Skip to main content
लेखक अनन्त्_यात्री यांनी सोमवार, 24/06/2024 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
प्रपाताने थेंबुट्यास कमी कधी लेखू नये पिंडी वसते ब्रह्मांड कदापि विसरू नये महापुरात लव्हाळी वाचतील? खात्री नाही लवचिकतेचा ताठा लव्हाळ्याने धरू नये आरशाने आरशात प्रतिबिंब पाहू नये अनंताने कोंदटसे सान्तपण लेवू नये कवितेचा शब्द शब्द ओळ बनण्याच्या आधी दोन ओळींच्या मधल्या अनाघ्राता स्पर्शू नये
लेखनविषय:

वाचने 1568
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

हे सुरेख आहे.
कवितेचा शब्द शब्द ओळ बनण्याच्या आधी दोन ओळींच्या मधल्या अनाघ्राता स्पर्शू नये