*घारगे
*लालभोपळा
*आषाढ
खरं म्हणजे मागच्या आठवड्यात दोनदा आषाढात आखाड तळून झाला.तोवर लाल भोपळा आणला नव्हता.चार दिवसांपूर्वी आणला पण वेळच झाला नाही.आज भोपळ्याचे घारगे करत उपवास सोडला.मराठी घरांत , काळ्या मेघांच्या झालरीत, उधाणलेल्या पावसात लाल भोपळ्याचे घारगे/घाऱ्या का अबाधित आहेत.मुळातच मला ही एक पारंपरिक पाककृती खासच वाटत राहते ;)
गुळाचा मुरलेला गोडवा,जायफळ वेलचीचा मंद सुगंध, वाफवलेल्या भोपळ्याचा मऊसर गोडसर ओलावा जिभेला कमाल तृप्त करतो.
*कृती
भोपळ्याच्या बिया,शिरा व सांगली काढून टाकायची.बारीक किसून घ्यायचा ,एक मोठी वाटी किस घ्यावा.तूपात परतून घ्यायचा.अर्धी वाटी गूळ,वेलची,जायफळ पावडर घालून मऊसर शिजवून घ्यायचा.हे मिश्रण थंड झाल्यावर बसेल तेवढी कणीक+तीन चमचा तांदळाची पिठी घालत मळून घ्यायचे.घारगे पुरीच्या आकारात लाटून तळून घ्यायचे.
गुळाचे योग्य प्रमाण असेल तर पुरी छान फुगते.

वाचने
5405
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान-आवडले.
धन्यवाद सर,आपणही सतत
In reply to छान-आवडले. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आषाढ तळला वाटतं
आखाड तळावाच लागतो.
In reply to आषाढ तळला वाटतं by कर्नलतपस्वी
माझा अत्यंत आवडता पदार्थ
अरे वाह ,थापून मस्तच की
In reply to माझा अत्यंत आवडता पदार्थ by श्वेता२४
+१ माझी आई पण हा पदार्थ थापुनच करते