माझे संशोधन/अविष्कार - WD-40 सारखा spray!
नमस्कार मिपाकर,
सरळ मुद्द्यावर येतो. मला फार पुर्वीपासुन म्हणजे २००६, २००७ पासुन रसायनशास्त्रात पी.एचडी करायची होती. फास्ट फोर्वर्ड....ईन शोर्ट, मी खुप हातपाय मारुन मल हव्या त्या मेन्टर(रीसर्च गाईड) कडे त्या लॅबमध्ये प्रवेश ही मिळवला. परत, फास्ट फोर्वर्ड....घाणेरडे अंतर्गत राजकारण, खालच्या दर्जाचे, 'संशोधन' ह्या शब्दाला फाट्यावर मारणारे सो कॉल्ड वैज्ञानिक, नावडता विषय बदलुन न मिळणे, फेलोशिपचे फॉर्म भरुनही, पैसे नावाच साट पण न देणे ह्यामुळे मी १४ ते १५ महीन्यांनी पी.एचडीच्या सर्व स्वप्नांना पुर्णविराम दीला. व तो आध्याय बंद केला.
पण......रसायनशास्त्र हे माझे प्रेम आहे, निर्जीव गोष्टी कधी धोका नाही देत. माझे केमिस्ट्रीचे ज्ञान हे वर्षानु वर्षे तसेच राहीले व वाढतही गेले. आता अजुन शिकायला जास्त काही नाही, असही वाटायला लागल. ते असो. तर मध्ये मला 'एकिकडुन'(ईथे त्या माध्यमाचे नाव मी लिहु ईच्छीत नाही) मला खालील प्रकराचा व्हीडीओ पाठवला गेला. तो व्हिडिओ WD-40 ह्या ख्यातनाम स्प्रेचा होता व मी अगदी सेम स्प्रे 'शोधुन' काढणे अपेक्षित होते. मला साधी सायकल ही चालवता येत नाही, २००३ पासुन काही कारणाने मी बाईक, स्कुटर चालवणे बंद केले आहे. तर मला WD-40 नावाचा स्प्रे असतो हे माहीतीही नव्हते व मी कधी साधे ऐकले ही नव्हते.
https://www.youtube.com/watch?v=QLrtS0dtOn8
युट्युबवर असे खुप व्हीडीओज आहेत, खुप विविध भाषेंमध्ये आहेत. हा एक अत्यंत प्रभावी व तितकाच प्रसिध्द (जगविख्यात) स्प्रे आहे, हे मला नंतर समजले. WD-40 : Water Displacement, 40 means it was the inventor's 40th trail/attempt to reach to this perticular formulation.
ते असो, तर ते सेम formulation मी स्वःता तयार केले आहे. मला जवळजवळ एक महीना लागला. ते formulation मी त्या क्लाईंटला विकले सुध्द्दा, त्यांनी ते अक्सेप्ट केले सुध्दा, त्यांनी मी पाठवलेले सॅपल ट्राय केले सुध्दा, आणि आता बल्क मध्ये बनवत असतील सुध्दा. कोणती कंपनी, काय ब्रँडखाली सर्व चालु आहे, मला काहीही माहीती नाही. हा एक सब-कॉन्ट्रॅक्ट होता.
मी तयार केलेल्या formulation चे डेमो दाखवणारे व्हिडीओज खाली देत आहे.
https://www.youtube.com/shorts/JFRevtUpzO0
https://www.youtube.com/watch?v=1M9LmtuurDQ
https://www.youtube.com/watch?v=GZxwF_RrYxo
https://www.youtube.com/watch?v=0usxamOEQxs
https://www.youtube.com/watch?v=YipxUwp7Jq4&t=7s
मला हा स्प्रे म्हणजे पुर्ण formulation शोधुन काढेपर्यंत खुप मानसिक ताण व ईतर शारीरीक ताण, तंतोतंत तेच केमिकल्स ईथे राहुन मिळवणे व ते आणणे वगैरे खुप त्रास झाला. पण रीझल्ट आवडलाही. सर्वात महत्वाचे की ते formulation त्या क्लाईंटने ट्राय करुन स्विकारले सुध्दा.
माझा हा लेख ईथे लिहण्याचा उद्देश :
मला हाच स्प्रे मार्केटमध्ये माझा स्वःताचा प्रोडक्ट म्हणुन launch करायचा आहे. मी NDA साईन नव्हते केले, तर तो काही प्रॉब्लम नाही. मला ह्या प्रॉडक्टची कॉस्ट कटींग कशी करायची ह्याचे पुर्ण ज्ञान आहे. खुप कॉस्ट कटींग शक्य आहे. मार्केट मध्ये विकताना डिस्ट्रीब्युशन नेटवर्क व तत्सम ज्ञान सोप्पे आहे. ते असो.
मला ईथल्या माहीतीगारांकडुन खालील माहीती हवी आहे :
१) मला ह्या प्रोडक्ट साठी 'फंडींग' चे कुठले पर्याय आहेत? माझे लक्ष ७ ते १० लाख रुपये आहे. प्रत्येक युनिट सेल मागे ४५% प्रॉफीट असेल. ते पुर्ण वेगळे कॅल्क्युलेशन आहे, ते ईथे स्पष्ट करण्यात अर्थ नाही.
२) प्रायव्हेट कींवा सरकारी, प्रयत्न हमखास यशस्वी होतील, अश्या कुठल्या योजनेचा फायदा होऊ शकेल का? अश्या योजना आपल्या माहीतीत आहेत का?
३) एखादी संस्था कींवा व्यक्ती ह्या formulation मध्ये ईंटरेस्ट घेऊन भांडवल उपलब्ध करुन देऊ शकतो का, मी % प्रॉफीट ठरवायला तयार आहे.
तर मला क्रूपया ह्या बाबतीत मार्गदर्शन/मदत अपेक्षित आहे. धन्यवाद.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
एम.एस.एम.ई ह्या वेबसाईट वर
मुद्रा लोन वगैरे मिळणे खुप
सुरुवातीचा थोडाफार सेल, किमान
" मी गेलो होतो, ५० लाख फंडीग
मन्युफॅक्चरींग अगोदर आणि नंतर
मन्युफॅक्चरींग अगोदर आणि नंतर