✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

बिष्णोई,कॅनडा आणि रॉ

म
माईसाहेब कुरसूंदीकर यांनी
Sun, 10/20/2024 - 23:05  ·  लेख
लेख
'रॉ' ह्या भारतिय गुप्तचर संघटना. कामाप्रमाणे ह्या संघटनेचे काम गेली अनेक वर्षे गुप्तपणे चालत आले आहे. एवढे की इंटरनेट येउन ३० वर्षे झाली तरी ह्यांची वेबसाईट नाही.(अनेक देशांच्या गुप्तचर संघटनांची आहे). आत्ता पर्यंत केवळ पाकिस्तान कोणत्याही घातपातामागे 'रॉ'चा हात आहे असे सांगायचा. गेल्या वर्षी 'निज्जर' भारताविरुद्ध कारनामे करणार्या कॅनडास्थित खलिस्तानी समर्थकाची हत्या झाली आणि कॅनडाच्या RCMP पोलिसानी सरळ भारतिय गुप्तचर यंत्रणेवर आरोप केला. भारताने अर्थात तो फेटाळला. RCMP पोलिसानी 'आम्ही पुरावे दिले आहेत पण भारत स्वीकारायला तयार नाही' असे सांगितले. ह्यावर मात्र भारताची प्रतिक्रिया आली नाही. गेल्या आठवड्यात 'बाबा सिद्दीकी' ह्या माजी मंत्र्याची हत्या झाली आणि ह्या मागे 'लॉरेन्स बिष्णोई' ह्या गुजरातमधील तुरुंगात असणार्या गुन्हेगाराची गँग आहे असे सांगितले. एवढेच नाही तर त्याची ७० की ७०० लोकांची टोळी आहे असेही सांगितले. योगायोग असा की RCMP पोलिसानी गेल्या आठवड्यात निज्जरच्या हत्येमागे हीच 'लॉरेन्स बिष्णोई' टोळी आहे असे पत्रकार परिषदेत्च सांगितले.(https://www.youtube.com/watch?v=fcL8mDb0bqk&list=RDNSfcL8mDb0bqk&start_radio=1). गेल्या आठवड्यात अजित डोवाल ह्यांनी सिंगापूरमध्ये 'लॉरेन्स बिष्णोई हा कोठेही घातपात घडवुन आणु शकतो' असे विधान केले. https://www.tribuneindia.com/news/india/at-secret-meet-ajit-doval-told-canada-officials-of-bishnoi-reach-us-daily/ हा लॉरेन्स बिषणोई कोण? हा गेले दहा वर्षे साबरमती येथील तुरुंगात बंद आहे. मग अजित दोवाल ह्यांच्या विधानाचा अर्थ असा काढायचा की रॉ'ने ह्या बिष्णोई टोळीच्या मदतीने निज्जर ह्याची हत्या केली? आणि मग बाबा सिद्दीकीच्या हत्येमागे कोण आहे? ह्या सगळ्या प्रकारात रॉ ह्या संघटनेची अब्रु चव्हाट्यावर आली असे वातते. ह्यांच्या अधिकार्याची नावे, त्यांचे 'गुप्त' काम कॅनडाच्या पोलिसांनी जगासमोरच मांडले. त्यानंतर दूतावासात काम करणार्या अधिकांर्याच्या बदल्या ओघाने आल्या. 'जस्टिन ट्रुडो अपरिपक्व आहेत ' वगैरे चर्चा भारतिय चॅनेल्सनी चालु केल्या पण RCMP पोलिस पत्रकार परिषदेत जे भारतावर थेट आरोप करतात त्याचे काय?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11039 वाचन

💬 प्रतिसाद (92)

प्रतिक्रिया

जान कार मिपा कर लोक यान्च्या

जावा फुल स्टॅक
Mon, 10/21/2024 - 10:56 नवीन
जान कार मिपा कर लोक यान्च्या पर्तिसादा च्या परतिक्शेत आहे मि लिहु शकत नाही --- प्याट्रीक झेड कांदा लिंबू अहिरावण नाठयाळा ग्रेटथीण्कर वैग्रे ऐदी परत अनुन द्यावे हि विनन्ति
  • Log in or register to post comments

श्री जावा फूल स्टॉक ह्यांच्या

अमरेंद्र बाहुबली
Mon, 10/21/2024 - 11:04 नवीन
श्री जावा फूल स्टॉक ह्यांच्या मागणीनुसार वरील आय डी मिपाने सक्रिय कराव्यात अशी विनंती करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जावा फुल स्टॅक

सदर घटनांत वेगळे काय घडले आहे?

वामन देशमुख
Mon, 10/21/2024 - 11:56 नवीन
माईसाहेबांच्या यांना नमस्कार. प्रकृती कशी आहे?
ह्या सगळ्या प्रकारात रॉ ह्या संघटनेची अब्रु चव्हाट्यावर आली असे वातते.
लेखातून नेमके काय सांगायचे आहे हे कळत नाही. एखाद्या देशाच्या गुप्त संघटनेवर किंवा तिच्या विवक्षित अधिकाऱ्यांवर (तथाकथित पुरावे देऊन वा न देता) काही विशिष्ट आरोप करणे म्हणजे अब्रू चव्हाट्यावर येणे असे म्हणता येणार नाही. अनेक देशांच्या अश्या संघटनांवर असे आरोप नेहमीच होत असतात आणि त्या त्या देशांची सरकारे सोयीनुसार ते आरोप फेटाळतात किंवा मौन धारण करतात. सदर घटनांत वेगळे काय घडले आहे?
  • Log in or register to post comments

वामन

माईसाहेब कुरसूंदीकर
Mon, 10/21/2024 - 12:25 नवीन
वामनराव, ह्याआधी पाकिस्तान वगळता कोणी 'रॉ' वर उघडपणे आरोप केले होते का? आणि अशा प्रकारच्या चर्चा उघडपणे दुसरा देश करत होता का? अगदी ८०च्या दशकातील उदाहरण घ्या. 'रॉ' प्रभाकरन आणी त्याच्या LTTE ला भारतात ट्रेनिंग देते असे आरोप व्हायचे पण श्रीलंकन पोलिसानी/सरकारने कधी तशी जाहीर भूमिका घेतली नाही. कारण ठोस पुरावे नव्हते किंवा रॉने ट्रेनिंग दिलेही नसेल. अगदी पाकिस्तानचे उदाहरण घ्या. पाकिस्तानातील घातपाती कारवायात 'रॉ'चा सहभाग असतो असे पाकिस्तान म्हणतो पण कधी पत्रकार परिषद घेउन "हे घ्या पुरावे' म्हंटलेले नाही. फक्त त्यांच्या चॅनेल्सवर चर्चा चालते तशी. ह्यावेळी परिस्थिती वेगळी आहे. कॅनडाचे पोलिस पत्रकार परिषद घेउन "निज्जरला बिष्णोई टोळीने 'रॉ'च्या सहय्याने मारले आहे. भारतीय दुतावासातील अधिकारी ह्यात सहभागी आहेत. आणि त्याचे पुरावे आम्ही भारताला दिले आहेत' असे धडधडीत बोलतात. फरक कळतोय का आता? 'रॉ'च्या आणि भारतीय परराष्ट्र खात्यावर हे प्रशन्चिन्ह नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

आचार (मराठी)सहिंता लागू आहे.

कर्नलतपस्वी
Mon, 10/21/2024 - 11:59 नवीन
आपण कतार मे है,प्रतिक्षा करे..... हलकेच घ्या.
  • Log in or register to post comments

काहीही असले जरी तरीही जगातला

गवि
Mon, 10/21/2024 - 12:26 नवीन
काहीही असले जरी तरीही जगातला कोणताही देश असे अधिकृत मान्य करणे शक्य आहे का की हो बुवा, आमचाच हस्तक अन्य देशांत असे प्लॉटिंग प्लॅनिंग करत होता?
  • Log in or register to post comments

अमेरिकेत fbi ने पण एका भारतीय

कॉमी
Mon, 10/21/2024 - 13:25 नवीन
अमेरिकेत fbi ने पण एका भारतीय एक्स ऑफिसरला चार्ज केले आहे पन्नूच्या खुनाच्या प्रयत्नासाठी. तिथे भारताने मवाळ भूमिका घेतली आहे. अर्थात अमेरिकेने सरकारच्या सहभागाबद्दल काही आरोप केला नाहीये, जो कॅनडाने केला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

खरे आहे

माईसाहेब कुरसूंदीकर
Mon, 10/21/2024 - 14:08 नवीन
Justice Department Announces Extradition of Indian National Charged in Connection with Foiled Plot to Assassinate U.S. Citizen in New York City https://www.hindustantimes.com/india-news/us-indicts-ex-raw-man-over-plot-to-kill-pannun-101729275868345.html निखिल गुप्ता ह्या रॉच्या अधिकार्याला अमेरिकेने चेक रिपब्लिक येथुन पकडुन अमेरिकेत आणला आणि आता खटला चालु आहे. मुद्दा रॉने काय करावे किंवा करू नये हा नाही तर अशा संस्था आणि आपले परराष्ट्र खाते ह्यांच्यात काही तणाव निर्माण झाले आहेत? लॉरेन्स बिष्णोई गेले दहा वर्षे गुजरातमधील साबरमती तुरुंगात बंदिस्त आहे पण अजित दोवाल म्हणतात- 'तो काहीही करू शकतो'. असे विधान पाकिस्तान्,बांग्लादेशमधुन आले असते तर काही वाटले नसते पण अजित दोवाल? तो काहीही करू शकतो म्हणजे त्याला तुरुंगात सगळ्या सोई पुरवण्यात येत आहेत, असेच त्यांनी अप्रत्यक्षरित्या सांगितले आहे ना? की आता कॅनडा/अमेरिका थेट पुरावे देणार ह्याची खात्री पटल्याने बिष्णोईला पुढे करायचा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

माईसाहेब, तुमचं म्हणणं खरंय,

अमरेंद्र बाहुबली
Mon, 10/21/2024 - 13:57 नवीन
माईसाहेब, तुमचं म्हणणं खरंय, रॉ ची अब्रू खर्च चव्हाट्यावर आलीय. मला वाटतं अजित डोभाळासांसारखे कुचकामी अधिकारी सरकारी आशिर्वादाने अनेक ठिकाणी पेरले गेलेत, त्याची फळे आज आपण भोगतोय. गुप्तचर संघटना तीच जी मोठमोठे कांड करूनही डाव्या हाताचे उजव्या हाताला कळू देत नाही. पाकिस्तानी गुप्तचर संस्थेला आपली रॉ नेहमी भारी पडत आले असायची. पण सध्या अमेरिका कॅनडात रॉ अधिकारी सापडलेत. सबळ पुराव्यांशिवाय कॅनडा सारखा देश आरोप करणे अशक्य आहे.
  • Log in or register to post comments

पण सध्या अमेरिका कॅनडात रॉ

चौकस२१२
Mon, 10/21/2024 - 15:01 नवीन
पण सध्या अमेरिका कॅनडात रॉ अधिकारी सापडलेत. सबळ पुराव्यांशिवाय कॅनडा सारखा देश आरोप करणे अशक्य आहे. एकूण आनंद झालेला दिसतोय एकदा एखादा निहंगा तुमच्या मागे तलवार घेऊन लागला कि फाटेल तेवहा समजेल ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

मी इथे सुरक्षित आहे

अमरेंद्र बाहुबली
Mon, 10/21/2024 - 16:52 नवीन
मी इथे सुरक्षित आहे निहांग्याच्या भीतीने ऑस्ट्रेलियात तूमची फाटली नसेल अशी आशा आहे. फाटली असेल तर इकडे परत या. पैसा पैसा किती करायचा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

मी इथे सुरक्षित आहे ...

चौकस२१२
Tue, 10/22/2024 - 06:46 नवीन
मी इथे सुरक्षित आहे ... कारण तुम्ही बहुसंख्यानक आहात निहांग्याच्या भीतीने ऑस्ट्रेलियात तूमची फाटली नसेल अशी आशा आहे. ओके म्हणजे तूंमचा पाठिंबा दिसतोय तर तिरंगा काढून वरती निहांगा झेंडा किंवा पिवळं झेंडा फडकवयाला .. नक्की भारतीय नागरिक आहत का हो ? गटारी प्रतिसाद , परत परत ऑस्ट्रेल्या वैगरे काढणे ... काय म्हणतोय ते नाही बघणार पैसा पैसा किती करायचा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

पैसा पैसा किती करायचा?

चौकस२१२
Tue, 10/22/2024 - 06:57 नवीन
पैसा पैसा किती करायचा? एक भ्रामक समजूत , "जो प्रत्येक जणभारत सोडून जातो तो केवळ पैशा करीता जातो ! आणि अर्थातच त्या मुलळे त्याचे / तिचे भारतावर प्रेम तर नसतेच पण भारतावर राग असतो ,,,हा हा हा " असो मूळ विषय"काम कसे काय " हा आहे पण अर्थात बाहुबलींनी नेहमी प्रमाणे "ऑस्ट्रेल्यात कसे वैगरे गरळ ओकलीच" आपल्या पातळीवर जाऊन सांगतो ... इकडे बरे आहे उन्हाळ्यमुळे , ढुंगा पुसायला मलबरीची पाने जरा कमी झाली आहेत बाकी ठीक बर निहानग्यांमुळे फाटली तर शिव्यायला मेड इन इंडिया मजबूत धागे आहेतच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

बरयं, आपल्यासारखे ॲडव्हायजर सरकार सोबत नाहीत.

कर्नलतपस्वी
Mon, 10/21/2024 - 20:56 नवीन
अजित डोभाळासांसारखे कुचकामी अधिकारी सरकारी आशिर्वादाने अनेक ठिकाणी पेरले गेलेत, त्याची फळे आज आपण भोगतोय. गुप्तचर संघटना तीच जी मोठमोठे कांड करूनही डाव्या हाताचे उजव्या हाताला कळू देत नाही. आत्मपरीक्षण करण्याची सुवर्ण संधी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

कर्नल साहेब आपल्या मताचा आदर

अमरेंद्र बाहुबली
Mon, 10/21/2024 - 22:31 नवीन
कर्नल साहेब आपल्या मताचा आदर आहे. पण डोभाळ हे भारतीय अधिकारी कमी नी भाजप कार्यकर्ताच जास्त वाटतात. मला वाटत निवृत्तीनंतरच्या खासदारकीसाठी किंवा मंत्रिपदासाठी ते काम करत असावेत. अनेक उत्तमोत्तम अधिकाऱ्यांनी पाकिस्तानात कामे केलीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

अबा, धन्यवाद.काही तथ्य आत्मपरीक्षण करण्या साठी.

कर्नलतपस्वी
Tue, 10/22/2024 - 06:02 नवीन
श्री डोभाल,79 वर्षाचे सेवानिवृत्त वरिष्ठ नागरीक यांचा कार्यकाल, 1968-अवघ्या तेविसाव्या वर्षात पोलीस अधिकारी. 1972-केवळ चार वर्ष सेवा असतानाकाँग्रेस सरकार ने केरळ,राज्य सेवे मधून केद्रिंय सेवेत उचलले. 1988-काॅग्रेस सरकारने सर्वोच्च सैन्य पदक किर्ती चक्र प्रदान केले. एकमेव पोलीस अधिकारी. 2005-काॅग्रेस सरकार ने डायरेक्टर आय बी, सर्वोच्च गुप्तचर विभागातील सर्वोच्च पदावर नियुक्त केले. अशा काँग्रेस सरकार ने रूजवलेल्या वाढवलेला गुणवंत अधिकारी , 1968 ते 2014 पर्यंत काँग्रेस सरकार बरोबरच काम करणारा गुणवंत आज कसा बरे कुचकामी ठरतो? निवृत्तीनंतरच्या खासदारकीसाठी किंवा मंत्रिपदासाठी ते काम करत असावेत. अशा गुणवंत अधिकाऱ्याला काॅग्रेस सरकारने खासदार का नाही बनवले? मिलियन डाॅलर प्रश्न...... मी डोभाल याची पाठराखण करणारा वगैरे काही नाही. केवळ विचार किती उथळ आणी पूर्वग्रह दुषित असू शकतात हे दाखवायचे आहे. राजकीय मतभेद असणार हवेत पण त्या साठी एखाद्या योग्य व्यत्कतीला कुचकामी,नाकारा समजणे पटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

श्री डोभाल, 1968 ते 2014

चौकस२१२
Tue, 10/22/2024 - 06:59 नवीन
श्री डोभाल, 1968 ते 2014 पर्यंत काँग्रेस सरकार बरोबरच काम करणारा गुणवंत आज कसा बरे कुचकामी ठरतो? | कर्नलतपस्वी यांनी चेंडू अटकेपार फाटकावला आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

डोभोळ हा आजवरचा सर्वश्रेष्ठ

विवेकपटाईत
Wed, 10/23/2024 - 09:21 नवीन
डोभोळ हा आजवरचा सर्वश्रेष्ठ अधिकारी आहे. रॉ या घटकेला अधिक शक्तीशाली झालेली आहे. त्यामुळेच असले बिन बुडाचे आरोप रॉ वर होत आहे. निज्जर हत्या खालीस्तान्यांच्या आपसी विवादामुळे झालेली आहे. भारताचा त्यात कोणताही हात नाही. पण थोक व्होट बँकसाठी भारतावर खोटा आरोप आहे. 23 जागांवर सिख जिंकलेले आहेत. जसे मुंबई हलल्या मागे हिंदू आतंकी होते असे पुस्तक ही पब्लिश झालेले आहे. पोलिस अधिकार्‍यांच्या हत्या मागे त्यांचाच हात आहे असे विधान आपल्याच देशातील अनेक राजनीतिक दल (दिग्विजय सिंह) इत्यादींने केले आहे. व्होट बँक साठी हिंदू आतंकवाद सिद्ध करण्यासाठी युपीए अनेकांवर खोटे आरोप लावले होते. ते कोर्टात सिद्ध झाले नाही हे वेगळे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

डोभोळ हा आजवरचा सर्वश्रेष्ठ

अमरेंद्र बाहुबली
Wed, 10/23/2024 - 17:30 नवीन
डोभोळ हा आजवरचा सर्वश्रेष्ठ अधिकारी आहे. ते रॉ ची वेशीवर टांगली गेलेली अब्रू पाहून दिसतच आहे. जसे मुंबई हलल्या मागे हिंदू आतंकी होते असे पुस्तक ही पब्लिश झालेले आहे. पुस्तक प्रकाशित करणारा कृपाशंकर भाजपात आहे. सत्तेसाठी लाचार झालेला भाजप पक्ष कृपाशंकर ते सावरकरांचा अपमान करणार्याना पक्षात घेऊन पदे नी आमदार/खासदारक्या देतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

आपण महान आहातच .. तरीही ....

सुक्या
Tue, 10/22/2024 - 05:00 नवीन
सबळ पुराव्यांशिवाय कॅनडा सारखा देश आरोप करणे अशक्य आहे.
थोडे धुन्डाळले तर महान त्रिदेव ह्यानी पण आमच्याकडचे जे काही पुरावे आहेत ते भारताला दिले नाहीत असे म्हणाले आहेत. त्यांची ती मुलाखत जालावर उपलब्ध आहे. त्यांचे म्हणने असे आहे की. "आम्हाला (म्हणजे कॅनडा पोलिस) असे आधळले आहे की भारताचा निज्जर हत्येत हात आहे. पण सबळ पुरावे नाहीत म्हणुन तुमच्या कडे जी माहीती आहे (इंटेलिजन्स) ती आम्हाला द्या किवा आपण दोघे बघु म्हणजे पुरावे मिळतील" हा ट्रुडो म्हणजे कैच्याकै आहे. गंम्मत म्हणजे भारतात सुध्ढा त्याला सपोर्ट करणारी मंडळी आहेत. सोप्या भाषेत सांगायचे तर भारतात देशविघातक लोक भरपुर आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

त्यांचे म्हणने असे आहे की.

कॉमी
Tue, 10/22/2024 - 07:53 नवीन
त्यांचे म्हणने असे आहे की. "आम्हाला (म्हणजे कॅनडा पोलिस) असे आधळले आहे की भारताचा निज्जर हत्येत हात आहे. पण सबळ पुरावे नाहीत म्हणुन तुमच्या कडे जी माहीती आहे (इंटेलिजन्स) ती आम्हाला द्या किवा आपण दोघे बघु म्हणजे पुरावे मिळतील"
मला समजले त्यानुसार त्याचे हे वक्तव्य २०२३ मध्ये त्यांना काय माहित होते ह्याबद्दल आहे. सध्या त्यांच्याकडे पुरावे आहेत कीं नाहीत ह्यावर ते वक्तव्य नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

अजुनही निज्जर प्रकरणात कुठेही

सुक्या
Tue, 10/22/2024 - 12:54 नवीन
अजुनही निज्जर प्रकरणात कुठेही सबळ पुरावे नाहीत. आर सी एम पी अजुनही तपास चालु आहे जास्त बाबी सार्वजनिक करता येणार नाही म्हणुन बाता लपवते आहे. परराष्ट्र मंत्री डीटेल आर सी एम पी ला विचारा वगेरे बोलुन प्रश्न टाळत आहेत. ही सगळी धावपळ त्रुडो राजकारनात राहण्यासाठी करतो आहे हे समजण्याईतके लोक दुधखुळे नाहीत. असो. बाकी तुम्हाला कुठल्या देशाला सपोर्ट करायचा तो तुमचा प्रश्न आहे. आम्ही मात्र खलिस्तानि झेन्डा दिसला की गाडीच्गा खच्चुन होर्न वाजवतो. निज्जर ल भारताने उडवला असेल/ नसेल, साला एक दुश्मन गेला वर, त्यांच्याच दुकानातुन मिठाई घेउन आपण सेलेब्रेट करतो. हाय काय अन नाय काय /...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

लेखाचा रोख कळलला नाही ?

चौकस२१२
Mon, 10/21/2024 - 14:59 नवीन
लेखाचा रोख कळलला नाही ? RAW ची कानडा किंवा अमेरिकेतील "कामे" हा आहे एकी " लॉरेन्स बिष्णोई " या गुंडा बद्दल आहे ? कि काही करून सदर सरकारचे वाभाडे काढणे हा आहे , तसे जगभर आपली "इज्जत" या आधीही बाहेर आली आहे , फक्त भाजप सरकारचं काळातच असे नव्हे . ऐतिहासिक दृष्टया बघतले तर RAW चे कार्यक्षेत्र जास्त करून दक्षिण आशिया आणि आखाती देशात + थोडे इंग्लड मध्ये असावे एकदम कानडा पर्यंत लक्ष घालावे लागलं ते केवळ या भरकटलेल्या खलिस्तानी शिकांमुळे तेथे RAW कमी पडले असेल पण लेखात एक असुरी आनंद दिसतोय कि "बघा कसे कमी पडले " RAW ने हे काम करो कि नको पण पाश्चिमात्य देशात हे खलिस्तानी हिंदूंना खूप तरस देत आहेत आणि त्यांना आजारात गोंजारत आहेत ते येथील " अपराधी गोरे डावे " मी मागे पण एकदा अनुभव सांगितलं होता कि सार्वजनिक दिवाळी कार्यक्रमाला येथे हे "पिवळे झेंडे वाले" कसे आक्रमक रित्या निदर्शने करतात भारतीय दूतावासावरील हल्ले काही वर्षपूर्वी असे नव्हेत हिंदू जास्त ओरडा करीत नाहीत येथे पण किती दिवस खपवून घायवय्याचे ? माईसाहेब तुम्ही कोणत्या स्थळी राहत माहित नाही पण असा जमाव कधी अंगावर येण्याचा अनुभव घेतलाय ( र यावं करताय का ताव करताय या आधी दिवाळी मेळे आता सुरु होतील परत तेच होणार असे दिसतंय एक हिंदू म्हणून शिखांबद्दल चे प्रेम आणि आदर आता हळू हळू लोप पावत आहे , खांदयावर बसवले तर कानात मुतायला लागले अशी परिस्थिती एवढया वर्षात भारतातील मुस्लिमांनी भारताबाहेर भारतीय दूतावासावर कधी हल्ला केल्याचे आठवत नाही तेवढे हे पवित्र पिवळी पगडी वाले करीत आहेत !
  • Log in or register to post comments

एक हिंदू म्हणून शिखांबद्दल चे

कॉमी
Mon, 10/21/2024 - 17:02 नवीन
एक हिंदू म्हणून शिखांबद्दल चे प्रेम आणि आदर आता हळू हळू लोप पावत आहे , खांदयावर बसवले तर कानात मुतायला लागले अशी परिस्थिती
काय अविर्भाव आहे. खांद्यावर बसवले म्हणजे काय केले बुवा तुम्ही शीख लोकांसाठी? काय उपकार केले तुम्ही? दोन्ही बाजूला असल्या निरर्थक बाता करणारे लोकं असतात म्हणून मुद्दे चिघळत जातात. संधी मिळाली रे मिळाली जनरलयझेशन सुरु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

सहमत, हिंदू मुस्लिम भांडण

अमरेंद्र बाहुबली
Mon, 10/21/2024 - 17:04 नवीन
सहमत, हिंदू मुस्लिम भांडण लाऊन झाले आता हिंदू शीख लावताहेत.. नेहमी द्वेषच करत राहणार हे लोक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

हिंदू शीख भांडण लावताहेत.

चौकस२१२
Tue, 10/22/2024 - 07:01 नवीन
हिंदू शीख भांडण लावताहेत. अहो तुमचे डोस्क ठिकाणावर आहे का? शीख आपले खरे बंधू आहेत हेच म्हणतोय आम्ही , भाण्डन नको असे म्हणतोय ... असो तुमचा पूर्वग्रह कधी बदलणार नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 10/25/2024 - 07:04 नवीन
सहमत. काही लोकांना परदेशात बसून दुसरं काही काम नाही. पूर्वीच्या सरकार कृपेने परदेशात गेले. सगळी सुखं उपभोगायची आणि त्यांच्याच नावाने शंख फुंकत राह्यचे. हिंदू-मुस्लिम, चीन-पाकिस्तान, शिख, आणि सद्य सरकारच्या आरत्या ओवाळणे एवढाच धंदा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

+१

जावा फुल स्टॅक
Fri, 10/25/2024 - 07:25 नवीन
सहमत. काही लोकांना भारतात राहूनही दुसरं काही काम नाही. सरकारच्या कृपेने कॉलेजातील लठ्ठ पगार, भत्ते, सुट्ट्या व सगळी सुखं उपभोगायची आणि त्यांच्याच नावाने शंख फुंकत राह्यचे. हिंदूविरोध, चीन-पाकिस्तान समर्थन करणे आणि विरोधी पक्षाच्या आरत्या ओवाळणे एवढाच धंदा. - प्रोफेश्वर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एवढं लिहायला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 10/25/2024 - 08:16 नवीन
इतकं सर्व लिहायला डुप्लीकेट आयडी घ्यावा लागला. धन्यवाद लिहिते राहा...=)) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जावा फुल स्टॅक

नाही

वामन देशमुख
Fri, 10/25/2024 - 09:26 नवीन
इतकं सर्व लिहायला डुप्लीकेट आयडी घ्यावा लागला.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे हा कुणाचा डुप्लीकेट आयडी आहे याच्याशी माझा काही संबंध नाही, नसते आरोप करू नका. - प्रोफेश्वर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

=))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 10/25/2024 - 09:54 नवीन
वाटलंच होतं. वामन देशमुख असणार. कोण कोण वापरतं. तुमचा आयडी. =)) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

खांद्यावर बसवले म्हणजे काय

चौकस२१२
Tue, 10/22/2024 - 05:58 नवीन
खांद्यावर बसवले म्हणजे काय केले बुवा तुम्ही शीख लोकांसाठी? तुम्हाला म्हनायायचंय काय ? जन्मापासून ते आपले भाऊ आहेत हे मनापासून मानले आणि अजूनही मनात आहोत आज किती तरी हिंदू आदराने गुरुदवरात जातात त्याउलट किती शीख हिंदू मंदिरात जातात ? आणि फाळणी च्य वेळी हिंदूंनी शिखांना आणि शिखांनी हिंदूंना मदत नाही तर कोणी केली ? असो तुम्हाला नाही कळणार ... प्रत्यक्ष या खलिस्तानवाद्यांना समोरासमोर बघ मग कळेल काय भेलकांडल आहेत ते आणि त्यापेकशा खतरनाक म्हणे त्यांना मूक पाने समर्थन करणारे "मॉडेरेट " शीख आणि त्यापेक्षाही बेकार म्हणजे त्यांची भलावण करणारे टुंचाईसारखेच हिंदू एक वेळ ओवेसी परवडला त्याला काय म्हणायचं ते सरळ दिसते तरी संधी मिळाली रे मिळाली जनरलयझेशन सुरु. प्रत्यक्ष बघून मग बोलतोय उगाच पुरोगामी असल्याचाच आव आणू नका आजही कोणताही हिंदूअल शिखानबरोबर जे काही संबंध वाईट आहेत त्याचे दुःखक होतंय आनंद नाही काही इतर अल्पसंख्यांकानशी भांडणे आहेत त्याचे काही वाटत नाही ती वर्षानुवर्षे चालू आहेत पण शिक्षण बरोबर हे असे का झालाय याचा जास्त वाईट वाटते , यात शिखांचा राग नाहीये तर घरातीलच हि फूट का पडली याचे दुःखच आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

हेच

माईसाहेब कुरसूंदीकर
Mon, 10/21/2024 - 17:36 नवीन
"कि काही करून सदर सरकारचे वाभाडे काढणे हा आहे" "पण लेखात एक असुरी आनंद दिसतोय कि "बघा कसे कमी पडले " ज्या संस्थेला मिळालेल्या निधीचे कधी ऑडिट होत नाही, ज्या संस्थेत नातेवाईक्,मित्र-मंडळींचा भरणा असतो(निदान पुर्वी असायचा) आणि ही सरकारची संस्था आहे, अशा संस्थेला म्हणजे रॉला दुसरा देश जबाबदार धरत असेल, तर ही देशाची मानहानी नाही का ? का नाही प्रश्न विचारायचे? राजकीय चष्मा काढुन स्वतःला विचारा- काँग्रेस सत्तेवर असती,पंतप्रधान काँग्रेसचा असता तर आपण हीच भूमिका घेतली असती? भाजपावाले गप्प बसले असते?अर्नब गोस्वामी,नाविका कुमार शांत बसले असते?
  • Log in or register to post comments

डोवालांचं 'विधान'?

नठ्यारा
Mon, 10/21/2024 - 18:18 नवीन
माईसाहेब, तुम्ही म्हणता की डोवालंनी हे विधान केलं :
गेल्या आठवड्यात अजित डोवाल ह्यांनी सिंगापूरमध्ये 'लॉरेन्स बिष्णोई हा कोठेही घातपात घडवुन आणु शकतो' असे विधान केले.
पण सदर लेखात डोवालांनी केवळ शक्यतेची स्वीकृती ( acknowledged ) दिल्याचं लिहिलंय. म्हणजे विधान इतर कोणाचं तरी असणार. असो. शब्दच्छल सोडून मुद्द्यावर येतो. जगातल्या बऱ्याच गुप्तचर संस्था सर्रास अंमली पदार्थांचं स्मगलिंग करतात. अन्यथा पैसे कुठून आणायचे, असा प्रश्न असतो. तो निज्जर काय किंवा पन्नू काय ते ड्रग बिझनेसमध्ये मलीन झालेले आहेत. मग भारताने या व्यापाराचा फायदा घेऊन आपलं हित साधलं तर काय बिघडलं? आपला नम्र, -नाठाळ नठ्या
  • Log in or register to post comments

गुप्तचर संस्थांचे मूल्यमापन.

कर्नलतपस्वी
Mon, 10/21/2024 - 19:03 नवीन
कुठल्याही देशाची गुप्तचर संस्था किती सक्षम आहे,कुठल्या प्रकारे सुचना, माहीती गोळा करते,त्यांची कार्यप्रणाली काय? इत्यादी बद्दल काही माहीती नसताना केवळ वर्तमानपत्रात किंवा सोशल मिडीयावर आलेल्या बातम्यांवर अवलंबून त्यांचे मूल्यमापन करणे य्योग्य नाही. माहीती आणी ती सुद्धा वेळेवर किंबहुना आगाऊ मिळवणे यावर बर्‍याच गोष्टी अवलंबून असतात. माहीती एक शस्त्र आहे ते काल होते आणी उद्याही असणार आहे. गुप्तचर संस्था शिवाजी महाराजांच्या काळात होत्या,त्या इंग्रजांच्या काळात होत्या. काँग्रेस सरकार सुद्धा गुप्तचर संस्थेवर निर्भर होती आणी आताचे सरकार सुद्धा. ओसामा,सद्दाम आपण कुठे लपलो आहोत हे काही स्वताच सांगण्यासाठी बाहेर आले नव्हते. विचार करा किती वेळ लागला आणी किती मेहनत या गुप्तचर संस्थांना करावी लागली. मला एव्हढेच म्हणायचे आहे की राजकीय दृष्टीकोनातून या सर्व गोष्टींकडे बघणे म्हणजे कावीळ झालेल्या रोग्याच्या डोळ्यांनी बघण्यासारखेच म्हणावे लागेल. बाकी चर्चा चालू द्यात, वाचतो आहे.
  • Log in or register to post comments

कॅनडा

चक्कर_बंडा
Mon, 10/21/2024 - 20:31 नवीन
कॅनडा ज्यांना पुरावे म्हणतोय ते फक्त गुप्तचर अहवाल आहेत ज्यांना पुरावे म्हणून किंमत नाही ही भारताची कॅनडाच्या निज्जर प्रकरणाच्या पुराव्यासंबंधीच्या दाव्यांवर अधिकृत प्रतिक्रिया आहे, कदाचित तुमच्या नजरेतून सुटली असावी, पुन्हा एकदा तुमचे माहिती मिळवण्याचे मार्ग तपासून खात्री करून घ्या. जी भेट झाली अथवा नाही याचेच काही पुरावे नाहीत अशा भेटीत डोवाल बिष्णोईसंदर्भात कुणाला काय बोलले व त्यावर विसंबून काय अर्थ काढायचे ते तुमच्या कल्पनाशक्तीच्या भरारीवर अवलंबून आहे, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा.... अमेरिकेतील गुरपतवंत प्रकरणातील विकास यादव हा माजी रॉ अधिकारी आहे, दुसरा निखिल गुप्ता हा भारतीय नागरिक आहे, अमेरिकन यंत्रणांनी गुप्तचर अहवालाच्या आधारावर त्यांच्याविरोधात त्यांच्या कायद्यानुसार खटला चालवता येईल असे पुरावे गोळा करून खटला दाखल केला आहे, आरोप सिद्ध होतील की नाही ते पुढे कळेलचं. या कारवाईला ही भारताने "योग्य" असा प्रतिसाद दिलेला आहे. दिलेलं लक्ष्य पुर्ण करण्यासाठी कोणताही मार्ग वर्ज्य नसणे ही जगभरातील गुप्तचर यंत्रणांची ढोबळ कार्यपद्धती असते. "मोसाद"च्या आख्यायिका वाटाव्यात अशा अनेक खऱ्या-खोट्या कारनाम्यांच्या कहाण्या तुम्ही वाचल्या-ऐकल्या असतील अशी अपेक्षा आहे. आज तुम्हाला ज्या प्रकरणामुळे "रॉ" ची अब्रू चव्हाट्यावर आली असं वाटतंय तुमच्या दुर्दैवाने तेच प्रकरण काही वर्षांनी "रॉ" चं मोठं यश म्हणून जगभरात चघळलं जाईल याचीचं दाट शक्यता आहे. ते त्यांनी खरंच केलं होतं की नाही हा मुद्दा तेव्हा अस्तित्वातच असणार नाही, निदान, पूर्वानुभव तरी हेचं सांगतो. सरतेशेवटी, गुप्तचर यंत्रणांच्या एकूण कार्यपद्धतीबद्दल फार कमी माहिती सार्वजनिक असते. निव्वळ राजकीय अभिनिवेशातून त्यांचं समाजमाध्यमांवर मूल्यमापन करण्याचा प्रयत्न मुर्खपणा ठरेल.
  • Log in or register to post comments

ANY PUBLICITY IS GOOD PUBLICITY

धर्मराजमुटके
Mon, 10/21/2024 - 21:08 नवीन
ANY PUBLICITY IS GOOD PUBLICITY हे वाक्य खास करुन शरद पवारांच्या समर्थकांनी लक्षात ठेवले पाहिजे. महाराष्ट्रातील राजकारणात कुठे खुट्ट वाजले तरी यामागे काका आहेत अशा आवया उठतात आणि ती गोष्ट काकांनी केलेली असो की नसो, त्याचे फायदे तोटे त्यांना वेळोवेळी मिळत राहतात. रॉ आणि काकांची जातकुळी एकच समजावी. अमेरीका आणि कॅनडा रॉ ची दखल घेतात म्हणजेच रॉ आता खरोखर आंतर-राष्ट्रीय स्तरावर पोहोचली असे मानावयास जागा आहे. बाकी माई तुमचे हे कसे आहेत ? दिवाळीच्या चकल्या पाडायला त्यांनीच तुम्हाला प्रेरणा दिली काय ?
  • Log in or register to post comments

धर्मराजा

माईसाहेब कुरसूंदीकर
Mon, 10/21/2024 - 22:59 नवीन
"रॉ आणि काकांची जातकुळी एकच समजावी" धर्मराजा, दोघांमध्ये फरक एवढाच की गेल्या ४० वर्शात काकांविरुद्ध एकही पुरावा आजतागायत सी बी आय, आय बी, सी आय डी कोणालाही सापडलेला नाही. काकांवर 'हजारो कोटींच्या जमीनी लाटल्या' असे आरोप करणारे काकांना पद्मविभूषण देते झाले हे ल़क्षात घायला हवे. ईकडे कॅनडाचे पोलिस(राजकारणी नव्हेत) थेट भारतिय संस्थेवर आरोप करत आहेत. आणि अमेरिकाही 'हे आरोप गंभीर आहेत' असे म्हणत आहे. आपल्या येथे राजकारणी सरकारी संस्थाना वापरुन घेतात तसा प्रकार कॅनडात असतो का? शक्यता नाही. पोलिस खाते अमेरिकेसारखेच स्वतंत्र काम करते ना तिकडे? त्यांच्या वेब साईटवरच त्यांनी लिहिले आहे- An extraordinary situation is compelling us to speak about what we have discovered in our multiple ongoing investigations into the involvement of agents of the Government of India in serious criminal activity in Canada. It is not our normal process to publicly disclose information about ongoing investigations, in an effort to preserve their integrity. However, we feel it is necessary to do so at this time due to the significant threat to public safety in our country. https://www.rcmp-grc.gc.ca/en/news/2024/rcmp-statement-violent-criminal-activity-occurring-canada-connections-agents-the We reached a point where we felt it was imperative to confront the Government of India and inform the public about some very serious findings that have been uncovered through our investigations. "अमेरीका आणि कॅनडा रॉ ची दखल घेतात म्हणजेच रॉ आता खरोखर आंतर-राष्ट्रीय स्तरावर पोहोचली असे मानावयास जागा आहे. धर्मराजा, देशाची गुप्तचर संस्था ही एकाअर्थाने आंतर-राष्ट्रीयच असते. पुन्हा तेच सांगते- रॉने निज्जरला मारले असेल्/नसेल.. निज्जर बद्दल/खलिस्तान्यांबद्दल कोणालाही सहानुभूती नाही. पण गेली अनेक वर्षे पडद्यामागे राहुन काम करणारी ह्या संस्थेच्या कामात काहीतरी नक्कीच गोंधळ झालेला आहे. २०१६ साली पाकिस्तान-ईराण सीमेवर पकडला गेलेला कुलभूषण जाधव हा रॉचा अधिकारी अजूनही तेथील तुरुंगात आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

उत्तम प्रतिसाद माई. खरेतर रॉ

अमरेंद्र बाहुबली
Mon, 10/21/2024 - 23:15 नवीन
उत्तम प्रतिसाद माई. खरेतर रॉ संस्था चुकीच्या लोकांच्या हातात गळ्याची ही लक्षणे आहेत. त्या गावठी जेम्स बॉंडला आधी बाजूला करायला हवे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

गेली काही वर्ष भारतात नागरी

रात्रीचे चांदणे
Mon, 10/21/2024 - 23:25 नवीन
गेली काही वर्ष भारतात नागरी वस्तीत बाँबस्फोट झाले नाहीत अत्ता तर काश्मीर मधली दगडफेकही थांबलेली आहे. मग ह्याच श्रेय कोणाला देणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

नक्की?? नागरी वस्ती म्हणजे

अमरेंद्र बाहुबली
Tue, 10/22/2024 - 09:52 नवीन
नक्की?? नागरी वस्ती म्हणजे तुमच्या लेखी फक्त पुणे मुंबईच असावे नाही?? नाहुतार इतकं फेकायची हिंमत केली नसतीत. आणी काश्मीरात दगडफेक थांबलीय? कुठल्या ग्रहावर राहतात? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

गेली काही वर्ष भारतात नागरी

शाम भागवत
Wed, 10/23/2024 - 12:42 नवीन
गेली काही वर्ष भारतात नागरी वस्तीत बाँबस्फोट झाले नाहीत अत्ता तर काश्मीर मधली दगडफेकही थांबलेली आहे. मग ह्याच श्रेय कोणाला देणार?
हा काय प्रश्न आहे? सगळं श्रेय हे नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि राहूल गांधी यांनाच जाते. 😊 तरीही काही श्रेय शिल्लक असल्यास ते काका व उध्दव यांना समसमान वाटून द्यावे. 😉 हाकानाका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

Trudo २०१८ का १७ साली भारतात

रात्रीचे चांदणे
Mon, 10/21/2024 - 22:27 नवीन
Trudo २०१८ का १७ साली भारतात आला होता. तेंव्हाच मोदींना भेटण्या आगोदर फुटीरता वाद्यांना भेटला होता. म्हणजे त्या वेळे पासून किंवा आदी पासूनच त्याचा फोकस स्पष्ट आहे. समजा पुढे माघे RAW चा सहभाग स्पष्ट झाला तरी अब्रू चव्हाट्यावर वगेरे आली अस काही वाटत नाही, एखाद तरी ऑपरेशन फेल जाणारच.
  • Log in or register to post comments

अब्रू चव्हाट्यावर??

राघव
Tue, 10/22/2024 - 00:17 नवीन
कशामुळे? कुणीतरी आरोप केले म्हणूनच ना? त्यानं काय होतंय? असे आरोप अनेकांनी अनेकांवर आजवर केलेत.. कुणाची अब्रू चव्हाट्यावर आलीये आत्तापर्यंत? कोणीही काहीही म्हटलं तरीही सबळ पुराव्याअभावी (अहवाल म्हणजे पुरावे नाहीत) काहीही फरक पडत नाही. जगातली कोणतीही गुप्तचरसंस्था आरोपांना उत्तर देण्यास बांधील नसते/नसावीच. कारण उत्तर देणं म्हणजे आरोपांना महत्त्व देणं आहे. आपल्या देशाच्या कोणत्याही अधिकृत संदेशात रॉ किंवा इतर कोणत्याही संस्थेचा हात आहे असं आपण मान्य केलेलं नाही. आपल्या गुप्तचर संस्थांबद्दल आदर असायला हवा, शंका नाही. गुप्तचर खातं देशांतर्गत आणि देशाबाहेर, अनेक संस्थांच्या मदतीनं काम करत असतं. जोवर गुप्तचर खात्यातला कुणी माणूस त्यांची माहिती जगजाहीर करत नाही तोवर, आपल्याला खरं-खोटं काय ते समजतही नाही. त्यामुळं नुसत्या स्पेक्युलेशन्स वर अवलंबून काहीही निदान करणं अत्यंत अयोग्यच नव्हे तर देशविघातक आहे. काही बाबी दुसऱ्या बाजूनं बघण्याचा प्रयत्न करावा. फार नाही, मागच्या वर्ष-दोन वर्षभरातील बातम्या बारकाईनं वाचल्यात तर चित्र वेगळं दिसेल. - भारतानं अमेरिकेला धार्जिणी भूमिका घेणे कमी केलेलं आहे. काही अपवाद सोडलेत तर आपण त्यांचं म्हणणं मान्य करत नाही. करोना काळापासून हे चालू आहे. बायडेन स्वतः भारतविरोधी भूमिकेत गेलेले दिसतात, ज्याची अनेक उघड कारणं आहेत. - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुका येऊ घातल्यात आणि त्यात ट्रंपतात्या भारतीयांना चुचकारतांना दिसतात! - कॅनडातील सरकारमधे पन्नूचे लोकं आहेत. त्याच्या पाठिंब्याशिवाय ट्रुडोचं सरकार टिकू शकणार नाही. ट्रुडोची स्वतःची लोकप्रियता लोपत चालली आहे. तेथील विरोधक भारतविरोधी भूमिका घेतल्याबद्दल त्याची नालस्ती करताहेत. - आपण अमेरिकेसमवेत नुकतेच एक-दोन संरक्षण क्षेत्रातील करार केलेत. पण "आत्मनिर्भर भारत" च्या नाऱ्यापासून अमेरिकन कंपन्यांसोबतच्या अशा करारांची संख्या रोडावली आहे. अमेरिकेतील डिफेन्स आणि फार्मा या दोन्ही क्षेत्रातल्या लॉब्या भारतावर दबाव बनवण्याचा पूर्ण प्रयत्न करताहेत. - वेगवेगळ्या बाजूंनी दबाव बनवायचा आणि त्यातून मुख्य वेगळंच काम करून घ्यायचं हे आपल्याबाबतचं अमेरिकेचं पुर्वीपासूनचं धोरण आहे. .. .. .. नीट बघीतलं तर आंतरराष्ट्रीय राजकारणात ह्या अशा अनेक बाजू दिसायला लागतात. बहुतांशवेळा जे दिसतं त्यापेक्षा काहीतरी भलतंच गणित चाललेलं असतं. सरकारबद्दल तर तसंही खडे फोडणं चालूच असतं, पण आपल्या अधिकृत संस्थांवर आरोप करतांना फार काळजीपूर्वक बोललं पाहिजे. बाकी श्री. अजित डोभाल यांच्यासारख्या व्यक्तीबद्दल काही बोलण्यास आपण कुणी पात्र आहोत असं मला वाटत नाही. आपण स्वतःच स्वतःची अब्रू टांगतोय असं होईल.
  • Log in or register to post comments

बायडेन स्वतः भारतविरोधी

अमरेंद्र बाहुबली
Tue, 10/22/2024 - 09:56 नवीन
बायडेन स्वतः भारतविरोधी भूमिकेत गेलेले दिसतात, ज्याची अनेक उघड कारणं आहेत. आपले महान पंतप्रधान तिथे जाऊन “अबकी बार ट्रम्प सरकार” बोलून आल्यावर आणखी काय अपेक्षा करावी श्री. बायडन ह्यांच्याकडून?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव

आपले महान पंतप्रधान तिथे जाऊन

चौकस२१२
Tue, 10/22/2024 - 13:13 नवीन
आपले महान पंतप्रधान तिथे जाऊन “अबकी बार ट्रम्प सरकार” बायडन भारता वर उलटले तर त्याला एकटे मोदी जबाबदार ? नेहरूंपासून इंदिराजनीचे राशिया कडे झुकणारे आणि अमेरिकेला झुगारून देणारे धोरण मात्र याला जबाबदार नाहीच? असो , काही मुद्दे माहित नसले तर - अमेररिका एक तर आधी स्वतःचे बघते मग डेमोक्रॅट ( डावे ) किंवा रीपब्लिकन ( उजवे ) कोणी का असेनात - साधी गोष्ट महात्मा गांधींचे स्वावलंबन काय किंवा आत्म निर्भर भारत काय "धंद्याला सोयीचे नाही म्हणून पाश्चिमात्यांना आवडत नाही - पाश्चिमात्य डाव्यान्न इतर देशातील राष्ट्रीयवाद असे काही दिसले कि लगेच "फॅसिस्ट " अशी आवई उठवियाची सवय आहे - चीन ला शह म्हणून भारत मित्र , उदय गरज सरली कि वैद्य मरो असेच करतील तुम्ही भारतीय म्हणून स्वतःचे हित जोपासायला पाहिजे पण तुम्हाला तर ह्या भाजप ला खाली कधी खेचतो / मनुवादी यातच अडकून पडायचे आहे ... नतद्रष्टपणा म्हणतात तो हा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

निज्जर हत्या

विवेकपटाईत
Wed, 10/23/2024 - 09:15 नवीन
निज्जर हत्या खालीस्तान्यांच्या आपसी विवादामुळे झालेली आहे. भारताचा त्यात कोणताही हात नाही. पण थोक व्होट बँकसाठी भारतावर खोटा आरोप आहे. 23 जागांवर सिख जिंकलेले आहेत. जसे मुंबई हलल्या मागे हिंदू आतंकी होते असे पुस्तक ही पब्लिश झालेले आहे. पोलिस अधिकार्‍यांच्या हत्या मागे त्यांचाच हात आहे असे विधान आपल्याच देशातील अनेक राजनीतिक दल (दिग्विजय सिंह) इत्यादींने केले आहे. व्होट बँक साठी हिंदू आतंकवाद सिद्ध करण्यासाठी युपीए अनेकांवर खोटे आरोप लावले होते. ते कोर्टात सिद्ध झाले नाही हे वेगळे. बाकी लेख ही शेंडा न बुड असलेला आहे. अधिकान्श प्रतिसादात फक्त अज्ञान दिसत आहे. मी स्वत: 6 वर्ष देशातील सर्वोच्च सुरक्षा अधिकारी एस दुलत आणि एमके नारायण दोघांचा पीए म्हणून काम केले आहे. त्या आधारवर म्हणू शकतो भारत रशियन ब्लॉकचा समर्थक असल्याने अमेरिकेची भूमिका सुरवतीपासून भारत विरोधी आहे. 1971 मध्ये अमेरिकाचा पराभव भारताने केला होता. त्या दिवशी पासून भारताचे अनेक तुकडे करायेची सुप्त इच्छा सीआयए ची आहे. डेमोक्रॅटिक पक्ष सत्तेत येतो तेंव्हा भारत विरोधी षड्यंत्र अधिक रचले जातात. खालीसतान जर अस्तीत्वात आले तर तिथे अमेरिकेन फौज ठेवली जाऊ शकते. 1984 मध्ये जून महिन्यात हे षड्यंत्र सफल होणार होते. पण आधी कळल्यामुळे ते असफल झाले. 2014 नंतर परिस्थिति अमेरिकेच्यासी आणिक प्रतिकूल झाली. गेल्या दहा वर्षांत भारताची चौफेर प्रगति झाली. या घटकेला भारताला आर्थिक दृष्ट्या ब्लॅक मेल करणे ही संभव नाही. अमेरिकेच्या नाकावर टिच्चून भारताने रूस आणि इराण कडून तेल घेतले. भारत ही चीन सारखा शक्तीशाली झाला तर जगात अमेरिकेची पत आणिक कमी होईल. जे अमेरिका स्वत: करू शकत नाही त्या साठी कॅनडा किंवा ब्रिटेनचा वापर करतो. ट्रंपच्या बाबतीत म्हणाल तर त्याच्या साठी अमेरिका प्रथम होती. कारण अमेरिकेची आर्थिक परिस्थिति हळू हळू घसरत चालली आहे, हे त्यांना स्पष्ट दिसत होते. त्यामुळे त्यांच्या काळात जगात कुठेही मोठे युद्ध झालेल नाही. बायडण ह्यांना शस्त्र माफियाचे खुले समर्थन आहे. त्यामुळे जगात अनेक युद्ध सुरू झाले आहेत. गेल्या निवडणूकीच्या वेळी ही मी डेमोक्रेट जिंकणे भारताच्या हिताचे नाही असा प्रतिसाद ही दिला होते. बाकी खालीस्थानी आतंकीचे खुले समर्थन देण्यामुळे अमेरिका आणि कॅनडा दोन्ही उघडे पडले आहे. रॉ बाबत म्हणाल आत रॉ पूर्वी पेक्षा अधिक शक्तीशाली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

जसे मुंबई हलल्या मागे हिंदू

शाम भागवत
Wed, 10/23/2024 - 12:52 नवीन
जसे मुंबई हलल्या मागे हिंदू आतंकी होते असे पुस्तक ही पब्लिश झालेले आहे. पोलिस अधिकार्‍यांच्या हत्या मागे त्यांचाच हात आहे असे विधान आपल्याच देशातील अनेक राजनीतिक दल (दिग्विजय सिंह) इत्यादींने केले आहे. व्होट बँक साठी हिंदू आतंकवाद सिद्ध करण्यासाठी युपीए अनेकांवर खोटे आरोप लावले होते. ते कोर्टात सिद्ध झाले नाही हे वेगळे.
तो भगवा आतंकवाद आणि सुशिलकुमार शिंदे यांचा पॉडकास्ट कोणालाच कसा आठवत नाहीये. अगदी अलिकडचीच बातमी असूनही. 😉
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

ऐकुण काय काही मिपावरील

चौकस२१२
Tue, 10/22/2024 - 06:05 नवीन
ऐकुण काय काही मिपावरील "फूर्गम्यांना" ची कशी जिरवली याचा असुरी आनंद झातेल दिसतोय ( आपण विधवा झालो तरी चालेल पण सवतीचे कुंकू पुसले गेलं पाहिजे हि वृत्ती ) + मग कोण्ही फुटकळ येऊन डोभाल कसे कुचकामी अशी टिप्पणी करून जातो जणू काही डोभाल ह्यांचं घरचे खातोय
  • Log in or register to post comments

"फूर्गम्यांना" RAW ची कशी

चौकस२१२
Tue, 10/22/2024 - 07:04 नवीन
"फूर्गम्यांना" RAW ची कशी जिरवली याचा असुरी आनंद झातेल दिसतोय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा