आम्हीपण. पैसा जास्त महत्वाचा असतो असं माझं प्रांजळ मत आहे. विद्या श्रेष्ठ असे म्हणत बहुसंख्य मराठी समाज वर्षानुवर्षे गरीब राहिला असे मला वाटते. विद्येचा अनादर करण्याचा कुठलाही हेतु नाही पण जर पैसा नसेल तर तुम्ही स्वत:चे व आपल्या कुटुंबियांचे पोट भरु शकत नाही हेही तितकेच खरे आहे.
जर लक्ष्मी चंचल असते तर किती श्रीमंत लोक तु गरीब झालेले पाहिले आहेस ? ह्या असल्या विचारांनी मराठी लोकं पहिल्यापासुन गरीब राहिली असे माझे स्पष्ट मत आहे. जर हा विचार नसता तर खुप आधीपासुन अनेक मराठी लोकं बिझनेस करु लागली असती. पैसा नसेल तर हल्ली काही मिळत नाही पर्नल.
एनीवेज, आपण ख.व. मधुन जास्त चर्चा करु हवे तर.
विद्या श्रेष्ठ असे म्हणत बहुसंख्य मराठी समाज वर्षानुवर्षे गरीब राहिला असे मला वाटते.
हा हा हा! हे बाकी अगदी खरं हो! :)
तात्या.
--
बर्याचश्या मराठी कथांची सुरवात - एका गावात एक गरीब शाळामास्तर रहात होता! ;)
हम्म! निवडणुकीत लक्ष्मी नेहमीच मागे पडते परंतु गम्मत अशी की तिला मत न देणारे लोकंही शेवटी तिच्यावरच मरतांना दिसतात! :)
असो, कौल प्रस्तावक असल्यामुळे आम्ही मत दिलेले नाही. आम्ही तूर्तास न्युट्रल आहोत!
आपला,
( लक्ष्मीभक्त ;) ) तात्या.
दुसर्या उमेदवाराची निशाणी हजाराची नोट (नकली ) आहे!
तेव्हा नाईलाजाने ;) माझे मत वीणेला!!!
अवांतर : माझी खव , व्यनि सुविधा निवडणूक आयोगाच्या लालफितीत अडकली आहे!! ;)
मी पण विणेवर छापा मारला.
बुध्दीमुळे लक्श्मी येताना पाहिले आहे. पंण लक्श्मी बरोबर बुध्दी/ज्ञान येतेच असे नाही.
मुन्नाभाईला सिनेमात मिळत असेल कदाचित.पण ते खरे नाही.
मीनल.
मला ही निडवडणूक अमान्य आहे. कारण निवडणूक ही एखाद्या पदासाठी असते (जसे आमदार, खासदार इत्यादी). लक्ष्मी आणि सरस्वती या दोन्हीची गरज आयुष्यात असते कारण ती दोन विभिन्न आणि गरजेची पदे आहेत. दोन्हीची एकमेकांना गरज आहे.
नुसते पैसे करायला पण स्वतःची नाहीतरी दुसर्याची विकत घेऊन का होईना बुद्धी वापरावी लागतेच! आणि नुसत्या बुद्धीच्या बळावर जगता येत नाही, कुठल्यान् कुठल्या रुपात पैसे मिळवावे लागतातच!
माझे मत विष्णुला जरी उमेदवार नसला तरी
पत्नी असल्याने लक्ष्मी झकत मागे येते.
पुत्राची (ब्रह्मदेवाची ) बायको म्हणजेच सुन असल्याने सरस्वती आदराने पहाते
--अवलिया
या संदर्भात एक रामदासांचे चांगले वचन आहे:
बुद्धीने सर्वही होते, बुद्धीदाता नारायणू
आधी तो आपुला किजे लक्ष्मी चरणी वसे ||
यात नारायणास बुद्धीदाता का म्हणले यावर चर्चा होऊ शकते. माझ्या मते "राखावया जगी संता, दुष्टा दूर करावया" जन्म घेत असताना प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या पद्धतीने बुद्धी चालवत नारायणाने वाचवले आहे असे आपले पुराण आहे. कदाचीत या कारणास्तव तसेच समर्थ "राम"भक्त असल्याने म्हणले असावेत.
सरस्वती विद्येची देवता आहे तर लक्ष्मी संपत्तीची.
विद्येच्या वापराने पैसा-संपत्ती जमा करण्याचा आपला प्रयत्न असतो. संपत्ती जमवण्याचे विद्या हे एक साधन असावे. हेतू संपत्ती कमावणे आहे. ती वडिलोपार्जीत अथवा इतर मार्गाने मिळू शकतेच.
माझे मत लक्ष्मीला.
ज्ञान आणि विद्या या दोन वेगळ्या गोष्टी मानून हे लिहिले आहे.
-- लिखाळ.
१००० च्या नोटेवर शिक्का मारतो.
ही ऍपल-टू- ऍपल कंपॅरिझन नाही वाटत. एक साधन आहे आणि एक साध्य आहे. गंमत अशी की साधन काय आणि साध्य काय हे पण कालपरत्वे आणि व्यक्तिअपरत्वे बदलत जाणारं आहे. क्वाईट अ कॉनण्ड्र्म!! :?
मला वैयक्तीक दृष्ट्या एकवेळ पैशाशिवाय जगता येईल मात्र कला, विचार, शब्द आदिंशिवाय "माझ्या" जगण्याला अर्थ उरणार नाहि असे वाटते. तेव्हा मत वीणेला.
(याचा अर्थ लक्ष्मी महत्त्वाची नाहि असा होत नाहि. फक्त जर असे दोनच पर्याय समोर असतील तर मी सरस्वतीचा भक्त होईन)
-ऋषिकेश
अर्थातच वीणा...
....पैसा साला कितीही मिळाला तरी कमीच वाटतो. त्याला काही लिमिट नाही.
वीणेनंतर खरंतर मी "आरोग्य देवतेला" मत देईन. कारण माझा तरी पूर्ण विश्वास आहे की "Health Is the Real Wealth".
लक्ष्मी पोटा पुरती चांगली, पण... आपल्या बुद्धीने समस्या सोडवीलेल्याचे समाधान कितिही पैसे खर्च करुन मिळवता येत नाहि
(पण भुक्या पोटि भजन सुद्धा होत नाही, आणि पैशाषिवाय पोट भरत नाहि)
म्हणुन, आम्हाला युतिचे सरकार हवे :)
- शारंगरव
हे म्हणजे आई की बाबा असली निवड करायला का सांगताय?
ज्ञान आणी संपत्ती भले कमी मिळाली तरी दोन्हीही पाहीजे बॉ.
गंमत म्हणजे ज्ञान आणी संपत्ती कितीही मिळो एकदा मिळाल्यावर दोन्ही अंमळ कमीच मिळाली असे वाटते त्याचे काय :-)
खरं तर आपल्यावर संस्कार आहेत ते सरस्वतीची उपासना करण्याचे..विद्या प्राप्त करण्याचे. आजवर शिकवलं गेलं ते एकदा सरस्वतीची कृपा झाली की लक्ष्मी आपोआप येते. पण......................
खरंच हे खरं आहे का हो?
आज लक्ष्मीची कृपा नाही म्हणुन कित्येक हुशार मुलं विद्येपासून वंचीत आहेत. कित्येकांना बक्कळ विद्या आहे पण तिचा वापर करुन लक्ष्मी येत नाही.
खरं तर ह्या दोघींची तुलना करणं तसं अवघड आहे. विद्या आहे म्हणुन लक्ष्मीही आहेच असं दिसत नाही, आणि लक्ष्मी आहे पण विद्या नाही म्हणुन कुढणारे फारसे दिसत नाहीत. आजचं जग भोगवादी आहे. भोगासाठी लागतो पैसा....लक्ष्मीदेवींचा विजय असो!
हां, एखाद्याला विद्यार्जनाची आवड आहे, तर त्याला आधीच लक्ष्मी प्राप्त असेल तर सरस्वती येईलच की. पण सरस्वती सोबतीला आहे म्हणुन लक्ष्मी येईलच ह्याची शाश्वती दुर्दैवाने निदान सध्यातरी दिसत नाही :(
कोण्या हिंदी सिनेमातलं वाक्य आठवलं: माना के पैसा खुदा नहीं मगर खुदा से कम भी नही!
शेवटी हल्लीच्या जगात घडणारी गोष्ट म्हणजे... "पैसा हस्साये...पैसा रुलाये...पैसा नच्चाये........पैसा पैसा पैसा!!!!!
दुर्दैवानं माझा कौल लक्ष्मीच्या पारड्यात जातोय. :(
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
माझे मत लक्ष्मीआईला पण सरस्वतीदेवीच जिंकावी हि मनापासुन इच्छा.
हे आवडलं! :)
आपला,
(केन्द्रात सोनियासोबत आणि राज्यात जमल्यास राजसोबत जाऊ पाहणारा) शरदतात्या पवार! :)
आपल्याकडे नावे लक्ष्मीनिवास्,लक्ष्मीकांत्,लक्ष्मीधर.लक्ष्मी रोड बर्याच शहरात असतो पण सरस्वती रोड्?
लक्ष्मीनिवास मित्तलांचे ईकडे पायघड्या घालून स्वागत होते.तसे एखाद्या शास्त्रज्ञाचे होईल का?
तेव्हा मत लक्ष्मीलाच भारतात तरी.! :)
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
मत अर्थातच वीणेला दिले आहे.
सरस्वती बघितली की लता मंगेशकर डोळ्यासमोर येतात आणि त्या आमचे दैवत आहेत.
सध्याच्या काळात लक्ष्मी म्हटले की 'मायावती' नजरेसमोर येतात.
पुढे काही लिहिण्याचीच जरुर नाही.
बर्याच विचारा अन्ती सरस्वतीस मत दिले
खर तर सध्या काय, आख्ख आयुष्यच पैशाची चणचण, टन्चाई, कफल्लकता इत्यादी सगळे अनुभवलेले
त्यामुळे लक्ष्मीला मत द्यायचा मोह अनावर झालेला
तरीही
असलेली प्राप्त लक्ष्मी "वापरणे" वा "उपभोगणे" अथवा, लक्ष्मी नसतानाचा कालखण्ड कण्ठणे, दोन्ही करता सरस्वतीची उपस्थिती आवश्यकच हे जाणवल्याने सरस्वतीला मत दिले!
एक वेळ लक्ष्मी नसेल, तरी जीवन कण्ठता येईल
पण सरस्वतीच (बुद्धीच) नसेल, तर जगणे केवळ पशुवत बनेल :)
आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर) :D :P
२ही
आम्ही आपले
+१
In reply to आम्ही आपले by परिकथेतील राजकुमार
फक्त
In reply to +१ by अमोल खरे
फक्त
In reply to फक्त by पर्नल नेने मराठे
पर्नल ताई
In reply to फक्त by पर्नल नेने मराठे
एनीवेज,
In reply to पर्नल ताई by अमोल खरे
चुचु
In reply to एनीवेज, by पर्नल नेने मराठे
मेल्या
In reply to चुचु by परिकथेतील राजकुमार
विद्या
In reply to +१ by अमोल खरे
१+
In reply to विद्या by विसोबा खेचर
वीणा
हम्म!
४९ ओ
आमचे पण ४९
In reply to ४९ ओ by नितिन थत्ते
नि:संशय वीणा!
तात्या..
लक्ष्मी च
एक्दम
In reply to लक्ष्मी च by चिरोटा
वीणा
ज्ञानाच्य
In reply to वीणा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
क्या बात है!
In reply to ज्ञानाच्य by परिकथेतील राजकुमार
परा,
In reply to ज्ञानाच्य by परिकथेतील राजकुमार
निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई...
In reply to परा, by अनंता
सहमत
In reply to वीणा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हि निवडणूक अमान्य
माझे मत
या संदर्भात
In reply to माझे मत by अवलिया
लक्ष्मी ला
सरस्वती
थोडी सरस्वतीची कृपा आहे म्हणून..
वीणा
अर्थातच वीणा...
खरं आहे रे बबलू!
In reply to अर्थातच वीणा... by बबलु
आम्हाला हवे...
कसली
कठीण आहे
ह्त तेच्यायला
लक्ष्मी
वीणा
In reply to लक्ष्मी by स्वामि
वीणा!
मोठा अवघड आहे निर्णय!
माझे
माझे मत
In reply to माझे by दिपक
.
(विषय दिलेला नाही)
In reply to . by Nile
नावे
लता
माझं मत
विद्या
मत
वीणा!