✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मं...(मग)!

प — प्राची अश्विनी, Wed, 05/22/2024 - 12:29
मं ..(मग?) मsssग कधीतरी 'रे' ची वाट बघून बघून थकलेल्या 'गं' चा स्वर चढतो. "मीच नेहमी हाक मारायची, मीच भेटायची बोलायची धडपड करायची, तुला काहीच नाही वाटत माझ्याबद्दल" या "मीचमी"च्या मुद्दूसूद भांडणात मग हळूच डोकावतो तो मं.. "राग येणार नाहीतर काय, मं(मग)? मुद्दामहून करतो का रे? मं(मग)?" हा मं एकटा नसतो, मागून त्याच्या ग असला तरी अध्याहृत, कळत नकळतसा. .... मं ची मिजास त्याच्या तीव्रतेत. मुक्कामाची त्याची जागा देखील ठरलेली, मोक्याची. झुटामुठा राग आल्यावर नाकाच्या शेंड्यावर, मोग-याच्या कळीसारखा गोलमटोल फुगरा! मानेच्या मुरक्यात, मासोळीसारखा लयदार! मृगनयनांतल्या मेघांआड दडलेला, मुसमुसणारा.. मोहक बिहक मुळीच नसतो तो अशा वेळी.. माहीत असतंच ते "गं"लाही चांगलंच्. मुकामुका तरी कितीवेळ रहाणार बिचारा गं? शेवटी मनातलं बोलून मोकळा होतो.. आणि मोठ्या तो-यात उभा रहातो कमरेवर दोन हात ठेऊन दिवाकरांच्या नाट्यछटेतल्या रुसलेल्या मुलासारखा, "बोलावणं आल्याशिवाय नाही" म्हणत.. ... आता बारी मितभाषी कोमल रे ची असते, मृदू मुलायम शब्दांनी गं ला मनवायची, तीव्र मं सोबत धीरानं संवादी होण्याची, गं ला असंss जवळ घेऊन, आंजारून गोंजारून, "सा"वरून स्थिरावण्याची.. मावळतीला मधुरगंभीर मारवा छेडण्याची... ( रे आणि गं नंतर म अपरिहार्य होता. आणि मारवा असल्यानं कवितेत प वर्ज्य:))

प्रतिक्रिया द्या
1424 वाचन

💬 प्रतिसाद (4)

बाई बाई कहरच...

Bhakti
Wed, 05/22/2024 - 13:01 नवीन
मृगनयनांतल्या मेघांआड दडलेला, मुसमुसणारा..
असाच आमचा मं :) मं... धुसरलेल्या वातावरणात मधाळ गोडवा.... गुंतलेल्या छटांना मं सोडवत मोकळीक देतो अल्हाळपल्हाळ लावत गं पहाटेपर्यंत मरवा फुलवायची ता"रे" झेलतं मनोहरी मग अंगण दिसायचे..
  • Log in or register to post comments

अहा!

प्राची अश्विनी
Fri, 05/24/2024 - 09:18 नवीन
भक्ती, खूप खूप thanks!:)
  • Log in or register to post comments

अद्भुत आहे काव्यमाला.

चित्रगुप्त
Fri, 05/24/2024 - 13:45 नवीन
"कवित्व शब्द सुमनमाळा.. अर्थपरिमळ आगळा" याची प्रचिती या मालिकेत येते आहे. खूप खूप सुंदर आणि कल्पक.
  • Log in or register to post comments

मितभाषी कोमल रे ची असते, मृदू मुलायम शब्दांनी गं ला मनवायची,

कर्नलतपस्वी
Fri, 05/24/2024 - 18:02 नवीन
सगळ्याच घरात अशी रागदारी नसते, ज्यांच्या घरी तीव्र 'ग' वसतो त्यांच्या दारी 'राग', असतो 'मग, संवादी 'रे',ची 'ध',(वादी) धडपड सुरू होते 'ग', मधील गारवा शोधण्यासाठी पण एक जन्म सुद्धा कमी पडतो मं ..(मग?),'समे', वर येण्यासाठी कवीता आवडली.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा