Skip to main content

प्रश्न : Is: O ⊆ I ?

लेखक प्रसाद गोडबोले यांनी गुरुवार, 26/06/2025 02:27 या दिवशी प्रकाशित केले.
प्रश्न: Is: O ⊆ I ? व्याख्या • समजा I : त्या सर्वच्या सर्व शब्दांचा संच जे की LLM ला ट्रेन करताना वापरले गेले आहेत. • समजा O : त्या सर्व मानवी बुद्धिमत्तेला आकलन करता येईल अशा, अर्थपूर्ण शब्दांचा संच जे LLM जनरेट करू शकेल. प्रश्न असा आहे की O हा I च सब सेट असेल की सुपर सेट ? --- क्रमशः

वाचने 1360
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

मिपा वर असलेले सदस्य आणि एका सदस्याची आठवण काढणारे सदस्य या पैकी कोणता सेट हा सब्सेट असेल?

उत्तर मिळाले,"आपण एज बार झाले असल्याने आपल्याला समजेल असे उत्तर मला देता येत नाही,कृपया क्षमस्व ". हलकेच घ्या. बादवे, कृबू=चाटगपट =जेमिनी=मेटा, तर यातील कोण मोठा शेठ आणी कोण छोटा शेठ

इथे (अ)" सर्व मानवी बुद्धिमत्तेला आकलन करता येईल अशा गोष्टी" ही अट घातली गेली आहे. म्हणजे इतर (ब)कंपुटरला समजणाऱ्या गोष्टी, फक्त काही बुद्धिमान लोकांनाच समजणाऱ्या किंवा या क्षेत्रात विशेष अभ्यासकांनाच समजणाऱ्या गोष्टी अंतर्भूत नाहीत. त्या सर्व (अ) + (ब) धरून set I हा सुपरसेट आहे तर फक्त(अ) असणारा छोटा सब सेट आहे. (( अवांतर उदाहरण special theory of relativity ही संकुचित गोष्टींनाच लागू होते. तर general theory of relativity अधिक गोष्टींचा व्यापक विचार करते/ गोष्टींना लागू होते. म्हणजे special set हा general चा लहान भाग ठरतो.)) पण प्रश्नाचा रोख कळला नाही.

In reply to by कंजूस

त्या सर्व मानवी बुद्धिमत्तेला आकलन करता येईल अशा, अर्थपूर्ण शब्दांचा संच
>>> मला जे लिहायचे होते ते असे होते - त्या सर्व शब्दांचा संच जे मानवी बुद्धिमत्तेला आकलन करता येईल अशा, अर्थपूर्ण शब्दांचा संच. सर्व मानवांना आकलन करता येतील असे शब्द म्हणायचे नव्हते. सर्व शब्द जे कोणातरी एका तरी माणसाला आकलन करता येतील असे म्हणायचे होते. तत्वज्ञानावर लिहायचे म्हणजे शब्द फार मोजून मापून वापरायला लागतात , व्याकरणाकडे लक्ष द्यायला लागते , तरीही अनवधानाने अशा चुका होतातच. चूक ध्यानात आणून दिल्याबद्दल धन्यवाद !

व्याख्येचा साध्या मराठीत असा अर्थ आहे का ? • समजा I : LLM ला ट्रेन करण्याकरीता वापरल्या गेलेल्या सर्व शब्दांचा संच. • समजा O : LLM जनरेट करू शकणाऱ्या आणि मानवी बुद्धिमत्तेला आकलन करता येण्याजोग्या अर्थपूर्ण शब्दांचा संच असं असेल तर I सुपरसेट असेल, कारण O मध्ये अजून एक फिल्टर वाढला आहे.