तुरीची आमटी
घरासमोर अनाहुतपणे वाढलेल्या तुरीच्या शेंगांची कचोरी केली.आमटी करेन करेन म्हटलं तर राहिलेच.आमच्याकडे बाजारात तुरीच्या शेंगा विकत मिळत नाही.मागच्या महिन्यांपासून सकाळी फिरायला पुन्हा सुरूवात केली तेव्हा हळूहळू इमारतींनी भरून जाणाऱ्या रस्त्यालगत काही शेतं शिल्लक आहेत तिथे तुरीचे खुप मोठं शेत होत.आज तोडेन उद्या तोडेन ठरवत होतं तर तुरीची काढणी पण झाली.झाली का पंचाईत,आता पुढच्या वर्षीच तुरीची आमटी खाऊया म्हटलं.खरोखरीच मागच्या वर्षीची इच्छा आज नवीन वर्षी पूर्ण झाली.आई खानदेशात फिरायला गेली होती तिकडून तिने तुरीच्या शेंगा आणल्या होत्या.
तुरीच्या शेंगा स्वच्छ धुवून घेतल्या.कुकरमध्येच फोडणी दिली.कांदा टोमॅटो लसूण,खोबरे,तीळ,धने , कोथींबीर,लाल मिरची यांच परतून केलेलं वाटण फोडणीत टाकून परतून घेतले.मग तुरीच्या यात शेंगा परतून घेऊन आवश्यकतेनुसार पाणी,मीठ टाकले.कुकरच्या चार शिट्ट्या होऊ दिल्या.
आधीच कालच्या कडक एकादशीने खुप भूक लागली होती.तीळ लावत भाकरी केली.गाजर किसून डाळिंब पेरत कोशिंबीर केली.भाकरी कुस्करून त्यात हवी तेवढी आमटी टाकत तृप्तीचा ढेकर भक्तीने दिला :) ;)
नवीन वर्षाची सुरुवात खमंग झाली..
-भक्ती

वाचने
2264
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
स्लर्रर्रर्प ... (लाळ गाळू इमोजी कल्पावि)
तूर तूर तूर
In reply to तूर तूर तूर by अभ्या..
सोलापूर की लातूर
In reply to सोलापूर की लातूर by स्वधर्म
ह्या......
In reply to सोलापूर की लातूर by स्वधर्म
शाही कौडंग विथ एक्स्ट्रा चीज
In reply to शाही कौडंग विथ एक्स्ट्रा चीज by अभ्या..
+१
In reply to +१ by स्वधर्म
अॅमेझॉनवर cow dung cakes
In reply to +१ by स्वधर्म
पुणेकर नो मोर?
In reply to तूर तूर तूर by अभ्या..
+१११
.
वा !!! तोंपासू....
मस्त रेसिपी. आवडली.
ओल्या तुरीच्या शेंगा दिसत