तीळाचे लाडू
लाडू करायचे म्हटलं की साजूक तूप पाहिजेच हा समज खजूर वापराने दूर झालाय.खजूर वापरल्यामुळे लाडूंची चवही सुंदर होते आणि वळायलाही झटपट होतात.
तीळाचे लाडू
१५० ग्रैम अर्धवट भाजलेले तीळ
अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे
अर्धी वाटी सुके खोबरे
अर्धी वाटी गुळ
आठ- दहा खजूर
दहा बारा बदाम
इलायची
सर्व जिन्नस मिक्सरमधून फिरवून घ्यायचे.यात खोबरं,तीळ असल्यामुळे याला सहज तेलही सुटते वळायला सोपे जातात.अगदी स्निग्ध पूर्ण लाडू होतात.
हे लाडू मऊ असल्याने खायलाही कष्ट ह़ोत नाही,पाक वगैरे करावा लागत नसल्याने चिकटही होत नाही.
टीप- तीळ अनपौलिश असतील तर चव उत्तम होते.

वाचने
3411
वाचनखूण
प्रतिक्रिया
4
जब्राट दिसत आहेत लाडु!
तूप न घालताही लाडू करता येतात
In reply to तूप न घालताही लाडू करता येतात by कांदा लिंबू
मिळतील की पार्सलपण मिळेल,
तर्मिनतोर भौ ,मी पण तेच म्हणतो