Skip to main content
लेखक अनन्त्_यात्री यांनी सोमवार, 30/12/2024 10:57 या दिवशी प्रकाशित केले.
कवितेच्या वाटेवरती कधी झुलतो मोरपिसारा मोहवितो पांथस्थांच्या पाणवल्या, दिपल्या नजरा कवितेच्या वाटेवरती कधी विफल, विरागी राख दडलेले त्यात कधीचे धुमसते निखारे कैक कवितेच्या वाटेवरती अर्थाचा वर्ख निखळतो शब्दांचा अचपळ पारा वाटेवर विखरुनी जातो
लेखनविषय:

वाचने 1206
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

अर्थाचा वर्ख निखळतो
अर्थाचा वर्ख निखळूच शकत नाही. दॅट्स द होल पॉइंट. शब्द आणि अर्थ इतके संपृक्त आहेत , त्यांना वेगळं करताच येत नाही. असो. लिहित रहा.

हे खास आवडलं...
कवितेच्या वाटेवरती कधी विफल, विरागी राख दडलेले त्यात कधीचे धुमसते निखारे कैक