Skip to main content

चुकले का हो ?

लेखक मूखदूर्बळ यांनी गुरुवार, 14/05/2009 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
(इलाही जमादारांच्या 'चुकले का हो ? ' ह्या अत्यंत सुंदर गझलेचे एक असुंदर विडंबन) श्वसुराला, त्रास म्हणालो, श्वसुराला, त्रास म्हणालो, चुकले का हो? मेहुणीला, 'लै खास' म्हणालो, चुकले का हो? (उरली) चिरंजीव वेदना, मस्तकी, हळहळणारी (कसली बर ? ) भाचरांना (तिच्या) , बकवास म्हणालो, चुकले का हो? बुडत्याला, तरण्यासाठी, काय लागते? जेवणावळीं, आता बास म्हणालो, चुकले का हो? खाण्याआधी, नाव सांग त्या, पदार्थाचे उल्हासात, फाल्गुनमास म्हणालो, चुकले का हो? निंदानालस्तीही, केवळ, मिळवत गेलो सासुचे, वय साठ म्हणालो, चुकले का हो? मेहुण्यास, ग्रहण खग्रास म्हणालो चुकले का हो ? पाहील्या कविता, देखील्या ग़ज़रा, गीतेस पाहीले (ह्या सगळ्या तिच्या मैतरणी बर) पत्नीला मी, फास म्हणालो, चुकले का हो? चौदा वर्ष, काढली विवाहा, उरली वंचना हाच खरा, वनवास म्हणालो, चुकले का हो? वात आप्त, आघाता टगे, अपघात मेहुणे साड्यांना तिच्या , आरास म्हणालो, चुकले का हो? चुकले का हो? चुकले का हो? म्हणणाऱ्यांनो! रचनेस माझ्या, जरा हास म्हणालो, चुकले का हो? (चु भू द्या घ्या )
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 1574
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया