चिमण्यांना सांभाळतांना
कु..कू..कू..डीजेवर गाणं दणाणून वाजत होती.इकडे १० वर्षांची लेक काय बीट्स म्हणत कू..कू..कू..म्हणू लागली.मी म्हटलं,"अगं गप्प बस,नको म्हणू हे गाणं, हे चांगलं गाणं नाही." आधीच लेक एकपाठी आहे.थांबवल नसतं तर गाणं पाठ करून,घर दारी हेच गाणं गात बसली असती
"चांगलं नाही.काय वाईट आहे यात?" तिला ह्याच गाण्याचा द्वयार्थ ,गाण्यावरची बंदी सांगितले.ती म्हणाली " गाणं लिहिणाऱ्याला हे कळत नव्हतं का?त्याने असं का गाणं लिहिलं."
मनात म्हटलं,बाई बरं झालं तुमची पिढी मराठी जुने गाणं ऐकत नाही.नाहीतर दादा कोंडकेंची द्वयीअर्थी गाणी समजायला लागली तेव्हा लाजाने कससं व्हायचं.रविवारी दादा कोंडकेंचा सिनेमा असेल तर तो बंद करून खेळायला जात असं सांगितलं जायचं.
पण या उत्सवांच्या नावावर डीजे नावाचा बिभत्सपणा कानाच्या पडद्यापासून मनाच्या अस्तरावर ओरखडे ओढत असतो.विविध जयंती, विविध धार्मिक उत्सवात डीजे अविभाज्य भाग केला गेला आहे.इतर डीजे यात्रा तास दोन तास सहन करावी लागते.गणेशोत्सवाचा बीजे मात्र १०-११ दिवस सहनशक्तीचा अंत पाहतो.आम्ही आमच्या मुलांना कलियुगात ज्या गोष्टींपासून दूर ठेवायचा आटोकाट प्रयत्न करतो.तेच वातावरण आमच्या घरात न मागता कर्कश आवाजात पोहचवले जात आहे.
यामागची राजकीय, आर्थिक गणित इतकी गुंतागुंतीची झाली आहेत की सामान्यांसाठी हे उत्सव वाहतूक, सुरक्षितता,शांतता , स्वच्छता इ.अनेक सोयींची वाट लावत आहे.बरं चांगले शिकले सवरलेलेही याला धार्मिक, सामाजिक विरोध समजून या अनिष्टाला कुरवाळणारेही आढळतात.
माझ्या लहानपणी घरात गणपती बसवला जात नसे.त्यामुळे सार्वजनिक गणपतीच्याच आठवणी या माझ्या गणेशोत्सवाच्या आठवणी आहेत.झांज आणि लेझीमचा नाद, वकृत्व-निबंध-चित्रकला स्पर्धेंची रेलचेल असायची."कशी चिक मोत्यांची माळ" या गाण्यावर नृत्य स्पर्धेत भाग ठरलेला असायचा.तर झाशीची राणी होतं वेशभूषेत भाग घेतला जायचा.नक्की मी सध्या चुकीच्या वेळी जगतेय किंवा चुकीच्या ठिकाणी आहे की चुकीच्या मानसिकतेमध्ये आहे असं काहीतरी मनात तराळते.पण स्वतः वर विश्वासही आहे तेव्हा वाटतं
'मला माझा गणराय परत द्या असंच म्हणावं वाटतं.'
मग परत वातावरण ऐकण्यासाठी योग्य झालंय तर तिला १८ वर्षांच्या मुलीने डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पाळी थांबवण्यासाठी हॉर्मोन्स गोळ्या ३ दिवस घेतल्या.पण त्यात गुंतागुंत होऊन ती डीप थ्रॉंबोसिस होऊन ती वारली.हे सर्व एका पुजेसाठी तिला सामील होता यावं म्हणून केलं.सुनिता विल्यम्स अंतराळात पोहचली पण तिच्याच वंशातल्या मुली पाळीला विटाळ समजतात??जीवाचे मोल अनिष्टता पाळण्यासाठी दिले गेले.
लेक म्हणाली "छे आई ,पिरियडर वाईट नसतात.देवाला त्याचा प्रॉब्लेम नसतोच."
म्हटलं "हो राणी ,पण आजही बाईचे पिरियडर आणि प्रथेची गुंतागुंत अनेक खेडोपाड्यात रूजलेली आहे."
उत्सव हे आयुष्यात वाटेतल्या पथदिव्यांसारखे असतात.उगाच अंधारल्या सारख्या भासमान प्रसंगात पुढे चालायचे बळ देतात.आजकाल ते अंधाराचे कोश फेकत राहतात.अशावेळी आपण आपल्या घरातल्या चिमण्यांना सांभाळून ठेवावं लागतं .
-भक्ती
वाचने
3117
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
खरं बोललात. कदाचित वेगळा विषय
In reply to खरं बोललात. कदाचित वेगळा विषय by नचिकेत जवखेडकर
तेच तर या पिढीत सहजता वाटते
देव जेव्हा पैसेवाल्यांचा होतो
In reply to देव जेव्हा पैसेवाल्यांचा होतो by कंजूस
+१
घरात खेळीमेळीचे वातावरण....
In reply to घरात खेळीमेळीचे वातावरण.... by कर्नलतपस्वी
हो मोकळीक महत्त्वाची आहे.
यावरून आठवलं की मिपाचे
In reply to यावरून आठवलं की मिपाचे by कंजूस
का ओ काका वेगळे दालन कशाला?
In reply to का ओ काका वेगळे दालन कशाला? by Bhakti
वेगळे दालन होते. हेच सांगायचं
छान लेख
नक्की मी सध्या चुकीच्या वेळी जगतेय किंवा चुकीच्या ठिकाणी आहे की चुकीच्या मानसिकतेमध्ये आहे असं काहीतरी मनात तराळतेसध्याचे पालकत्व खूप आव्हानात्मक आहे. मुलांना कोणत्या गोष्टी,कधी , किती आणि कशा सांगाव्यात हे खर तर खूप मोठं आव्हान आहे.पालकत्व पूर्वी सुद्धा
In reply to पालकत्व पूर्वी सुद्धा by सुबोध खरे
सर्वात महत्त्वाचे म्हणजे
खरंच मुलांना कसं कधी काय
दे आर मेटींग
आंतर जालावरचा माहीतीचा भडीमार