बेणारे
युद्धपिपासू साम्राज्यटोळ्यांच्या
शोकसंघर्षातून गर्वल्यालेला
बधिराsकांत
तोंडी लावायला लब्धप्रतिष्ठित
सुरुंगा-तुरुंगांच्या चित्ताकर्षक
बाजारगप्पा
चिअर्स चिअर्स
आणि विद्धनजरेने पहायची
पैलतीरावरच्या
बेणारेची सुटकाधडपड
किंवा वितळून राहायचे
ऐलतीरी झारीतल्या
शुक्राचार्यासारखे
आळोखे पिळोखे देऊन
कंटाळा आल्यावरती
मात्र टाळ्या पिटून
निघून जायचे
उगाच तो आकांत
मनाला चिकटला तर काय घ्या
म्हणत म्हणत की
"अशी धडपड अनुभवायची
म्हन्जे " हौ एक्सायटिंग नै "?
१८ मे २००९, पुणे
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3252
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
क्या बात है
लौकिकार्थ
In reply to क्या बात है by सुवर्णमयी
जोरदार
ही कविता तीनचारदा वाचली पण फारसे काही हाती लागले नाही.
आवडली
२६/११ चा
भडकमकर
In reply to २६/११ चा by भडकमकर मास्तर
बेणारे ...
युद्धपिपा
कविता
पराचे
मन अस्वस्थ करणारी कविता
हेच खटकले
In reply to मन अस्वस्थ करणारी कविता by दत्ता काळे
कुणाला ही कविता समजली तर कृपया इथे