Skip to main content

तू

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 11/12/2025 14:55 या दिवशी प्रकाशित केले.
ग्रीष्म-तप्त भूमीवर तू तर सर सर मृगसर कोसळणारी विकल-विव्हल प्राणांवर फुंकर घालुनी सांत्वन तू करणारी क्षणभंगुरता गर्वे मिरवीत चिरंतनासम तू फुलणारी परंपरांचे अवजड बंधन सहज समूळ तू झुगारणारी कोलाहल भवताली त्यावर प्रशांत शिडकावा करणारी भळभळते व्रण माझे बांधून भरजरी पैठणी तू उरणारी
लेखनविषय:

वाचने 655
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

शब्दकळा निव्वळ अप्रतिम.

अप्रतिम!

देणाऱ्या कविता रसिकांना धन्यवाद