ह्या कथेवर असंख्य वेगवेगळे चित्रपट निघाले, ह्यातले सर्वात प्रसिद्ध म्हणजे १९३१ सालचा 'फ्रॅन्केनस्टाईन' आणि १९३५ सालचा 'ब्राईड ऑफ फ्रॅन्केनस्टाईन' मात्र हे दोन्ही चित्रपट पाहिले नाहीत. खरं तर मध्यंतरी डॅनियल रॅडक्लिफ आणि जेम्स मॅकअव्होयचा व्हिक्टर फ्रॅन्केनस्टाईन हा सिनेमा पाहिला होता पण मूळ कथानकाशी तो बिलकुल प्रामाणिक नव्हता, शिवाय तो पिक्चर फारसा आवडलाही नव्हता. अशातच गियेलर्मो डेल टोरो (Guillermo del Toro) चा 'फ्रॅन्केनस्टाईन' नेटफ्लिक्स वर आला आणि आणि तो लगेच पाहून झालाही. डेल टोरोचे पॅन्स लॅब्रियान्थ आणि द शेप ऑफ वॉटर पाहिले होते, आवडलेही होते. फॅन्टसी, भय ह्यांचे विलक्षण मिश्रण करणारा हा दिग्दर्शक हेलबॉय, पॅसिफिक रिम सारखे तद्द्न मसाला चित्रपटही देतो. पण तो लक्षात राहतो तो कॅबिनेट ऑफ क्युरियोसिटीज ह्या सिरियलसाठी आणि पॅन्स लॅब्रियान्थ, द शेप ऑफ वॉटर आणि फ्रॅन्केनस्टाईन यांसारख्या चित्रपटांसाठीच.
मेरी शेली यांची कादंबरी ही विज्ञानकथा म्हणून जितकी प्रसिद्ध आहे, तितकीच ती एक शोकांतिका. जीवन निर्माण करण्याची हिंमत व्हिक्टर फ्रँकनस्टाईन करतो, पण त्या जीवनाची जबाबदारी घ्यायची वेळ आली की तो मागे सरतो. डेल टोरो यांच्या चित्रपटात हातात हा व्हिक्टर फ्रॅन्केनस्टाईन वेडसर न वाटता, आजूबाजूला दिसणाऱ्या जबाबदारीपासून पळ काढणाऱ्या आधुनिक माणसाचा प्रतिनिधी ठरतो. गॉथिक दृश्यशैलीत हा सिनेमा भयावह न वाटता अस्वस्थ करणारा ठरतो. प्रतिभावान पण अहंकारी असलेला डॉक्टर बॅरोन व्हिक्टर फ्रॅकेनस्टाईन हेन्रिक हार्लेन्डर ह्या गर्भश्रीमंत शस्त्रविक्रेत्याची (ख्रिस्तोफ वॉल्ट्झने हे पात्र अविस्मरणीय बनवले आहे) आपल्या प्रयोगात मदत घेऊन विविध मृत शरीरांचे अवयव एकत्र शिवून आकाशातल्या विजेच्या साहाय्याने एका राक्षसी जीवाची (creature)निर्मिती करतो. परंतु त्याच्यात जीव आल्यावर त्याच्या भयानक रुपामुळे व्हिक्टर त्याला स्वीकारत नाही आणि आपली निर्मिती नष्ट करण्यासाठी तो त्याची प्रयोगशाळा असलेला हार्लेन्डरचा राजवाडा आग लावून उद्वस्त करतो. नुकताच जीव आलेला तो दुर्दैवी जीव ह्यातून बचावतो आणि आत्मशोधासाठी प्रयत्न करतो. समाजाकडून सतत नाकारला गेलेल्या ह्या भावनाशील, संवेदनशील आणि प्रेमाची गरज असणारा हा जीव स्वतःचे अस्तित्व, आपले स्थान आणि निर्मात्याने दिलेले दुःख यांचा अर्थ शोधू लागतो. आणि सुरु होतो निर्माता आणि निर्मिती ह्यांमधील जीवघेणा संघर्ष. खरा राक्षस कोण? मृत अवयव शिवून बनलेला हा जीव की जबाबदारी नाकारणारा, नैतिकता मिरवणारा व्हिक्टर ह्याचे अपेक्षित उत्तर चित्रपटातच मिळते. डेल टोरोने व्हिक्टोरियन वास्तुशैलीत साकारलेली ही गॉथिक भयकथा खरंतर एक ट्रॅजिडी आहे. निर्मात्याची कथा (Victor's Tale) आणि निर्मितीची कथा (The Creature's Tale) अशा दोन भागांत हा चित्रपट साकारला आहे
ऑस्कर आयझॅकने व्हिक्टर फ्रॅकेनस्टाईन तर जेकब एलोर्डीने राक्षसी दुर्दैवी जीव अक्षरशः जिवंत केले आहेत. ख्रिस्तोफ वॉल्ट्झबद्द्ल तर काही बोलूच नये. लहानशा भूमिकेतही तो प्रचंड प्रभाव टाकतो. मिया गॉथने एलिझाबेथ साकारली आहे. 'फ्रॅकेनस्टाईन' कादंबरीचे फॅन्स असणार्यांनी हा चित्रपट सोडूच नये. अर्थात मूळ कादंबरीत असलेल्या ह्या कथानकात चित्रपटाच्या अनुषंगाने बरेच बदलही केलेले आहेत मात्र तरीही हा चित्रपट मूळ आशयाशी अत्यंत प्रामाणिक आहे. अवश्य बघावाच असा आहे.
वाचने
2445
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगली ओळख.
छान ओळख.मी हा सिनेमा पाहयला
ह्या कथेवर असंख्य वेगवेगळे चित्रपट
काल रात्री बघितला, आधी
In reply to ह्या कथेवर असंख्य वेगवेगळे चित्रपट by टर्मीनेटर
क्रिचर्स टेल भारीच आहे. पण
In reply to काल रात्री बघितला, आधी by टर्मीनेटर
सहमत आहे. एकंदरीत चित्रपटाचा
In reply to क्रिचर्स टेल भारीच आहे. पण by प्रचेतस
हे गाणे "फास्टर फेणेचा रणरंग" या पुस्तकातले आहे .
In reply to सहमत आहे. एकंदरीत चित्रपटाचा by टर्मीनेटर
+१
In reply to हे गाणे "फास्टर फेणेचा रणरंग" या पुस्तकातले आहे . by सिरुसेरि
"इनके पीछे खंग"/ नेफा भागात
In reply to +१ by गवि
क्या बात...
In reply to हे गाणे "फास्टर फेणेचा रणरंग" या पुस्तकातले आहे . by सिरुसेरि
एक प्रश्न आहे.
सतत प्रयोग करत राहून,
In reply to एक प्रश्न आहे. by Bhakti
अच्छा +१
In reply to सतत प्रयोग करत राहून, by प्रचेतस
छान. वाचन ही उत्तम सवय.
अरे वा!!
अरे वाह.
आभार....
पुष्पगुच्छ
In reply to आभार.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
होय...
In reply to पुष्पगुच्छ by गवि
जुने किल्ले, अंधार, वादळी
In reply to आभार.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खरं आहे.
In reply to जुने किल्ले, अंधार, वादळी by टर्मीनेटर
परखड प्रतिसाद आवडला. आपला
In reply to खरं आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुम्ही दोघेही जीवश्चकंठश्च
In reply to परखड प्रतिसाद आवडला. आपला by गवि
आता संत तुकाराम वगैरे चित्रपट
In reply to खरं आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
द शेप ऑफ वॉटर पाहिले होते,
कॉलेज जीवनात Frankenstein
एक माहिती आणि शुभेच्छा !