चालत नाही याची कल्पना आहे. पण तरीही राहवत नाही म्हणून मांडावे म्हणतो.

 

मिपाच्या तांत्रिक देखभालीसाठी एखाद्या कंपनीला AMC दिली तर जास्त सोय होणार नाही काय?

जे आत्ता मिपाची देखभाल करत आहेत त्यांनीच त्या कंपनी कडून कामं करून घेणं जास्त सोयीचं ठरेल असं मला वाटतं.

७-८ कोटेशन्स जरी घेतले, त्याबरहुकुम लागणारी वार्षिक रक्कम इथे एका स्वतंत्र धाग्यात मांडली आणि निनावी ऐच्छिक देणगीसाठी सदस्यांना मुभा दिलीत तर मला वाटतं की लोकं हातभार लावायला सहज तयार होतील. जेवढी रक्कम लागेल, तेवढी झाली की देणगीचा पर्याय बंद करता येईल. 

 

माझ्यामते यावर एक चर्चा आयोजित करायला हरकत नसावी. 

अडचणी मांडायच्या आणि त्यावर उपाय शोधायचे. जास्तीत जास्त काय होईल? की जैसे थेच बरे हे समजेल. पण लोकांचे विचार तरी समजतील.

 

जाणकारांनी मत मांडावे अशी विनंती.