✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

गुल्लक

क
कर्नलतपस्वी यांनी
Wed, 08/27/2025 - 08:58  ·  लेख
लेख
गणेशोत्सवाच्या मिपाकरांना सपरिवार हार्दिक शुभेच्छा. मिपा वाढदिवसानिमित्त संस्थापकांचे स्मरण, आभार आणी संपादक,लेखक,वाचकांचे अभिनंदन. गुल्लक..... भातुकली खेळता,खेळता केंव्हा पुढे निघून गेली लक्षातच आले नाही. अचानक आला वादळाला घेऊन गेला जपून ठेवीन मनात काळजी करू नका कानात सांगुन गेला राजा राणीचा संसार. लग्नानंतर पहिल्यांदाच आई बाबां आले. हरखून गेली. काय करू, काय नको असे झाले. तीचा आनंद तोच त्याचा परमानंद. जोडीने अदरातिथ्थ चालले होते. आई बाबांच्या डोळ्याचे पारणे फिटले. दिवस भुर्रकन उडून गेले. हुश्श!!!! राजा ताळेबंद करू लागला.जमापुंजी संपली, त्याचा चेहरा चिंताग्रस्त झाला. मनकवडी राणी बेडरूम कडे धावली, "थांब, काळजी करू नकोस, मी आलेच ..." कानावर चिरपरिचित आवाज आला,"गुल्लक फोडू नकोस बेटा". तीने इकडे तीकडे पाहीले.कुणीच नव्हते,भास होता तो. कपाटात गुल्लकच्या खाली पाचशे रूपयांच्या करकरीत नोटांच बंडल दिसले. ऐन उन्हाळ्यात श्रावणधारा बरसू लागल्या. बाहेर मोबाईलवर गाणे वाजत होते.... "ओ री चिरय्या,नन्हींसी गुडीया....". अठरा वर्षापुर्वी बाबाने घेऊन दिलेली "पिगीब्यांक", तिच्याकडे बघून हसत होती. बाप माणूस
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
1327 वाचन

💬 प्रतिसाद (5)

प्रतिक्रिया

गणेशोत्सवाच्या मिपाकरांना

पर्णिका
गुरुवार, 08/28/2025 - 02:13 नवीन
गणेशोत्सवाच्या मिपाकरांना सपरिवार हार्दिक शुभेच्छा. मिपा वाढदिवसानिमित्त संस्थापकांचे स्मरण, आभार आणी संपादक,लेखक,वाचकांचे अभिनंदन.
शुभेच्छा आणि मनःपूर्वक अभिनंदन ! अगदी अस्संच असते मुली-वडिलांचे नातं ... मन हळवं झाले ! मुक्तक आवडलंच !
  • Log in or register to post comments

मुलगी असण्या साठी परम भाग्य

गणेशा
गुरुवार, 08/28/2025 - 11:30 नवीन
मुलगी असण्या साठी परम भाग्य लागते असे माझे म्हणणे आहे. खुप्पच भावनात्मक पणे लिहिले आहे... मागे यावर काही लिहिलेले आठवले...पुन्हा लिहिल वेळ मिळाल्यावर
  • Log in or register to post comments

हृदयस्पर्शी, मन भावुक करणारं

श्वेता व्यास
गुरुवार, 08/28/2025 - 15:46 नवीन
हृदयस्पर्शी, मन भावुक करणारं लिहिलंत. गणेशोत्सवाच्या शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

छान !

हेमंतकुमार
गुरुवार, 08/28/2025 - 18:48 नवीन
मुक्तक आवडलं.
  • Log in or register to post comments

सुंदर!

Bhakti
गुरुवार, 08/28/2025 - 19:24 नवीन
सुंदर! आईवडिल देवदुतच असतात.मायाच्या सावलीचे प्रेमाचे मेघ असतात.आयुष्यभर मायेने बरसत राहतात.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा