हा आता मुंबईच्या सीटा पडल्या तेव्हा बोला असे ढीग राजच्या नावाने. पण च्यायला राज लढत होता तेव्हा त्याला दोन आधाराचे शब्द कोणी ऐकवले असतील का नाही कोणास ठाऊक. जेव्हा राजने पहिल्यांदा छटपूजेविरुद्ध बोंबाबोंब केली तेव्हा शिवसेनेची अवस्था कशी झाली होती हे मी पाहीले. अगदी शिवसेनेने छटपूजा स्वखर्चाने करून द्यायची ठरवल्यासारखे वागत होते. त्यानंतर तर शिवसेनेला कोणती भूमिका घ्यायचे हे कित्येक दिवस उमगतच नव्हते. त्यानंतर देखील राजच्या प्रकरणाने पेट घेतला तरीही शिवसेना दिङमूढ होऊन काय भूमिका घ्यायची याच्या विवंचनेतच होती. आता आलेत मोठे भावनिक ब्लॅकमेल करणारे. बाकी या उत्तरभारतीयानी करूदे सत्कार वगैरे काही पण जास्त आगाऊपण करतील तर त्यांच्या गां*वर २ फटके परत मारायलाही काही कमी करणार नाही.
राजला पैसे देऊन काँग्रेसने उभे केले असं मानल तर काँग्रेसने शिवसेनेच्या संघटनेचाच नव्हे बुद्धिभेदही केला याचे दु:ख अधिक आहे. शिवसेनेच्या संघटनेचा भेद झाला असता तर काही प्रकारे प्रयत्न करून संघटना परत बांधता आली असती पण आत शिवसेनेपुढे झालेला बुद्धिभेद आणि त्यामुळे गेलेली पत या दोन्ही गोष्टीतून वर कसं निघायचे हा मोठा प्रश्न आहे.
शिवसेनेने शेतकर्यांच्या प्रश्नांवर रान उठवून जे कमावले ते त्यानी राजच्या प्रकरणात गमावले हे नक्की.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
काल एका ठिकाणी असाच आत्ताच्या निवडणूकीचा विषय चालला होता. त्यात एका उत्तर भारतीयाबरोबर माझा संवाद झाला. भाजप-सेनेच्या मुंबईतील हार खाण्याबद्दल अर्थातच राज, कारण असल्याचे त्याचे पण म्हणणे होते. मात्र पुढे तो जे काही बोलला (हिंदीत) ते "इंटरेष्टींग" होते: त्याच्या म्हणण्याप्रमाणे, "राज हा एक चांगला नेता आहे आणि चांगला राज्यकर्ता होऊ शकतो. त्याचे जे काही उत्तर भारतिय आणि हिंदी भाषिकांविरुद्ध चालू आहे, तसे करण्याव्यतिरीक्त त्याच्याकडे (बिचार्याकडे) काही पर्याय नाही. कारण तो राजकारणात नव्याने (स्वतंत्र) येत आहे. काही तरी मुद्दा राजकारण्यांना लागतोच. एकदा सत्ता मिळाल्यावर सगळे नॉर्मल होईल!" :-)
शिवसेनेने हिंदुत्व रक्षणाची अतिरीक्त जबाबदारी स्वीकारल्यामुळे निर्माण झालेली "मराठी" पणाची राजकीय पोकळी, राज यांनी चाणाक्षपणे हेरली. मुंबईतील मराठी मते राज यांच्याकडे वळत असताना, उत्तर भारतीय मते मात्र सपा-बसपा कडे न वळता काँग्रेसकडे वळत असतील (लोकसभेच्या निवडणूकीत हे दिसलेच आहे), तर तो राज यांच्या राजकीय भूमिकेचा विजयच ठरेल, असे म्हणायला हरकत नसावी. कारण त्यामुळेच, ह्या उत्तर भारतीय पक्षाच्या नेत्यांना मुंबईत बस्तान बसवणे कठिण होणार आहे - जे राज यांना नेमके हवे होते. कारण भैय्या जे रोजगार करीत होता-आहे, ते रोजगार मराठी तरूण कधिच करणार नव्हता.
थोडक्यात काय, हा उत्तर भारतीयांच्या आर्थिक नव्हे तर, सांस्कृतिक/राजकीय वर्चस्वाविरुद्धचा लढा होता.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
उत्तम विश्लेषण....
हा अँगल विचार करण्यासरखा आणि इन्ट्रेष्टिंग आहे... :)
_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)
एखाद्या समाजाविरुध्ध बोलले की मिडिया पटकन दखल घेतो.गर्दी जमवण्यासाठी असले मुद्दे पटकन चालतात. ३०/३५ वर्षापुर्वीचे शिवसेनेचे 'लुंगी सोडा' आंदोलन असेच होते.हळुहळु सत्तेची उब मिळाली आणि मग सेना शांत झाली.मनसेचे ही तेच धोरण असावे.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
अभिजिता, राज ठाकरे कोणाबरोबरही गेले तरी आमची हरकत नाही !;)
फक्त उतारवयात श्री बाळासाहेब ठाकरेंना जो त्रास राज ठाकरे देताहेत त्याचे लै वाईट वाटते ;)
आज दै. सकाळमधे एक बातमी वाचून खूप करमणूक झाली. सामनातील संपादकीय तसेच..!
-दिलीप बिरुटे
आणि एक म्हातारा एका उमद्या तरुणाला इतका त्रास देतोय, ते देखील आपल्या उदास मुलाच्या उन्नतीसाठी, ह्याची देखील गंमत वाटली.
पुढच्या वर्षभरात शिवसेनेचे तुकडे होऊन मनसे ला मिळणार, तेव्हा माझी आठवण काढा म्हणजे झाले.
-- मिसळभोक्ता
(अधिक माहितीसाठी प्रभूमास्तरांना भेटा.)
अभिजत लेख छानच. इथेही काही खरडलेलं आहे.
http://marathi.webdunia.com/newsworld/currentaffairs/manthan/0905/18/1090518051_1.htm
(भोचक)
आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो...
http://bhochak.mywebdunia.com/
असा लेख लिहिण्याचे धाडस करुन दाखवाच अभिजितराव! राजवर तर हल्ली शेंबडी पोरंही लेखणी चालवून घेतात. या निवडणुकीत खरे थोबाड पवारांचे फुटले आहे. तेव्हा, त्यांच्यावर असे काही लिहिले असते, तर त्याचा मझा घेता आला असता.
४२ वर्षे राजकारणात पण १० खासदारपण नाहीत.पण नेहमीप्रमाणे पवारप्रेमी आतापण त्याना 'मुत्सद्दी/परिस्थितीचे अचुक भान असलेला' अशी विशेषणे लावतीलच.मनसेची खरी स्थिती पुढच्या ५ वर्षात कळेल.
राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाला काही विधायक कामे हाती घ्यावी लागतील.सारखे भैय्या/मराठी-अमराठी वाद घातले तर लोक कंटाळतील.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
अभी, विषयांतराबद्दल क्षमस्व रे !
अभिजितराव! राजवर तर हल्ली शेंबडी पोरंही लेखणी चालवून घेतात. या निवडणुकीत खरे थोबाड पवारांचे फुटले आहे. तेव्हा, त्यांच्यावर असे काही लिहिले असते, तर त्याचा मझा घेता आला असता.
अमोलसेठ, राज्यसभेत असलेले विजय दर्डा यांनी लोकमत मधे इथे पवारांवर भर्पूर तोंडसुख घेतले आहे. मला वाटतं तुम्हाला मजा येईल !
राज यांनी परप्रांतियांऐवजी ''बांगलादेशी' घुसखोरांविरुद्ध हेच आंदोलन पुकारले असते तर महाराष्ट्रच नाही अख्खा देश मागे उभा राहिला असता. असो, जनतेला महाराष्ट्रातील परप्रांतिय, हा भारतातील 'बांगलादेशी' घुसखोरांपेक्षा ज्वलंत विषय वाटतोय.
बांगलादेशी घुसखोरांविषयी १९९३ पासून ऐकत आहोत.
युती शासनाच्या काळात त्यांना हाकलता आले नसेल कदाचित. (केंद्रातही यांचेच शासन होते १९९८ पासून) पण त्यांची यादी तरी करता आली होती काय?
खराटा
(रंग माझा वेगळा)
मुख्य म्हणजे ते मुंबईत किती आहेत? की प्रत्येक बंगाली मुस्लिम म्हणजे बांगलादेशी मुस्लिम असे तर नाही? :)
काही वर्षापुर्वी काही लोकाना पोलिसानी पकडुन कोलकाट्याच्या ट्रेनमधे बसवले होते. ट्रेन बंगालमध्ये जात असता तिकडच्या स्थानिक लोकानी पकडुन नेणार्या महाराष्ट्राच्या पोलिसाना बदडले होते.त्यांचे म्हणणे ते बान्गलादेशी नव्हतेच.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
अभिजित तुम्हा सर्व लोकांचे असे का मत बनले आहे कि राज ठाकरे मुळे मराठी(शिवसेनेचे) उमेदवार पडले. आज मुंबईत २ मराठी उमेदवार निवडुन आले आहेतच की.राज ठाकरे शिवसेनेत असताना जर त्याची योग्य दखल उध्दव ठाकरेनी घेतली असती तर आज ही परिस्थिती त्याच्यावर आली नसती. अजुनही उध्दव ठाकरे राज विषयी मवाळ भुमिका न घेता त्याना संपवायची भाषा करतात ते तुम्हाला योग्य वाटते का?राजकारणात आता दोघाच्या वाटा वेगवेगळ्या आहेत,दोन्ही पक्षाची ध्येयधोरणे वेगळी आहेत. मग एकटा राजच दोषी का? मी असे म्हणतो कि उध्दवच्या हेकेखोर पणा मुळे मनसेचे ६ उमेदवार मुंबईमध्ये पडले.शिवसेनेने किती उमेदवार मुंबईमध्ये उभे केले होते,राज पेक्षा कमीच मग ते तरी का उभे केले? सरळ राजना पाठिंबा दिला असतातर आज सगळे मनसेचे खासदार मुंबईमधुन निवडुन आले असते.शिवसेना भाजपला बरोबर घेवुन ही निवडणुक मुंबई मध्ये लढली. परंतु एकटा राज ठाकरे त्याना भारी ठरला.
संजय निरुपम,दत्त कुटुंबिय ह्याना मुंबई मध्ये मोठे कोणी केले? शिवसेनेनेच ना, मग आता कशाल टाहो फोडता.मागे जे पाप केले ते आज पाण्यावर आले. त्याचा दोष राज ठाकरेच्या माथी मारण्यात काहीच अर्थ नाही. बर राज ठाकरेनी शिवसेनेचे उमेदवार आपल्यामुळे पडतात म्हणुन काय करावे? शिववड्याचा स्टॉल दादर ला काढावा की काय?
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
स्वतःची पापे राजवर धकलुन उध्धव नामानिराळा होउ पहातो आहे. सोबतीला म. टा. सारखे मित्र आहेतच. आजचा लेख वाचा त्या प्रकाशन सोह्ळ्याचा....
उदध्धव ला म्हणावे जा आता कुपा शंकर कडे गणपतीला...
माझ्या (कथित) उपहासात्मक लेखावर 25 प्रतिक्रिया आल्याचे पाहून धन्य वाटले. पण त्यातल्या बहुतांश प्रतिक्रिया माझ्या (कथित) लेखनशैलीबद्दल नव्हे, तर राजप्रेमाबद्दलच्या होत्या, हे पाहून पोपट झाला. असो.
मुंबईतल्या युतीचा पराभव मनसेच्या उमेदवारांमुळे झाला, हे तर उघडच आहे. पण राज ठाकरेंच्या मराठीप्रेमाचा बुरखा वगैरे फाडण्यासाठी किंवा त्यांना दोष देण्यासाठीचा हा लेख नव्हता. काही जण बरेच गंभीर झालेले दिसतात. केवळ एक सार्वत्रिक भावना वेगळ्या शैलीत मांडावीशी वाटली, एवढंच! राज ठाकरेंवर टीकाच करायची असती, तर तसा वेगळा राजकीय वगैरे लेख हाणला असता.
तरीही, असो.
प्रतिक्रियांबद्दल मनापासून धन्यवाद.
प्रतिक्रिया
शब्द
हा आता
एक उ.भा. निरीक्षण
राज यांची नीती
उत्तम
सहमत
सध्या
तुम्हाला
बरोबर
:)
हहपुवा
मराठी व्होटबॅंकेचे 'राज'कारण
पवारांवर
सहमत
अभी,
राज यांनी
+१
बांगलादेश
मुख्य
तात्या या चोरापासुन वाचवा
सकाळ
पोपट
चुकि झाली
मग आता काय करावे राज ठाकरेनी?
वेताळ शी सहमत......
माझ्या
अभिजितराव,