कळिकाळाच्या हिंदोळ्यावर
मीपण जळले रुसले तुटले
अद्वैताच्या पुण्याईशी
ललाटरेषा जुंपून घेते
पुन्हा विखारी तल्लख अडसर
अर्थव्यथेचे फ़ासे फ़सले
प्राणपाखरू उडता उडता
काय राहिले, कोणी न उरले
१७ मे २००९, पुणे
________________________________________
एका गरीब रुग्णाच्या कुटुंबाला मोठ्या शस्त्रक्रियेसाठी आर्थिक ताकद नसल्याने कठीण परिस्थितीतून जावे लागले, तो प्रसंग पाहिल्यानंतर त्या आठवणीत लिहिलेली ही कविता आहे..... यापेक्षा अधिक स्पष्टीकरण देणे मला अशक्य आहे....
... माझ्या या आधी लिहिलेल्या इतर कवितांप्रमाणेच या कवितेतूनही इथला सूज्ञ वाचक करमणूक किंवा डोकेदुखी शोधेल याची खात्री आहे. ... असो... जो जे वांछील तो ते लाभो, इतकेच म्हणते...
Taxonomy upgrade extras
वाचने
3295
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान!!!
पहिल्यांदा तुमची कविता समजली
+१
In reply to पहिल्यांदा तुमची कविता समजली by लवंगी
+२
In reply to +१ by ब्रिटिश टिंग्या
शब्दवैचित
कविता छान
सुबोध करण्याच्या प्रयत्नांनी
सहमत. धनंजय
In reply to सुबोध करण्याच्या प्रयत्नांनी by धनंजय
सॉरी पण
+१
In reply to सॉरी पण by भडकमकर मास्तर
ढेमसं हे
In reply to सॉरी पण by भडकमकर मास्तर
हे छान
In reply to ढेमसं हे by नितिन थत्ते
आवडली ही
कविता फरशी