अमेरिकेतील गुजराती मंड्ळ
लेखनप्रकार
मी आजपर्यंत अमेरिकेतील न्यूयॉर्क, न्यू जर्सी, कनेक्टिकट, बे एरिया या भागातील मराठी मंडळांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना हजेरी लावली आहे, पण गुजराती मंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमांना कधीच हजेरी लावली नव्हती. ही माझी पहिलीच वेळ होती.
मराठी लोकांना राग आला तरी चालेल, पण मराठी मंडळांत प्रवेश मिळवण्यासाठी आणि त्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना हजेरी लावण्यासाठी मला डॉलर्स द्यावे लागले, या उलट गुजराती मंडळात मात्र आवजाव घर तुम्हारा होते, (पैसे की कोई कमी नही है)
मुळात गुजराती मंडळात का गेलो? तर दक्षिण अमेरिकेत उतरल्या उतरल्या ज्या हॉटेलात मी थांबलो ते सुपर 8 हॉटेल गुजरत्याचे होते, त्याला कळले की मी एकटाच आहे मग तो त्यांच्या सर्व कार्यक्रमांना मला बोलावू लागला. तिकडे सर्व सुपर 8 आणि सुपर सिक्स अशी जी काही मोटेल्स असतात ती झाडून गुजरात्याची असतात,
जसा आपल्याकडे पानवाला म्हटला की भैय्या!
दूधवाला म्हटलं की भैय्या!
टायर पंचर वाला म्हटला की केरळी!
चहावाला म्हटला की राजस्थानी भट!
तसा तिकडे मोटेलवाला म्हटला की पटेल!
इंडियन ग्रोसरी म्हटले की पटेल!
एक टॅक्सी ड्रायव्हरने तर विचारले की पटेल चा अर्थ दुकान होतो का?
मी म्हणालो, "नाही"
मग तो म्हणाला की, प्रत्येक दुकानावर पटेल का लिहितात?
मग सांगितले त्याला सर्व, की बहुतेक दुकानदार पटेल असतात.
एखादा नोकरीवाला गुजराती असेलही पण तोही नाईलाजास्तव नोकरी करत असणार आणि संध्याकाळी कुठेतरी दुकानात जाऊन धंदा शिकत असणार. (आपल्याकडे नाही का मोहम्मद शमी नाईलाज जास्त बॅटिंगला जातो तसे. पुर्वी मणिंदर जाते असे, जाताना जनरीत म्हणून बॅट घेउन जात असे)
आपले लोक काही पैशात कमी नाहीत पण ते सर्व डॉक्टर आणि इंजिनियर अशा एलिट वर्गात मोडतात, त्यामुळे पेट्रोल पंप, मोटेल, किराणामाल यात मराठी माणूस नाही.
( तसाही कुठल्याच धंद्यात नाहीम्हणा)
शिवाजी महाराज जसे म्हणाले, की असती आमची आई सुंदर तर झालो असतो आम्ही सुंदर.
तसे मी मनात म्हणालो "असती आमची आई गुजराती झालो असतो आम्ही व्यापारी"
एखादा पुणेकर तिकडे भुसार सामानाचे दुकान टाकून बसला आणि दुपारी झोपायला दुकान बंद करून लागला तर धंदा चौपट होईल, असो पुरे झाला मराठी लोकांचा उपमर्द,
तर गुजराती मंडळ म्हणजे आव जावं घर तुम्हारा, (याच्यात कितना भी खाव हे पण येते.)
शेवटी माझे फुकट ते पौष्टिक ब्रीदवाक्य मी जगाच्या पाठीवर कुठेही सोडत नाही.
बेकर्सफिल्ड मध्ये मी माझ्या पंजाबी सरदार मित्रासोबत अनेकदा गुरुद्वारात गेलोय. तो जाताना डाळ तांदूळ घेऊन जायचा. मी मात्र त्याच्या बाजूला त्याची बायको उभी तसा राहून मम म्हणेल तसे त्याच्या हाताला हात लावायचो. त्याने दिले काय मी दिले काय? एकच ना? तर गुरुद्वारात का जायचे? तर फुकट लंगर!
मला ताकाला जाऊन भांडे लपवायला आवडत नाही. जातो फुकट खायला तर जातो! खाण्याबरोबर अन्य फायदेही असतात, म्हणजे घरी काही बनवायला लागत नाही, भांडी घासावी लागत नाही, असो,
तर गुजराती मंडळ,
मुळात हे लोक त्यांच्या मंडळाला गुजराती मंडळ असे नाव कधीच देताना दिसले नाहीत. सगळीकडे इंडियन कम्युनिटी, सर्वांना सामावून घेणारे. आपल्याकडे नाही का शिवसेना नावाचा अखिल भारतीय पक्ष आहे. आहे महाराष्ट्र पुरताच, पण अखिल भारतीय! (नावात कशाला कद्रूपणा?) (यात दोन्ही गट आले, शिंदे आणि उबाठा)
तर इंडियन कम्युनिटी नावाची गुजराती मंडळे.
मी पहिल्यांदा गेलो तेव्हा माझ्या ओळखीचे कोणीच नव्हते, मग त्यातल्या त्यात वयस्कर आणि गरीब दिसणाऱ्या दोघांच्या बाजूला जाऊन बसलो. तसे दिसायला सर्वच गरीब होते कपड्यावरून. बोलता बोलता एका म्हाताऱ्याने मला विचारले, तुमचा काय बिजनेस? मी म्हणालो, नोकरी करतो!
त्याबरोबर त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य, तुच्छता, करुणा सर्व आलं, मी निर्लज्जासारखा गप्प!
मग म्हणतो "खाना खाया?"
मी हो म्हणालो!
"कैसा था?"
मी म्हणालो, "अच्छा था" आता फुकटचे सर्वच चांगलं लागतं!
त्यानंतर त्यांनी बोलता बोलता सांगितले की त्यांचे पाच पेट्रोल पंप आहेत. आणि दुसरा जो गरीब दिसणारा होता त्याची पाच हॉटेलस होती.
कशाला वर्गणी काढतील?
त्यानंतर कळले की सर्वच तिथे व्यावसायिक होते, अगदी पुस्तकांचा स्टॉल किंवा अगदी कन्वेनियन्स स्टोअर का असेना पण प्रत्येकाचा व्यवसाय होता, आणि तो व्यवसाय धो धो चालत होता, सर्वांच्या चेहऱ्यावर कृतकृत्य समाधान होते, माझ्या चेहऱ्यावर दुसऱ्या दिवशी सोमवार असल्याने ऑफिसला जायचे दडपण होते, हे सर्वच मराठी मंडळात लोकांच्या चेहऱ्यावर असते,
गरब्याचा कार्यक्रम असल्याने अचानक मस्तपैकी साडी घातलेल्या बायका पोरी फेर धरून गरबा नाचू लागल्या, माझे इकडे गप्पा मारणे आणि खाणे चालू होते, अचानक काय झाले माहित नाही त्यांच्यात काहीतरी गेम चालू होते, त्या गेम चा एक भाग म्हणून एक मोठा बॉल माझ्या अंगावर येऊन आदळला, लगेच एक पोर सवदा मुलगी आली आणि माझा हात धरून मला खेचू लागली, थोडक्यात माझा गेम झाला होता,
मला खेचून ती त्या फेऱ्यात घेऊन गेली आणि मला नाचायला सांगू लागली,
मी माझ्या आयुष्यात नाचणे सोडा कधी ह्रिदम मध्ये चाललेला आठवत नाही,
तिने माझे दोन्ही हात धरून मला रिदम मध्ये हलवण्याचा प्रयत्न केला,
पण एखाद्या ठोकळ्याला किती नाचवणार? मी कठपुतली सारखे हात हलवले,
शेवटी तिला लगेच कळले की आपण गेंड्याला नाचवायचा प्रयत्न करतोय,
तिने प्रयत्न सोडून दिले मी गप्प परत येऊन खुर्चीवर बसून गेंड्याप्रमाणे रवंथ चालू केला, ज्या कामासाठी आलोय ते का सोडा? आणि ती भवानी खेचून घेऊन गेली तेव्हा ताटात अन्न होतं!
अन्नाचा अपमान का करायचा ?
तरी बाजूला एक वयस्कर म्हातारा म्हणाला काहीतरी,
सरस् करयु!
मनात म्हणालो - डोंबलाचे सरस !
आयुष्य जगावं तर गुजरात्यांनी असं तेव्हा वाटलं,
धंद्यात झोकून द्यावं, अपयशी झाल्यास पुन्हा उठावं, परत झोकून द्यावे, यश मिळवावं ,
आलेल्या पैशात जग फिरावे, फिरताना जगाची पर्वा न करता मोठ्याने ओरडावं, "दुनिया गई भाड मे"
जिसने धंदे मे की शरम, उसके फुटे करम,
बरं हे सर्व गुजराती कायदेशीर मार्गे आलेले असतात असेही नाही, येण केण प्रकारेण, ते हुल झपट करून अमेरिकेच्या धरतीवर अवतरतात, कित्येक लोक आपल्या गावचा जमीन जुमला विकून इकडे आलेले आहेत,
दुर्दम्य इच्छाशक्ती, अपयशाची भीती नाही, अपार कष्ट करण्याची तयारी, भाऊबंदांना साथ देण्याची वृत्ती यामुळे ही कम्युनिटी अमेरिकेतील एक पावरफुल कम्युनिटी बनली आहे, पण पाय जमिनीवर.
माझा हॉटेलवाला मित्र मल्टी मिलेनियर आहे, त्याच्या हाताखाली त्याने गोऱ्या पुरुषांना व बायकांना कामाला ठेवले आहे, त्याची एवढी मोटेल्स आहेत पण कधी शर्ट इन केलेला पाहिला नाही, मुंबईच्या रस्त्यावर चालताना कोणी म्हणेल की, आत्ताच गाड्या धुवून घरी चाललाय असं ध्यान!
पण एवढे ऐश्वर्य असून मला जेवायला बोलवण्याची एकही संधी तो सोडत नाही, काय पाहिलं माझ्यात ? माहित नाही.
कदाचित माझा गरीब स्वभाव पाहिला असेल.
कधीही फोन केला की लगेच बोलावून घेणार आणि घरी पोटभर जेवू घालणार.
अशी ही दिलदार माणसे मला इंडियन कम्युनिटी च्या कार्यक्रमात कशाला वर्गणी बद्दल विचारतील? असो
वाचने
4238
वाचनखूण
प्रतिक्रिया
32
खटपट्या जी, अतिशय उत्तम झाला
धन्यवाद,
मस्त, खुसखुशीत लेख!
आवडला लेख.
खटपट्या सेठ, सुरेख लेखन !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Rehman Dakait Entry Song :Dhurandharगुजराती लोक एकमेकांना पकडुन
In reply to गुजराती लोक एकमेकांना पकडुन by कानडाऊ योगेशु
अगदी शैक्षणिक शिष्यवृत्त्या,
In reply to गुजराती लोक एकमेकांना पकडुन by कानडाऊ योगेशु
परदेशात जैन लोकांचे खायचे
चोक्कस!
मनमोकळं खुसखुशीत लिखाण आवडलं.
मातीचा गुण .... ?
हा मातीचा गुण म्हणावा का?
In reply to हा मातीचा गुण म्हणावा का? by विजुभाऊ
+ सहमत आहे. माझ्याही ओळखीचे
In reply to हा मातीचा गुण म्हणावा का? by विजुभाऊ
संस्कार होत असतात परिस्थितीचे
:-)
चांगला लेख. युके मध्ये मला
In reply to चांगला लेख. युके मध्ये मला by चावटमेला
वेगळी आणि चांगली माहिती!
In reply to वेगळी आणि चांगली माहिती! by रामचंद्र
असेच म्हणतो...
In reply to चांगला लेख. युके मध्ये मला by चावटमेला
ह्या दोन गटांमध्ये
In reply to ह्या दोन गटांमध्ये by कानडाऊ योगेशु
गुजरातमध्ये आजही जात‑पात
In reply to गुजरातमध्ये आजही जात‑पात by असा मी असामी
लोहाणा समाजाचे लोकही परदेशांत
In reply to लोहाणा समाजाचे लोकही परदेशांत by चावटमेला
हे सर्व बहुतेक कच्छी असावेत.
In reply to ह्या दोन गटांमध्ये by कानडाऊ योगेशु
काय म्हणता ?
In reply to काय म्हणता ? by सौन्दर्य
तेच म्हणायचे होते मला.
In reply to चांगला लेख. युके मध्ये मला by चावटमेला
मर्मग्राही निरीक्षण
In reply to मर्मग्राही निरीक्षण by गामा पैलवान
धन्यवाद. मर्मग्राही वगैरे
मस्त, खुसखुशीत लेख!
सर्व प्रतिसादकांचे आभार्स
मला अमेरिकेतील नाही पण
In reply to मला अमेरिकेतील नाही पण by अभ्या..
व्य नि
छान.
In reply to छान. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्यवाद सर,