Skip to main content

बाबुजी.. एक रेखाटनाचा प्रयत्न.

लेखक राघव यांनी बुधवार, 13/05/2009 10:54 या दिवशी प्रकाशित केले.
साद स्वरांची अलगद देते स्पर्श सुखाचा नवा.. नाद सुरांचा गाऊन जातो संध्याचळी मारवा! गोड सुरावट सहज छेडती बोल अमृताचे.. ताल लयीचा तोल पेलती साज प्रेषिताचे!! राघव
From Sketches
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 7219
प्रतिक्रिया 39

प्रतिक्रिया

अतिशय सुरेख रेखाटन. राघव.. प्रतिभेला प्रणाम .. आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

राघवदादा, सुरेख रेखाटन.. बाबुजींचा अगदी प्रसन्न मुद्रेतला हा मूळ फोटू आहे. आपल्या रेखाटनातही ती प्रसन्नता अगदी तशीच आली आहे.. मनापासून अभिनंदन... आपली अशीच एकसे एक रेखाटने यापुढेही मिपावर यावीत हीच इच्छा! आपला, (बाबुजींचा शिष्य) तात्या.

उत्तम रेखाटन. राजा परा वर्मा ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

नुस्तं सुंदर एवढंच नाही म्हणता येत ... बाबुजी संवाद साधत आहेत असं वाटत आहे. डोळा खूपच आवडला, डोळ्यामुळेच संवाद साधत आहेत असं वाटतंय.

सुंदर! अतिशय बोलके, भावपूर्ण रेखाटन पु.रे.शु. ऋषिकेश ------------------ प्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता? ;)

अप्रतिम, राघवा, अप्रतिम. विशेषतः डोळा खूपच छान आहे. मला वाटतं की कोणत्याही चित्रात रेखाटनात डोळाच सगळ्या जास्त अवघड असतो ना? इथे खूपच सुंदर जमलाय तो. बिपिन कार्यकर्ते

सगळ्यांचे मन:पूर्वक आभार! :) देव काका, सुधारणा तर असायलाच हव्यात. मलाही त्याची कल्पना आहे. पण तुम्हाला ज्या सुधारणा अभिप्रेत आहेत त्या थोड्या विस्तृतपणे सांगा. मी नक्की तसा प्रयत्न करेन. तात्या, अहो हे काय सांगायला हवे? चांगले काही जमले की अगोदर मिपावर टाकल्यावाचून राहवत नाही आता! :) बिपिनदा, डोळे सगळ्यात महत्त्वाचे हे खरेच. मुख्य भाव त्यानेच व्यक्त होतो. अर्थात सोबत बाकीचा चेहरा पूरक असायला हवा नाही तर हवा तसा भाव दिसत नाही. :) रंगदा, होय! काव्यपंक्तीही माझ्याच आहेत. आज सकाळीच सुचल्यात. तशाच टाकल्या इथे. चित्र मात्र जवळपास २-३ दिवस झालेत करतोय. आपला, राघव

व्वा...राघवजी फारच सुंदर रेखाटले आहे तुम्ही हे बाबुजींचे चित्र. मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.

अप्रतिम रेखाटन आणि काव्य! =D> क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***