लोकसभेच्या २०२४ निवडणूकीची धामधूम एकदाची थांबली. निवडणूकपूर्व कल चाचण्या फोल ठरल्या. आता लोकसभेचा निकाल पाहता, कोणत्या एका पक्षाला भारतीय जनतेने बहुमत नाकारले आहे असे दिसते आणि आघाड्यांच्या सरकारांकडे पुनरागमन आणि विरोधी पक्षाला बळ या निवडणूकीने दिले असे आता सर्व संमिश्र निकाल पाहता म्हणायला हरकत नाही.
![]() |
छायाचित्र जालावरुन साभार |
लोकसभेच्या निवडणूक निकालाच्या दिवशी सुरवातीच्या निकालपूर्व अंदाजात 'वाराणसी मे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पिछे चल रहे' या बातमीचा तर, कमाल धक्का बसला होता.पंतप्रधान कसे बसे दीड लाखाच्या मतांनी ते विजयी झाले. दुसरं एक अत्यंत महत्त्वाचं जनतेचं अभिनंदन करावी अशी गोष्ट वाटली, ज्यात फैजाबाद अयोध्येतील जनतेने आणि राम भक्तांनी 'देव भक्ती वेगळी आणि राजकारण वेगळं' हे दाखवून दिलं आणि अयोध्येत भाजपचा पराभव केला. प्रत्यक्ष रामालाही रामावरून केले जाणारे राजकारण आवडलं नसावं. चंद्रबाबू नायडू आणि नितेशकुमारला अच्छे दिन आलेत त्यांचंही अभिनंदन. लोकसभेत लोकांनी एक वेगळाच निकाल दिला. सर्वाधिक जागा मिळून भाजपा सत्तेत नाही. इतर पक्षाच्या आधाराने सत्ता येत आहे तर, इंडियाने जी देशभर आघाडी घेतली त्याने राष्ट्रीय लोकशाही आघाडीपेक्षा कमी असूनही त्यांचा उत्साह नक्कीच वाढला आहे, लोकशाहीत जनतेला ग्रहित धरायचं नसतं, हे अत्यंत सुखद आहे.
विविध राज्यातील बहुमतांतील सत्ता उलथवणे, इडी,सीबीआय, आयकर आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून धाडी टाकून विरोधकांचा आवाज दाबणे, नेत्यांना तुरुंगात टाकणे. पक्ष फोडणे, पक्ष चोरणा-यांना मदत करणे, भ्रष्ट नेत्यांना पक्षात घेणे त्याला निर्दोष असल्याचे प्रमाणपत्र देणे, अशा असंख्य गोष्टी सरकार करीत होते आणि जनता सगळं गप्प राहुन बघत होती. लोकांनी मतदानाच्या माध्यमातून बदल करुन एक प्रतिक्रिया दिली आहे. एक पक्ष आणि एक मालक असावे अशा प्रकारचे सद्य सरकारचे वागणे होते. सर्व 'फोकस' ध्यानधारणेच्या वेळेस जसा होता तसा पक्षीय 'फोकस' 'सरकारी फोकस' सर्व आपल्यावर असावा दुसरा त्यात नसावा अगदी क्यामे-यातही दुसरा कोणी नसावा इतकी मतलबी वृत्ती लोक पाहत होते, आता आघाडी सरकार असल्याने 'हम करे सो कायदा' याला मर्यादा येणार आहेत, मनमानी पद्धतीने वागता येणार नाही.
भारत देशाचे पंतप्रधान म्हणून जे बोलण्याचे, जवाबदारीचे, प्रतिष्ठेचे पदाचे कायम ठेवले पाहिजे. असे ते भान मा. पंतप्रधान यांनी गमावलेले निवडणूकीत दिसले, जे की दुर्दैवी वाटत होते. भारतीय प्रसारमाध्यामधून स्क्रीप्टेड मुलाखती आणि प्रचारादरम्यान केलेली विधाने ही तर, देशाच्या पंतप्रधानांकडून निव्वळ थट्टा होती. गाय, गोबर, हिंदू-मुस्लिम, मंगळसूत्र, अल्पसंख्याक, मासे, मटण, मुजरा आणि सर्वात म्हणजे म.गांधी यांच्यावरील तर विधान अतिशय दु:खदायक असे होते. महाराष्ट्रात सतरा ठिकाणी पंतप्रधानांच्या सभा झाल्या त्यात केवळ तीन ठिकाणी विजय मिळवता आला, यावरून प.मोदींची लोकप्रियता कमी होत चालली आहे असे म्हणायचे की निवडणूक व्यक्तीची निवडणूक नसते तर ती लोकांच्या प्रश्नांची निवडणूक असते असे म्हणता येते. गत, सरकारच्या 'अब की बार चारसो पार' च्या गल्लीबोळातला घोषणांनी जी काय रया जायची ती गेलीच आहे. आता तोही एक एक स्टॅटर्जीचा भाग म्हणायचा तरी, बंगालमधेही अशीच रणनीती अवलंबवली होती, तेव्हा अधिक विजयासाठी अशा प्रसिद्धीची घोषणा आवश्यक असली तरी 'अब की बार चारसो पारचा' आवाज आता म्यूट झाला आहे.
सामान्य जनतेला वाढती महागाई, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, सुरक्षितता हे प्रश्न महत्त्वाचे वाटतात. कोणताही पक्ष असो वा सरकारे, जगण्या-मरण्याचे प्रश्न कायम सुटत राहिले पाहिजे असे जनतेला वाटत असते. आपण जेव्हा अशा प्रश्नांकडून भावनिक प्रश्नांकडे लोकांना घेऊन जाऊ पाहतो, तेव्हा काही काळ लोक भावनिक होतातही, पण हीच जनता आपली जेव्हा फसवणूक होते आहे, असे वाटते तेव्हा मतदानाच्या माध्यमातून बदल करते हा धडा या निवडणूकीने दिला.
शेतक-यांचे आंदोलन, चौकाचौकात खिळे ठोकून शेतक-यांची केलेली मोर्चाबंदी, केलेला गोळीबार, मणीपुरामध्ये चाललेली जाळपोळ, महिलेची काढलेली नग्न धिंड, करोना काळात अचानक निर्णय घेऊन हजारो-लाखो जनतेच्या मृत्युपंथास घेऊन जाणारे अचंबीत करणारे निर्णय. महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषणाचे आरोप, त्यांच्या आंदोलनाच्या निमित्ताने त्यांना फरफटत घेऊन जाणे, राजकारणाचा स्वार्थ हेतू ठेवून डोळ्यावर झापडे बांधून घेणे, हे मुख्य माध्यमांतून येत नसले तरी जनतेने पर्यायी माध्यमांचा वापर करून सरकार विरोधी रोष कायम ठेवला, टीका करीत राहिले. जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे सरकार मात्र दुर्लक्ष करीत राहिले.
दहा वर्षात ज्या काही योजना सरकारने आणल्या त्या निश्चितच स्पृहणीय असतील त्या जनतेसमोर अधिक सक्षमपणे ताब्यात असलेल्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून जनतेपर्यंत घेऊन जाता आले असते. तीनशे सत्तर कलम, देशभरातील रस्ते, शेतक-यांसाठीच्या विविध योजना, महिलांसाठीच्या योजना आणि अनेक गोष्टी आहेत पण त्याचा वापर निवडणूकीत करून घेता आला पाहिजे. अग्निवीर सारख्या फसव्या योजना, नवे शैक्षणिक धोरण, जनतेचे आरोग्य, तरुणांच्या नोकर भरतीची बंद झालेली दारे उघडणे अजूनही सरकारला शक्य आहे.
गत निवडणुकीत एकमेकांना शिव्या घालणारे, अजिबातच भरवसा नसणारे पक्षांना घेऊन आता नवे सरकार स्थापन होणार आहे, असे दिसते. मुल्यहीन राजकारण, अजिबातच विश्वास नसणारे राजकर्ते, राजकारणातील नैतिकता, क्षणाचा भरवसा नसणारी मतलबी स्वार्थी माणसं सर्वच पक्षात आहेत तेव्हा अशावेळी हे सरकार नवे आव्हानांना सामोरे जात चालवावे लागणार आहे. बहुमताच्या सत्तेसाठी अजून काही पक्ष फोडाफोडी होते का ते येत्या काळात जनतेसमोर येईलच.
धार्मिक झुली घेऊन मतदारांना भुलवता येईल पण जगण्या-मरण्याच्या प्रश्नांकडे डोळे झाक केली तर, जनता मतदानाच्या माध्यमातून सर्व निकाल लावते हा विविध राज्यांमधील संमिश्र निकाल पाहता म्हणावे वाटते. अठराव्या लोकसभेने भारतीय जनतेने विविध पक्षांना हा दिलेला धडा आहे, येत्या काळात येणारे सरकार जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे अधिक डोळसपणाने बघेल त्यासाठी नव्या आघाडी सरकारला शुभेच्छा आणि विरोधी पक्ष जो अधिक दमदार पद्धतीने 'इंडियाच्या' निमित्ताने अधिक मजबूत होत आहे, जनतेच्या प्रश्नासाठी सरकारवर दबाव ठेवतील, उत्तम निर्णय घ्यायला भाग पाडतील. निवडणूकीत जनतेने दिलेल्या धड्यांचा आदर करतील, निर्णय कायम स्मरणात ठेवतील. अठरावी निवडणूक यशस्वी पार पाडल्याबद्दल निवडणूक आयोगाचे अभिनंदन. निवडणुकांमधील होणारे घटते मतदान हा चिंतेचा विषय असला तरी, जागरुकपणे मतदानात सहभागी होणा-या जनतेचंही अभिनंदन. लोकशाही जिंदाबाद.
मिसळपाव

प्रतिक्रिया
बहुतेक, तुमच्या या चांगल्या
या निमित्ताने प्राडॉ लिहिते
एक राहिलं!
In reply to या निमित्ताने प्राडॉ लिहिते by अहिरावण
पुरावे?
संपादित. व्यक्तिगत टिपणी
In reply to पुरावे? by वामन देशमुख
अनाकलनीय
In reply to संपादित. व्यक्तिगत टिपणी by अहिरावण
हा हा
In reply to अनाकलनीय by प्रसाद गोडबोले
कोणाला गंडवताय सर ?
In reply to हा हा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माझीही आयडी उडवली होती
In reply to अनाकलनीय by प्रसाद गोडबोले
धन्यवाद.
In reply to पुरावे? by वामन देशमुख
लेखनावरील आपल्या प्रतिक्रिया
In reply to धन्यवाद. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वाह वा !
In reply to लेखनावरील आपल्या प्रतिक्रिया by वामन देशमुख
उत्तम समतोल लेख लिहीला आहेत
एक चांगला समतोल लेख
संजय आवटे फॉरवर्ड पोष्ट.
In reply to एक चांगला समतोल लेख by स्वधर्म
भारत व जर्मनी
In reply to संजय आवटे फॉरवर्ड पोष्ट. by बाबुराव
खुसपटे
In reply to भारत व जर्मनी by नठ्यारा
ज्जे बात !
In reply to खुसपटे by स्वधर्म
छान लेख.
भाजपच्या अपेक्षाभंगामागील कारणे
मन की बाते.
In reply to भाजपच्या अपेक्षाभंगामागील कारणे by नठ्यारा
आपल्या विचारांचं मतांचं स्वागत आहे. लेख लिहून झालं आणि असंख्य मुद्दे राहुन गेले. दोनहजार चौदाच्या भाजपा जाहीरनाम्यात महागाई, रोजगार, भ्रष्टाचार, काळा पैसा हे अनुक्रमे चार मुद्दे अग्रक्रमावर होते. विकासाचे मुद्दे निवडणूकीत होते. जनता या पूर्वीच्या सरकारच्या धोरणांना कंटाळलेली होती आणि या नव्या भूलीचा जनतेवर प्रभाव पडला. ”बस हुई महंगाई की मार अब की बार मोदी सरकार’ लोकांचा चमत्कारावर विश्वास. दोन हजार एकोनावीसला जाहिरनाम्यात मुद्दे भरकटले. आतंकवाद, सैनिक कल्याण, राष्ट्रीय सुरक्षा वगैरे गावगप्पा. दोन हजार चौवीसची निवडणूक ’मोदी की गॅरंटी” वर लढल्या गेली. कशाची गॅरंटी तर, गरीब परिवाराची सेवा, मध्यम परिवाराचा विश्वास, महिला सक्षमीकरण, युवकांना संधी वगैरेची गॅरंटी. पण निवडणूक प्रचारात निव्वळ ’हिंदू’ भोवती फ़िरली. जाहीरनाम्यात हिंदुंना आवडणारे कोणतेही मुद्दे नव्हते, ते केवळ भाषणबाजीचे विषय होते असे वाटते.
विकासाकडून सुरु झालेला प्रचार हिंदू भोवती फिरला. पण म्हणुन सरसकट हिंदुंना भाजपाची विचारसरणी आवडते असे समजण्याचे काही कारण नाही, कारण की विचारसणी मानणारी जी काही हिंदू मतं पडायची ती भाजपाला मिळालीच असतील. पण हिंदू आणि इतर अशांना या हिंदुत्व सोडून जी जीवन-मरणाचे प्रश्न आणि इतर मुद्यांकडे जायचं असेल तर भाजपाकडे त्यांना रोखण्यासाठी आता काही मुद्दे आहेत असे मला व्यक्तीगत वाटत नाही. काँग्रेस आणि आघाडीतील इतर पक्षांना याचा लाभ झाला. मुस्लीमांच्या मतदारांबद्दल आपण लिहिलंय, त्यात ती एकगठ्ठा राहीली नाहीत असे वाटते, उदा. उत्तरप्रदेशात मायावतींनी आपले जे उमेदवार दिले त्या उमेदवारांनी मुस्लीम मतं घेतली आहेत. आज उत्तरप्रदेशातली आकडेवारी पाहात होतो. एकूण सोळा मतदार संघात बसपामुळे भाजपा उमेदवार विजयी झालेले दिसतात. बसपामुळे तो विजय सुकर झाला. ते अधिकचे सोळा उमेदवार भाजपेतर निवडून आले असते तर ? क्रिकेट आणि राजकारणात जर तरला तसाही काही अर्थ नसतो.
आता चंद्रबाबू नायडू आणि नितेशकुमारांच्या सत्तेतील सहभागाच्या आघाडीचे परिणाम सुरु झाले आहेत. अर्थात, काँग्रेस पक्षातील आणि इतर पक्षातील खासदारांना भाजपा आपल्या शैलीने गळाला लावेल तेव्हा लावेल पण आता जदयु आणि तेलगु देसमच्या इशा-यावर हिंदुत्वच्या मुद्याला तिलांजली देवून आता त्यांच्या इशा-यावर ”सत्तेसाठी नाचते मी परवा कुणाची ” म्हणून मुजरे घालावे लागणार आहेत. दोघांनीही पाठींबा देतांना अटी घालायला सुरुवात केली आहे. लोकसभेचं अध्यक्षपद, मंत्रीपदं आणि अग्निपथ योजना मागे घ्या. समान नागरी कायद्यावर पुर्विचार करा. इकडे महाराष्ट्रातही विविध शासकीय कार्यालयात किती भरती बाकी आहे त्याची माहिती मागवली जात आहे. आघाड्यांचे सरकार, विरोधी पक्ष ताकदीने उभा राहील तेव्हा येत्या काळात एनडीएचं सरकार कसं चालेल ते पाहणे रोचक ठरणार आहे. चुभुदेघे
-दिलीप बिरुटेख्या ख्या ख्या .
सारांश
In reply to ख्या ख्या ख्या . by प्रसाद गोडबोले
महाराष्ट्रातील विधानसभा
In reply to सारांश by प्रसाद गोडबोले
समीक्षा चांगली केली आहे.
'शुगर कोटेड' स्लेजिंग आवडले!
देशाला जपा,काळजी घ्या आणि आभार.
काल काळजीवाहू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सेंट्रल हॉलमधे नेतेपदी आणि अर्थात पंतप्रधानासाठी निवड करण्यात आली. गेल्या दोन पंचवार्षिकचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बहुमताचा उत्साह आणि आता एनडीएचा उत्साहातला फरक जाणवणारा होता. बहात्तर मिनिटांच्या भाषणात एकोनावीस वेळा 'एनडीएचा' उल्लेख करावा लागला. आघाडी सरकारांना सहकारी पक्षांची जी हाजी हाजी करावी करावी लागते, त्याची सुरुवात अधिकृतपण उद्यापासून सुरु होईल. ''मोदी की गॅरंटी आणि काँग्रेसच्या 'हाथ बदलेगा हालात'' लोकसभेतील निवडणूकांचा प्रवास पंतप्रधानांच्या निवडीपर्यंत येऊन ठेपला.
संपूर्ण देशात सर्वाधीक सभा घेण्याचा मान अनुक्रमे तेजस्वी यादव, नरेंद्र मीदी प्रियंका गांधी, अमित शहा, राहुल गांधी यांनी आपापल्या मतदार संघात सभा गाजवल्या. निवडणूकांचा प्रचार संपला, निकालही लागलेत. नव्या रणनिती, नवे राजकारण त्याची धावपळ पुन्हा सुरु होईल. सर्वच पक्ष नेत्यांनी आपापला थकवा घातला असेल. ध्यानधारणा करुन प.नरेंद्र मोदी नव्या उत्साहाने उद्या तिस-यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील. महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री पराभवाची नैतिक जवाबादरी घेऊन 'मला मोकळे करा' वर ठाम आहेत. महाराष्ट्रातले येत्या विधानसभेचं राजकारण कसं असेल त्याची सुरुवात आता झाली आहे.
देशातील जनतेने भाजपास दोन वेळा बहुमत दिलं. देशासाठी काय केलं आणि काय केलं नाही त्याचा लेखाजोगा लोकसभेच्या निवडणू निकालांच्या माध्यमातून जनतेसमोर आहे. भारत जोडो अभियान, न्याय यात्रा यांनी राहुल गांधी यांच्या काँग्रेस आणि आघाडीलाही चांगलंच बळ दिलं. सत्तेची सिमारेषा दिसेल इतक्या अंतरावर उभे केले. एकहाती सत्ता देऊनही काहीच जर होत नसेल तर, जनतेने पुन्हा आघाड्यांच्या सरकारांकडे ही धुरा दिली पाहिजे असे जनतेला वाटले म्हणायला हरकत नाही. देशातील अजूनही खुप प्रश्न मोठे प्रलंबीत आहेत. संसदेतील कामकाज व्यवस्थित चालले पाहिजे. असे आणि इतर गोष्टीत बदल दिसणे आवश्यक आहे.
भारत देश सर्वांचा आहे, भारतातल्या विविध जाती, धर्म, पंथ, संस्कृती, भाषा वेगवेगळ्या असल्या तरी आपण सर्व गुण्यागोविंदाने राहतात, दर्व भारतवासी एक आहेत, राजकारणातील वैरभाव, द्वेषाचे राजकारण सोडून एकात्मतेची भावना उभी करणे गरजेची आहे. नवे सरकार भारतातील जनतेला जपेल,त्यांच्या विकासासाठी, जीवन-मरणांच्या प्रश्नासाठी अधिक सक्षमपणे काम करेल, जगभरात आदर्श असलेल्या लोकशाहीची काळजी घेईल, प्रसारमाध्यमे अधिक निष्पक्षपाती, निर्भीड, अधिक स्वतंत्र होतील अशी शुभेच्छा नव्या सरकारास देतो आणि थांबतो.
मिपाकर आंद्रे वडापाव, अथांग आकाश, वामन देशमुख, जेष्ठ मिपाकर गवि, स्वधर्म, कॉमी,नठ्यारा, कंजुसकाका, टर्मीनेटर, आपल्या प्रोत्साहनाबद्दल आभार, सर्व मिपाकर वाचक यांचेही आभार. चालक-मालक यांनी अभिव्यक्त होण्याची संधी दिली त्याबद्दल आभार. चुभुदेघे. -दिलीप बिरुटे
हया निवडणुकीतले काही ठळक
आणखी काही मुद्दे.
In reply to हया निवडणुकीतले काही ठळक by अमरेंद्र बाहुबली
जर मोदीना “चांगले” निर्णयच
In reply to आणखी काही मुद्दे. by अमरेंद्र बाहुबली
जर मोदीना “चांगले” निर्णयच घ्यायचे होते तर मागच्या दहा वर्षात का घेतले नाहीत? तेव्हाही एखाती सत्ताच होती ना?दुर्दैवाने या बाबतीत अबांशी सहमत आहे. संघ-भाजप-मोदी यांना जे काही करायचे होते ते करण्यासाठी सलग एक दशकाची प्रचंड बहुमतातील सत्ता पुरेशी नव्हती का? ३०० पार असताना फारसे काही करू शकले नाहीत ते २०० पार आल्यावर काय करणार आहेत? काही नाही.बकवास
In reply to आणखी काही मुद्दे. by अमरेंद्र बाहुबली
ज्याना मोदी, शहा, फडणवीस,
In reply to बकवास by टीपीके
अहो अ बा, नाही हि लोकही नाही
In reply to ज्याना मोदी, शहा, फडणवीस, by पॅट्रीक जेड
फक्त द्वेषातून बकवास लिहिलय
In reply to अहो अ बा, नाही हि लोकही नाही by टीपीके
हाय ला
In reply to हया निवडणुकीतले काही ठळक by अमरेंद्र बाहुबली
पॅट्रीक जेड
In reply to हाय ला by सुबोध खरे
मिपा पण विषामृत खेळतं काय?
In reply to पॅट्रीक जेड by वेडा बेडूक
डॉक्टरांच म्हणजे कसं बघा
In reply to मिपा पण विषामृत खेळतं काय? by सुरिया
मीपावर धागे काढून दिवसरात्र
In reply to डॉक्टरांच म्हणजे कसं बघा by पॅट्रीक जेड
तुमच्या बद्दल नाहीये ते.
In reply to मीपावर धागे काढून दिवसरात्र by सुबोध खरे
@ सुरिया
In reply to मिपा पण विषामृत खेळतं काय? by सुरिया
काहीच न होणे .... ?
विरोधकांचा विजयबिजय आहे तो
In reply to काहीच न होणे .... ? by नठ्यारा
तुम्ही कुणाचा डू आय डी
In reply to विरोधकांचा विजयबिजय आहे तो by पॅट्रीक जेड
‘मोदी ओरिजनल ब्रँड’, शिवसेना
आता सध्या भाजपने फडणविसाना
हायला
शिंदेना राज्यमंत्रिपद आणी
लिंबूटिंबू उभे केल्याची शिक्षा
In reply to शिंदेना राज्यमंत्रिपद आणी by पॅट्रीक जेड
शिंदेंचा स्ट्राईक रेट ३
In reply to लिंबूटिंबू उभे केल्याची शिक्षा by नठ्यारा
महाराष्ट्राच्या वाट्याला एकच
सुबोध खरे, शाम भागवत, वामन
निकाला आधी तर सर्व ऍक्टिव
In reply to तुमच्या भंपक प्रतिसादांना by सुबोध खरे
किती लोकांनी तुम्हाला "
In reply to निकाला आधी तर सर्व ऍक्टिव by पॅट्रीक जेड
गोदी मीडिया किती सत्य दाखवते
In reply to किती लोकांनी तुम्हाला " by सुबोध खरे
ध्रुव राठींवर तुम्ही विश्वास
In reply to गोदी मीडिया किती सत्य दाखवते by पॅट्रीक जेड
पॅट्रिक मान यु बॉर्न ऑन
In reply to गोदी मीडिया किती सत्य दाखवते by पॅट्रीक जेड
मी तरी यावेळेस भाग घेतला
In reply to सुबोध खरे, शाम भागवत, वामन by पॅट्रीक जेड
का हो?
In reply to मी तरी यावेळेस भाग घेतला by शाम भागवत
तुमचा उदय झालेला दिसतोय....
In reply to सुबोध खरे, शाम भागवत, वामन by पॅट्रीक जेड
बाकी मोदींची अनेक कामे मला
पण स्वतःचा उदो उदो नडला.
In reply to बाकी मोदींची अनेक कामे मला by पॅट्रीक जेड
+१
In reply to पण स्वतःचा उदो उदो नडला. by कानडाऊ योगेशु
योग्य धडा कोणता ....
In reply to पण स्वतःचा उदो उदो नडला. by कानडाऊ योगेशु
हिंदूंसाठी भयसूचक घंटा आहे.
In reply to योग्य धडा कोणता .... by नठ्यारा
कर्नाटक विधानसभा
In reply to योग्य धडा कोणता .... by नठ्यारा
सौ कुत्ते एक शेर का शिकार कर
In reply to कर्नाटक विधानसभा by कानडाऊ योगेशु
ही हिंदूंसाठी भयसूचक घंटा आहे
In reply to योग्य धडा कोणता .... by नठ्यारा
१० वर्षे एकहाती सत्ता असूनही
In reply to ही हिंदूंसाठी भयसूचक घंटा आहे by कानडाऊ योगेशु
स्वतःचा उदो उदो
In reply to बाकी मोदींची अनेक कामे मला by पॅट्रीक जेड