✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

घनदाट, घनगर्भ अंधार दाटून येतो

उ
उपेक्षित यांनी
Fri, 06/20/2025 - 11:42  ·  लेख
लेख
कधीतरी मनात आतून अंधार दाटून येतो तो इतका दाट असतो की डोळ्यात बोट घातले तरी काही म्हणता काहीच दिसत नाही मग आस लागते त्या किरणांची जी या घनगर्भ अंधाराला दूर सारून शांत, शीतल असा प्रकाश शिंपडून जातील. पण हे क्षणा क्षणाच वाट पाहणं असह्य होत जात, अस वाटत की त्या अमरत्वाचा शाप मिळालेल्या अश्वत्थाम्या प्रमाणे आपल्याला पण हा युगानु युगे वाट पाहण्याचा शाप मिळालेला आहे का ? एक एक क्षण एकेका युगाप्रमाणे भासतो आहे. या अंधाराचे छातीवर असह्य दडपण आलं आहे ज्यामुळे श्वास घेणं देखील दुर्धर झालंय. हळू हळू जाग येत आहे, दुरून कुठूनतरी पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत आहे, बेफामपणे कोसळणाऱ्या एखाद्या जलप्रपाताचा आवाज देखील त्यात मिसळलेला आहे. पण अजूनही डोळ्यासमोर दाटून आलेला हा अंधार .... घनदाट, घनगर्भ उपेक्षित...
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वाङ्मय
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
1280 वाचन

💬 प्रतिसाद (3)

प्रतिक्रिया

कधीतरी मनात आतून अंधार दाटून येतो.

कर्नलतपस्वी
Fri, 06/20/2025 - 17:32 नवीन
अंधार असा घनभारी चन्द्रातुन चन्द्र बुडले स्मरणाचा उत्सव जागुन जणु दुःख घराला आले दाराशी मी बसलेला दुःखावर डोळे पसरुन क्षितिज जसे धरणीला श्वासानी धरते उचलुन विश्रब्ध किनारे दूर जाऊन कुठे मिळताती जणु ह्रिदयामागुन माझ्या झाडांची पाने गळती नाहीच कुणी अपुले रे प्राणांवर नभ धरणारे दिक्काल धुक्याच्या वेळी हृदयाला स्पंदविणारे -कविवर्य ग्रेस क्षणा क्षणाच वाट पाहणं असह्य होत जात अगदी खरं. ग्रेसांचा पंखा.
  • Log in or register to post comments

क्या बात है सरजी,

उपेक्षित
Mon, 06/30/2025 - 18:58 नवीन
क्या बात है सरजी, या आधी वाचली नव्हतं, धन्यवाद ओळख करून दिलीत आपण. गेल्या महिन्यात हास्पिटलात ऍडमिट होतो त्या वेळी मनात आलेलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

हि कवीता बहुतेक..

कर्नलतपस्वी
Fri, 06/20/2025 - 17:33 नवीन
आई गेल्यावर लिहीली असावी. असा अंधार तेव्हांच दाटून येतो.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा