Skip to main content

९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, दिल्ली २०२५

लेखक प्रसाद गोडबोले यांनी रविवार, 23/02/2025 14:19 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार ! ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०२५ दिल्ली येथे पार पडत आहे ! मिसळपाव हे आपले इतके प्रसिध्द आणि मराठी भाषेतील साहित्याला वाहिलेले अग्रणी संकेतस्थळ ! असे असुनही इथे साहित्य संमेलनावर , अध्यक्षीय भाषणावर चर्चा करायला , वाद विवाद करायला , काथ्याकुट करायला लेखन नाही हे पाहुन एक मिपाकर म्हणुन शरम वाटली ! तस्मात हा लेखनाचा धागा सुरु करत आहोत ! फुल्ल मजा चालली आहे तिथे ! या गप्पा मारायला . डोन्ट स्किप धिस एन्टरटेन्मेंट ! या ! वेलकम !

वाचने 5310
प्रतिक्रिया 27

प्रतिक्रिया

In reply to by प्रसाद गोडबोले

ह्या चित्रात माउली आणि तुकाराम बोवा ह्यांची चित्रे नाहीत. politically correct chitra.

In reply to by श्रीगुरुजी

गोडबोले साहेबांनी, शाहू फुले आंबेडकर, असे सर्च करून, जे चित्र पाहिले मिळाले, ते इथे डकवले... प्रतिभा पाटील, वैगरे कडे लक्ष द्यायला त्यांना पुरेसा वेळ मिळाला नसेल... राम...

In reply to by आंद्रे वडापाव

वरील प्रतिसादाबद्दल मनःपुर्वक धन्यवाद आंद्रे वडापाव ! वरील प्रतिसाद हा तुमच्या पुर्वग्रहदुषित पराकोटीच्या व्यक्तिद्वेषाचा ढळढळीत पुरावा आहे ! सदरहु चित्र हे अन्यत्र कोठुनही घेतलेले नसुन खुद्द ९८वाच्या साहित्य संमेलनाच्या अधिकृत वेबसाईट वरुन घेण्यात आले आहे . ही घ्या लिंक - https://abmssdelhi.org/ जराशी शोधाशोध केले असते तर त्य्मचे तुम्हालाच सापडले असते हे संकेतस्थळ , पण असो , त्यात तुमचा दोष नाही , कारण गट -१ आणि गट - २ ही विभागणी कृत्रिम नसुन नैसर्गिक आहे , तुम्ही त्याला काहीही करु शकत नाही . गोडबोलेंनी काहीही लिहिलं की त्याला विरोध आणि केवळ विरोधच करणे ही तुमची नैसर्गिक वृत्ती आहे , उर्मी आहे ! आणि म्हणुनच मी तुम्हाला , गट-२ ला धन्यवाद म्हणतो कारण अशा वृतीमध्ये , अशा वृत्तीच्या लोकांमध्येही , त्यांच्या प्रतिसादांमध्ये राम पाहणे हीच खरी परिक्षा आहे , साधना आहे ! असो. आताही चुक मान्य न करता ह्या प्रतिसादालाही विरोध करणारा काहीतरी उपप्रतिसाद द्या =)))) राम

In reply to by प्रसाद गोडबोले

अरे वा, सिंगल आऊटपूट न्यूरलनेटवर्क मध्ये सुधारणा करून , ड्युअल-आऊटपूट क्लासिफिकेशन न्यूरलनेटवर्क आलं म्हणायचं ... (राम + गट १ क्लासिफाइड) (राम + गट २ क्लासिफाइड) _/\_

In reply to by आंद्रे वडापाव

राम ! =)))) हेच अपेक्षित होतं तुमच्याकडून ! जन देव तरी पाया चि पडावे | त्याचिया स्वभावे चाड नाही ||१|| अग्नीचे सौजन्य शीतनिवारण | पालवी बांधोनि नेता नये ||२|| तुका म्हणे विंचु सर्प नारायण | वंदावे दुरोन शिवो नये ||३|| https://www.youtube.com/shorts/_XNegCENn2o राम !

पवार साहेबांनी आव मोठा आणला होता, परंतु आयत्यावेळी कच खाल्ली. सोबत दोघांना व्यासपीठावर आणून त्यांचा पद्धतशीरपणे अपमान झाला हे बघून खुष झाले असतील.

मी अकरा मिनिटांचे भाषण ऐकले. https://www.facebook.com/share/v/18NrTATHgL/?mibextid=D5vuiz अहाहा! खरोखर खूपच अप्रतिम भाषण झाले. गोषवारा असा होता. भाषा जैविक आहे.बोलीभाषेने , संतांच्या काव्याने ती जिवंत राहिली.आमचे संत हे खरे पुरोगामी होते. महाराष्ट्राला त्यांनी बळ दिले.असा संतांनी घडवलेला महाराष्ट्रात शिवाजी महाराजांना अनेक मावळे याच भाषेच्या श्रीमंतीमुळे मिळाले.आईने बाळाला ऐकवली पहिली ओवी म्हणजे या भाषेचा उगम आहे.-डॉ.तारा भवाळकर दुसरे पूर्ण १ तासांचे भाषण ऐकायचे राहिले आहे,ऐकेन लवकर.

मिपा वरील स्त्री वाचक याना, बीबीसी युट्यूब चॅनेल वर, साहित्य संमेलन अध्यक्ष, तारा भवाळकर, यांच्या मुलाखतीचा ९ ~१० मिनिटाचा तुकडा पहा ही विनन्ति... "बापाला बापपण सिद्ध करावं लागतं"....

In reply to by आंद्रे वडापाव

https://youtu.be/HWAuiSPJZJE?si=xK0XHTgmQog4o1ad तूच बाप आहेस खात्री आहे का? _/\_की नुसता अधिकार गाजवायचा? यात त्यांनी पुरुष नाटकाचा उल्लेखही केला आहे.बहूदा सध्या जे पोंक्षेंचे जे नाटक 'पुरुष' नाटक सुरू आहे,ते हेच आहे का? हे नक्की माहीत नाही पण बकेट लिस्टमध्ये हे नाटक पाहायचे नक्की आहे. होय,निर्मिती करण्यांत इतर वर्गांमध्ये स्त्री देखील समाजव्यवस्थेत नकळत कशी बळी पडते -स्वीकारून कौतुकबळी वा इतर मार्गी हे कित्येकांना कळतही नाही.सध्या तर पाश्चात्य फिलॉसॉफी ऐकतेय, भारतीयही ऐकतेय,मनात अगदी समुद्रमंथन सुरू आहे,पाहते विष बाहेर पडते वा अमृत!

ते अजैविक जन्माबद्द्ल ऐकलं का कोणी ? बाईंनी शालजोडीतले हाणले म्हणून बर्‍याच पेप्रांत छापून आलं होतं म्हणे. बाकी कुणी नाहितर मिपावरील काही सभासदांनी नक्किच ऐकलं असावं.

In reply to by धर्मराजमुटके

बाकी कुणी नाहितर मिपावरील काही सभासदांनी नक्किच ऐकलं असावं.
"नॉनबायोलॉजिकल इंटरनॅशनल डंकापती" , सुनके फ्लावर समझे क्या ??? d

आमही मनोरनजन व महतवाचे विचार वाचायला लेख वाचला पण दोनही शूनय भोपळा! या लेखात. व परतीसादात पण नाही . ( कीबोर्ड बरोबर नाही क्षमसव.)

In reply to by nutanm

नीट पहा सदर लेखन हे लेख ह्या सदरात केलेले नसून काथ्याकूट ह्या सदरात केलेलं आहे. त्यामुळे इथे काहीही महत्त्वाचे (?) विचार दिलेले नाहीत. आणि प्रतिसाद नाहीत त्याला कारण कदाचित हा काथ्या इतका शुष्क आणि निरस आहे की कोणाला तो कुटायची इच्छा झाली नसावी =)))) तुम्हाला काथ्या कुटायचा असल्यास स्वागतच आहे. पूर्वी जात्यावर ओव्या म्हणायच्या तसे आपण उखळावर च्या ओव्या नावाची नवी लोकपरंपरा सुरू करू , या . =)))) अवांतर: मला लाल भोपळ्याची भाजी फार आवडते. आणि घारगेही आवडत ! त्यामुळे धन्यवाद !

मराठी साहित्य संमेलनात हजेरी लावताना निदान राजकारण्यांनी फक्त पुरणपोळीच मिळावी झणझणीत ठेचा नको असे म्हणणे योग्य नाही. नसेल सहन होत तर तिकडे जाऊच नये. साहित्यिकांनी मर्यादा पाळाव्यात असे सांगणारे हे कोण टिकोजीराव? तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, मर्यादेचे बंधन तुम्हाला लागू होते, साहित्यिकांना नाही.

साहित्य फोटो मी एकच दिवस या कार्यक्रमाला गेलो तो दिवस म्हणजे दिल्ली करांच्या 40 कवींच्या कवितेचा संग्रह छापला होता. रात्री जेवण ही फुकट मिळाले होते. हे वेगळे ग्रेटर नोइडातून तिथे जाण्या येण्याचा खर्च दोन हजार रुपयाहून जास्त झाला. बाकी मोदींचे भाषण टीव्ही वर ऐकले. नंतर कवी कट्टा ही होता. पण एवढे पैशे खर्च करून कविता वाचायला किंवा उपस्थिती लावयाला जाणे योग्य वाटले नाही. तसे ही महा विद्वान साहित्यनेत्रीचे अध्यक्षीय भाषण ऐकून हसावे की रडावे हेच कळले नाही. बाकी जे माझ्या ओळखीचे गेले त्यांच्यानुसार या सम्मेलनात महाराष्ट्रातले प्रसिद्ध साहित्यिक अनुपस्थित होते. साहित्यकार नसलेले विचारशून्य जास्त होते. पण शेठजींनी भाषणात त्यांच्या अजेंडा व्यवस्थित राबविला. तो संपूर्ण देशात पोहचला. भविष्यात सरकारने यासाठी अनुदान देऊन पैसा व्यर्थ करू नये. साहित्य 2

In reply to by विवेकपटाईत

छान आटोपशीर प्रामाणिक वृतांत ! आपली दुसर्‍या प्रचितली पटाईत छबी आवडली !
तसे ही महा विद्वान साहित्यनेत्रीचे अध्यक्षीय भाषण ऐकून हसावे की रडावे हेच कळले नाही.
आता इतक्या दिवसांनंतर उमगले असेल तर आपण "हसावे" कॅटेगिरीत गेलात की "रडावे" कॅटेगिरीत गेलात यावर सविस्तर वाचायला आवडेल !

भविष्यात सरकारने यासाठी अनुदान देऊन पैसा व्यर्थ करू नये. अगदी बरोबर! पण काहींना सरकारी खर्चाने अजेंडा राबवायचा असतो, छबी मिरवायची असते, मग भले तेथे जाऊन अपमान झाला तरी हरकत नसते.